Sunday, 19 July 2020

शिकवण चुकांची !!

शिर्षक : शिकण्याचं खरं व्यासपीठ : चूक (FAULT) !!

लेखन : एन.के. ( पत्रकार ; मो.- 8806605852 )

[ नमस्कार ! खुप दिवस नंतर विषय घेऊन येतो आहे, मानवाने आज पर्यंत अनेक जीवनाची चढ उतार पाहिले, अनेक सुख - दुःखाची दारे ठोठावली त्यातून अनेक गोष्टी पोळल्या ही असतील आणि काही आठवणींचा कप्पा गडद ही केले असतील ; आणि यावरून माणसाने जीवन प्रवासात काही अडचणी चुका मधून ही उद्भवल्या असतीलच आणि एक लक्षात ठेवा, चुकणे हा माणसाचा स्थाई स्वभावच बनला आहे, कारण जो निर्णय घेतो त्याच्याच हातून चुक होते जो निर्णयच घेत नाही त्याच्याकडून चूक होण्याची शक्यता नसतेच, पण एकदा केलेली चुक परत न करणे यालाच शहाणपण असे म्हणतात. असाच एक सुंदर विषय वर लेखन तुमच्यासाठी... ]

आजच्या टॉपिकवर येतो, चूक करणे किंवा होणे हे माणूसपणाचे लक्षण असले तरी चुकांची पुनरावृत्ती न करणे आणि केलेल्या चुकांच्या परिणामांची जबाबदारी उचलणे हे गुणी माणसाचे लक्षण आहे. बरोबर आहे आज काल माणूस चुका करतो पण त्यावर भाष्य किंवा ते स्वीकारून न घेता त्यावर पडदा टाकण्याचाच जास्त वेळा प्रयत्न होतो. असे न करता झालेल्या चुका पदरात घ्या आणि स्वछंद मनाने आत्मसात करून त्यावर मान्यताप्राप्त बनायला शिका.
         तसेच प्रत्येक माणसांत गुण आणि दोष हे असतातच. कदाचित एकाकडे गुण जास्त असतील तर दुसऱ्यात ते कमी प्रमाणात असतील. काहींचे दोष डोळ्यावर येतील तर काहींचे दोष छुपे राहतील. हे सगळं डबोलं अंगावर घेऊनच आपण जगत असतो. त्यामुळे काही फायदे होतात तर काही तोटे, पण सर्व फायदे-तोटे भोगत जगणं हा आपला स्वभावधर्म होऊन बसतो आणि आपण आपल्याकडे शांतपणे बघतच नाही. एखादवेळेस आजार झाला, अपघात झाला तर नाइलाजास्तव का होईना, आपल्या सवयी, जीवनशैली यात थोडा बदल करतो. पण तेसुद्धा अगदी मनापासून केलेलं नसतं. अगदी अस की काही बाबतीत जगण्याच्या प्रत्येक वाटेवर, काळात, अलीकडे किंवा आपल्या बोली भाषेतल्या पलीकडे चुका सुधारून घेऊन त्या उलट चांगल्या सवयीना आवर्जून प्राधान्य द्या. २. अस कधी कधी स्वतःमध्ये डोकावून बघा ना वाटून जातं की, दुनियेतले कोटय़वधी लोक असंच जगत असतील जसे मागील पान उलटून त्याच वाटेने नवा दिवस व्यतीत करीत असतात. यालाच आम माणसाचं जीवन म्हणतात. जर उगवणारा प्रत्येक दिवस नवा असेल तर जे आतापर्यंत करत आलो त्यात चांगला बदल व्हावा असे अगदी थोडय़ा माणसांना का वाटते? जगात चांगला माणूस म्हणून जगणे थोडय़ा माणसांना का बरं जमते? आणि आपण बहुसंख्य जसे आहोत तसेच वर्षांनुवर्षे का जगत राहतो. का रुटीनमध्ये जगणं हीच आपण आपली नियती मानतो? म्हणजेच एक प्रकारे आपल्या आयुष्याचे दोर नियतीच्या हातात देऊन तिच्या तालावर पावले टाकत राहतो...? म्हणून कधीही खचून न जाता नशिबाच्या कागदाची वाक्ये न विचारात घेता स्वतःच्या मनाची आर्त हाक ओळखायला शिका. ‘मन’ हे असे वाहन आहे जे घरबसल्या आपल्याला जगाची सैर घडवते.. सगळीकडे फिरवून आणते..मन अर्थात आपल्या शरीराचा बॉस असतो. जो जस म्हणतो तस करावं लागतं. मन तस खुप मोठ असतं. सगळ्यांची चिंता वहाते.. कधी कधी उदास असते तर कधी आनंदी असते..एंजल आणि सैतान हे मनाचे दोन रहिवासी आपल्याला कधी सुंदर विचारधारा देतात तर कधी वाईट विचारधारा..एक अस ही विचार करून बघा की मन थकत नाही.. सतत उंडारत राहतं मनाचे काम दिवसरात्र चालू असतं. इतकं की कधी कधी आपल्याला कंटाळा येतो. कामात असतानाही मन शांत बसू देत नाही.
जाता जाता एक शब्दांकन असे की माझे गुरुवर्य माझ्या कामाच्या ठिकाणी असणारे एक वरिष्ठ अधिकारी मा. निशांत सर यांनी या विषय बद्दल आपल्या मार्गदर्शन मार्फत खूप छान बोध दिला त्यांच्या आत्मविश्वास भरे संभाषण नंतर हा विषय ठरला माझा त्यांनी आपल्या माहितीत असे विशद झाले की "माणसाने चुक करू नये, आणि जर अनभिज्ञ एखादी चूक झालीच तर त्याची जबाबदारी किंबहुना मान्य करायला स्वीकारा. तसच झालेल्या चुकामधून खूप शिकण्यासारखं असत ते शिका आणि सुंदर आयुष्याला गोंडस बनवा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बाबतीत चुका घडतात चुका कधी त्रासदायक असतात पण क्षणात गोंधळून न जाता शांत बसून वेळ काढा आणि पुन्हा चूक का झाली यावर विचार न करता चूक होणार नाही याकडे एक सुंदर विचार प्रेरित करून जोमाने कामाला लागा."

धन्यवाद !