Sunday, 1 April 2018

मैत्रीत तूच महत्वाची मला....!

मैत्रीच्या स्नेहबंधात तुझी स्पंदने...

प्रत्येक पावलावर तुझ्या मैत्रीची जाणीव घट्ट आहे,
तुझ्या स्नेहाची किरणे आज ही माझ्यात प्रकाशमय आहे,
क्षणिक मैत्री कधी जमली नाही,
 नातं दोन मानाचं जोडलं आहे घटिकभरासाठी हे बंध नाही...!

भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी तुझी हि मैत्री,
सुकलेल्या फुलांना बहर आणणारी,
दुखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी तुझी हि मैत्री,

अगदीच निराळी आपली मैत्री..
निराळा तो व्हाट्स अप कट्टा..
रोजच आम्ही भेटतो...!
आजही तसेच भेटू..
तिथेच भेटू..!

     लेखन- एन.के. (पत्रकार)

नोटबंदी आणि प्रशासन = सध्य परिस्थिती.

शीर्षक :- म्हशीचे वर्षश्राद्ध...

लेखन :- एन.के.(पत्रकार)

"हर हर मोदी,घर घर मोदी", "छत्रपतींचा आशिर्वाद" आणि "सबका साथ सबका विकास" या सगळ्या ब्रीद वाक्यांचा अभ्यास केला तर नक्कीच विकास दर वाढलाय, काळा पैसा बाहेर आलाय का वेगवेगळ्या समर्थक आणि वेगवेगळ्या विरोधकांची त्यांच्या त्यांच्या लेखनातून समर्थन आणि विरोध व्यक्त झाला असेल पण या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेतून आज शेतकऱ्याला योग्य भाव मिळाला का...? "विकास" सुधरलाय आता इतका कि या डिजिटल संकल्पेतून कंप्युटर वरून ज्वारी आणि बाजरीची पेरनीही झाली आहे. नोटबंदी करून वर्ष झालं सगळी कडे विकासाच्या मुद्द्यावर माझंही वाचन झालं विविध क्षेत्रातून विविध मतांच्या विविध मुद्देही पडताळून झाले असे खालील काही प्रश्न पडले न ते लेखनाच्या माध्यमातून दृष्टीक्षेपात आणायचं ठरवलं *(कितीही पटण्यासारख लिहलं तरीही विरोधकांना विरोध करायला पाहिजेच कारण जनतेपेक्षा झेंडा महत्वाचं)* चला तर वर्ष पूर्तीनंतर मला पडलेले काही प्रश्न-  आज ग्रामीण भागात सकाळी उठून बैलजोडी घेऊन शेतात जाणाऱ्या माणसाला GST चा फायदा किती झाला,
महिन्याला संपणाऱ्या गॅस टाकीला घेऊन तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या बापाला आता ९६/- जास्त मोजावे लागणार आहेत कारण देश बदलतोय त्यामुळे सामान्यांनी ९६/- वर्गनिस्वरूपात सर्वांनी हुकमावरून भरायचे आहेत, क्रूड ऑइल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ३८% नी स्वस्त झालं असून तेल आपल्याला कमी किमतीत मिळण्या ऐवजी अधिक रकमेत मिळत आहे याचा उद्देश एवढंच कि आपण वाहन घेऊन प्रदूषण करता आणि भविष्यकाळात वाढीव किमतीमूळ आपण सायकल वर प्रवास करून प्रदूषणाला आळा बसवणारे महान महामेरू होणार आहात, ६० वर्षात काँग्रेस ने घोटाळे वर घोटाळे केले आणि देशावर पावणे तीन लाख हजार कोटींचे कर्जाचा डोंगर उभा केला आहे आणि त्याला हटवण्यासाठी माझ्या "मा.पंतप्रधान साहेबानी" अवघ्या ३ वर्षात साडेसात लाख हजार रुपयांचे कर्ज देशावर निर्माण केले आहेत कोणी काही म्हणु नका कारण देश बदलतोय डिजिटल इंडिया होतोय पुढच्या काही दिवसात घरात बसून पेरणी आणि online मेट्रोने खते आणायला आपण जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकणी जाणार आहोत... घाबरू नका कर्ज काढून आपल्या मुलाबाळांना शिकवा कारण शेतामध्ये कोपऱ्यात बांधावर पुस्तक ठेऊन पेरणी आणि शेतीची मशागत करताना पाहायला मदतीची होणार आहेत आता पर्यंत १५ लाख लोकांच्या नोकऱ्या तर गेलेत पण सरकारी नोकर भरती बंद झाल्यावर या शिक्षणाचा शेतात उपयोग होईल, सरकारी योजना काय आहेत ते नीट समजून घ्या कारण जाहिरातीतून आपल्याला बोध मिळणार आहे त्याची माहिती मिळणार आहे आणि तुम्ही 'लाभार्थी' होणार आहात ज्या पद्धतीने त्या आजोबांचं आणि आज्जींच फोटो छापला गेला तसं तुमचं कोणी अचानक फोटो वैगरे काढून नेलं तर भिऊ नका आपण त्यांच्या जाहिरातीचे लाभार्थी असणार आहात कारण कोट्यवधी रुपय जाहिरात करण्यासाठी शासन देत आहे, आणि आपला संसार भविष्य काळात सुख आणि समृद्धीचा होणार आहे जर घरखर्चासाठी पैसे कमी पडत असतील तर शेती करायला पैसे नसतील घाबरू नका प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रु येणार आहेत आणि लवकरच विकास दर ७% वरून २.४ वर आलाय लवकरच तुमच्या पर्यंत पोहचेल सगळीकडे विकास भक्कम होतोय आणि प्रगती हरवली आहे शोधाच्या ताणावमध्ये कर्ज बाजरी न होता बिनधास्त राहा आत्महत्या वैगरे करू नका कारण सरकार ने सर्वात मोठी कर्जमाफी केलीय आणि आपण सगळे त्याचे "लाभार्थी" आहोत जाता जाता एक उदाहरणं देतो जनतेला आणि काहींना पटेल न पटेल पण वाचा "दूध दाखवून माशीला राखायला लावणारं मालकी सिस्टीम..."
 उदा. त्याच्या गोठ्यातली म्हैस फार मारकी होती, दिसेल त्या गोष्टीला म्हैस ढुसण्या मारायची म्हणून गोठ्यातल्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असायच्या त्यामुळे गोठा कायम अस्वच्छ दिसायचा. गोठा असा पाहून मालक सालगड्याला नेहमी त्याच्या अप्रामाणीकते साठी शिव्या घालायचा आणी कोण्या पाहुण्याला गोठ्याची ही परिस्थिती दिसू नये म्हणून मालक गोठा नेहमी झाकून (अपारदर्शी) ठेवायचा.
ह्यावर जालीम उपाय म्हणून एक दिवस सालगड्याने म्हैसच मारून टाकली, आता गोठा कायम स्वच्छ दिसायला लागला, मालकाचेही सालगड्याला शिव्या देणे बंद झाले, गोठा स्वच्छ असल्यामुळे आता मालक गोठा पारदर्शी ठेवू लागला होता. पण म्हैस मारल्यामुळे मालकाच्या मुलांना दूध मिळेनासे झाले म्हणून मुलं रडू लागली पण सालगडी महा चतुर, त्याने म्हैस मारल्यामुळे मालकाला चामडे मिळाले हा किती मोठा फायदा आहे हे पटवून देणे चालू केले.. ईकडे उपाशी पोरांना हेच कळेनासे झालेय कि दूध महत्वाचे की म्हशीचे चामडे..!!

महिला : स्वातंत्र्य आणि कर्तव्य...? (ज्वलंत प्रश्न)


शिर्षक:-  महीला कर्तव्याच्या विळख्यामुळं पारतंत्र्यात

दि. ३०/०६/२०१७

लेखक - एन. के.

आधुनिकतेच्या काळात वावरताना महिला सुद्धा खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात परिणामी ५०% आरक्षणाच्या नावाखाली महिलांना सुद्धा आता आरक्षण, हवं तर स्पेस म्हणून त्यांना मिळत आहे. आणि आज महिला अनेक क्षेत्रात प्राविण्य मिळवत आहेत.
देशात महिलांचे स्थान, स्थिती पाहून तुम्ही देशाची स्थिती सांगू शकता. भारतालाही मोठी प्रगती साधायची असेल तर महिला सक्षमीकरण अत्यावश्यक आहे. महिला सक्षमीकरणासाठी समाज, देश आणि महिलांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजे. महिलांना समाजात महत्त्वाचे स्थान आहे. त्यांना आदिम काळापासून पुजनीय ठिकाणी ठेवले आहे. मात्र आजच्या घटना पाहता यावर संशय येतो. दिल्ली बलात्कारानंतर महिला अत्याचाराविरूद्ध उघड चर्चा आणि आंदोलने झाली. तेव्हापासून यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे महिला अत्याचाराच्या घटना पुर्णपणे थांबल्या नाहीत मात्र समाजाने, शासनाने याबद्दल विचार केला यातच थोडे यथ आहे.
महिलांनी आपल्या कर्तृत्वावर अनेक क्षेत्रात आघाडी मिळविली आहे. बचतगटाच्या माध्यमातून तर महिलांनी ग्रामीण व शहरी विकासाच्या विविध क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. त्यामुळे आजची स्त्री ही चूल आणि मूल या पुरातन म्हणीनुसार तेवढयापुरतीच मर्यादित न राहता ती आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात आघाडीवर राहून पुरुषापेक्षा काकणभर सरसच ठरत आहे. त्यामुळे आजची महिला ही केवळ महिला राहिली नसून ती सक्षम अशी सबला स्त्री बनली आहे.
‘स्वयंविकासाबरोबरच समाजात समानतेने, बरोबरीने विकसित होण्यासाठी महिलांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार किंवा तसे वातावरण तयार करणे म्हणजे महिला सक्षमीकरण’ अशी सर्वसाधारण व्याख्या मान्यवरांनी येथे केली आहे. या व्याख्येप्रमाणे वातावरण, अधिकार अजूनही महिलांना मिळत नाहीत, मात्र त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी प्रसारमाध्यमे, पोलीस, न्यायालय, समाज, स्वयंसेवी संस्था यांच्या भूमिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
समाज सातत्याने बदलत असतो. त्या बदलाचे पडसाद महिलांच्याही जीवनमानावर होत असतात. त्यातून त्यांची भूमिका, महत्त्वाकांक्षा आणि दृष्टिकोन यामध्येही मोठा बदल होत आहे. भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांकडे, त्यांच्या अधिकारांकडे, व्यक्तिस्वातंत्र्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र अजूनही संकुचितच आहे. तो दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. हे प्रश्न मांडणारे, त्यावर उपाय सुचविणारे, उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी लक्ष देणारे महिलांप्रमाणेच पुरुषही आहेतच, हे वास्तव असूनही ही वैचारिकता समाजातील काहीच पुरुषांमध्ये असल्याचे आढळते. अधिकार गाजवणारी पुरुषी मानसिकता बदलायची असल्यास महिला सक्षमीकरणाची चळवळ ही तळागाळापर्यंत पोहोचलीच पाहिजे.
चूल आणि मूल’ ही एक चौकट आहे, स्त्रीजीवनाची. स्त्रीचे आयुष्य या चौकटीतच वावरत, ती शिक्षित असो वा नसो. ती ही तिची सगळी कर्तव्य बिनभोबाटपणे बजावत असते, प्रसंगी त्याग तर तिच्या पाचवीलाच पूजलेला..
स्त्री जगत जाते तिचं आयुष्य , जे तिच अस काहीच नसत. चूल आणि मूल ही गोष्ट सोपी नाही, हे फक्त एक स्त्रीच जाणते. ती स्वतःच अस्तित्व पणाला लावून एक जीव जन्माला घालते, अन या जीवसृष्टीचे चक्र चालू राहावे यासाठी सिहांचा वाटा उचलते.
ती चूल सांभाळते, घरातल्या माणसांची काळजी घेणं, त्यांना हवं नको ते बघण, मुलांना वाढवणं, त्यांच्यावर सुसंस्कार करणं. ती चूल आणि मूल सांभाळता सांभाळता एक नवी पिढी घडवत असते.
हे सगळं ठीक आहे, पण या सगळ्यात ‘ती’ कुठे असते?…. तिच्या इच्छा, तिची स्वप्न एका मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त असतात, आणि त्या बंदिस्त कोपऱ्याची दार कधीच उघडत नाही.. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढते, पण तिची चूल आणि मूल चौकट ती कधीच सोडत नाही, खरतर कधी सुटतच नाही.
चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री म्हणजे ‘सदासर्वदा ग्राह्य’ धरली जाणारी एक व्यक्ती असते, तीच अस्तित्व असूनही कधीच जाणवत नसत.  अस सगळं असेल तर, ‘चूल आणि मूल’ हे एका स्त्री साठी वरदान कस असेल? हा प्रश्न प्रत्येक संवेदनशील मनाला पडणारच. स्त्री निसर्गतः च सहनशील असते, तर चूल आणि मूल ही तिच्या सहनशीलतेची कसोटी ठरू शकते, वरदान नाही….
स्त्रीने ‘चूल आणि मूल’ सांभाळणं हे वरदान आहे, निसर्गासाठी ज्याचे जीवनचक्र तिच्यामुळे पुढे सरकते.., वरदान आहे, त्या प्रत्येक घरासाठी ज्याचा कमावता भले एक पुरुष असेल, त्या पुरुषासाठी, कारण त्याच्या घराची भविष्यकालीन पिढी ती घडवत असते, अगदी समर्पित भावनेने..!

एकूण एक सांगायचं झालं तर महिलाना एक असा व्यासपीठ उपलब्ध असावं कि जेणेकरून निर्णायक जीवनाच्या चांगल्या रिझल्ट साठी निर्णय तरी मनमोकळ्या पणाने घेण्यासाठी असं एक स्वातंत्र्य असावं यासाठी जुन्या रूढी आणि परपंरांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शेवटचे उपाय असतील.


   धन्यवाद...! 

समस्यावर मार्ग हेच जीवनाचं यश...!

🔘 समस्या नाहीत असा मानव नाही आणि उपाय नाहीत असं आयुष्य नाही... 🔘

माणसाच्या आयुष्यात अनेक चढ उतार होत असतात पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पथदर्शक फलक नसलं तरी एखादा पादचारी आपल्यासाठी देवाने ठेवलं आहे म्हणून फक्त प्रत्येकाचा सल्ला घेऊ नका विचारात्मक गोष्ट म्हणून मनात घेऊन पाऊल उचला म्हणजे यशाला सुद्धा तुमचंच पदर दिसेल वाचता वाचता एक गोष्ट आठवली... एका खेड्यात एक शेतकरी रोज शेतातल्या विहिरीतून पाणी भरून घेऊन घरी यायचा. यासाठी तो दोन बादल्या काठीला बांधून नेत असे. विहिरीवर दोन्ही बादल्या भरून तो घरी जायला निघे. माञ त्यातील डाव्या बाजूच्या बादलीच्या तळाशी एक बारीक छिद्र पडलेले असल्याने त्यातून थेंब थेंब पाणी गळायचे. शेतातून घरी जाईपर्यंत त्या छिद्रवाल्या बादलीतून निम्मे पाणी वाटेत सांडून जायचे.
असे रोज व्हायचे. एके दिवशी त्या गळक्या बादली कडे पाहून चांगलीवाली बादली म्हणाली, "बघ, मी किती मालकाच्या उपयोगी पडते. पूर्ण पाणी त्याच्या घरापर्यंत नेते. नाहीतर तू पहा, निम्मे पाणी वाटेत सांडत येते"
हे ऐकून त्या छिद्रवाल्या बादलीला वाईट वाटते.
दुसऱ्या दिवशी शेतकरी जेव्हा दोन्ही बादल्या घेऊन विहिरीकडे निघतो, तेव्हा ती गळकी बादली त्याला म्हणते, "मी तुझी मेहनत वाया घालवते आहे. निम्मेच पाणी घरापर्यंत मी नेतेय. तर तू मला टाकून देऊन नवीन छान बादली का घेत नाहीस ?"
यावर शेतकरी हसून सांगतो, "वेडी आहेस का ? तुला माहित नाहीये कि तू किती छान काम नकळत करते आहेस. नीट पहा, आपल्या वाटेवरच्या डाव्या बाजूच्या कडेला छान छान हिरवळ फुलली आहे. त्यात छान छान फुले देखील उगवली आहेत. ही डावी बाजू पहा किती चैतन्याने रसरसलेली आहे. ही तुझ्या बाजूची डावी बाजू आहे. ही तुझ्या त्या गळक्या थेंबाची कमाल आहे आता उजव्या बाजूला पहा. त्या बाजूच्या बादलीतून एकही थेंब गळत नसल्याने त्या साईडला कसलिही हिरवळ उगवलेली नाही. फुले तर नाहीच नाही !!
गेल्या अनेक महिन्या पासून मी देवपूजेसाठी जी फुले नेतोय ती याच डाव्या बाजूची आहेत. माझ्या या देव कार्यात तुझ्यामुळेच जी फुले फुलली त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तळाशी पडलेल्या छिद्राचे तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस !!

हे ऐकून ती गळकी बदली शहारली. मनापासून आनंदित झाली !!

जस पौर्णिमेला चंद्र आहे आणि त्याला डाग आहेत तस अमावश्याला भयाण काळोख दिली आहे तस प्रत्येकात देवाने चांगलं-वाईटची मेमरिकार्ड दिलेल आहे फक्त आपल्याकडं कशाचा संग्रह आहे त्यावरून वाटचाल करताना आपण कुठं तर चुकतो मग नशिबाला दोष देत बसतो...

💐 : दोष कोणात नाहीत ? सगळ्यात आहेत. त्यामुळे मी चांगला, तो वाईट, असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. पण त्या दोषातून जर कधी कोणाचे भले होत असेल तर तो दोष त्या व्यक्तीने "अभिमानाने" मिरवावा. आधी थोडा काळ इतर लोक याला नावे ठेवतील. पण अंतिम सत्य पाहिल्यावर तेही नतमस्तक होतील !!

✍🏼 एक सुंदर विचार👌🏼

समस्या नाही असा "मनुष्य" नाही...!
आणि "उपाय" नाही अशी समस्या नाही...!!

     .... त्यामुळे

   ☄Be Positive☄,,,

    - तुमचा एन.के. ( पत्रकार )

उसंत हवं आहे जीवाला...!



शीर्षक - अ(महत्वाच्या) व्यापात व्यस्थ असलेली "आपली" माणसं
लेखक - एन.के. (पत्रकार)
मोबा.- ८८०६६०५८५२
आधुनिक जग आणि मानवी जीवनातील वेग याचा संगनमताने विचार केला तर दोन्हीला गती आहे. या गतिमान जीवनात आपण कितपत आपल्या माणसासोबत वेळ घालवतो ? आपल्या माणसासोबत व्यक्तिशः कित्ती संलग्न राहतो किंचितच ना...? आपलं आयुष्य जगताना काही जणांना असा पण एक प्रचित भास होत असेल का हो बघा ना- तेल संपलेल्या पणतीची वात वाढवून, फाटलेल्या पतंगाला ढील देऊन, सुकलेल्या ओढ्यात खड्डा खणून, सगळं करून झालं,यश काही येईना म्हणून नशिबाला डोष देत आपण आपलं आयुष्य जगत असतो काहीदा बोलायला वाईट वाटत ओ पण जगामध्ये इतकी मानस कमावली पण कुणाकडे २ मिनिटे बोलायला वेळ नाही आज मी थांबलो तर माझा काळ वाईट होईन म्हणून खोटी ऊर्मी अंगात आणून माणूस असा आत्मविश्वास घेऊन जगतोय ते पण सांगू का...- मी थांबणार नाही,थांबून चालणार नाही, अजुनही मुजलेल्या विहिरीवर मोट बांधायची आहे,संपलेल्या पारायणात टाळ वाजवायचे आहेत,रिकाम्या देवळाला फेर्‍या घालायच्या आहेत,एवढं सगळं करायचं आहे. म्हणून आपलं आयुष्य वेशीला टांगून घ्यायचं आणि कधीतरी आपणच विचार करत बसायचं व्यस्त व्यस्त व्यस्त झालोय... ! काहीच्या काहीच सुचत नाही... !
आम्हाला सुद्धा आता कळेना झालाय राव माणसाशी प्रेमानं वागावं का रागानं माणसांना आठवण काढून फोन केला तर इतकं बोलतात कि जगाची सगळी काम यांनाच दिलेत त्यांचं तर काय प्रत्येकाच्या घरातलं सुरवात पण असंच झालाय त्याला तर कोण काय करणार एका कुटुंबातलं (शिक्षीत) - एका बायको आणि नावाऱ्यातलं संभाषण साधारणतः - अरे सकाळी उठल्या उठल्या WhatsApp messages बघण्यापेक्षा पिल्लुला जरा ब्रश करवतोस का ? मी जरा चहाच बघते.” हल्ली आमची सकाळ ही  WhatsApp messages बघुनच होते आणि बहुदा आमच्यासारखीचअनेक जणांची सुद्धा होत  असावी.
        गडद काळोख्या रात्री जस आकाश ताऱ्यांनी गच्च भरलेल बघितल की मनाला तृप्ताता वाटते अगदी तशीच भावना जेव्हा आपला फोन messages नी तुडुंब भरलेला असतो तेव्हा दाटून येतात. मनात कुठेतरी आनंदच   झालेला  असतो. खरतर आपल्या कामाची अशी मोजकीच messages असतात..बाकी सगळी लग्नात आलेल्या साडीसारखी forwaded आणि कदाचित यापूर्वीही बर्‍याच वेळा आलेली .
हेच आणि इतकंच एका सुशिक्षित आणि चांगल्या व्यक्ती,महिला,युवक आणि युवतीच्या मतानुसार आयुष्य आहे. मग एखाद्याला वेळ द्यायचा आणि काढायचा म्हटलं तर कुठून येणार ? सांगा ना आहे का उत्तर...?
       हे पण खरं आहे जाता जाता सांगू वाटलं आणि माझ्या मते तुमच्या-आमच्या आयुष्यात येणार प्रत्येक नातं हे तुम्हाला काही ना काही देऊनच जात. फक्त तुम्ही त्यातून काय घेता . काय शिकता हे महत्वाचं. सहवासात येणारे सगळेच हे सोफेस्टीकेटेड , सुशिक्षित आणि सन्माननीय कुटुंबातील असतातच अस नाही किंबहुना अशा लोकांपेक्षा बहुतांशी वेळेला साधी सरळ पण माणुसकी असलेली लोकच तुम्हाला श्रीमंत करून जातात . म्हणून सर्वांनी व्यस्त राहा पण आपल्या या शब्दातली ताकद ओळखून त्यासाठी आणि त्यांच्यासाठी वेळ काढायला शिका म्हणजे तुम्ही शिकलेल्याला अर्थ आहे. मग मला फक्त आणि फक्त Albert  Einstein  च्या ओळी  आठवल्या “I  fear  the  day technology will surpass our human interaction .The world will  have a generation of idiots . ”

     धन्यवाद...!

नेता आणि कार्यकर्ता कसा असावा...?


शिर्षक:- मी कार्यकर्ता म्हणून कुठं आहे...

दि. - ०६/०७/२०१७

लेखक : एन.के. (दै. संकेत टाइम्स)

    समाजात आम्ही राहतो तुम्हीही राहता बालपण सहजचं आडावर,नदीवर,शेतात,झाडावर कधी संपून जात कळत नाही. १०  वी ला आल्यावर अभ्यासाची एक चाकोर मनातून जाते आणि आपण स्वतःला प्रौढ बनल्यासारखं आव आणून एका लाक्षणिक घटनांतून प्रवास सुरु होतो. कॉलेजच्या दिवसात स्टँडवर बॅनर बघून दादा,नेते,राजे या उपमा आपल्या सभोवतालच्या गल्लीतल्या हिरोला द्यायला मोकळे होतो. बालपणी असं काही नव्हतं जागच्या जागी असलेल्या गल्ली बोळातल्या म्होरक्या आणि दादा तिथंच होता ना... फक्त आपल्यात बदल घडतो तो म्हणजे आपल्याला उमजत असलेल्या वॉर्डचा शब्दोच्चार प्रभाग असा होतो मग आपण एखाद्या नेत्याच्या पाठीमाग कट्टर कार्यकर्ता म्हणवत हिंडायला लागतो. स्वतःला आरशात १०० दा बघत केसांवरून हात फिरवत आपण एखाद्या गावच्या कट्ट्यावर पायावर पाय टाकून बसलो कि काय रुबाब राव सांगायला नको. आणि हळू हळू एका निवडणुकीत याच्या पाठीमाग ४ दिवस आणि पुढच्या निवडणुकीत ४ दिवस यांच्या पाठीमाग हिंडून येतो मग स्वतःला एक खंभीर कार्यकर्ता म्हणवत स्वतःच्या लहानशा मिशीला ताव देत हिंडतो.
    एक कार्यकर्ता म्हणून जगताना स्वतःची घुसमट होता काम नये या पद्धतीने जगा म्हणजे एका अशा ठिकाणी तुमचं नेतृत्व असायला हवं ज्या ठिकाणी तुम्हाला एक संघ प्रशासक आणि एकीकडे पाईक म्हणून जगताना तुमची भूमिका योग्य आणि काटेकोरपणे निभावली गेली पाहिजे म्हणजे समाजात आपण एखाद्याचा कार्यकर्ता म्हणून अल्प परिचित असलो तरी त्या जनतेच्या कार्याला हातभार लावता आला पाहिजे इतकं सक्षम आणि त्या नेत्याला आपला शब्द म्हणजे जनतेची हाक आणि आपलं कर्तव्य इतकं काहीसं आठवलं पाहिजे इतक सक्षम दृष्टिकोन ठेऊन कार्यकर्ता बना. एखाद्या नेत्यांसाठी आपण दिवस रात्र झटतो आणि त्याला विजयश्री प्रदान करून देतो आणि ज्यावेळी या निवडणुका चालू असतात त्यावेळी या चिन्ह वाल्यांनी त्या चिन्हवाल्याशी घेतलेली दुश्मनी पाहाता म्हणजे या कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्यासोबत तुरळक पण दुश्मनी असते त्यात आपला शेजारी पण असतो लक्षात घ्या. पण कालांतराने सत्तेच्या हव्यसापोटी राजकर्ते आपला चिन्ह बदलतात पण आपलं काय ? आपण ज्या वेळी भांडलेलो आता एक व्हायचं कस...? चला त्यांचा कार्यकर्ता आहे म्हणून जायचं का पाठीमाग ? अशी द्विधा मनस्थिती प्रत्येकाच होतं मग प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं काम काय आहे हे शुद्धा अनेक वेळा माहित नसते... समाजातल्या लोकांना एक चांगल्या नेत्यांची महत्व पटवून देऊन त्या महत्वाचा समरस राहून जनतेची काम करून देणे आणि रात्र दिवस मदतीला धावून जाण म्हणजेच कार्यकर्ता..!
   ...अत्यंत महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते एक सच्चा कार्यकर्ता म्हणून आपली ओळख बनवायची असेल तर नक्कीच एका झेंड्याखाली राहा भलेही ध्वजारोहण करणारा माणूस बदलला तरी चालेल म्हणजे पहिल्यांदा "भगव्याच्या" छायेत राहून गावाकडच्या निवडणुकीत काँग्रेस वाल्याकडून माझ्याकडं इतकी कार्यकर्ते आहेत,मतदान आहेत म्हणून मलिदा मागणारा नेता नसावा, सेनेनंतर "घडाळ्याच्या" वेळेनुसार चालायचं पण वेळ पडली तर "कमळाला" सलाम करायचं म्हणजे सगळीकडं बट्ट्याबोळ कार्यकर्ते करायच काय असं कधीही करू नका एका कट्टर कार्यकर्त्याच्या मानसिकतेला धक्का पोहचेल असं कधीच करू नका...हे बघा तुम्ही कितीही नेता किंवा युवा राजकर्ता असाल तरीही तुम्ही तेवढ्या वेळेपर्यंत शाबूत आहात जो पर्यंत एक तुमचा कार्यकर्ता तुमच्या चांगुल्पनाची सु-सुमने गाणारा म्हणून आहे... ज्यावेळी तुम्ही त्याला रेल्वेच्या डब्यासारखं एकदा इंजिन-धनुष्य-घड्याळ-कमळ असं प्रवास घडवत असाल तर सावध राहा तुमच्या हातून समाजाचं हित कधीच होऊ शकत नाही. ज्या नेत्याला एका घरचं पाईक होता येत नाही तो काय समाजाचं हित करेल... वेळ गेलेली नाही अजूनही सुधारा जे आपल्याला चांगल्याची धडे द्यायचे तेच "धड" आहेत का बघा...! चुकलं असेल तर क्षमस्व...!


   धन्यवाद...! 

वणवण पाल्याची______!!

शासनाची हि योजना बनेल वाड्या वस्तीवरील पाल्याना आडकाठी - वाड्या वस्तीवरील  विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणार पायपीट व वणवण पालकातून नाराजी

 - एन.के. (पत्रकार)

अनुक्रमे शासनाने नव्याने घेतलेल्या शाळा बंदीचा निर्णय म्हणजे चक्क चुकीची ठरते का काय अशी भीती निर्माण झाली आहे. आज पर्यंत वर्षानुवर्षे कमी पटसंख्या असून सुद्धा आपल्या पाल्याला जवळच्या शाळेत घालून त्याची पायपीट कमी करणे, आणि शिक्षण हे शेवटी विद्येचे एक अनुभवी पात्र म्हणून पालकांनी आपल्या पाल्याला शाळेच्या दर्जा असो वा गुणवत्ता ऐवजी शिक्षणाचं दार आणि व्यासपीठ म्हणून या शाळांकडे पहिले परंतु शासनाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा जनतेतून असंतोष निर्माण होत आहे. जि प शाळा यांच्या पटसंख्या कमी म्हणून या शाळा मुख्य शाळांना जोडण्याचे काम शासन करणार आहे... देशात शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून गाव तिथे शाळा,वाडी-वस्ती तिथे शाळा या योजनेचे स्वागत या अगोदर झाले आणि परिणामी सीमाभागातील कन्नड शाळा बंद पडून मराठी शाळेकडे निश्चितच कौल वाढला होता आणि या शासनाच्या निर्णयाने पाल्याची शिक्षणासाठी वणवण होणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक स्वरूपाच्या या शाळा शासनाने जर बंद केल्या तर अनेक मुलं आपल्या शिक्षणासाठी गावातील शाळेपर्यंत पोहचण्यासाठी जर साधन उपलब्ध नसेल किंवा बालवयात शिक्षणाच्या दारापर्यंत पाल्याला पोहचवणे जर पालकांना जमले नाही तर ते पुढं पाल्य शिक्षण घेईल...? किंवा पालक पाठवतील...? आणि याचा परिणाम म्हणून शिक्षण या संज्ञेपासून कितीजण वंचित राहतील...? किती पाल्यांचे नुकसान होईल...? वेळोवेळी शिक्षकांच्या मूल्यमानापाच्या परीक्षा ? कन्नड शाळा पूर्वतत सुरु करण्याची मागणी तर वाढणार नाही ना...? ऐपत परीक्षण इ. मुळे अगोदरच शिक्षकांच्या मानगुटीवर टांगती तलवार बनलेल्या प्रश्नात या शाळा बंदीच भूत नव्याने... यातून शासनाला काय साध्य करायचे आहे सीमाभागातील कन्नड शाळेकडे नक्की कौल वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शिक्षक कमी म्हणून शाळा संकुचिकरणाचे काम शासन करणार आहे म्हणजे त्या पाल्याला आणि शिक्षकाला नवखं व्यासपीठ देऊन गोंधळात टाकण्याची हि भूमिका किती सकारात्मक बरोबर किती स्वीकारा योग्य वेळ आणि भाविष्यचं ठरवेल.

धन्यवाद...!