Friday, 23 November 2018

माझा बाप : थेट लेकीच्या मनातलं !

शिर्षक :- लेक आणि बाप : नात्यापलीकडचं संबंध सांगणारं एक बंधन

 ( ज्यांना मुलगी आहे अशा बापानी आणि बापावर प्रेम असणाऱ्या सर्व लेकींनी वाचवा असा लेख...)

लेखक :- एन.के. (पत्रकार)
वेळ / दिनांक :- 22/11/2018

अनेक पुस्तक आणि अनेक गोष्टीतून नात्याची ओळख पटवून देणारी अनेक उदाहरण न्याहाळत असताना एक अस नात जे नात म्हणून नाही तर पवित्र, प्रेमळ तथा निस्वार्थ नात्याबद्दल अनेक जणांनी लिहल असेल पण माझ्या कडून लिहिण्याची पहिली वेळ नात्याबद्दल लिहीत असताना त्या नात्याची पारख असायला हवी पण अशी काही नाती आहेत जी अनुभवलं नसलं तरीही त्याबद्दल उत्तरावं अस वाटतं ,लिहावं वाटत अस नात म्हणजे "लेकीचं आणि बापाचं"


बाप आणि लेक हे नाते शब्दांत मांडणे कठीण आहे कारण ज्याला मुलगी आहे त्याला नशीबवान म्हणले पाहिजे कारण *"मुली ज्याच्या पोटी जन्म घेतात किंवा ज्याला मुलगी आहे त्याला एक विलक्षण सामर्थ्य परमेश्वराने प्रदान केले आहे. मुलीची हरेक इच्छा मुलापेक्षा सौम्य गतीने जरी पूर्ण होत असतील तरीही बापाचं हृदय मात्र त्या लेकीसाठीच तुटत न रडत हे कदापी विसरून चालणार नाही."* मुलीच्या जन्मानंतर बेटी बचाव शब्दांकन तिच्या जन्मांपासून चालू होतं वाईट वाटण्यासारखं काही नाही पण कटू सत्य असत अस म्हणतात त्या प्रमाणे बेटीला समाजाच्या प्रत्येक चांगल्या वाईट नजरेपासून वाचवून तिला संस्कार आणि संसाराचे बाळकडू पाजून परक्या घरी आपल संस्काराचे तास घ्यायला पाठवणं ही मुलीचं जीवन अस न समजता किंवा इतकाच तुच्या जीवनाचा आणि संभाळाचा संदर्भ न मानता किंवा इतकंच नाही तर तर तिच्या सुख दुःखाची झालर अंगावर घेत तिच्या प्रत्येक अडचणीला पगडी ते टोपी पासून धोतर पसरवणारा बाप न इतकं करत असताना जीवनाच्या झुंझार रस्त्यावर बापाला माझ्यासाठी एवढं करावं लागलं यासाठी हृदय पिळवटून घेऊन स्वतःला शांत करणारी ती मुलगी या अक्षररुपी नात्याला नाव देता नाही आलं तरी चालेल पण या नात्याची शिकवण मात्र इतिहासापेक्षा श्रेष्ठ आणि प्रखर आहे.
एखाद्या मुलींसाठी तिचा लाडका बाबा हा शहाळ्यासारखा असतो बाहेरून कितीही कठोर असला तरी आतून मात्र नितळ आणि मधुर पाण्याचा झरा असतो. पुरुष म्हटलं की हृदयाच्या कडा मजबूत असतात घरातला जन्मदाता मेला तर घरच्यांना सावरत डोळ्यातून चुकून अश्रू न काढणाऱ्या त्या बापाला तिच्या मुलीला सासरी पाठवताना कुठून पाझर फुटतो अगदी धाय मोकलून रडतो. इतकं कठोर मन असून ही तिच्या लग्नात मात्र त्या हृदयाला गुलाबाच्या फुलाईतकी मुलायमता येते कुठून म्हणून या नात्याला नाव शोभत नाही ना उपमा शोभत नाही. "ज्याच्यात मुलीच्या सर्व वाईट-चांगल्या गोष्टीला सामोरे जाऊन मग तुच्याशी निगडित असणार अब्रू असो किंवा वाईट नजर असो या सर्वातून खंबीर साथ करत तिच्या प्रत्येक केसागणिक तिची काळजी करण्यापासून ते तिच्या वर कायम योग्य संस्कार देऊन आदर्श म्हणवून घेण्याची ताकद असते त्याच्याच पोटी देव "मुलगी" देत असतो..."
कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते, तर तो फक्त तिच्या वडिलांवर लेक जर घराचे सौख्य असेल तर,
त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाबा असतो. या नात्याबद्दल मला जास्त लिहिता आले नाही कारण नात्याचं वर्णन करताना मनातून भरून येत नात जरी आपल्याशी निगडित नसलं तरीही त्या बद्दल असणारं प्रेम न भावना आठवलं की भरून येतं चार संकलित ओळी लेखाच्या मध्याला सादर करतोय-
शॉपिंग करताना आईने कमी किमतीचा ड्रेस काढला तर; हळूच लेकीला विचारून भारी किमतीचा ड्रेस घेणारासुद्धा बाबाच असतो,
आईने काही काम सांगितले तर,
तिला दटावणारासुद्धा बाबाच असतो,
लेकीचे पहिले बोबडे बोल ,
तिने टाकलेले पहिले पाऊल ,
तिचे लाडिक वागणे,
तिची घरभर पैंजणांची छुमछुम हे सगळे पाहून सुखावतो तो बाबा असतो आणि
लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळणारा ,
आणि प्रसंगी रागे भरणारा पण बाबाच असतो,
पण त्यात त्याची लेकीसाठी तळमळ असते, तिच्यासाठीची काळजी असते..!
लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणाराही बाबाच !!!
आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचे धन हे कटू सत्य पचवणाराही बाबाच !!!
ज्या लेकीला २०-२५ वर्षे जीवाच्या पलीकडे सांभाळले तिला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचे हृदय काय तुटत असेल ह्याची कल्पनाही करता येणार नाही. ..
आर्त धागे तुटल्याची ती वेदना कोणीच नाही समजू शकणार.
आपल्या लेकीला माहेरचा उंबरठा ओलांडून…
सासरी जाताना पाहताना ढसाढसा रडणाराही बाबाच असतो….
आपल्या लेकीचा हात परक्याच्या हाती देताना… आतून तुटणारा बाबाच असतो…
“दिल्या घरी सुखी रहा म्हणताना ”
मनातून खचलेलाही बाबाच असतो…! ( संकलित)
... लिहिण्याचं कौतुक झालं नाही तरी चालेल पण त्या नात्याला आणि तुमच्या अवती भवती असणाऱ्या या बांधनाला पवित्र मानून तुमच्यात असणारा समज आज सुधारत "मला मुलगी नको" हा संक्षिप्त न्यूनगंड बाजूला करून मुलगी जन्माला घालून भाग्य समजल्या सारख बाल पद्धतीने नृत्य केलं तरी चालेल पण आजपासून मुलगी असणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला नशीबवान मानायचं तुमच्या मनाला कधी इतकी भावनिक चटक लागली नसेल पण तुमची लेक सासरी जाताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवण्यासाठी आणि तुमच्यात असलेले यासाठीच सामर्थ्य बघून ईश्वर तुमच्या पोटी मुलीचा जन्म दिलाय हे समजून घ्या. बाप म्हणजे बाप असतो कारण तिच्या साठी सर्वस्व वेचण्याची हिम्मत त्याच्यात असते.
लग्नाळू मुलगी ही तिच्या वडीलांच्या दृष्टीने फार मोठी जोखीम असते. कधी एकदा मुलीला सुस्थळी आणि योग्य हाती सोपवतोय आणि आपण आपल्या या जबाबदारीतून पार पडतोय ही चिंता असंख्य वधूपित्यांना भेडसावत असते.
पण जसजसा लग्नाचा दिवस जवळ येतो तसतसा हाच वधूपिता हळवा होतो. आपल्या काळजाचा तुकडा दुसर्‍याच्या हाती सोपवतोय, ते तिला नीट वागवतील ना? इथल्यासारखा हट्ट तिने केला तर अल्लड समजून तिला माफ करतील ना? तिला इथल्यापेक्षा जास्त सुखात ठेवतील ना? या नव्या चिंता त्यांना भेडसावायला लागते आणि जेव्हा त्याला कळते की आपली मुलगी सासरी फार फार सुखात आहे तेव्हा त्या बापाला धन्य धन्य वाटते. इतकं पांढर शुभ्र नातं बाप लेकीचं.

आमच्या सारख्याला लेखांकन करताना ही डोळे पाणावले. बस एवढंच या नात्याबद्दल वर्णन आणि बांधनाबाबत लिहायला घेतलं एक वेळ पूरणार नाही.

- आपला एन.के. ( पत्रकार )

Thursday, 1 November 2018

चला कर्मातून आपली ओळख दाखवुया...!

शिर्षक - तुमच्यात मी एकटा वेगळा असलो तरी काय बिघडलं...?

लेखन- एन.के. (पत्रकार)

दिनांक - 01/11/2018/ 11:36

कधी कधी अंधारातल्या किर ओरडणाऱ्या रातकिड्यांचा आवाज पण शमतो, तर कधी कधी लाही लाही म्हणून ओकणाऱ्या माझ्या सुर्यदेवाची पण शाळा सुटते ना... तस काही गोष्टीत जेवढं ताणल जायला हवं तितकं न ताणता अगदी अलगत आणि हळू हळू आपल्या कर्मठ आणि कर्कश संवेदना कमी करेल तितकं चांगलं आहे...! अनेकांनी म्हणून ठेवलं आहे की "कर्म ऐसें करो की नाम हो जाये, नाम ऐसें कामाओ की नाम सूनते ही काम हो जाये" या पद्धतीने चांगले कर्म करत राहायचं कधी न कधी आणि कसलेही तथा कोणतेही अर्थात निमीत्त काहिही असो पण शेवटी जाणीव शिल्लक आहे तोवर एखाद्या कुंचल्यातून किव्वा कवितेतून, छायाचित्रातून वा लेखातून हे अनुभव प्रकट होतच रहाणार, तुमचेही व माझेही. आणि यातून नक्की काही तरी घेण्याजोगे आहे कारण कुणा एकाला सुधारण्यासाठी इतरांची मने नाराज करून बसू यासाठी त्यांचं धर्म आणि त्यांच्या कुवृत्तीच्या वंशाला जाऊ द्यावे करण असे वंश त्या त्या वंशात ते जवळून अनुभवले असतील किंवा अनुभवतील.
भोवतालच्या जगाशी मिळत जुळत न घेण हा काहीसा स्वभाव कम धर्मच असतो काहींचा. Survival of Fittest चं शास्त्र हे आपल्यालाही लागू होतच, अर्थात आपण जिवंत असतो तोपर्यंतच. मात्र कधी कधी अगदी हट्टाकट्टा किंव्वा वरकरणी एकदम सुदृढ मनुष्य सुद्धा अचानक हृदयविकाराने मरतो तेव्हा तोन्डात बोटे घालण्याखेरीज आपल्याला काही करता येत नाही. ह्या अशाच काही अनाकलनिय गोष्टी आपल्या सभोवताल किंवा आपल्यात घडतात किव्वा मधूनच एखादी सुनामी येते तेव्हा रोजमराच्या जीवनातील बूडापासून टाळूपर्यंत गोठलेल्या काही शिरा पुन्हा तडतडतात, जेव्हा काही आपल्या सोबत आणि आपली निजी जीवनात जवळ म्हणून संबोधले जाणारे एखादी व्यक्ती किंवा वस्तू आपल्यापासून जेव्हा दल बदलू सरड्या प्रमाणे आपल्यातून वेगळं किंवा आपल्या कल्पक बुद्धिपेक्षा जास्त विचार करायला लागली की शहाणा नावाचा प्राणी अंगात शिरला की आटोमॅटिक सॉफ्टवेअर अपडेट झाल्यासारखं आपल्यावर खिल्ली उडवण्यापासून ते आपल्या विरोधात वागण्याचा संसार करण्याचा विचार करणारी माणसे आपोआप निर्माण होतात तेव्हा एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला मोठं करण्यासाठी महा बहाद्दर कष्ट घेत आहेत.
"एकजुटीने पेटलं रान, तुफान आलंया"
या सत्यमेव जयते सारख्या वॉटर कॅम्प ब्रीद वाक्य प्रमाणे जर एकजुटीने आपण पेटत गेलो तर नक्कीच आपल्यावर चांगल्या दिवसाच तुफान आल्याशिवाय राहणार नाही...!

आपला एन.के. ( पत्रकार )

Wednesday, 1 August 2018

गब्बर इज बॅक...!

शिर्षक : बेबस हु मगर बेजुबान नही...जब तक है जान मै नाचुंगी

सध्या जनजीवन जगायचे तर नियमाच्या कक्षेत राहून जगायला हवं इतकं मात्र तय आहे. सामान्यांच जनजीवन पाहता रोजी रोटीसाठी आणि आपल्या भविष्यासाठी चार रुपडं एवढंस अजेंडा सोडलं तर आयुष्यभर पुरेल इतकं तेच स्वप्न बाळगणारा आपला बळीराजा आणि सामान्य मध्यम वर्गातील जनता जनार्धन. रोज उगवणाऱ्या सूर्याला नमस्कार घालून दिवसाच्या सुरवातीपासून पलंगावर आडवं होईपर्यंत ईश्वराच्या चरणी माथा ठेवत नमन करत सर्वस्वी अनिश्चित जनजीवन आज सामान्यांच झालं आहे. आणि स्वतःच्या नशिबाच्या भोगाचे चटके यावर विचार करत दिवस रात्र आपली म्हणजे बळीराजा ते मनगटाच्या ताकदीवर आणि शरीराच्या घामावर आयुष्य काढणाऱ्या प्रत्येकाचं संपत असते.
     गेली ४ वर्ष भष्टाचार काय असतो आम्हाला दिसला नाही. बाकी बँकेचे घोटाळे कोणी केले, बालवाडीच्या चक्की पासून ते मेहता बिल्डर प्रकरण म्हणजे काय आम्हाला काही माहिती नाही त्याबाबत आम्ही कानाला खडा लावला आहे. आधार कार्ड लिंक करण्यात काही वर्षे कशी गेली हेच कळेनासं झालं आहे. बळीराजा आणि त्याच्या प्रति असलेली शाब्दिक कमी उच्च पण एक प्रकारची शिवीगाळ आजच्या नेत्याच्या थोबाडवर लगेच न स्पष्ट उमटू लागलेत. जवानाबद्दल बोलताना किंवा त्याच्या प्रति बळीराजावर भाष्य करताना इथं कोणीच थकत नाही. वरुण राजाच्या कृपादृष्टीत कमालीची कपात झाल्यानंतर यांच्या बोलणी खाण्यासाठी हा माझा बळीराजा आहे का ? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारातील शिष्टमंडळ आणि राज्यकारभार डोळ्यासमोर ठेवलं तर इतिहासाच्या पानात आपलं आयुष्य का कोरल गेलं नाही अशी क्षणिक खंत ही माझ्या बळीराजाला वाटत. पण आताच्या सरकार ना जनता ना-ही  बळीराजा ना-ही बेरोजगार यांच्यावर तत्पर होतंय फक्त विकासाच्या बतावण्या आणि सुंदर भाषणाची माळच आपल्या गळ्यात पडताहेत.
     सविस्तर सांगायचं झालं तर घटनेने नमूद केलेल्या कक्षेनुसार आरक्षणाच्या वाटण्या ह्या झाल्या पाहिजेत. मराठ्यांना , धनगरांना, लिंगायताना आरक्षण देऊ या आशेवर स्वान पथक जागवत असलेलं सरकार आज पुन्हा दूग्ध व्यवसाय ते शेतीहमीभाव या प्रश्नावर रयतेचे हाल केले. आता परत आरक्षणाच्या अश्वासनाला जगवताना जनतेचे रोजी रोटी साठी कामाच्या ठिकाणी जायचं मुस्किल झालं आहे न याला कारण जरी मोर्चा आणि आंदोलन असली तरी ह्या सरकारच्या बे-ताल टाळ मृधुंग मंत्र मुळेच झालं आहे. आता मराठे पेटून उठले आहेत उद्या धनगर मग लिंगायत या सर्वांच्या मागण्या मान्य कधी होणार आणि जनतेचे हाल कधी मार्गी लागणार याकडे बघणं म्हणजे पावसाची वाट बघण्यासारखं आहे. मोर्चेकरी आणि आंदोलन कर्ते सुद्धा चुकीचे नाहीत. कारण हक्क मागताना ते मागे हटणारे नाहीत. यावरून एक शोले मधलं गाणं आठवत गब्बर ने जेव्हा बसंतीला ताब्यात घेतलं तेव्हा एक गाणं जे- "जब तक है जान मैं नाचुंगी, बेबस हू मगर बेजुबान नही..;ये दुवा झुक सकती नही..."  या प्रमाणे जेवढं जीव आहे तो पर्यंत आम्ही हक्कासाठी लढणार आणि जरी आम्ही अधिकाराने बेबस असलो तरी हाकेच्या स्वरूपात आम्ही तुमच्या पर्यंत नक्की पोहचणार म्हणजे बेजुबान तरी आम्ही नाही असं तात्पर्य या बांधवाना द्यायचं असेल. म्हणून गब्बर हटाव मोहीम आता दृष्टीस येत आहे. आणि यासाठी जय विरु सारखे आपले बांधव आपल्या हक्कासाठी शांत मधून रोद्र कडे वळत आहे. पाहिलं तर सगळी कडे सत्ता आहे म्हणून ५६ इंच छाती मोठी करण्यापेक्षा यातल्या ५-६% टक्के तरी या मोर्चा आणि आंदोलनाचा विचार व्हायला हवं. आणि जनतेच्या मनावर होणाऱ्या हाल अपेष्टा बंद व्हाव्यात एवढीच इच्छा देवाजवळ करावीशी वाटते.


    लेखक - एन.के.

    दि. ३१ जुलै २०१७

   मोबाईल - ८८०६६०५८५२

Friday, 22 June 2018

मनाला परत वाटलं प्रेम आपलं बहरत गेलं...!

शिर्षक :- वाटलं आठवणी ताज्या झाल्या न प्रेम आपलं बहरत गेलं..!

लेखक :- एन.के. पत्रकार

दि. :- २१/०६/२०१८

सकाळच्या कोवळ्या उन्हात तुला भेटायचं म्हणून उठलो,
आवरलं अंघोळ केलं आरशा समोर एक तास घालवलो,
मनाला तुझ्या त्या नजरेची चाहूल लागलेली हृदय हसत हसत थोडं डोललं,
म्हणजेच वाटलं आठवणी ताज्या झाल्या न प्रेम आपलं बहरत गेलं...! ....१

नटखट गोजिरी ती हसरी नजर भिडली नजरेला,
न वाटलं मनमोकळी दाद मिळाली या हसण्याला,
वाटलं जवळ बसून हितगुज आयुष्याचे सांगावे तुजला,
पण ओंजळ दूर आहे म्हणून मन मलाच खायला उटलं,
म्हणजेच वाटलं फक्त आठवणी ताज्या झाल्या न प्रेम आपलं बहरत गेलं...! ...२

खुप वाटते आपले कुणीतरी असावे केवळ मी तुझाच आणि तूही फक्त माझीच, असे म्हणावे कुणीतरी रात्रंदिवस जुरतय तुझ्यासाठी येरे परत,
म्हणावे किती स्वप्न पाहावे, किती झुरावे, नसत इतकं भाव कोणी खात,
हळू हळू झोप लागत गेली स्वप्न सुद्धा तुझेच न हळूच कंठ पण रागावून दाटलं,
आणि काय मग परत वाटलं आठवणी ताज्या झालाय न प्रेम आपलं भरत गेलं...!...३

तुझे स्पर्श जणू भासे ओल्या पावसाळी सकाळच ते कोवळं ऊन,
प्रेम बहारायला प्रेम पुरेस नसत जोडल्या पाहिजेत मतं आणि मनं,
पण त्या विश्वासात निर्माण होते ते प्रेम ,आपुलकी अन जिव्हाळ्याच बंधन,
खरच असे करून तू माझी तुझ्याविषयीची जबाबदारी का वाढवतेस,
पण मनाला हे पटलं न मन परत म्हटलं ..
आठवणी ताज्या झालाय न प्रेम आपलं भरत गेलं...!...४

तू नुसती दिसणार असलीस तरी मन नाचायला लागते,
हातात हात नाही घेता आला, तरी तुज्या डोळयातून प्रेम वाहताना दिसते,
तू मला इतके प्रेम दिले आहेस की ते मला आयुष्यभर पुरेल ..
उद्या मेलो तरी तुज्यासाठी परत शरीरात श्वास भरेल...
अस लिहताना प्रत्येक वेळी वाटलं परत एकदा,
आठवणी ताज्या झालाय न प्रेम आपलं भरत गेलं...!...५

धन्यवाद...!

Sunday, 10 June 2018

जगायचं लोन मिळतं का बघायला हवं...!

शिर्षक - जगायचं लोन मिळत का बघायला हवं...!

लेखक - एन.के. पत्रकार

मोबाईल- ८८०६६०५८५२

आमच्या सर्वांगीण विकासासाठी आजही आपण आपल्या आपल्या परीने जगतो आहोत. सामाजिक भान आणि वैचारिक औचित्य मात्र आता आपल्यापासून कोसो दूर गेलं आहे. सक्षम आणि भक्कम जगणं म्हणजे काय याचा ठाव ठिकाणं लागणं आता आपल्या विचाराच्या आणि मेंदूच्या बाहेरच घटक बनलं आहे. तू,तुम्ही,तुमचं जरासं कमी होऊन आता मी माझं जास्त होत आहे.
वेळ कुणासाठीही थांबत नाही, हे माहिती असून सुद्धा नको असलेल्या गोष्टीत प्राविण्य मिळवणारे न्यूनगंडाचे महाशय आता वाढीस लागले आहेत. मात्र या सगळ्यात आपण जगायचेच मात्र विसरून जातो आहोत.
ना तुमच्यासाठी ना माझ्यासाठी ना इतरांच्यासाठी अस दिवसा मागून दिवस जातात, वर्षामागून वर्ष..पण काही आठवणी मनात कायमच्या कोरलेल्या असतात.काळाबरोबर तुम्ही पुढे निघून जाता तुमच्या प्रियजनांबरोबर..
तुमचं आयुष्य बदलतं, मित्रमंडळी बदलतात, आजूबाजूचं  जगही बदलतं
पण मनात कोरलेल्या त्या काही आठवणी तशाच असतात, तुम्हाला हव्या असल्यातरी किंवा नको असल्या तरीही,  ज्या आनंदाच्या क्षणी दुख देवून जातात आणि दुखाच्या क्षणी आनंद...कधीतरी अचानक त्या आठवणी मनात दाटून येतात अन चेहऱ्यावर एक गोड हास्याची लकीर देवून जातात...आणि कोणी जर त्या हसण्या मागचं कारण विचारलं तर तुम्ही फक्त एवढंच म्हणता "Nothing" म्हणून जगणं खूप सुंदर आहे ओ पण कसं जगायचं याच पुस्तक मात्र बाजारातल्या कुठल्याच कप्प्यात मिळत नाही ही खरी खंत. अनेकदा आम्ही तुम्ही खूप सार पैसे कमावतो माणसे कमावतो पण त्या पुंजीची योग्य विल्हेवाट असो किंवा ताळमेळ जमेनास झाला की मग आयुष्यच सिद्धांत आणि प्रमेय चुकल्या गेल्या इतकंच त्या पाठीमाग तात्पर्य मिळत.
म्हणून आपलं या जन्मात काहीतरी राहातंय पण नक्की काय राहातंय हेच समजायला आज कुणाकडे पुरेसा वेळ सुद्धा नाही आहे. सत्य आहे पण कटू पण तितकंच आहे ना पैसा अडका जमीन जुमला कितीही असलं तरी सुद्धा माणसं कमवलं नसेल तर मयताच्या गर्दीत पण लेखा जोखा होतीच ना ओ... तुमच्यासाठी वाचनातल्या ४ ओळी...-
आज उद्या म्हणता म्हणता
खूप काही करायचं राहून गेलं
आयुष्य निसटलं हातून
मात्र जगायचं राहून गेलं…

फुलासारखी उमळली नाती
आणि तितक्याच लवकर कोमेजू लागली
या देवाण घेवाणचा जगात
नातं जपायचं राहून गेलं
ज्यांनी प्रेम केलं माझावर
त्यांना सोबत करायचं राहून गेलं…!

- धन्यवाद..!

Sunday, 13 May 2018

मदर्स डे शुभेच्छा नको मातृत्व जपा..!

शिर्षक :- मातृ दिनाच्या शुभेच्छा झाल्या स्वस्त पण आईचे मातृत्व जपलं जातंय...?

लेखक :- एन.के. (पत्रकार)

दिनांक : १४ मे २०१८

नमस्कार मंडळी /मित्र/ मैत्रीण/ जिवलग/ जेष्ठ/ आदर्शवत सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा...; आज शुभेच्छा देण्याचं कारण म्हणून प्रश्न चिन्हांकित चेहरा झाला असेल.. काय करू सकाळपासून आईची डिपी बदलले जात आणि मेसेज येत आहे. आईला थँक्स सांगा आईला आज देव मानणारे १०० भेटले पण मला एक प्रश्न पडला माझ्याकडे आईचा फोटो पाकिटात आहे. सकाळपासून कामावर होतो. दुपारी घरी जाण्याचा योग आला गोड धोड घेऊन जाता आलं नाही. घरात गेलो नजर आईला शोधत होती. आई बाहेर गेलेली. सायंकाळी आल्यावर आईच्या मांडीवर खुशाल झोपायचं ठरवलं. तस झालंही खूप म्हणजे ४-५ दिवस घराकडे जायचं झालं नव्हतं म्हणजे कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी होतो. गावाकडे जाता आलं. नाही आईने कौतुकाने डोक्यावर हात फिरवत चौकशी केली कसा आहेस. मी पण सांगितलं बर आहे आई आईची विचारपूस केली तबियत विचारलं. आईने ही सकारात्मक उत्तरात बर आहे म्हणाली. तिच्या पेक्षा घरच्यांची आम्हा भावंडांची , वडिलांची न सुनांची काळजी घेऊन आईच्या खरमुड हाताला पण मखमली जाणीव मनाला होत होती. असं झोपून मला मांडीवर झोप लागलेलं कळलच नाही. असं सुख अनुभवताना मला विलक्षण प्रिय वाटत होत. कारण मी नशीबवान होतो. आई वडील माझ्या जवळ होते. मला किंवा कुणालाच आयुष्यात कितीही पैसे ओतले तरी हे दैवत मात्र मिळत नाही. ते दैवत आज माझ्याजवळ होत. जगात अशी अनेक अनाथ आज आईसाठी तळमळत असतील. आशा साठी कुठला डिपी निवडलाय तुम्ही. यांच्या साठी कोणता प्रोफाइल पिक्चर आहे तुमच्याकडे??
माता होणे सोपं नसत उदरात तुम्हाला वाढवल्यावर तुमच्या प्रश्नाला बाल ते वृद्ध पर्यंत असतील तर नक्कीच प्रथम मान्यता वजा मंजुरी असते पण आपण कधी २० ते ३० च्या वयाच्या घरात वावरताना आई वडिलांच्या कंठातून आलेल्या शब्दाला जगल्यासारखं मनमोकळी दाद देतो का हो ? मनाला विचारून बघा ना कधी तरी आई साठी सरप्राईज म्हणून काय घेऊन गेलोय का जस एखादं डे आलं की १०० _२०० च खर्च करायला आपण विसरत नाही तस आईला किंवा बाबाला कधी १००-१५० च काही तरी त्यांच्या उपयोगाची वस्तू आणतो का हो आपण...? ६० च्या घरानंतर आई वडिलांच्या पांगाला फेडण्यासाठी काळजी आणि क्षणिक लहान सहान गोष्टीची अपेक्षा असते कधी स्वतःहून विचारपूस करून पूर्ण करतो का हो ...? अनाथ आश्रम आज गच्च भरताना दिसतात का ९ महिने ९ दिवस पोटाला चिकटवून हिंडणाऱ्यां माऊलीला आज ९ एक वर्ष असणारी न ते आयुष्य पूर्ण तुझ्यासोबत राहायचं न तुझ्यात असण्याची स्वप्न बघणाऱ्या जन्मदात्याला सोबत ठेऊ शकत नाहीस इतकं निर्दयी ...? अरे लहान असताना तळहाताच्या पायावर जपणाऱ्या त्या माऊलीला आज मातृदिनाच्या शुभेच्छा नकोयत रे तिला फक्त तुझ्या आधाराची गरज आहे ज्यावेळी तुला उभं राहता येत नव्हतं तेव्हा तुझ्या प्रत्येक पायाच्या पायरीला छातीच पाणी करणारी का तर पडतोस का तू म्हणून इतकं उदात्त मनाच्या देवाला आज फक्त या दिवशी सेल्फी आणि क्षणिक किंमत देऊन तिला तुझ्या शुभेच्छा कधीच आपलंसं वाटणार नाहीत रे. मग शुभेच्छा देताना वचन देशील का रे ज्यांनी तुला आयुष्य जगायला शिकवलं त्यांच्या आयुष्यात कारण, वाद, मतभेद होऊन त्यांना दूर करणार नाहीस असं बघ जमलं तर...तिच्या मातृत्वाची किंमत कमी होऊ देऊ नको रे...!

धन्यवाद….!

Wednesday, 2 May 2018

बांगड्यांचा सन्मान करायला शिका...!

बांगड्यांचा सन्मान करायला शिका म्हणजे मिळवलात...!

【वाढत्या बलात्कार आणि महिला अत्याचारावर कटाक्ष टाकणारा लेख..】

लेखक : एन.के. (पत्रकार)

मोबाईल : ८८०६६०५८५२

दिनांक : १ मे २०१८ (महाराष्ट्र दिनाच्या निमित्त लिहलेले..)


आपण राहत असलेल्या समाजाला एक राजकीय आणि मौलिक तथा वैचारिक बलिदानाचा इतिहास लाभला आहे. अनेक सोयी आणि सुविधांच्या कक्षेत वावरताना स्वातंत्र्यनंतर काळात राजकीय आणि टेक्निकल चेंजेस खूप होताना आणि वृद्धी तथा विकास वेड्यासारखं झालाय का वेड्यासारखं करतो आहे हे समजेना झालाय. इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या काळात भारत माता सुखा-समाधानाच्या विचारांनी जनता आंनद नावाच्या दिवसात गोड नांदत होती. इतिहास आणि वैचारिक विचारांनी समृद्ध झालेला माझा भारत महिला आणि मुलगी यांच्या अनिष्ट प्रथावर 'काहीसं' निर्बंध लागले पण त्याच्या सुरक्षेचा प्रश्न आजही ऐरणीवर आहे ही खंत मात्र रोजच्या सकाळ संध्याकाळची दिनचर्या बनून गेली आहे. लिहिण्यासाठी अनेक प्रश्न आहेत पण सत्ताधारी आज प्रत्येकाच्या विषयाला बेताल वक्तव्य करत सुटतो. तर काही ठिकाणी सामन्याच्या प्रश्नाला 'मॅनेज' ने दबवले जातात अशी मार्मिक खंत वाटावी इतक्या स्वातंत्र्यात आपण आहोत का...? विचार करायचा की आम्ही पण आणि तुम्ही पण आज शासन आणि प्रशासन घुडगे टेकून आम्हा महिला किंवा बाल बघेना सर्रास रोज निदान एक तरी अत्याचार किंवा बलात्काराच्या गोष्टींची वृत्त पत्रात पाहायला मिळते आहे. म्हणजे असं झालय 'आंधळं दळतय कुत्रं पीठ खातंय' मग आता दळणारा तर त्यावर निर्बंध आणू शकतो आशा कुत्र्यापासून आपल्या गिर्हाईकच्या पिठाला वाचवू शकतो पण कुत्रं गिरणीवाल्याच आहे असं आता काहीसं झालं आहे.
सामान्य सत्ताधारी अशा प्रश्नावर कधी रस्त्यावर उतरत नाहीत कारण सत्ता, खुर्ची, आणि पक्ष महत्वाचा आहे कारण घरचा रस्ता पाहायला लागेल या भीतीने समाजाच्या अनेक अशा लज्जास्पद प्रकरणावर अनेक वेळा काय नेहमीच मौन असत...! एखाद्या सत्ताधाऱ्यानं किती मस्तीत, माजात, घमेंडखोरीत मिरवावं? मग तो संपूर्ण पक्ष असो की त्याचं नेतृत्व. कोवळ्या मुली, वयात आलेल्या मुली, स्त्रिया यांच्यावर सरेआम बलात्कार होतात. संरक्षक पोलिसांच्या साक्षीनं लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणारे लिंगपिसाट होतात. करुण किंकाळ्यांनी आसमंत हादरतो, देशवासी दिग्मूढ होतात. मती गुंग, सुन्न होते. पण यांच्या जाहिराती अधिक रंगीत होतात. यांचे लोकार्पण सोहळे थांबत नाहीत. प्रसंगानुरूप कुर्ते आणि जाकिटे रंग बदलत राहतात. रक्ताचा सडा पडतो, देहाची विटंबना होते, निरपराध झुरळापेक्षा क्षुल्लक पद्धतीनं मारले जातात. यावर कळस म्हणजे अपराधी, अपराधगंडानं अथवा कायद्याच्या शासनाच्या भीतीनं गपगर होऊन फरार होत नाहीत की तोंड लपवत नाहीत. उलट राष्ट्रध्वज हातात घेऊन झुंडीनं हिंडत कायदा, न्याय, शासन सर्वांनाच आव्हान देतात. कारण, आम्ही हिंदू आहोत आणि देशात आता आमचंच सरकार आहे. सरकारचं मौन या आक्रमकतेला मूक प्रतिसादच देतं.
सांगा ना बलात्कार होतात महिला अत्याचार सहन करते. पण यावर कठोर असं प्रशासनाची चाबूक आम्हाला आणि सर्वांना गर्व वाटेल असं कुठं आहे ? नाव ठेवलं पाहिजे म्हणून नाही किंवा महिला सुरक्षा आणि 'सबका साथ सबका विकास' च्या नावाखाली सत्ता भोगायला लागला तुम्ही पण सब च्या विकास आणि सुरक्षेच के केला ओ तुम्ही. उन्नावमध्ये तर सरळ सरळ लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलिस आणि राज्य सरकार वर्षभर पीडितांना झुलवतात. दबाव टाकतात, नमवतात. पीडित मुलीच्या बापाचा पोलिस कोठडीतच मृत्यू होतो. ‘दबंग’गिरी चालूच राहते. हे असे ‘दबंग’ सर्व पक्षीय वारकरी असल्यानं विरोधी पक्षही आस्ते कदम मोडवर जातात. आणि हे सर्व घडत असताना प्रधानसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करत स्वत:च्या पदाचं श्रेय त्यांना देत आयुष्यमान सप्ताह साजरा करण्याचे आवाहन सोहळे करत राहतात! किमान नैतिकता ही आता या राष्ट्रीय पक्षात आणि त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांत राहिलेली नाही. जणू काही आपण त्या गावचेच नाही, असं आठवडाभराचं मौन पंतप्रधानपदाची शोभा करतं. कधीतरी याच पक्षाच्या जाज्वल्य नेत्यानं, जो सध्या अडगळीत आहे, त्यावेळच्या पंतप्रधानांना ‘सबसे निकम्मा प्रधानमंत्री’ अशी चपराक लावली होती. त्याच पंतप्रधानांना आताच्या पंतप्रधानांनी ‘मनमौनसिंह’ असं नाव दिलं होतं. मग आता या दोन्ही उपाध्या एकत्र करून ‘मौनी निकम्मा’ म्हणून साभार परत करायच्या काय? टीकेची झोड आणि राजकारण याना मध्य म्हणून बघायला आम्हालाही आवडत नाही पण राजकीय झेंड्याखाली EVM च्या मदतीने प्रतिनिधी झालेले कधी प्रतिनिधींच्या पुढं असलेले 'लोक' या शब्दाला जागले नाहीत. हे पण कटू सत्य म्हणावं लागेल का नाही...? भारत निर्माण होतोय असं लाट पहिली पण समुद्र मात्र आम्हाला राजस्थानी वाळवंटासारखाचं दिसतो आहे. महिलांच्या समस्या घेऊन जगत असताना निर्भया पथक त्यांच्या परीने हा ... 'अथक' प्रयत्न करूनही महिलांच्या लचके तोडले तर कसे जातात. गस्त आणि प्रशासन इतकं स्ट्रीक्ट असताना खिंडार पडतेच काशी...? शाहिस्तेखान निसटून जातोच कसा..? ही प्रश्न आम्हाला पडतात पण विचारायचं कुणाला हा पण या प्रश्नापेक्षा भला मोठा प्रश्न बनून गेलाय. कारण न्याय आणि सुव्यववस्थेवर नियंत्रण तथा लोक हित वर्धक पोषक वातावरण जपण्याचे एकमेव सूत्र म्हणजे लोकप्रतिनिधी. आणि अशा कठुआ आणि उन्नाव सारख्या प्रकरणात जर सावरासावर जर लोक प्रतिनिधीच करत असतील तर न्याय कुणाला मागायचं आणि असं प्रश्न पडणं साहजिक आहे...
    आत्ता पर्यंत कोपर्डी आणि अशा अनेक प्रकरणाचा छडा किती सक्षम पद्धतीने लागला आम्हालाही कळत ना. या सर्व घटनांतील पुरुषी मानसिकता हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. मग तो पुरुष आमदार असो, मंत्री, अधिकारी, प्रधानसेवक असो की सरसंघचालक. स्त्रियांचं स्वावलंबन आणि स्वयंनिर्णयन कायमच खूपत असतं सर्वांनाच. त्यामुळेच स्त्री आरक्षण विधेयक संसदेत धूळ खात पडतं. हरेक बलात्कारासोबत नवा कायदा, नवे नियम, नव्या समित्या. पण पुरुषांची शिकवणी नाही. तीन मुलांच्या आईवर कोण बलात्कार करेल, हे भाजप नेत्याचं दिव्यज्ञान. हे असे मर्द ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाकडून आपण अपेक्षा तरी काय करायची? असं नाही ज्यांच्या मूळ आपल्यात आज गाव राज्य आणि देश जिवंत आणि सुरळीत चालू आहे त्याचे तारणहार म्हणजे जवान आणि जवानांच्या पत्नीवर सत्ताधारीचा प्रतिनिधी असे बेताल वक्तव्य करतात का ओ कुणाचं श्रेय आणि अभय आहे याना....? बलात्कार यांच्या काळात आणि त्यांच्या काळात होत नव्हते का असा उत्तर आणि प्रश्न येतील पण प्रतिनिधी आणि मॅनेज नावाची वाढीव चरबी फक्त या सध्य सत्ताधाऱ्यांच्या अंगावर आहे म्हणून असे प्रकरणे सर्रास आणि रोजरास घडत आहेत. याला बंधन काय म्हणून अनेकांचे उलट प्रश्न येतील ही पण त्यांना उत्तर एकच असु शकते ज्यांच्यात हिमंत नसते ते फक्त भुंकत असतात आणि आपण भुंकणारऱ्याला भाकरी घालायचं का इमानदार कुत्र्याला आपलं करायचं हे सर्वस्वी तुम्हा आम्हाच्या हातात आहे.

    या आणि अशा गुन्हेगारीतील गुन्हेगारांना त्यांचे त्यांचे पक्ष, नेते, धर्म, जाती वाचवतील. यातून स्त्रियांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. रामराज्यांनी भारलेल्या सध्याच्या काळात राम, रावण, धोबी, सगळेच एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अग्निपरीक्षा, लवकुश व आजन्म वनवास!

...तेव्हा प्रतीकं आणि मिथकं यातून बाहेर पडत थोडं उच्चरवानं सांगायला हवं की, बांगड्यांचा अहेर तथाकथित मर्दांना पाठवू नका. आम्हाला बांगड्यांचं ओझं नाही की, ते तेवढंच आमचं स्त्रीधन नाही. आता सती पेटणार नाहीत, तशी बांगडीही फुटणार नाही की, कुंकू पुसलं जाणार नाही. म्हणून पर्यायी न भक्कम शासन येईपर्यंत जस आरक्षणाचा प्रश्न गाजरात रूपांतरित झाला. आणि त्या ८ वर्षाच्या असिफा प्रकरण दुर्लक्षित व्हावं म्हणून श्रीदेवीच्या प्रकरणाची चिन्ह चिन्ह करून चाळण कंटाळले इतकं चाळून पसरवल आणि हे सगळं शाळा आणि ज्ञान प्राप्त करून पण योग्य तात्पर्य आपल्यात मिळत नाही आपण फक्त परराष्ट्र मंत्री , भाई और बेहनो च्या गोड आपकी अदालत मध्ये बघून भारत मागासत्तेची स्वप्न पाहणार असू तर आपण चुकीच्या रस्त्यावर आहोत. चुकलं असेल तर क्षमस्व...!


धन्यवाद...!