Tuesday, 8 January 2019

जगण्यातला व्यवहार रुपी प्रवास...!

शिर्षक : जगणं = व्यवहाराच्या सावलीतलं एक अप्रत्यक्ष प्रवास...

 【 ...अर्थात जगण्याच्या पंक्तीतल्या माणूस आणि व्यवहार मधला जिंदगीच्या संघर्षाचा काळ आणि द एन्ड यावर कटाक्ष टाकणार माझं लेखन !】

लेखन :- एन.के. (पत्रकार)

    सर्वांचं मानापासून धन्यवाद; माझ्या प्रत्येक वैचारिक गोष्टीला आणि सत्य परिस्थितीला शब्दात मांडून आपल्या पर्यंत जेव्हा जेव्हा पोहचवल तेव्हा तेव्हा मला तुम्ही प्रत्येकांनी भरभरून दिल. प्रेरणा आणि एक उमेद मिळावी इतकं स्तुतीसुमने माझ्या पदरात दिलात त्याबद्दल दहे दिल थँक्स..!

   हे बघा ! व्यवहार सगळेच जपतात पण माणसातील माणूसपण जपलं गेलं पाहिजे ह्यासाठी आग्रही असणारी व्यक्ती म्हणून प्रत्येकाने स्वतःकड बघितलं या पेक्षा स्वतःला घडवलं तर जीवन खरचं सुंदर वाटल्याखेरीज राहणार नाही. सामन्यात जगायला म्हणून पाहिजे ते करत सुटणारे आपण कधी स्वतःकडे लक्ष देत नाही ही सर्वात मोठी खंत आहे. वयाच्या बालपणात मोकळी स्वप्न कवटाळून जगण्यात मजा वेगळी होती, पण तारुण्यात अस कोणतं अस भूत अवतरलं की आपण जोतिष्य झालो न भविष्याच्या सु- (चांगल्या) च्या पाठीमाग धावताना या जीवन गाण्याला व्यावहारिक बनवून घेतलं. मनसोक्त जिवन जगायचं म्हणून किंवा रिलॅक्स राहायचं म्हणून आपण कमवायच्या नादी लागून बसतो मग हळू हळू ४०-५० शी ओलांडत मग मग या हायब्रीड जगण्यात आपल्याला रिलॅक्स राहू इतकं वेळ त्या वयात संपून जाते. यासाठी मग कोणत्या शेड्युलने जगायचं काहीच गरज नाही तर एक माणूस म्हणून जन्माला आलोय तर माणूस म्हणून वावरूया जसे माणस अशी कमवा की २ शब्द शेअर करताना ऐकायला ४ जण असायला हवे सोबत. नाहीतर रोजीरोटीतर आज भिकारी पण कमवून घेऊन खातो. मग आपल्या सूट-बुटला काय किंमत ? म्हणून नात्यांची कदर करायला शिका कारण कुणीतरी किती सहजपणे नात्यांचं मनोगत सांगून गेलं आहे. " जी नाती मनाने जोडली जातात ती कधीच तुटत नाहीत" मग ते प्रेम असो की मैत्री..." अस सिम्पल राहायच. लक्षात घ्या कुणीच कुणाची साथ आयुष्यभर देऊ शकत नाही पण तुम्ही कुणाच्या जगण्याचे अविभाज्य घटक होता तेव्हा ते नातं नक्कीच कॅज्युअल असतं नाही हे मात्र अगदी खरं आहे. अनेकदा तुम्ही जीवापाड जपलेल्या नात्यात गैरसमजुती , मतभेद स्वतःच्या पाऊलखुणा मागे ठेवून जातात पण एका सॉरी ने आणि माफ करण्याने ती नाती पुन्हा सहज जुळली जातात. हा टर्निंग पॉईंट कायम मेंदूवर अधोरेखित करून टाकूया. का नाही जुळणार शेवटी ती आपली असतात आणि कायम कोणत्या ना कोणत्या वळणावर आपलीच राहतात. लेखाच्या शीर्षक प्रमाणे प्रत्येक माणूस व्यावहारिक जीवनाला चिकटला आहे असं नाही तर आज सामन्यात विचार केला की खेड्यात राहणारा माणूस जरा शेजारच्या घरातून आवाज आला की "काय हो काय झालं...?" म्हणून विचारणारा व्यक्तीश: आपुलकी आपल्याला शहरातल्या बनलेल्या आर.सी.सी. मनामध्ये दिसते का हो...? शेजारी कोण राहतो आपल्याला माहिती नसत पण गावातल्या प्रत्येक लहानातल्या लहानग्या तान्ह्याला गावातील गल्ली न घर न बोळ माहिती असत याचा या जगण्याशी काय संबंध म्हणून तुम्हाला प्रश्न पडणं साहजिक आहे लक्षात घ्या माणूस म्हणून एखाद्याच्या ज्ञात असणं म्हणजे ओळखीतून हुन जास्त आहे कारण आजकाल ओळखीच्या माणसाचा उपयोग फक्त काम आठवलं की लक्षात येणं अस पाढा बनला आहे. म्हणून कायम आपल्या माणसाच्या सलग्न राहा सोबत करा शेअर करा कारण आठवत का बघा एक रिच लग्न आपल्या सगळ्यांना आवडलं असेल पण माझा वैचारिक किंवा काही जणांनी केला असेल नाही माहीत नाही पण एक गोष्ट लक्षात आली. भारतातील नामांकित श्रीमंत अंबानीना आपण सर्व जण ओळखतो माझ्या मते... झालं असं की इशा अंबानी च्या लग्नाचे काही व्हिडीओ बघायला मिळाले लग्नात केलेली अप्रतिम सजावट पाहिली मंत्री, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील दिग्गज यांची मांदियाळी पाहायला मिळाली आणि सोबत पूर्ण हिंदी सिनेसृष्टी तिथे अवतरली होती,  सहज मनात विचार येऊन गेला आपली मुंबई म्हणजे महाराष्ट्राची राजधानी आणि इथल्या मातीत मराठी चित्रपटाने अगदी ऑस्कर पर्यंत झेप घेतलेली...; दर्जेदार कलाकार , साहित्य आणि चित्रपटांची निर्मिती हा मराठी सिनेसृष्टीचा चेहरा आहे पण तरीही एकही मराठी कलाकार ह्या समारंभासाठी आमंत्रित दिसला नाही. का कुणास ठाऊक पण महाराष्ट्रात राहण्याची खंत वाटण्या इतपत थोडं का होईना पण वेगळं आहे हे...काय आहे ना महाराष्ट्राच्या भूमीत राहून मराठी अस्मितेच्या जोरावर आणि या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या मातीत जन्म घेऊन जग विख्यात बनणारी लोकं आज मराठी अस्मिता विसरून जात आहेत का काय ही मला खंत वाटली इतकंच म्हणून हा विषय. तसं पण हे दुःख आजकाल व्यक्त करायचीही महाराष्ट्रात भीती वाटू लागली आहे कारण मराठी आणि महाराष्ट्र ह्या दोघांचा संबंध आता तुटू लागला आहे का अशी भीती निर्माण झाली आहे. म्हणून हा उदाहरण यासाठी की आपण अशा सेलिब्रेटीच्या आयडॉल म्हंणून उपयोग करतो पण लक्षात ठेवा की लेखाच्या शीर्षक प्रमाणे आपल जनजीवन आणि जगणं हे आपल्या माणसासोबत असायला हवं तेव्हाच कुठं तरी आपल्या जगण्याला अर्थ असणार आहे अन्यथा परके न वेगळे या व्याख्यात आपलं जीवन बेजार झाल्याशिवाय राहणार नाही. साधारणतः शहरी जीवन जगण्याच्या बरोबर ग्रामव्यवस्था सुद्धा सुधारित आवृत्तीच्या छायेत असली पाहिजे यासाठी ही प्रयत्न झाले पाहिजेत. भारतामध्ये प्रजासत्ताक स्थापन झाल्यानंतर लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली गेली आहे. स्वातंत्र्य, बंधुता, समता आदी अनेक तत्वांचा त्यात समावेश आहे. जगण्याच्या सोयी सुविधा सोबत राहणीमान सुद्धा उंचावला आहे याचं मुख्य कारण म्हणजे शिक्षण आज तळागाळापर्यंत पोहचल आहे. पण समता रुजली आहे का हा महत्वाचा प्रश्न सुद्धा पडून जातो. कारण माणूस हा माणूसच रक्त लालच पण आजही वेगळ्या जातीची आणि धर्माची लोक आजही खेड्यात वेगवेगळ्या गल्लीत राहतात म्हणजे हमारा हमारा अलग अशी किंचित राहणीमान दिसून येत. त्यासोबत त्यांचे राहणीमान आणि व्यवहार ही वेगळाच दृष्टीस येतो. याचे सुद्धा परिवर्तन झाले पाहिजे यासाठी आपले जगण्याचे व्यवहारात थोडं बदल केल की नक्कीच यात बदल घडतील.
          ...कारण माणूस म्हटलं की मरण आहे आणि आज ना उद्या आपल्याला मरायचं आहे पण इतकं हे जीवन फक्त कमाई, अच्छाई म्हणून जगायला आपण वेडे आहोत का अस म्हटलं तर वाईट वाटू नये कारण माणसं आणि झाडं ह्या दोघांची तुलना आपण करून बघूया झाडांसारखीच माणसांची वेगवेगळी रूप आणि भोग सुद्धा. आता हेच बघा ना कुंडीतली झाडं ही मुळातच नाजूक, अती ऊन वारा न सोसता येणारी, कुंडीच्या सुरक्षित आश्रयात स्वतःची मूळ रोवून बहरणारी. ह्या झाडांना कठोर राहता येत नाही की वागताही येत नाही. ताठरता हा स्वभाव नाही. सुसंस्कृत , संवेदनशील आणि भावुक माणसं देखील अशीच असतात. संस्कारांच्या चार भिंतीत सुरक्षित आयुष्य जगणारी, स्वप्नांळू ,कुणी दुखावू नये म्हणून काळजी घेणारी, हे जग आपल्या सारखंच साधं सरळ आहे असा विचार करत वाईट अनुभवातून ही सहज कोलॅप्स होतात कारण कुठल्याही कोणताही अपघात न पचवता फक्त व्यवहार म्हणजे मी न माझ संसार किंवा माझी माणसं म्हणून जगणाऱ्या माणसाला कधी कधी लोकांनी टीका केली , निंदा केली तरी स्वतःच्या मुळांना ही चिकटून राहतात. कोणताही बदल दर्शवत नाहीत. अर्थात गुलाबाला काट्यांच सौरक्षण असत पण गुलाब प्रत्यक्षात हा मात्र कोमलच असतो ना ? कुणी दुष्टपणे कुंडीतून उखडून टाकलं तरी जगण्यासाठी लागणारी धडपड ह्यांच्या अंगीच नसते म्हणूनच ती छोट्याशा आघातानेपण ह्या जगाचा निरोप घेतात. मग हा उदाहरण आपल्या जीवनाला समानार्थी ठरतो कारण आपण फक्त आपल्या व्यवहाराच्या कुंडीत राहून आपलं जीवन जगत असतो. जरा बाहेरच्या जगाचा टेक्निकल थिंक करून बघा नक्कीच छान वाटेल. नाहीतर या व्यवहाराच्या जगण्यात आपलं जगायचं हिशोब चुकून जाईल ; हो ना...? मग आजपासून कस जगायच आणि मानवी व्यवहार बाजूला करून कसा वाईट मायनस आणि चांगलं तेवढं प्लस करता येईल न यातून एक सुंदर जगणं जगता येईल ठरवून घेतलं तर बर वाटेल...!

   धन्यवाद...!

मोबाईल. - ८८०६६०५८५२

Wednesday, 2 January 2019

ए मितवा : जगण्याला पंख फुटले !

शिर्षक - 😍हेssss माझ्या जगण्याला पंख फुटले...; प्रेम न प्यार भरी जिंदगी की कहानी...!

लेखक - आपला एन.के....✍
मोबाईल - ☎-8806605852


एखादी व्यक्ती आपल्या सोबत सु-भाषित आणि नवखी आहे. तिच्या सोबत जस जसे संपर्क वाढत जातात मग प्रत्येकाला आपली बाजू "बाहुबली" म्हणून आपण चांगले मित्र या पेक्षा जिवलग मित्र आहोत असे भास होऊ लागतात. मनाने मग एखाद्याच्या डोक्याखाली उशी प्रमाणे विसवून जाण्याची मग स्वप्ने प्रत्येकाला पडू लागतात. साधारणतः मी एक जेन्ट्स या नात्याने विचार करून लिहावं म्हटलं या बद्दल तर जस म्हणतात ना "आदमी सब एक जैसे होते है..." अस जर एक सुंदर न सुशील महिला समोर बोलायला आणि इकडे ही स्वतःला सलमान खान समजणारे मग हळूच प्रेमाच्या चादरीत आपली प्रेमाची शेकोटी शेकून घेण्याचा एक अविभाज्य युद्ध सुरू करतात किंवा होतात. मला सांगा अशी मैत्री किती दिवस टिकते हो...? मग हा मैत्री पद्धतीचा किस्सा किती दिवस न किती काळ टिकणार प्रभूच जाणे ना...? टिको न टि माणसाची बोलण्याची पद्धत न रोजच्या रोजमराच्या जिंदगीच्या रुळावरून जरा त्याच्या-तिच्यासाठी प्लॅटफॉर्म सोडून बाजूला येऊन अवगत कला म्हणून हवं तर छान छान बोलून आपलं करून घेण्याची मग दोन्ही बाजूने इनिंगज चालू होतात. प्रत्येक जण एकमेकाला पहिल्या दोन तीन वाक्यात पूर्णतः समजून जात जातात. मनाच्या कोपऱ्यात कुणाला ना कुणाला या पेक्षा एक पुरुष जातीला न त्यातील काही वयोगटातील न अपवाद यात ७० ते ८५% जणांना लवकरात लवकर महिला किंवा मुलगी आपल्यात असावी न आपल्या प्रेमाच्या बाहुपाशात सामावी अशी वाटते. महिला अपवाद वगळता त्यांनाही काहीना तस वाटत..नाही असं नाही त्याही शेवटी "दिलं तो बच्चा है जी" च्या श्रोते असतात त्यांना अपवाद कसे वगळून चालेल...? मग प्रशंसा , आवड निवड मग परत गर्लफ्रेंड सारखी जानू, बाबू, राजा, राणी मग चालू होतं. न प्रेम होतं मग तो "मै प्यार का प्यासा " मग तिकडून ही आवाज येतोच "मै प्यार की पुजारीन" हा मग अस पाढे चालू होतात. सामान्य माणूस म्हणून विचार करायला जरा सुदीक वेळ नसतो आमच्याकडे आणि पुढच्या महिलाकडे एक साम्राज्य, स्वप्न, आयुष्य आहे हे विसरून तिला किंवा आपल्याला प्रेमाची भूक लागू लागते हळू हळू आशा पल्लवित झाल्या की मग प्रेमाच्या गोष्टीत वाढ, कधी कधी कॉल तर कधी कधी लेट नाईट चाट आपल्याला आपलं भान आणि पुढच्याला स्वतःच भान नसत. रंगवलेल्या कल्पक गोष्टीत जवळीक न हळूच येऊ घातलेल्या संभाषित मिठीत या बर्फाळ थंडीत दोघ विसरून जातात अस काहीस जगात प्रेमाच्या नवीन फॉरवर्ड रिलेशनशिप बनत असतात. ही बाजू झाली क्रमांक एक.
स्वतःच्या जीवनात किंवा इतरांच्या विचारांचा घेतलेला एक क्षण किंवा प्याराग्राफ म्हणून पाहिलं तर प्रेमाची मानस अस बनतात का हो...? हा प्रश्न मला पडला साहजिकच लेख लिहायला घेताना वर्णन न शब्द कसे पटलावर घ्यायचे समजलं नाही पण सत्य उत्तरावं न याची सत्यता माझे वाचक म्हणून तुम्ही द्याल अस ठरवलं...!
मग दुसरी बाजू काय ...? - मित्र न मैत्रीण म्हणून जीवनात येणं चूक नसत लक्षात घ्या, जिंदगीमे हर दिन नया है यहा रोज चेहरे नये मिलते है अस नवीन मित्र मैत्रिणी ज्या नात्यातून पलीकडे भेटतात तुटतात यालाच जिंदगी म्हणतात न हे सगळं सोडून घर, दार, संसार , काम याला दिलेला वेळ म्हणजे भविष्य म्हणून चुकीच पाहिलं गेलेल्या स्वप्नासाठीची धडपड. हे बघा नाती जपायचं म्हणून हवं तसं "जैसे थे " एकमेकांच्या भेटीत आलो तर एक सुंदर नात प्लस पॉईंट म्हणून विश्वास पूरक नात निर्माण होत. इथं एक प्रेमाचा विषय चालू आहे तर असे की जर बोलण्याच्या रुपरेषेत आपण जर लक्ष्मण रेषा ओलांडली नाही म्हणजे जस आहोत तस मानापासून एकमेकांच्या सानिध्यात व्यक्त पासून ते वर्तन घडवून आणलो तर पुढची किंवा पुढचा तुमचा फॅन लवकर नाही होणार पण खरं असलेल्या तुमच्या मनावर नक्की फिदा होईल मग तुम्ही "मुझे प्यार हुआ प्यार हुआ अल्लाह मिया" म्हणून नाचल तरी चालेल. म्हणजे अस की एखाद्या बद्दल जाणून घेतल न एकमेकांच्या चांगल्या वाईट बद्दल जाणून घेऊन त्या अनुषंगाने आपण त्यांना आणि ते आपल्या समोर व्यतीत झाले न त्यांच्या किंवा आपल्या सुखदुःखात सुखावणार एक पुष्प जर आपण एकमेकांचे बनलो तर नक्कीच प्रेम करायला हरकत नाही मग प्रेमाची व्याख्या ही अशी असावी : काळजी करणार, अडचणीला धावून जाण्यासाठी कोणताही स्वार्थ न पहाणार, चेहरा, रंग, रूप, ढंग न पाहता कायम एकमेकांसाठी पाठीशी असणार नात रुपी प्रेम झालं तर नक्कीच या प्रेमला जागतिक संमती असायला हरकत नाही. सकाळचा चहा ते शुभ रात्री पर्यत तिच्या सोबत गप्पा टप्पा सुरू होऊद्यात मग असच या दिनचर्येत "आप मुझे अच्छे लगने लगे" म्हणून गाणं जरी म्हटलं तर तेही रिप्लाय मध्ये तुम्हाला "तेरे ईशक मे नाचेंगे..." म्हटल्याशिवाय राहणार नाहीत. एकमेकांच्या काळजीत जगायचं म्हणून मग तिला आपल्या प्रेमाच्या उदाहरण किंवा स्टंट न करता आपलं मन न तिच्या बद्दल असलेलं मानसिक प्रचिती विचार जैसे थे व्यक्त व्हा मग तुम्हाला ही ती तस व्यक्त झाली किंवा होत असेल तर हेवा एकमेकाच्यात वाढेल मग दोघ प्रेम करू शकता न ते प्रेम चिरकाल टिकेल १००% ग्वाही आहे माझी. मग हे इंग्लिश १४३ ( आय लव्ह यु ) च काय करायचं आणि १८1 ( एक आठवण) च काय...? सांगतो ; प्रेम केल्यावर लगेच इंग्रज व्हायचं नाही तर एक खोडकर मैत्रीण म्हणून पाहणाऱ्या तिची आठवण आली तर मिस यु म्हणून मेसेज केलं किंवा तिला मिस केलं तर गैर नाही, किंवा तिच्या प्रशंसा न तिच्या मनाला बर वाटल पाहिजे म्हणून अस फक्त छान म्हणण्यापेक्षा आपल्यासाठी ती नुतन आहे पण आपली जिवलग आहे म्हणून लव्ह यु म्हटलं तरी नो प्रॉब्लेम ना गाईज...? अशा प्रेमाचीही गोष्टी ज्ञात आहेत पण लक्षात घ्या ह्या दोन्ही गोष्टी (क्रमांक ) एकत्र आल्या वाईट काहीच नाही पण समवयस्क असल्यास शब्द राईट टू ऍक्ट असल्यास तर नक्कीच लग्न हा एक सेफ न सक्सेस पर्याय बनवु शकतो न एक सुंदर कुटुंब म्हणून रेशनकार्ड साठी अप्लाय करू शकतो. हसू नका एक रेशनकार्ड म्हणजे कुटुंब न कुटुंब बनल की जिंदगीची एक टास्क बनून जातो न असच मनाने जगात राहिलो तर जीवन अफल ना सो म्हणून हे रेशनकार्डच उदाहरण.

तात्पर्य म्हणून काही घेण्यासारखं असेल किंवा असावं असही वाटत नाही मनापासून जपणारा - जपणारी असेल तर नक्कीच एकमेकांवर सुंदर प्रेम करा, नाती जपली जातील असे भाष्य आणि वर्तन असुद्या विरह असुद्या, तिच्या न त्याच्या बद्दल कायम आदर असुद्या, न प्रेमात विरह न आठवणीच मोठ्ठ गाठोडं असुद्या मग एकदा गुणगुणा "याद आ राहा है..." ; कारण विरह सहन केल्याशिवाय प्रेम करता येत नाही आणि विरह झाल्याशिवाय मनमोकळं न स्वच्छ प्रतिमेने आपण एकमेकाला व्यक्त होऊच शकत नाही न जेव्हा फ्री माइंडेड ने आपण व्यक्त व्हायला दोघ शिकू तेव्हाच प्रेम होईल न तेव्हाच प्रत्येकाच्या जगण्याला नवं प्रेम पाखरू मिळेल न कालांतराने या तुमच्या जगण्याला पंख फुटल्याशिवाय राहणार नाहीत.

धन्यवाद...!🙏

Sunday, 30 December 2018

आभार प्रदर्शन...!

🙏 मनापासून धन्यवाद ! नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या किंवा देणाऱ्या सर्व जिवलग मित्र, मैत्रिणी,प्रतिष्ठित, अधिकारी तथा प्रियजन...

        वर्षभर लेख न अनेक माध्यमातुन कायम ना सही काही अनेक दलबदल काळात सानिध्यात राहिलो न सोबत करत असताना आपण म्हणजे कधी तुम्हीही किंवा मीही कधी जात पहिली नाही किंवा कधी रंग-रूप नाही फक्त एक व्यक्ती म्हणून किंवा रक्ताच्या नात्यापालिकडे जाऊन एक महत्वाचा सहवास म्हणून उत्तुंग न आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सोबत असलेल्या विचारांची देवाणघेवाण करत आयुष्याची अनेक वर्षे जात आहेत किंवा नव्याने भेटलेल्या सर्व नूतन पण मनापासून आदर्श विचार घेऊन सोबत केलेल्या आपण सर्वांनी ३१ डिसेंबरला किंवा १ जानेवारीला या पाश्चिमात्य नूतन वर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव माझ्यासोबत इतर तुमच्या संलग्न असणाऱ्या सर्वांना कराल. सर्वांना विश करण्यासाठी शुभेच्छा आणि मला केल्याबद्दल धन्यवाद...!
संतांच्या भूमीत आपण वाढलो तुकारामाचे अभंग, कबीरचे दोहे न यातून शिकवण घेऊन जगणं जगायला शिकणारे आपण स्वराज्य निर्माण करताना महाराजासोबत १८ पगड जाती धर्माची लोक सोबत केलीं हा विशाल संस्कृतीचा महाराष्ट्र घडला. अनेक महान हिंदु-मुस्लिम ग्रंथ मग त्यात भगवत गीता, किंवा कुराण असो किंवा कोणत्याही कल्पक जाती ज्या निर्मित आहे त्यांचे धर्मग्रंथ असो ते ग्रंथ नेहमी एकी आणि त्याचे बळ शिकवते ते कधी निंदानालस्ती ना कधी द्वेष किंवा ना ही कधी तेढ शिकवते पण सोबतच संस्कृती आणि परंपरा शिकवते. नूतन वर्षाच्या पाडव्याला शुभेच्छा देऊन आपल्या संस्कृती आणि परंपरेची ओळख दृढ करणे माझ्या मते चांगली राहील. धर्म म्हणून मानवता, आणि जात म्हणून मानव बघायला शिकूया आजपासून यातून आपल्या असणाऱ्या प्रत्येक संस्कृती आणि रीती रिवाज भक्कम होण्यास मदत होतील. मी तरी शुभेच्छा दिलं तर उत्तरार्थ धन्यवाद देणार नाही तुम्हि ही ब्रिटिश वर्ष सुरवातीची शुभेच्छा देणं टाळलं तर बरं होईल. बदल होईलच म्हणून सांगणार नाही तर फक्त कॅलेंडर बदलून मन न नात कायम ठेवणारे माझे जिवलग आहात तुम्ही म्हणून एक संदेश आपल्या सर्वांसाठी....!

- आपला एन.के....✍
मो. - ८८०६६०५८५२

Friday, 28 December 2018

मैत्री : रक्तातून जास्त महत्वाचं एक बंधन !!

शिर्षक :- इअर एंडिंग है ; पण नात्यात कायम चांगल्या विचारांची बेगिनींग राहुद्या...!

[खऱ्या जीवनाच्या जिवंत असणाऱ्या निर्जीव माणसाबद्दलच माझं लेख...]

लेखक :- एन.के. पत्रकार

सगळ्यांच्या आयुष्यामधला एक वर्ष संपत्तीच्या सांजवेळी आपल्या या नात्याबद्दल दोन शब्द, वर्ष संपत आलं आहे अनेक कडू गोड आठवणी आपल्या सोबत आहेत प्रत्येक भेटलेला माणूस काही ना काही नवख्या रुपात भेटला , गेला ; पण त्याची तीच वेळ आणि काळ कायम कुणाच्या ना कुणाच्या स्मरणात असते. नात तात्पुरत किंवा अखंडित माहिती नाही पण प्रत्येक क्षण आणि अडचण किंवा सोप्या भाषेत आपण म्हणतो की नड असते त्यावेळी आठवण करणारी आपली स्वार्थी बुद्धी सुधारित आवृत्ती म्हणून कधीही जन्माला येत नाही पण काही अशी ही नाती असतात जी कायम हवीहवीशी वाटतात तर कायम आठवणींच्या हिंदोळ्यात जवळ बाळगावी अशी प्रखर न मनस्वी असतात. "मैत्री" दोनच शब्द पण उजळणी करायला गेलं तर शब्द कमी पडतील, मैत्री म्हणजे काय ? काय असत त्या अतूट नात्यात ? मैत्रीचं नात हे नवीनच लावलेल्या रोपटयासारखं असत ते लहान असतानाच काळजी घ्यावी लागते. एकदा का वृक्ष झालं की तोच आपल्याला सावली देते.,आधार देतो, मित्र ही जगातील अशी एकमेव भेट आहे जी आपण स्वतःलाच स्वतः देत असतो. आपले अंतरंग उघडवून दाखवणारा सर्वोत्तम आरसा म्हणजे आपला मित्र. मैत्रीच्या नात्यातील गोडवा म्हणजे आपल्या सर्वांना प्रिय असत मित्र हा वय, वेळ, काळ काहीच बघत नसत लहान पासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वांचे जिवलग सवंगडी म्हणजे एक व्यक्त होण्याचं दालन तथा व्यासपीठ असत. आपण कुठल्या ना कुठल्या कारणाने एकत्र येत असतो न तिथून मैत्रीची जी सुरवात होते त्यातून अनेक काल त्या त्या कारणाने ती व्यक्ती आपल्या सानिध्यात संपर्कात असते.
              इतकं समरस लोक असतात जगात की त्यांच्यात असणाऱ्या स्वभाव हा एक दृढ कारणाने त्या व्यक्तीला आपण कधीच दुराऊ शकत नाही अशा घट्ट नात्यालाच आपण मैत्री म्हणून संबोधतो. मैत्रीच्या या पर्वात अशीच नाती जपायला शिका प्रत्येक कल्पक नात्यात एक वैशिष्ट्य असत. या वर्षाच्या सांजवेळी माझ्या लेखाची प्रतीक्षा आणि वाचक वाढत आहेत याच समाधान आहे पण समाज आणि सौन्दर्य आणि निसर्गाची निरीक्षणाची सांगड घालत नेहमी एक सामाजिक संदेश देण्याचा माझा प्रयत्न राहील याचप्रमाणे लेखाच्या वळणावर पुनः मानव म्हणून किंवा एक सजीव म्हणून आपण जगण्याच्या कुठल्या पंक्तीत बसतो हेच कळत नाही हे बघा, मृत्यूच्या उंबरठ्यावरुन स्वर्ग आणि नरकाच्या भव्य दिव्य अशा दैवी महालातून माणूस म्हणून जन्माला येऊन आईच्या गर्भातून बाहेर येऊन हाडांची पकड निर्माण होईपर्यंत तेही आई वडिलांच्या तळहातावर जगलेलं ते बालपण आणि त्यानंतर समाजपुढं स्वतः मी काय आणि माझं अस्तित्व काय म्हणून साकार करण्यासाठी कागदी पुस्तक मधली रेघीव आणि वळणदार शब्दांच्या संगतीत शिक्षण घेत महाविद्यालयीन शिक्षण एक सदृढ पायरीवर आपल्याला जाणवत आपल्याला भाषा मिळाली, जात मिळाल, धर्म मिळलं,मित्र मिळाले एवढंच नाही राज्य मिळालं, देश मिळालं इतकं असूनही कधीच हा विचार केला गेला नाही की मानव म्हणून जिवंत असणाऱ्या आपण खरंच सजीव का निर्जीव...? सजीव म्हणजे हालचाल करतो अशीच व्याख्या असेल का ओ..? स्वतः जगतो आणि दुसऱ्याला जगावतो म्हणजेच मानव किंवा सजीव अस असेल कदाचित...? चालतो बोलतो तो सजीव का मातीचा आवरण घालून "स्वार्थ आणि स्वतःच" जीवन जगणारा बुजगावणे ...? उत्तर नाही ना... असच निर्जीव वस्तू किंवा गोष्टी आपल्याला कायम मदत करतात कधी कधी स्वतःची हानी करून घेऊन मदतगार बनतात, झाडे, पक्षी, प्राणी, डोंगर, पाणी ह्या सगळ्या गोष्टी कधी स्वार्थ बघितलेलं पहातो आपण नाही ना....! मग आपण सजीव कसे सजीव म्हणून जगताना इतरांचा विचार अपल्याकडून कधी होतो कधीच नाही झालेल्या अवतीभवतीच्या घटना वर सुद्धा दुर्लक्ष करणारे आपण इतके कठोर कसे हो झालो....फक्त चाट, कमेंट, यातच दंग असणारे आपण कधीतरी सत्याच्या जीवनात सजीव होऊयात...? या संकल्प करूया जे आपले आहेत त्यांच्यासाठी वेळ नाही काढलं तरी चालेल पण कारण नसताना कॉल किंवा भेट घायच आजपासून, आवडत्या व्यक्तीला भेट न तेही अचानक द्यायचं..., बघा अस जमत का सोप्प पण सुंदर जगायला...! 

★ तात्पर्य - मैत्री हाच मानवाला जगायला शिकवतो कारण मैत्री म्हणजे मानवाच्या कुठल्याही जगण्याच्या स्टेपला आठवणीत येणार, मदतीला येणार साधन नाही तर मानव म्हणून जगण्याचा चूक -बरोबर तपासायच शिक्षक आहे म्हणून या शिक्षकाला स्मरत राहा मानव जन्माच्या सार्थकात सजीव म्हणून जगण्याची खरी मजा येईल...

- धन्यवाद -मो.- ८८०६६०५८५२

Tuesday, 18 December 2018

परमेश्वर सगळं बघत असतो....!

शिर्षक :- लक्षात असुद्या...आपण कायम परमेश्वराच्या CCTV कक्षेत असतो...!

लेखन- एन.के. (पत्रकार)

【 जगण्याच्या दिनचर्येत सदकार्याची घट पाहता स्वार्थी समंजस जगणं सोडून द्यायला हवं ; बहुदा इतरांसाठी जगणं आपल्याला कधी जमणार आहे...?, समाजासाठी जगायला शिकलं पाहिजे हा बोध अभिप्रेत करणारा लेख.... 】

सकाळी सकाळी उठून आपल्या कामाला जायचं आमच्या पदावर काम करायला जायच्या संकुचित वृत्ती प्रत्येकांत असते लहान पासून ते थोरा मोठ्या प्रमाणात हे "आपलं "पाहायला मिळत शाळेत नाही गेलो तर हजेरी पाटावर माझी कमी जाणवेल, कामावर नाही गेलो तर पगार मला कमी मिळेल, इथं नाही गेलो किंवा तिथं नाही गेलो तर अस होईल तस होईल म्हणून स्वार्थी जगणं सोडून कधी जगासाठी वेळ द्यायला आपण मनापासून तयार होतंच नाही का हो...? दुसऱ्यांची सुख दुःख यात २ मिनिट थांबून बघून, ऐकून घेण्याव्यतीरिक्त त्यात सामील होण्यापर्यंत विचाराधीन होणारी आपली मजल कधीच जाणार नाही का हो...? कधी तरी धावत्या युगात गरजेच्या मदतीला आणि कधी तरी दुसऱ्यासाठी एखाद दिवस जगून बघूया..? कारण इतरांच्या साठी केलेलं नेहमी परमेश्वराच्या कॅमेऱ्यात पुण्य म्हणून नोंद नोंद होत असते, आणि आपण ऐकलं असेल की -
"जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले" या संताच्या उक्तीप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असणाऱ्या शोषितांची सेवा हीच ईश्वर सेवा. जनसेवेची आवड रक्तात पाहिजे आज समाजात व्यस्त लोक वाढत आहेत. कधी कधी माणसं आपल्या ऐपती प्रमाणे वागतात किंवा ऐपत नसूनही असूनही देखावा पसंद करतात. म्हणजे भीक देण्यापासून ते एखाद्याला मदत मदत जरी केली आणि ते जरी लहान असलं तरी त्याची जाहिरात मात्र निवडणुकीच्या प्रचारासारख स्वरूप असत. संकुचित राहून स्वतः बद्दल फुशारकीची स्तुती सुमने गाण्यात प्रत्येकाला रुची असते पण ही प्रवृत्ती बदलली पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे..! यासाठी मदत म्हणून संतांची शिकवण आपल्याला उपयोगी पडेल म्हणजे यात तुम्ही म्हणाल की संतांच्या आध्यत्मिक जीवनाचा का आशय पण काही शिकवण किंवा काही संतांच्या जीवनव्यथा ह्या जनसेवेची सक्षम आणि भक्कम उदाहरणं देणारी आहेत उदा. संत गाडगेबाबा त्यांनी प्रत्येक कठीण प्रसंगात देशातील जनतेचा उध्दार करण्याचे काम त्यांनी केले आहे व समाजाला प्रबोधन करून ज्ञान प्रसार केला आहे. संत गाडगे बाबा या संतामधील महत्वाची भूमिका पार पडणारे एक आगळे वेगळे संत होऊन गेले. त्यांच्या कार्यामुळे त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण झाले. याप्रमाणे संत तुकाराम असतील त्यांनी ही आपल्यात असणाऱ्या कर्मठ भावनेला संपवण्यासाठी प्रयत्न केले समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठीच त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. पण एक म्हण आहे ना "कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडचं" याप्रमाणे आपल्यात बदल म्हणून कोणतीही गोष्ट दिसत नाही आपण आपल्या आणि स्वतःच्या विश्वात कायम मग्न असतो इतकं मग्रूर असतो की कोणत्याही गोष्टीला आपण सहज घेऊन त्यावर रिऍक्ट होत नाही जो पर्यंत स्वतःबद्दल नसत किंवा आपल्या बद्दल नसत तो पर्यंत. गरिबीतून वर येण्याची जी पंक्ती आहे त्या पंक्तीला साजेसे जगणे असते आपले साधारणतः म्हणजे की अडचणी आणि परिस्थितीत "बिकट" नावाची पाटी सर्वांच्या माथी असते सर्वांना लहानपणापासून अडचणी असतात. मग राहतो प्रश्न कुठे तर आपल्या परिस्थितीची जाणीव होऊन स्वतःच्या वृद्धिबद्दल विचार करायला सुरुवात करून आपण मग संकुचित बनतो हे टाळले पाहिजे.
   या उलट जगायला छानसे दिवस असतात चांगल्या परिस्थितीत वावर, जगणं, असत अशा वेळी आपल्याला शक्य तेवढं एक मेकाला समाजालाच नाही तर सवंगडी असतील किंवा सोबती असतील याना मदत करत राहणे किंवा बहुदा हे जमत नसल्यास प्रत्येकाच्या सुख दुःखात एकत्र येऊन त्यांना हवा असणारा सहानुभूती प्लस वेळ देत समाजात त्या प्रत्येक गरुजूच्या पाठीवर फिरणार माझं हात अस प्रत्येक बुद्धीने विचार केला पाहिजे आणि गरज आहे. म्हणजे मी म्हणून काय केलं पाहिजे अस ही तुमच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो... If we are not the part of solution, then we are the part of the problem. अशी भावना जर असेल ना तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्याचा सन्मान नाही जरी मिळाले तरी समाधान मात्र नक्की मिळेल. प्रत्येकजण अंबानी नसतो त्यामुळे मी काय करायला हवं हा विचार करत बसू नका कारण मी एवढा मोठा लेखक नाही पण साधारण विचार करू आपण की आपल्या आयुष्यात इच्छांचे मृगजळ, आशा-आकांक्षांच्या उसळत्या लाटा, मायेची छाया किंवा परकेपणाचे दु:ख, कर्तृत्वाचे शिखर वा वैफल्याची दरी, सुखाची पौर्णिमा व दु:खाची अमावास्या, कधी वैभव तर कधी पैशांची कमतरता हे येतच राहणार, परंतु या पलीकडे जाऊन मला काही करायचे आहे. बस्स! हेच आपल्या आयुष्याचे ध्येय मानून पुढे जायचे. मग प्रत्येक मार्ग तुम्हाला गाईड म्हणून काम करेल. आपल्या अवती भवती असणारी जी मार्मिक गोष्टी घडताना आपण बघतो त्यावर आपल्याला आणि आपल्या वैचारिक बुद्धीच्या जोरावर जर मार्ग काढता येऊ शकत असल्यास मनमोकळं व्यक्त व्हा...! आणि यासाठी समाजकार्याची बिल्ले असले पाहिजेत खिशाला अस नाही त्यांच्या साठी काहीतरी करण्याचा प्रयत्नच करा बस... तुमच्या सदकार्याच्या यादीत नाव आणि परमेश्वराच्या कॅमेऱ्यात पुण्याची चित्रफीत तयार व्हायला वेळ लागणार नाही...!

"चला कॅमेरा लावलाच आहे २०१८ च्या वर्ष समाप्तीच्या पूर्वसंध्येला हा माझा वर्षाचा शेवटचा लेख तुमच्या साठी सादर करतोय मन जरी बळकट असल तरीही बुद्धी मात्र कर्मठ असत हे दृढ सत्य आहे ; नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक स्वाभाविक संकल्प मनात असतील मग या संकल्पात एक संकल्प अस ही करा मानवाच्या मूलभूत गरजा पाणी, वीज वाचवा, परिसर स्वच्छ ठेवा, बळीराजाला मदत, गरजूला हात, आपल्या सोबत वेळ, देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावणं हा ही उद्देश ठेवा ,आर्थिक मदत तुमच्याकडून होऊ शकत नसले, तरी इतर शक्य त्या प्रकारे खारीचा वाटा उचलायचा हे निश्चित करू शकता, रोजच्या धकाधकीच्या जीवनातल्या सगळी कर्तव्य पार पाडून, थोडासा वेळ आजूबाजूच्या गरजवंतांना द्यायचं द्यायचं ठरवा. आपण नेहमीच आपापल्या कामात व्यग्र असतो. परिणामी आपण माझं कॉलेज, माझा अभ्यास, माझं घर असे आत्मकेंद्री विचार करायला लागतो. आपल्याच भावविश्वात आपण रमलेलो असतो. या सगळ्यातून मुद्दाम वेळ काढून महिन्यातून किमान एकदा तरी जवळपासच्या वृद्धाश्रमात, अनाथाश्रमाला भेट देण्याचा निश्चय करा, महिन्यातल्या एक दिवस तरी त्या मुलांमध्ये, आजी-आजोबांमध्ये जायचं, तिथे जेवायचं, त्यांच्याशी छान गप्पा मारायच्या, लहान मुलांशी आपणही लहान होऊन मनसोक्त खेळायचं ठरवा"

धन्यवाद...!

- आपला एन.के. (8806605852)

Friday, 23 November 2018

माझा बाप : थेट लेकीच्या मनातलं !

शिर्षक :- लेक आणि बाप : नात्यापलीकडचं संबंध सांगणारं एक बंधन

 ( ज्यांना मुलगी आहे अशा बापानी आणि बापावर प्रेम असणाऱ्या सर्व लेकींनी वाचवा असा लेख...)

लेखक :- एन.के. (पत्रकार)
वेळ / दिनांक :- 22/11/2018

अनेक पुस्तक आणि अनेक गोष्टीतून नात्याची ओळख पटवून देणारी अनेक उदाहरण न्याहाळत असताना एक अस नात जे नात म्हणून नाही तर पवित्र, प्रेमळ तथा निस्वार्थ नात्याबद्दल अनेक जणांनी लिहल असेल पण माझ्या कडून लिहिण्याची पहिली वेळ नात्याबद्दल लिहीत असताना त्या नात्याची पारख असायला हवी पण अशी काही नाती आहेत जी अनुभवलं नसलं तरीही त्याबद्दल उत्तरावं अस वाटतं ,लिहावं वाटत अस नात म्हणजे "लेकीचं आणि बापाचं"


बाप आणि लेक हे नाते शब्दांत मांडणे कठीण आहे कारण ज्याला मुलगी आहे त्याला नशीबवान म्हणले पाहिजे कारण *"मुली ज्याच्या पोटी जन्म घेतात किंवा ज्याला मुलगी आहे त्याला एक विलक्षण सामर्थ्य परमेश्वराने प्रदान केले आहे. मुलीची हरेक इच्छा मुलापेक्षा सौम्य गतीने जरी पूर्ण होत असतील तरीही बापाचं हृदय मात्र त्या लेकीसाठीच तुटत न रडत हे कदापी विसरून चालणार नाही."* मुलीच्या जन्मानंतर बेटी बचाव शब्दांकन तिच्या जन्मांपासून चालू होतं वाईट वाटण्यासारखं काही नाही पण कटू सत्य असत अस म्हणतात त्या प्रमाणे बेटीला समाजाच्या प्रत्येक चांगल्या वाईट नजरेपासून वाचवून तिला संस्कार आणि संसाराचे बाळकडू पाजून परक्या घरी आपल संस्काराचे तास घ्यायला पाठवणं ही मुलीचं जीवन अस न समजता किंवा इतकाच तुच्या जीवनाचा आणि संभाळाचा संदर्भ न मानता किंवा इतकंच नाही तर तर तिच्या सुख दुःखाची झालर अंगावर घेत तिच्या प्रत्येक अडचणीला पगडी ते टोपी पासून धोतर पसरवणारा बाप न इतकं करत असताना जीवनाच्या झुंझार रस्त्यावर बापाला माझ्यासाठी एवढं करावं लागलं यासाठी हृदय पिळवटून घेऊन स्वतःला शांत करणारी ती मुलगी या अक्षररुपी नात्याला नाव देता नाही आलं तरी चालेल पण या नात्याची शिकवण मात्र इतिहासापेक्षा श्रेष्ठ आणि प्रखर आहे.
एखाद्या मुलींसाठी तिचा लाडका बाबा हा शहाळ्यासारखा असतो बाहेरून कितीही कठोर असला तरी आतून मात्र नितळ आणि मधुर पाण्याचा झरा असतो. पुरुष म्हटलं की हृदयाच्या कडा मजबूत असतात घरातला जन्मदाता मेला तर घरच्यांना सावरत डोळ्यातून चुकून अश्रू न काढणाऱ्या त्या बापाला तिच्या मुलीला सासरी पाठवताना कुठून पाझर फुटतो अगदी धाय मोकलून रडतो. इतकं कठोर मन असून ही तिच्या लग्नात मात्र त्या हृदयाला गुलाबाच्या फुलाईतकी मुलायमता येते कुठून म्हणून या नात्याला नाव शोभत नाही ना उपमा शोभत नाही. "ज्याच्यात मुलीच्या सर्व वाईट-चांगल्या गोष्टीला सामोरे जाऊन मग तुच्याशी निगडित असणार अब्रू असो किंवा वाईट नजर असो या सर्वातून खंबीर साथ करत तिच्या प्रत्येक केसागणिक तिची काळजी करण्यापासून ते तिच्या वर कायम योग्य संस्कार देऊन आदर्श म्हणवून घेण्याची ताकद असते त्याच्याच पोटी देव "मुलगी" देत असतो..."
कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते, तर तो फक्त तिच्या वडिलांवर लेक जर घराचे सौख्य असेल तर,
त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाबा असतो. या नात्याबद्दल मला जास्त लिहिता आले नाही कारण नात्याचं वर्णन करताना मनातून भरून येत नात जरी आपल्याशी निगडित नसलं तरीही त्या बद्दल असणारं प्रेम न भावना आठवलं की भरून येतं चार संकलित ओळी लेखाच्या मध्याला सादर करतोय-
शॉपिंग करताना आईने कमी किमतीचा ड्रेस काढला तर; हळूच लेकीला विचारून भारी किमतीचा ड्रेस घेणारासुद्धा बाबाच असतो,
आईने काही काम सांगितले तर,
तिला दटावणारासुद्धा बाबाच असतो,
लेकीचे पहिले बोबडे बोल ,
तिने टाकलेले पहिले पाऊल ,
तिचे लाडिक वागणे,
तिची घरभर पैंजणांची छुमछुम हे सगळे पाहून सुखावतो तो बाबा असतो आणि
लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळणारा ,
आणि प्रसंगी रागे भरणारा पण बाबाच असतो,
पण त्यात त्याची लेकीसाठी तळमळ असते, तिच्यासाठीची काळजी असते..!
लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणाराही बाबाच !!!
आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचे धन हे कटू सत्य पचवणाराही बाबाच !!!
ज्या लेकीला २०-२५ वर्षे जीवाच्या पलीकडे सांभाळले तिला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचे हृदय काय तुटत असेल ह्याची कल्पनाही करता येणार नाही. ..
आर्त धागे तुटल्याची ती वेदना कोणीच नाही समजू शकणार.
आपल्या लेकीला माहेरचा उंबरठा ओलांडून…
सासरी जाताना पाहताना ढसाढसा रडणाराही बाबाच असतो….
आपल्या लेकीचा हात परक्याच्या हाती देताना… आतून तुटणारा बाबाच असतो…
“दिल्या घरी सुखी रहा म्हणताना ”
मनातून खचलेलाही बाबाच असतो…! ( संकलित)
... लिहिण्याचं कौतुक झालं नाही तरी चालेल पण त्या नात्याला आणि तुमच्या अवती भवती असणाऱ्या या बांधनाला पवित्र मानून तुमच्यात असणारा समज आज सुधारत "मला मुलगी नको" हा संक्षिप्त न्यूनगंड बाजूला करून मुलगी जन्माला घालून भाग्य समजल्या सारख बाल पद्धतीने नृत्य केलं तरी चालेल पण आजपासून मुलगी असणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला नशीबवान मानायचं तुमच्या मनाला कधी इतकी भावनिक चटक लागली नसेल पण तुमची लेक सासरी जाताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवण्यासाठी आणि तुमच्यात असलेले यासाठीच सामर्थ्य बघून ईश्वर तुमच्या पोटी मुलीचा जन्म दिलाय हे समजून घ्या. बाप म्हणजे बाप असतो कारण तिच्या साठी सर्वस्व वेचण्याची हिम्मत त्याच्यात असते.
लग्नाळू मुलगी ही तिच्या वडीलांच्या दृष्टीने फार मोठी जोखीम असते. कधी एकदा मुलीला सुस्थळी आणि योग्य हाती सोपवतोय आणि आपण आपल्या या जबाबदारीतून पार पडतोय ही चिंता असंख्य वधूपित्यांना भेडसावत असते.
पण जसजसा लग्नाचा दिवस जवळ येतो तसतसा हाच वधूपिता हळवा होतो. आपल्या काळजाचा तुकडा दुसर्‍याच्या हाती सोपवतोय, ते तिला नीट वागवतील ना? इथल्यासारखा हट्ट तिने केला तर अल्लड समजून तिला माफ करतील ना? तिला इथल्यापेक्षा जास्त सुखात ठेवतील ना? या नव्या चिंता त्यांना भेडसावायला लागते आणि जेव्हा त्याला कळते की आपली मुलगी सासरी फार फार सुखात आहे तेव्हा त्या बापाला धन्य धन्य वाटते. इतकं पांढर शुभ्र नातं बाप लेकीचं.

आमच्या सारख्याला लेखांकन करताना ही डोळे पाणावले. बस एवढंच या नात्याबद्दल वर्णन आणि बांधनाबाबत लिहायला घेतलं एक वेळ पूरणार नाही.

- आपला एन.के. ( पत्रकार )

Thursday, 1 November 2018

चला कर्मातून आपली ओळख दाखवुया...!

शिर्षक - तुमच्यात मी एकटा वेगळा असलो तरी काय बिघडलं...?

लेखन- एन.के. (पत्रकार)

दिनांक - 01/11/2018/ 11:36

कधी कधी अंधारातल्या किर ओरडणाऱ्या रातकिड्यांचा आवाज पण शमतो, तर कधी कधी लाही लाही म्हणून ओकणाऱ्या माझ्या सुर्यदेवाची पण शाळा सुटते ना... तस काही गोष्टीत जेवढं ताणल जायला हवं तितकं न ताणता अगदी अलगत आणि हळू हळू आपल्या कर्मठ आणि कर्कश संवेदना कमी करेल तितकं चांगलं आहे...! अनेकांनी म्हणून ठेवलं आहे की "कर्म ऐसें करो की नाम हो जाये, नाम ऐसें कामाओ की नाम सूनते ही काम हो जाये" या पद्धतीने चांगले कर्म करत राहायचं कधी न कधी आणि कसलेही तथा कोणतेही अर्थात निमीत्त काहिही असो पण शेवटी जाणीव शिल्लक आहे तोवर एखाद्या कुंचल्यातून किव्वा कवितेतून, छायाचित्रातून वा लेखातून हे अनुभव प्रकट होतच रहाणार, तुमचेही व माझेही. आणि यातून नक्की काही तरी घेण्याजोगे आहे कारण कुणा एकाला सुधारण्यासाठी इतरांची मने नाराज करून बसू यासाठी त्यांचं धर्म आणि त्यांच्या कुवृत्तीच्या वंशाला जाऊ द्यावे करण असे वंश त्या त्या वंशात ते जवळून अनुभवले असतील किंवा अनुभवतील.
भोवतालच्या जगाशी मिळत जुळत न घेण हा काहीसा स्वभाव कम धर्मच असतो काहींचा. Survival of Fittest चं शास्त्र हे आपल्यालाही लागू होतच, अर्थात आपण जिवंत असतो तोपर्यंतच. मात्र कधी कधी अगदी हट्टाकट्टा किंव्वा वरकरणी एकदम सुदृढ मनुष्य सुद्धा अचानक हृदयविकाराने मरतो तेव्हा तोन्डात बोटे घालण्याखेरीज आपल्याला काही करता येत नाही. ह्या अशाच काही अनाकलनिय गोष्टी आपल्या सभोवताल किंवा आपल्यात घडतात किव्वा मधूनच एखादी सुनामी येते तेव्हा रोजमराच्या जीवनातील बूडापासून टाळूपर्यंत गोठलेल्या काही शिरा पुन्हा तडतडतात, जेव्हा काही आपल्या सोबत आणि आपली निजी जीवनात जवळ म्हणून संबोधले जाणारे एखादी व्यक्ती किंवा वस्तू आपल्यापासून जेव्हा दल बदलू सरड्या प्रमाणे आपल्यातून वेगळं किंवा आपल्या कल्पक बुद्धिपेक्षा जास्त विचार करायला लागली की शहाणा नावाचा प्राणी अंगात शिरला की आटोमॅटिक सॉफ्टवेअर अपडेट झाल्यासारखं आपल्यावर खिल्ली उडवण्यापासून ते आपल्या विरोधात वागण्याचा संसार करण्याचा विचार करणारी माणसे आपोआप निर्माण होतात तेव्हा एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला मोठं करण्यासाठी महा बहाद्दर कष्ट घेत आहेत.
"एकजुटीने पेटलं रान, तुफान आलंया"
या सत्यमेव जयते सारख्या वॉटर कॅम्प ब्रीद वाक्य प्रमाणे जर एकजुटीने आपण पेटत गेलो तर नक्कीच आपल्यावर चांगल्या दिवसाच तुफान आल्याशिवाय राहणार नाही...!

आपला एन.के. ( पत्रकार )