Wednesday, 26 February 2020

ONLINE : OFFLINE !

डिजिटल किती सेफ, किती घोडेबाजार ?

           आपल्या ज्ञात गेल्या १०-१२ वर्षात संगणक युग अर्थात डिजिटल दुनियेची धून वाजत आहे. संगणक नाही तर कोणतेही काम नाही असे दृढ व्याख्या बनून गेली आहे. कोणत्याही क्षेत्रात आता ऑनलाईन शब्दाशिवाय कामच होत नाही. आज कामे राहतील बाजूला पण ऑनलाइन संभाषण म्हणजेच कनेक्शन असे समजणारी नवीन समाज तयार झालं आहे म्हंटलं तर वावग ठरणार नाही. आजकाल सकाळ झाली की मोबाईल हातात घेतल की पाहिल्यादा डेटा सुरू करून ऑनलाईन येऊन मेसेज पासून नवीन विषय हातात हाताळायची जणू हौसचं. अनेक वर्षे झाली पंतप्रधान यांनी डिजिटल नावाच्या शब्दाला आणल्यापासून प्रत्येक माणसाचे काम असो किंवा कोणतेही संदर्भ असो इंटरनेट शिवाय काम होत नाहीत. गेल्या काळात एखादे काम करावयाचे असेल तर १०० कागद लागायची , १७-६० पडताळणी व्हायच्या पण आता ऑनलाईन सिस्टीम मुळे वेळ तर वाचलेच पण धगधग पण कमी झाली. पण या युगात आपण या ऑनलाईन नामक प्रक्रिया किती सेफ किंवा किती यात घोडेबाजार होतो हे कळणे मात्र अशक्य. ऑनलाईन कामे झाल्याने सुखवस्तू म्हणून पाहणाऱ्या सर्वांना आपण केलेलं ऑनलाईन काम किंवा आपण आपल्या कामासाठी दिलेली दस्तऐवज किती सुरक्षित आहेत याची परिसीमा मात्र अस्पष्टच.
           ऑनलाईनच्या या गौडबंगाल खेळामुळे घरात संगणक असेल, इंटरनेट असेल तर कोणालाही ‘ऑनलाइन शॉपिंग’ची इच्छा ही होणारच! तसंही खरेदी ही कोणाची आवड, कोणासाठी अगदी व्यसन तर कोणासाठी ती डोकेदुखीचीही बाब असते. प्रसंगी आपण या खरेदी करण्याचा उद्देशाने बोगस साईट आपल्यासमोर लादल्या जातात आणि त्या नुसार आपण साईट आणि त्या मागणी नुसार आपली असणारी पर्सनल माहिती किंवा यात अकाउंट नंबर, आधार नंबर किंवा पॅन डिटेल्स आपण सेव्ह करतो पण पुढे आपल्याला जर वस्तू आवडली नाही तर आपण पर्यायी प्रोसेस रद्द करून सोडतो मग हे आपण भरलेली माहीती चोरली जाऊ शकत नाही का ? काही वेळा पैशाचे व्यवहार आपण करताना आपल्याला OTP येते आणि मग त्या नंतर व्यवहार पूर्ण होतो. पण काही वेळा नेटवर्क मूळे प्रलंबीत झालेले व्यवहार पुन्हा नवीन नेटवर्क मध्ये नको असलेले व्यवहार पूर्ण झालेले अनेक उदाहरणे आहेत.
ऑनलाईन आज सुरक्षित की अ-सुरक्षित हा प्रश्न सर्वांच्या समोर पडतो. किंवा त्यात किती ठिकाणी घोडेबाजार होतो हा ही तितकाच महत्वाचा प्रश्न सर्व सामान्य किंवा आपल्यासमोर पडलेलं आहे. उदा. एखाद्या ऑनलाईन सर्व्हे मध्ये जर विहित माहिती भरली तर आपल्याला त्या योजनेचा लाभ मिळतो. पण ऑनलाईन सिस्टीम असल्याने काही माहिती अचूक भरली जाते व लाभार्थी म्हणून नसलेल्याला काही वेळा लाभ मिळतो आणि सामान्यांच्या वाटेला काही वेळा फक्त वाट पाहिल्याशिवाय काय पदरात पडत नाही.
        काही ठिकाणी ऑनलाईन ही उक्ती म्हणजे खरी डोकेदुखी बनते १० रु. च्या कामाला संगणक बघून आपल्याला १०० रु. द्यावे लागतात. कागदी घोडे नाचली तरी चालतील पण गरिबांच तोंड लहान झालं की १०-२० कमी करून अगोदर काम व्हायची. पण आता ऑनलाईन म्हणजे दवाखाना झालाय संगणक वर काय होतंय कळत नाही आणि सांगेल तेवढं पैसे देऊन औषध घेतल्यासारख आपल्याला पैसे द्यावे लागतात. आणि त्या कामात किती खरे पणा किती खोटेपणा समजायला मात्र रस्ता नसतो. म्हणून ऑनलाईन जरूर एक वेळ चांगलं पण आज कागद जमावणारी माणस कमी झाली आणि त्यांची जागा संगणकने घेतली हाच फरक.


     लेखन : एन.के.( पत्रकार ) मो. 8806605852

Thursday, 20 February 2020

परीक्षा युद्ध की यशाची पायरी ??



          फेब्रुवारीची शिवजयंती संपली की दोन-एक महिने परीक्षेची धून सुरू होते अर्थातच मी बोर्डाच्या इयत्ता १२ वी आणि १० वीच्या परिक्षाबद्दल बोलत आहे. मागील काही वर्षात बोर्डाची परीक्षा असली की एकच ऑक्टोबर पासून परिक्षार्थीची धामधूम असायची.

 शाळेच्या नियोजनात पण या परीक्षेला घेऊन कडक नियम करत मुलांकडून चोख अभ्यासक्रम पूर्णत्वाला हात घातलं जायचं न यात शिक्षकांची सुद्धा कसरत व्हायची. अलीकडे आधुनिक काळात परीक्षा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याकडे असणार एक केंद्रित लक्ष किंवा परीक्षा कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. अनुक्रमे 20 अमानत गुण, विद्यार्थ्यांना हात लावायचं नाही म्हणून सैसाल मोकळं रान म्हणून आज विद्यार्थी परीक्षा किंवा शालेय असणाऱ्या पुस्तकी उपक्रमात तेवढ्या हिरहिरीने भाग घेत नाहीत जेवढं अगोदरच्या काळात घेतलं जायचं, मोबाईल, टीव्ही, पब्जीसारखे ऑनलाईन खेळ, व्हाट्सएप मैत्री, संभाषण यात अभ्यासासाठी काढून ठेवलेल्या एकूण वेळेतून किमान कमाल वेळ आज कमी होत चालला आहे .
             पाल्य न पालक यांच्या असणारी परीक्षा बद्दलच गांभीर्य काहीसं ढासळत चाललं आहे. पुस्तकांशी मैत्री म्हणजे जीवनाच्या यशाशी मैत्री ही म्हण आता लोप पावत चालली आहे.
जुन्या काळात मॅट्रिक शिकलं म्हणजे नोकऱ्या लागायच्या आज पदवीधर झाल तर शिपाई म्हणून नोकरी लागायची पंचाईत. आजची ही शिक्षण पद्धत काहीशी सोपी झाली पण त्या शिक्षणाचा फायदा आज काही ठिकाणी होताना दिसत नाही बेरोजगारी, अपुऱ्या नोकऱ्या यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. परीक्षेला सामोरे जाताना आज वेळेत अभ्यास करून त्यावर मात मिळावं यासाठी केलेलं गनिमीकावा टाइपचा अभ्यास आज दिसत नाही. खिंड लढवून आल्यासारखं आनंद आता पास झाल्यावर दिसत नाही. कारण शिक्षण पद्धत सोपी मुलांच्या पाठीवरच्या ओझं कमी करण्याच्या नादात आज शिक्षण कमी मार्क जास्त अशी पद्धत-परंपरा रूढ होताना दिसते आहे. शिक्षण घेतल्यानंतर ९०% च्या वर मार्क असणाऱ्या मुलाला आज घरी बसावं लागत आणि आरक्षण असलेल्या मुलाला रस्ता गवसतो. मग शिकायचं का आणि कसं हा प्रश्न असताना जास्त मार्क किंवा मेरिट मध्ये ९५% च्या वर गुणानुक्रम यायला हवं आणि परीक्षेला एक युद्ध म्हणून जिंकण्याच्या हेतूने लढायचं आणि काढलेला किल्ला हाच आयुष्याचा एक पायरी, स्टेप म्हणून बघितलं तरचं शिक्षण या उक्तीचा उपयोग होईल अन्यथा आपली तलवार म्यानातून बाहेर येऊन जगाच्या बाजारात परफॉर्मन्स दाखवणार नाही हे नक्की त्या उद्देशाने पाल्य न पालक परीक्षा कडे बघावं या हेतू हा लेख.


                                           लेखन : पत्रकार एन.के - ८८०६६०५८५२

Monday, 17 February 2020

प्रेम : आई वडिलांवरचं...!

शिर्षक : खरं प्रेम तेच : आई-वडिलांवरचं

       आजची पिढी इतकी प्रगत झालीय की समाजात सत्य आणि असत्य न जाणता अनेक नात्यात सहज गुंफली जाते. अनेकांच्या स्वार्थी किंवा मतलबी या समर्पक नावाची पुष्टी न करून घेता ट्रस्ट नावाचा विश्वास ठेवून बसते. आजकालची पीढीला माहीत नाही की लोकांनी लोकांसाठी बनवलेलं एक नात म्हणजे संबंध हे नक्की मग त्या नात्यात रक्त नाते, मानलेली नाती असे अनेक प्रकार पडतात. वेळ आली की आवाज दिल्यावर येणारे १० तर कारणे सांगणारी १०० अशी अनिष्ट प्रथा आज समाजात वाढीस लागली आहे. सोशल मीडियाचा अतिरेक आजकाल आपण सभोवताल पाहतोच, नव-नव्या कॉन्टॅक्ट लिस्ट आणि मैत्रीच्या नात्याने तयार होणारी नाती काही स्वार्थी अपेक्षांचे ओझे घेऊन लयास जातात. अर्थातच माझ्या म्हणण्याचा हाच उद्देश आहे की आज सजवून धजवून आपल्या न पुढच्याच्या अंगावर स्तुतीसुमने उधळून तयार केलेल्या डुप्लिकेट नात्यात आज काहीसा प्रत्येक युवा ते सम वयस्क लोकांत ईश्क वाला लव्ह होताना दिसतो आहे. युवा वर्ग असो किंवा कोणीही पुरुष किंबहुना महिला किंवा मुलगी प्रत्येकाला नव्या झालेल्या नात्यात एक मेकांबद्दल जाणून घेण्याची चौकस बुद्धी खूप प्रमाणात अन क्षणात वाढताना दिसते. प्रेम होतं न आकर्षण सारख्या मारक गोष्टीतून नात बनत मान्य पण आवश्यक असणारा त्यातला खरेपणा असतोच किती ? वेळ न एक समज ऑफ जवळचा प्लस ओळखीचा म्हणून ओढाताण करून चालू ठेवलेली नाती टिकतातच किती ? सोशल मीडिया किंवा डोळ्याने किंवा वयाच्या न प्रवाहाच्या बदलात आवडलेली नाती ग्रेट म्हणून निवडली जातातच किती?

           

             असा संदर्भ आज घेऊन येण्याचा एकमेव उद्देश की आज हा म्हणतो ना बोलीभाषेत फेमस तसला तो ट्रेंड झालाय पण नात बनलं तर आई वडील सारख बनावं. जे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आपल्या दांपत्यवर असलेली तमा, काळजी, प्रेम कधीही स्वार्थी किंवा उद्देशून व्यक्त होत नाही. सुखात दुःखात कायम काळजीच नव्हे तर त्यात असणारी आपल्या हिताचे सजेशन देणारी ही नाती गुंफणारी ते आई वडील न त्याच नातंच सर्वश्रेष्ठ.  ठेच लागली की आई बाबा वडील हेच सावरणार असतात. कधी अडचण आली तर  माय बापाच्या आशीर्वादाला तोड नसते. पोटच्या गोळ्याला त्रास होऊ नये म्हणून आपल्याला जग माहीत नसताना , आपण या जगात नसताना ९ महिने वाढवलेल्या माउलीने त्रास घेऊन जग दाखवलं तर आजही अशी प्रगत, पाश्चात्य संस्कृतीवर अपार लव्ह करणाऱ्या, जास्त पानांची पुस्तक वाचलेल्या मुलांनी आज अनेक ठिकाणी आई वडिलांच्या जीवाला घोर अर्थातच वृद्धआश्रम दाखवला. न तेही आज लग्न करून आणलेल्या बायकोच्या गॉड बोलीच्या प्रेम जाळ्यात अडकून हे कितपत योग्य आहे...?
तात्पर्य एवढंच की ट्रेंड वाला प्रेम न कमिटमेंटने वाढलेलं प्रेमाचं झाड, वेल एकदिवस वाळून जाणार आहे चांगल आहे की ज्यांनी आपल्याला भूक लागल्यावर दूध पाजलं आपल्या उदरातून त्रास देऊन जग दाखवलं त्यांच्या प्रेमाला उत्तर न उपकार आपल्या जगात कुणाकडे नाहीत पण तेच प्रेम उपकाराच्या छायेत का असेना पण त्यांच्या या वयात न यावेळेत तर प्रेम करा रे ! सांभाळून त्यांच्या वर थोडं तरी प्रेम करा रे !

Wednesday, 12 February 2020

हायब्रीड जगणं...!

शिर्षक :- जगणं आपलं हायब्रीड....!

कालियुगाच्या कलांतरात माणसाने प्रत्येक गोष्टीत गरुडझेप घेतली. अनेक रासायनिक संज्ञा वापरून जीवन आणि आपल्या भौतिक सुखाच्या गरजेच्या वस्तू क्षणिक वेळात मिळवण्याची कला अवगत करून घेतली. जैविक आणि अजैविक विविधता समजून घेताना सांजवेळ आलेली माणसाला समजायला वेळ झालं मग माणसाच्या आयुष्याचा घेरा कमकुवत होत गेला. पण निद्रिस्त पिढीला आता भाकरी ऐवजी पीझझा, आणि बर्गर अतीप्रिय वाटू लागला. समजून आणि उमजून जगण्याच्या पंक्तीतला माणूस आता हरवत चालला आहे.
            

      आता माणूस मांडी घालून जेवायला आज बसत नाही त्याला टेबल लागत तर पाश्चिमात्य खाद्य संस्कृतीला आपलंसं करून देणारी ही मॉडर्न आणि ४० वर्ष जगणारी कल्पक जीवनपट : अर्थात आजची आधुनिक जगणं. आजच्या १०० माणसात ८० लोकांत अनेक सूक्ष्म आणि अनेक मोठी आजार आढळतात कारण एकच की खाण्याच्या पद्धती आणि अती रासायनिक खतांच्या वापराने तयार झालेली पिके न त्यातून बनलेली पदार्थ तर दुसरीकडे चायनीज, अमेरीकन अशा परदेशी खाद्यचंगळ ला आज पसंदी आहे. 
पूर्वी लोक म्हणायचे की कमी खा पण स्वच्छ खा, किंवा खेड्याकडे चला, कारण ही असच होत की तेव्हाची माणसं ८० आणि १०० वा वाढदिवस साजरा करताना दिसतात. तर आजची माणसं वयाच्या ३० व्या वर्षी मधुमेह आणि कॅन्सर सारख्या आजारांची पथ्य पाळताना दिसतात. अगोदर आमच्या परिचीत मध्ये रोगर सारख्या औषध म्हणजे सर्वात विषारी मानलं जायचं, आत्महत्या करायला वापरलं तर त्याची कट्ट्यावर चर्चा होताना अशा भयानक विषारी औषधांची नाव चर्चिली जायची पण त्यांची जागा आता प्रोक्लेम सारख्या विषारी औषधने घेतली म्हणजेच माणसाने विषला सुद्धा जालीम विष तयार केलं म्हणजेच कमी प्रमाण नाही तर अती प्रमाण मधला अतिरेकी वापर म्हणजे अगोदरच औषध फक्त पिकांच्या पानावर कार्य करायचं पण आता अंतर्मुख होऊन विष पूर्ण धान्यात प्रमाण दाखवायला सुरवात केलं. म्हणजे आज आपण खाणार अन्न आणि त्यावर झालेली प्रक्रिया घातक असून आपण रासायनिक धान्य-पालेभाज्या खाऊन स्वतःचे अस्तित्व मातीत गाडून घेतोय इतकंच तात्पर्य. म्हणून आज जगाच्या बाजारात लहान शेतकरी, किंवा कमी प्रमाणात विक्रीसाठी उपस्थित असलेल्या बळीराजाकडून धान्ये आणि भाज्या विकत घ्या. म्हणजे जेणेकरून त्यावर आपल्या आयुष्याचा घेरा ठरवता येईल. यातून एकच बोध देण्याचा मी प्रयत्न करीन हायब्रीड जगण्यात फक्त ४ वाढीव दिवसाची अपेक्षा जगण्याची असेल तर व्यायाम, योग आणि उत्तम अन्न याला पर्याय नकोच.


आपला - एन.के. (पत्रकार) : ८८०६६०५८५२

Tuesday, 11 February 2020

माहीत नसलेला बाप...!

शिर्षक - माहीत नसलेला डोंगराएवढा आपला बाप

      घराला घरपण देणारी माणसं म्हणून आई वडिलांकडे आजकाल पाहिल जातं. समाजाच्या कानाकोपऱ्यात आईला महत्व आणि यशाचं कल्पिक श्रेय कायम देण्यात आलं. घर, खर्च, नाती, अडचणी सोडवणारा बाप माणूस कायम मागच्या रांगेत दिसला. बापाने माणुसकीची झाडं उभी केली, स्वतः कष्टाच्या हिंदोळ्यात गुंतवून घेऊन स्वतःची प्रतिमा झाकोळून जगाला आपल्या आप्तेष्ट असणाऱ्या कुटुंबाची झंकारच कायम प्रकाशझोतात तेवत ठेवली.

     आईच्या सोबतीची आणि मायाळू ऊब कायम सर्वांना समजली पण बापच महत्व आणि बापाबद्दल संदर्भ लेखन आणि उपमा कायम कमी प्रमाणातच आढळली. म्हणतात ना की जिजाबाईंनी शिवाजी महाराजच्या रुपात दैवत ए महाराष्ट्र नक्की घडवला किंवा तसं अवश्य म्हणाव,पण त्याचवेळेस शहाजीराजांची ओढताण सुद्धा लक्षात घ्यावी. शहाजी राजे आपल्या नेतृत्व आणि संभाषण कौशल्य अधिक निधड्या छातीने स्वराज्यासाठी रावण रंक व्यक्तिमत्व निर्माण करून शत्रूला अस्मान दाखवण्याची पुरुषार्थ कला मात्र महाराजांच्या देवाने अर्थात बापानेच दिली अस हे सत्य न स्वीकारावेच सोबत देवकीचं,यशोदेचं कौतुक अवश्य करावं पण पुरातून कृष्णाला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव पण तितकाच लक्षात ठेवावे. आजच्या आपल्या आधुनिक जगाच्या गाभाऱ्यात वडिलांच्या टाचा झिझ्लेल्या चपलांकडे, पडलेल्या बनियनच्या भोकातून आपल्या बापाची कीर्ती न स्वराज्य नकाशा इतका प्रखर आपला बाप असतो. घरासाठी १-१ रुपयांची कधी न कधी काटकसर केलेला अधोरेखित बाप हा पुण्य दैवत ए होम असतो, दैवत ए जिंदगी असतो, दैवत ए सुख असतो हे विधिलिखित सत्य. 
वडिलांचं महत्व कोणाला कळत? १०० दा बापाच्या प्रशशेंची स्तुतीसुमने गायली तरी कमीच बापाबद्दल लिहायला खूप काही आहे शब्द अपुरे पडतील इतकं बापच व्यक्ती मत्व आहे. अनेक ठिकाणी पितृछत्र हरपलं की घर सांभाळून घराची सावली बनुन राहणारी अनेक मोठी मुले, भावंड, आई, यांची जबाबदारी घेणारी माऊली- मुली असे अनेक जणांना बापाच्या व्यक्तिमत्व बद्दल नक्कीच जास्त माहिती असणार आहे. आईला न घराला बघत बघत स्वतःची इमेज तयार करायला लागणार वेळ आणि त्यानंतर पाठीमागे पाहिलं तर बाबा, पप्पा, वडील यांचं कर्तृत्व आठवलं तर नक्कीच डोळ्यांत अश्रू तरळल्या शिवाय राहणार नाहीत. लग्न सराई त्यात मुलीचं आयुष्य बहराव, मुलगा हवं नको बघितला असेल नसेल पण बापाला एक कप चहा, आणि एक ग्लास पाणी देणारी आपली मुलगी बहीण ताई हिच्या लग्नाच्या वेळी डोंगराच्या आकारएव्हढं बापाचा अंतकरण भरून येत. बापाच्या पश्चात पितृ छत्र नसलेल्या कुटुंबाला एकेक वस्तू, सुख क्षणासाठी , वस्तूसाठी तरसावं लागतं. अस हा बाप, बाबा, फादर, वडील ज्याची ख्याती जगविख्यात आणि डोंगराच्या अथांग विशालतेत पण न मावणारा लक्षणीय आपला बाप. 



- लेखन : एन.के. - ८८०६६०५८५२

Friday, 24 January 2020

फक्त मनाला लढ म्हणा..!

शिर्षक - फक्त मानाला लढ म्हणा...!


 [ कष्टाच्या झाडाखाली चढ आणि उताराची सावली असतेच, चांगल्या म्हणवणाऱ्या दिवसा मागुन वाईट दिवसांची झालर येत असतेच, बहरलेल्या झाडाला वाळवी लागल्यासारख माणसाच्या आयुष्यात देखील अनेक नयन पाणावणारे क्षण एक ना एक दिवस गर्दी करतातच, म्हणून जगण्याला अर्थ नाही म्हणून देवाला आणि दैवाला दोष देणारे आपण सर्रास पाहतो, पण पडलेल्या रास्तावरच्या खड्याला बायपास मारून नवीन सुरवात करून आसवांना आनंद अश्रुत कन्व्हर्ट करणारा एक छोटासा किमान-कमाल प्रयत्न माझ्या या लेखद्वारे...]

        सामान्य माणूस जगायला खऱ्या अर्थाने जगायला लागला तेव्हा त्याची भूक समजली आणि आजवर कमी कमी म्हणत मला कमी पडतंय म्हणून वयाच्या काठी पर्यंत मला हवं हवं म्हणून हव्यासी बनून गेला. कमी जास्त काम जास्त म्हणत साठवत गेला पण कधी सुखं म्हणून अनुभवला का नाही ना ? क्वचितच सोडले तर ऐश आराम वगळता कौटुंबिक तथा जगण्याचं खरं सुख मात्र कोसो दूर गेला आणि ते सुख अगदी बोटावर मोजणी होईल इतक्याच लोकांनी अनुभवली. काम, काबाड कष्ट, मेहनत करून हव्या त्या गोष्टी आज आपल्याला साध्य ही करता येतात हो पण शेजारी असा तसा म्हणून आपले असे तसे रस्ते बदलणारे बाहुल्यांचे वाटाड्या म्हणवणाऱ्या वाटसरूची संख्या मात्र अमाप झाली आहे. देवाच्या देवळात जाताना महागडी चप्पल कडे साधारण १०००-१२०० च्या चपलाकडे लक्ष देणारा आणि गरीब १-२ रु. देताना १०० द विचार करणारा कृत्रिम मानव आज निर्मित झाला आहे. देवाकडे जाताना मागण्या शंभर एक असतात पण देताना हात मात्र पठयाचे आकुंचन पावतात म्हणजे स्वार्थी वृत्तीच जग आपल्या भोवताल आहे. आपल्याला आज कष्ट करायचं आहे तर व्यासपीठ शोधावं लागत. व्यासपीठावर आपला वचक असायला हवं तर कष्टाचे पाढे मात्र २-३ वेळा जास्तीचे पाठ करावी लागतील इतकं समरस परिस्थिती मात्र नक्की आहे. सर्रास आपलं सामान्य जनजीवन घेतलं तर आज अनेकांच्या हाताला काम नाही, धंदा करावं तर मार्केट नाही, भांडवल नाही. या अशा नैराश्यात जगणारा आजचा बेरोजगार नोकऱ्या, आणि कामासाठी वणवण भटकंती करताना दिसतो आहे. कुटुंब आई वडील बायको आणि समाज यांच्या समोर मी व्यस्त दिसलो पाहिजे कामाला असल्याचं एक स्व समाधान आणि समाज सोबत कुटुंबाला दिलासा म्हणून कार्य करत राहणे म्हणजे एकच ध्येय हा आजच्या सर्वांगीण तरुण पिढीचा पाढा झाला आहे. अशात कर्ज काढून भांडवल करणे, धंद्याला चालना मिळायच्या आत आर्थिक मंदीची झळ आणि परत रस्त्यावर येऊन बेरोजगार नावाचा शिक्का माथी घेऊन हिंडणे हीच दिनचर्या बनून जाते. अशा वेळी मन सुन्न होत आणि वेगवेगळ्या नाहक आणि दृष्ट विचारांनी मन ग्रासत आणि अशा वेळी संयम सोडून हातात दोरी, किंवा नोकरीच्या आमिषाने संसार आणि कुटुंबाची राखरांगोळी करणाऱ्या कुटुंबाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे कुठं तरी थांबलं पाहिजे, असे तरुण आणि मंदीमुळे कंपण्यातून बडतर्फ झालेल्या बेरोजगार गटातील व्यक्तींनी टोकाचा निर्णय न घेता सावरत स्वविश्व उभं करावं न मुंगी होऊन का होईना पण साखर खात जगावं ही गरज, आणि जन जागृती आहे.
      ह्या संदर्भद्वारे इतकंच मत प्रकट करेन की आपण सगळे निव्वळ श्वास घेतोय जगतोय म्हणून जगणं सुरू आहे असा पाढा आहे. आपली तीच मळलेली वाट, त्या वाटेवरचे तेच जुने धुळीचे कण झेलत आपणही जुने होतोय, वर्ष निघून जातात, काही दिवस आणि रात्र काढून एखाद्या दगडाला ठेच लागून पडतो, थांबला जातो तिथंच नकारात्मक गोष्टीचा उदय होतो न आपण संपलं सगळं आता खूप आपण जग पाहिलं पण त्यातून आपण हरलो म्हणून दुःखाला कवटाळून क्षण क्षण संपत जातो. आतून शुष्क होतोय खचला जातोय, पण हा कधी विचार मनात आणत नाही की कधी तरी, कुठे तरी ह्या प्रवासाला नवीन दिशा देत आपला मार्ग जिवंत जगण्याकडे जाईल का ? संपलेल्या वाटेवर नवी चैत्र पालवी फोडता येईल का ? सूक्ष्म सही पण छान जगणं पुन्हा जगता येईल का ? हा विचार कदापी मनात येत नाही. म्हणून चला पेटून उठा आणि म्हणा " स्पर्धा अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही" आपल्या चांगल्या वाणी आणि कुशाग्र वागण्यातून जगाला आपलंसं करत माणसांमधलं आणि परिस्थितीमधलं वैविध्य कुशलतेने हाताळत आपलं स्वतःच जग आणि व्यक्तिमत्त्व विशेष प्रभावशाली करा. समजून ज शून्य आहे मी आणि ज्याच्या सोबत असेन ज्या रस्त्यावर माझी वाटचाल असेल त्याची किंमत नक्की दूगनी (दुप्पट ) करेन म्हणून संघर्षाला आज पासून लागा. स्वतः स्वतःला घडवा नक्की यश मिळेल जळणारे आणि आपल्या लहान कार्याला बघून आता हसणारे बाकीचे मात्र कधी अहंकार तर कधी आत्मसन्मान तर कधी भावनिक कुचंबणा ह्यातून सामान्यच राहतील अशी गोड समजूत मनाला द्या आणि आपल्या वाटचालीत आपण कुठे माघार घ्यायची ,कुठे पुढाकार घ्यायचा हे स्वतः आत्मपरीक्षण करून ठरवा. जगाच्या सल्ल्याची किंचितही वाट बघू नका. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जगू तोपर्यंत आयुष्याची संध्याकाळ खुणावू लागलेली असते. मग जाता जाता बघा जमलं तर अस जगायला " मनाचा थांग लागू न देता स्वच्छंद जागा म्हणजे एक विलक्षण संयमित मुखवटा जगाला दिसेल ही पण तुमचा आतला पॉवर ऑफ न्यू च्यापटर कायम कार्यरत ठेवा. सोबत यश शिखर सर केल्यावर आपली माणसं जी संकटात उभी होती त्यांचं ही मन जिंका. आजच्या युगात मानसिक संघर्ष, उलथापालथ घडत असताना,शब्दांना मौनाचा बांध घालणं खूप कठीण असते अशा देवाने निर्माण केलेली अशी माणसं आजूबाजूला असताना आपण नक्की कुठे चुकलो आणि अपयशी झालो त्याचा आरसा ठेवा आणि लेट बट ग्रेट जगायला सुरू करा.

धन्यवाद...!      - पत्रकार एन.के.- 8806605852

Tuesday, 10 December 2019

फॉरेनवाला इंडिया...

शिर्षक : पाश्चिमात्य संस्कृती-विचारांचा इंडिया...

लेखन : पत्रकार एन.के. - ८८०६६०५८५२

         [ भगवतगीता आणि कुराण सारख्या अनमोल धर्मग्रंथानी बनलेला हा आपला सुजलाम सुफलाम भारत देश. संस्कृती आणि परंपरा जपत मार्गक्रमण करणारा आपला देश आज अनेक लहान पासून वृद्ध पर्यंत ट्रेण्डच्या विळख्यात फसून मॉडर्न वाली व्याख्या आत्मसात करायला निघालेली पिढी आणि या पाश्चिमात्य मॉडर्न मुळे निर्मित झालेल्या वाईट नजरा आणि घाणेरडी प्रवृत्ती तथा यामुळं अत्याचार सारख्या निर्लज्म घटनांना कारणीभूत कोण ? संस्कृती बाजूला ठेऊन, वयाचा विचार न करता, राहणीमान न पारखता उच्च-भु राहण्याच्या गडबडीत भारतीय नारी म्हणून कोसो दूर गेलेल्या पिढीला, सिनेस्टाईलची कॉपीराईट जिंदगी जगणाऱ्याची डोळे उघडण्यासाठी छोटासा माझा प्रयत्न या लेखद्वारे...]


         शिर्षक अन संदर्भ वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या जाणार हे नक्कीच कारण ; आमच्या फॅशनला आणि राहणीमान आणि स्टेटस भरी जिंदगीला कोणी उपदेश द्यावा आजच्या मानवी विचारांच्या पलीकडचे आहे. अत्याचाराच्या आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या भोवतालच्या घटनांचा क्रम पहिला तर आजवर अत्याचार सहन करून जिवन संपवून घेतलेली ही स्त्री मात्र आहे. बलात्कार, खून, अतिप्रसंग, छेडछाडीच्या बातम्या शिवाय आज पेपर पासून वृत्त चॅनेल्सना सुद्धा रंग नाही का असे छिन्न प्रश्न मनात येऊन जातात. देशाचं भवितव्य म्हणून नजीकच्या काळात बातमी वाचली की देशात महिलांना जास्त धोका असणारा देश म्हणजे चक्क भारत, बलात्कार सारख्या गोष्टीच्या घटनाक्रममध्ये सर्रास भारताचा अव्वल स्थानी क्रमांक पाहायला मिळाला. बातम्या वाचताना किंवा असे विश्लेषण हाताळताना मनात लाज ही वाटते आणि चीडही तितकीच येते. सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेलं तर आज जी पिढी तयार होते आहे हेच कारणीभूत असेल ? किंवा आजच राहणीमान आजची "स्टाईल मे रेहने का" मूळ किंवा लोकांची मनस्थिती मूळे अर्थात स्वार्थी ( जी मी क्वालिटी असलो / असले पाहिजे ) च्या नादात अनेक भयावह घटना घडतात हेच अंतिम सत्य म्हणावं लागेल. भारत हा देश अनेक प्रांत अनेक धर्म अनेक महापुरुष अनेक ग्रंथ अनेक वेदो-पुराणनी बनला आहे. भारताच्या विविध प्रांत नुसार चालीरीती, परंपरा, पेहराव इतकंच काय तर खाद्य संस्कृती सुद्धा विभिन्नतेने नटलेली आहे. आज ह्या संस्कृती न विभिन्नता लोप पावत इतिहास जमा होताना दिसत आहे. एवढंच नाही तर आजही मॉडर्न म्हणून जगण्यात लोकांना न सध्य + भावी पिढीला धन्यता वाटते. म्हणजे एकूण एक तात्पर्य गाघरा छोली ते चोळी पासून पंजाबी ड्रेस सारख्या पेहरावांची जागा आज जीन्स- टॉप ने घेतली तर वरण भात किंवा दाल-बाटी ची जागा हळूहळू पिझझा बर्गर घेत आहेत म्हटलं तर वावग ठरणार नाही. याचबरोबर सिनेमा न ऑनलाईनवाल्या लाईफने तर लाईफ बदलून टाकली न त्यातून निर्माण होणारी स्टाईल, वागणं, बोलणे, कृत्य यातून आजची पिढी हिरो हिरोईन झाल्या तर काकू अँटी झाल्या न मग स्टाईल के नाम पे बिकनेवाली जिंदगी नजरेच्या जाळ्यात आयटमच्या शिक्क्याला जागा दिली न त्यात सेम बेरोजगारी, ( अंधार कोठडीत पडलेले न कुत्रं पण विचारत नाही आता ) त्या उच्चशिक्षण घेऊन ही काम नसल्याने कट्टा ओस पडून दारू न नसेचे अड्डे तुडुंब व्हायला लागले. म्हणजे आपली संस्कृती, संस्कार कानाडोळा झाले न 90-60 वाले युवक निर्माण झाले. न तरीही मेक इन इंडिया म्हणून अजून प्रशासन ठेम्बा मिरवतय.
संदर्भ कडवट हाती घेतोय भावना दुखावल्या तर क्षमस्व म्हणणार नाही कारण मत प्रकट करतोय न ठाम आहे या मतावर. आज बाहेर काम करणाऱ्या मुली कितीही काम असेल तरी किमान घरापासून ४०-५० किमी अंतराच्या आत काम करतात. आणि अगदीच अडचण असल्यास आज सध्या घरासमोर ४ चाकी असते. साधारण ८ वाजता जरी घरी जायला निघालो तरी लवकर म्हणजे साधारण ९:३० पर्यंत आपण पोहचू म्हणजे सेफ झोन मध्ये पोहचू. हा एक भाग झाला पण जर रोज आपण रात्री प्रवास करतो एकांतात तर त्याला सेफ्टी राहणं महत्वाचं म्हणजे लहान संरक्षण पुरते शस्त्र बाळगा. याच बरोबर सगळ्यात महत्वाचा विषय आपण राहतो कसे न आपल्या सभोवताल असणारी जनरेशन न त्याची नजर यावर लक्ष ठेऊन जगात जगाल तर नक्कीच आयुष्य आदर्श न सुरक्षित बनेल मधे एक मराठी कार्यक्रम बघत होतो बिग बॉस मधील मंडळी कार्यक्रमसाठी उपस्थित होते तर अभिजित बिचुकले माहीत असेल सर्वाना त्यांनी एक महाराष्ट्र लावणी सम्राज्ञी पुणेकर बहुतेक आडनाव असावे यांच्या एक संदर्भ रंगला " की बिचुकले यांनी ६०+ वर्षाच्या त्या पुणेकर यांना आई म्हंटले म्हणून त्यांनी त्रागा केला की मी महाराष्ट्र गाजवते, थिरकवते मी म्हातारी झाली का ? मला आई म्हणतो हा मी अजून जवान आहे..! अक्षरशः जुंपली की बोलू नका हवं तर बिचुकले तुम्ही पण आई उपमा देऊ नका... उत्तरार्थ बिचुकले म्हणाले की जगातील सर्वात महान उपमा दिली पण तुम्हाला नाही आवडली...!" म्हणजे यावरून तात्पर्य अस की ६० वर्षाची वृद्धा म्हणते मी अजून जवान आहे म्हणजे युवक न पुरुषाच्या मनाची चालबिचालता इथं कोणी मलिन केली. सोबत एक अनुभव अजून शेअर करतो " टिकटॉक माहीत असेल सर्वाना त्यावर ट्रेंड चालतो ३५ ते ५० वर्षाच्या महिला आपल्या आवाजात अनेक नालायक प्रश्नाला स्वतः वाचा फोडलेला पाहायला मिळालं जसे की- "हॅलो फ्रेंड्स लग्न झालं तर काय झालं प्रेम होऊ शकत, लायसन्स असलं तरी आर.टी.ओ. म्हणून मॅनेज होता का ? मी सिंगल आहे बॉय फ्रेंड बनता का ?" इतकंच नाही तर अर्धनग्न कपड्यात व्हिडिओ बनवून पोस्ट करून एक पुरुष न त्याच्या दांडग्या विचारला आपण मालिन करण्याचं कामच केलात ना. अशा सोशल मीडिया माध्यमातून ओळख न मैत्री न प्रेम न ब्रेकअप आणि अंतिम द एन्ड काही वेळा नाही अनेक वेळा : जीवित हानीचा थरार ...! मग मला सांगा चूक कुणाची ??

     जाता जाता एवढंच सांगेन कुणाला दोष देण्याचा किंचितही हेतू नाही पण आपली संस्कृती न परंपरा न आपण कसे असावे पासून कसे जगावे हे सांगणारे महान धर्म ग्रंथांची पर्वणी आपल्याला लाभली आहे त्यानुसार जगणं असुद्या फॅशन करा पण त्याचा बाजार नको, स्टाईल करा पण त्याचा लोकाभिमुख स्टंट नको, महिलांनी विशेषतः स्वतःची काळजी घ्या, स्वतः मॉडर्न राहा पण विचारांनी दृशातून प्रदर्शनाकडे वाटचाल करणारी नको, प्रत्येक वेळी चूक पुरुषाची नसते कारण आपलं संरक्षण आपण स्वतः करायचं आहे पूर्वी स्वयंपाक घरातून बाहेर येत नव्हत्या महिला यातून १०% घ्या नजरा वाईट असतात तर त्यात बदल म्हणून संस्कृती अभिप्रेत होईल असं राहणीमान अवलंबून घ्या...!लवकर निघा-लवकर पोहचा. कसेही जगा पण भारताला इंडिया म्हणून बघून जगू नका. आपण अमेरिकेत नाही भारतात राहतो याचे देहभान सर्वाना असुद्या....!


धन्यवाद...!

"एखाद्या मुलीचा असो किंवा मुलाचा, त्यांचं सौन्दर्य हे जपायची गोष्ट आहे, पुजायची गोष्ट आहे ; भोगायची नाही" एवढं ध्यानात असुद्या...!