Sunday, 5 April 2020

आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकवेळी गुगल मॅप नसतो ..!

         

       सर्व साधारण जीवनाच्या जडणघडण मध्ये अनेक प्रकारची माणसं असतात. प्रत्येक माणसाच्या जीवनशैलीत प्रत्येकाची काही ना काही अडचण, दुखाच एक क्षणिक का होईना पण एखादी किनार असतेच. काही महिन्यापूर्वी एका ठिकाणी मित्रा समवेत एक कार्यक्रमात जाण्याचा योग आला. आमच्यात मनसोक्त गप्पा रंगल्या . सगळ्यांची वेगळी कहाणी . कुणाला या कॉलेजात त्या कॉलेजात अॅडमिशन मिळेल का ही चिंता , कुणी नोकरीत पगारवाढ झाली नाही म्हणून हिरमुसलेलं होतं . तर कुणाला या वर्षी तरी पोस्ट काढायची होती . कुणाला परदेशात एमएसला प्रवेश हवा होता आणि कुणाकुणाला विशिष्ट वयापर्यंत सेटल व्हायचं होतं . असे सगळ्यांचे प्लॅन तयार होते . सर्व एकमेकांसोबत शेअर करत होते . तेव्हा असंच आमच्या गप्पा मधून एक कटाक्ष टाकलं तर एक आजी - आजोबा यांचं जोडपं आम्हा मुलांच्या घोळक्याशेजारी बसले होते . आमच्या मोठ्या आवाजातल्या गप्पा त्या आजी - आजोबांना ऐकु जातच होत्या बहुतेक. काही वेळानंतर त्या आजोबांनी आमची चौकशी केली . कोण कुठलंय , कुठून आलोय , काय करतोय याची माहिती विचारली . आणि त्यानंतर हळच म्हणाले । " माझाही नातू तुमच्या वयाचा आहे . आता हट्टाने रशियाला डॉक्टर व्हायला गेला आहे . तुमच्या पिढीकडे पाहून वाटतं , 
          तुमच्याइतकं नियोजन आम्ही कधी केलं नाही . ते बरंही होतं . तेव्हा स्पर्धाही नव्हती . तुम्हाला तुमची ठिकाणं माहीत आहेत हे चांगलंच आहे . तरी लक्षात ठेवा , आयुष्याच्या प्रवासाला गुगल मॅप नसतो . " आम्ही थिजलो . विचारात पडलो . आजोबांचं हे वाक्य अनुभवाचं होतं . कारण स्थिर - अस्थिर असे दोन्ही तट आजोबांनी अनुभवले होते . त्यामुळेच पटणारं होतं. आयुष्याचा प्रवास सुरू होतो तो पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत . पण रोजच्या धावपळीत काहीतरी निमित्ताने प्रवास करतच असतो . गच्च भरलेल्या शहरात , खच्चन भरलेल्या बसच्या गर्दीत , सिग्नलवर वाट बघत , स्टेशनवर ताटकळत , लोंबकळत प्रवास हा चालच असतो . कधी स्वतःच्या वाहनाने ट्रॅफिकच्या गर्दीतही रेडिओ ऐकत स्टिअरिंग फिरवत , दुचाकीवर स्वार होत क्लच , ब्रेक ऍकसिलेटर आणि गिअर बदलत आपला प्रवास चालूच असतो अखंडपणे . मात्र भरलेल्या शहरात , गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या रस्त्यावर एक गुगल मॅप सतत आपल्या मदतीला असतो . अनोळखी ठिकाणी पोहोचवण्यासाठी . हा गुगल मॅप इच्छित स्थळ शोधून द्यायला आणि रस्ता दाखवायला तत्परच असतो . पण आयुष्याचं असं नाही ना ? अमुक एक ठिकाण आपल्यापासून किती दूर आहे हे वेळ आणि अंतर यासह गुगल मॅपला अचूकतेनं सांगता येत असलं तरी आपण पाहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी लागू शकणारा वेळ आयुष्याच्या प्रवासात कधी समजतो का ? अर्थात नाही . रस्त्यावरच्या प्रवासात ट्रॅफिक सिग्नलवर काही निश्चित सेकंद थांबून कूच करता येते . 
         
             
        अगदी सहज आणि निष्ठेने सांगायचं झाल तर आयुष्यात अनेक पर्वावर आपल्याला यश अपयश मिळत राहत पण कधी कधी आपल्याला हवं असत ते ध्येयवादी रस्ता मिळत नाही तर कधी कधी आपल्याला नको असलेल्या मॅप वर आपण येऊन ठेपतो. अर्थातच सगळ्याच गोष्टी आपल्याला गुगल वर मिळतात असे नाही. माणसाची तमा किंवा अपेक्षा विचारात घेतल्या तर ७०% गोष्टी ह्या माणसाच्या आचरण आणि वागणुकीच्या लेखा-जोखावर मिळतात, म्हणून का होईना साधं आणि सोप्प जीवन जगायला सुरू करा त्यामुळे आपल्याला हवं नको ते नक्की आयुष्यात मिळत राहील हे नक्की. आयुष्याच्या प्रवासात सहनशीलतेने खूप वेळ वाट बघायला लागू शकते . त्यासाठी लागणारी वेळ आणि अंतर कुणालाच ठाऊक नसतं . ही प्रतीक्षा न संपणारी असू शकते . पण हरकत काय ? एक दिवस बस नाही मिळाली आपण रिक्षा , टॅक्सी घेतो , तर कधी पर्यायी रस्ता निवडून इच्छित स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करतो तसंच कायम प्राप्त परिस्थितीत पर्यायांच्या शोधात राहायचं . जरा विसावायचं आणि पुढे जायचं . . जरा नजर बदलली की प्रवास सुंदर होतो. 

लेखन : पत्रकार एन.के.- 8806605852

Friday, 3 April 2020

वरुणराजाची आनंद अश्रू...!

शिर्षक : अखेर पावसाच्या सरी रुपात वरुण राजा सुखावला...!
 
"मानवाने माणुसकी विसरली, प्राणी मात्रावर दया न प्रेम विसरला, गरिबांच्या खिल्लीला उगम दिला तर आपल्या श्रीमंतीला माज दिला म्हणून निसर्गाच्या प्रकोपात निर्माण झालेल्या जगावरच्या संकटावर आज सर्वस्व हतबल झालं याच संक्षिप्त उदा. आणि यात मानवाला शिकवलेला धडा आणि यावर उदार होऊन इंद्र देव हास्य करत सरी रुपात भूतलावर आलेल्या क्षणाची स्पस्टोक्ती करणारा लेखांकन स्पर्शत एक प्रयत्न..."
                   

     कोरोनाच्या महामारीने अक्षरशः थैमान घातले आहे. जे सुखाच्या दारात उभं राहून गर्वाने चालेलल ऐटीतलं जनजीवन पण विस्कळीत होऊन पडलेल्या मानवी जीवनाला आता या विषाणूने जेरीस आणून सोडले आहे. भूतलावर असलेल्या प्राणीमात्रावर निसर्गाने जन्मताच विभागणी वजा एक कल्पक ओळख दिली आहे. काही देशात या प्राणीमात्रावर जीवानिशी खेळून अन्याय केला त्या अन्यायाला निसर्गाने मानवाला चांगली अद्दल घडवली. माणसाला आपल्या घरचं हक्काचं दार पण आज बंद करायला लावल त्या विधात्याने. "जैसे ज्याचे कर्म फळ देतो ईश्वर" या पंक्तीप्रमाणे मानवाला फळ देतोय इतकंच सत्य. मानवाने मानवतेच्या शाळेत उत्तम राहणे किंवा राहायला हवे होते याची शिकवण देऊन जाणारी ही आजची भयावह परिस्थिती. मानव निर्मित मशनरीपण आता काम करत नाहीत, पैसा, अडका, धन, दौलत सगळी पाण्यात गेलीय हे नक्कीच सत्य. काळाच्या घाल्यासमोर मानवच काही चालेना हे तितकंच कटू सत्य. सांगायचं तात्पर्य इतकंच की मानव जसा वागला, राहिला त्याची फळे इथं वाटली जात आहेत हे नक्कीच खरं. सगळे देव, प्रार्थना सुद्धा हरून कोपऱ्यात पडलेले आहेत. इतकी दुर्दशा जिंदगीत झाली नाही स्पस्टोक्ती जेष्ठ लोक करत आहेत. यातून बचाव करायचं असेल पुन्हा नेटाने जगायचं असेल काळजी घेणे न समाजाच्या हितासाठी झटणे हा एकमेव मार्ग मानवसमोर आहे.
          अशावेळी कालच्या सायंकाळी निसर्गाने ढग काळे केले, तर पावसाच्या प्रमाणाचे वातावरण धारण करून घेतलं आणि काही अवकाळी पावसाचा सरी अचानक कोसळायला सुरवात झाली तो मुग्ध करणारा मातीचा सुगंध सांगत होता असेल की मानवा मी आता सुखावलो, तुझ्या कष्टाला उरलो, तुला पोसल पण मानववृत्ती तू नाहीशी करतोय पण आता तुझ्यातल्या मरणाच्या भीतीने तू राग, मोह, मत्सर काढून टाकून माणूस बनून राहिलास त्या क्षणांनी मी भारावलो अर्थात सुखावलो. निसर्गाच्यात आत असणाऱ्या जन्मजात बदला वृत्तीला तू पुरून उरणार नाही हेच सत्य. पावसाच्या सरी सांगत असतील की हे मानवा आता मी ही सुखावलो न इतकंच नाही पावसाच्या निमित्ताने आनंद अश्रू सुद्धा मी ढळल्या माणसाच्या असणाऱ्या मागण्या किंवा मी पणाचा काहीसा अंत मी कोरोनाच्या माध्यमाने तुजला योग्य ती शिक्षा दिलीय मी आता भोग आपल्या कर्जाची फळे. वरुण राजा कोसळताना म्हणत असेल आणि आनंद व्यक्त करत असेल की मी ही तृप्त झालो आमच्या निसर्गावर जेरीस म्हणून असलेल्या मानवाला पण अद्दल घडली म्हणून धारा कोसळवून वरुन राजा पण ढसा ढसा रडला आज. अवकाळी पावसाचा स्वरूपात प्रकट होऊन साक्षात ईश्वरच पृथ्वीर येऊन अवस्था बघून सुखावला असेल आणि त्यात नित्य समाजसेवा करणाऱ्या माणसाचं रूप न हाल बघून आज इंद्रदेव पण रडला असेच म्हणावे लागेल. जाता जाता इतकंच म्हणावं लागेल की. निसर्गाच्या सानिध्यात राहताना माणुसकी पणाच दर्शन घडवून समाजसेवेची प्रार्थना अर्पण केल्यासच हे सर्व काही बरे होईल अन्यथा बोध दिलेल्या या परिस्थितीची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही हे ही सत्य...!


लेखन : पत्रकार एन.के. (8806605852)

Wednesday, 26 February 2020

ONLINE : OFFLINE !

डिजिटल किती सेफ, किती घोडेबाजार ?

           आपल्या ज्ञात गेल्या १०-१२ वर्षात संगणक युग अर्थात डिजिटल दुनियेची धून वाजत आहे. संगणक नाही तर कोणतेही काम नाही असे दृढ व्याख्या बनून गेली आहे. कोणत्याही क्षेत्रात आता ऑनलाईन शब्दाशिवाय कामच होत नाही. आज कामे राहतील बाजूला पण ऑनलाइन संभाषण म्हणजेच कनेक्शन असे समजणारी नवीन समाज तयार झालं आहे म्हंटलं तर वावग ठरणार नाही. आजकाल सकाळ झाली की मोबाईल हातात घेतल की पाहिल्यादा डेटा सुरू करून ऑनलाईन येऊन मेसेज पासून नवीन विषय हातात हाताळायची जणू हौसचं. अनेक वर्षे झाली पंतप्रधान यांनी डिजिटल नावाच्या शब्दाला आणल्यापासून प्रत्येक माणसाचे काम असो किंवा कोणतेही संदर्भ असो इंटरनेट शिवाय काम होत नाहीत. गेल्या काळात एखादे काम करावयाचे असेल तर १०० कागद लागायची , १७-६० पडताळणी व्हायच्या पण आता ऑनलाईन सिस्टीम मुळे वेळ तर वाचलेच पण धगधग पण कमी झाली. पण या युगात आपण या ऑनलाईन नामक प्रक्रिया किती सेफ किंवा किती यात घोडेबाजार होतो हे कळणे मात्र अशक्य. ऑनलाईन कामे झाल्याने सुखवस्तू म्हणून पाहणाऱ्या सर्वांना आपण केलेलं ऑनलाईन काम किंवा आपण आपल्या कामासाठी दिलेली दस्तऐवज किती सुरक्षित आहेत याची परिसीमा मात्र अस्पष्टच.
           ऑनलाईनच्या या गौडबंगाल खेळामुळे घरात संगणक असेल, इंटरनेट असेल तर कोणालाही ‘ऑनलाइन शॉपिंग’ची इच्छा ही होणारच! तसंही खरेदी ही कोणाची आवड, कोणासाठी अगदी व्यसन तर कोणासाठी ती डोकेदुखीचीही बाब असते. प्रसंगी आपण या खरेदी करण्याचा उद्देशाने बोगस साईट आपल्यासमोर लादल्या जातात आणि त्या नुसार आपण साईट आणि त्या मागणी नुसार आपली असणारी पर्सनल माहिती किंवा यात अकाउंट नंबर, आधार नंबर किंवा पॅन डिटेल्स आपण सेव्ह करतो पण पुढे आपल्याला जर वस्तू आवडली नाही तर आपण पर्यायी प्रोसेस रद्द करून सोडतो मग हे आपण भरलेली माहीती चोरली जाऊ शकत नाही का ? काही वेळा पैशाचे व्यवहार आपण करताना आपल्याला OTP येते आणि मग त्या नंतर व्यवहार पूर्ण होतो. पण काही वेळा नेटवर्क मूळे प्रलंबीत झालेले व्यवहार पुन्हा नवीन नेटवर्क मध्ये नको असलेले व्यवहार पूर्ण झालेले अनेक उदाहरणे आहेत.
ऑनलाईन आज सुरक्षित की अ-सुरक्षित हा प्रश्न सर्वांच्या समोर पडतो. किंवा त्यात किती ठिकाणी घोडेबाजार होतो हा ही तितकाच महत्वाचा प्रश्न सर्व सामान्य किंवा आपल्यासमोर पडलेलं आहे. उदा. एखाद्या ऑनलाईन सर्व्हे मध्ये जर विहित माहिती भरली तर आपल्याला त्या योजनेचा लाभ मिळतो. पण ऑनलाईन सिस्टीम असल्याने काही माहिती अचूक भरली जाते व लाभार्थी म्हणून नसलेल्याला काही वेळा लाभ मिळतो आणि सामान्यांच्या वाटेला काही वेळा फक्त वाट पाहिल्याशिवाय काय पदरात पडत नाही.
        काही ठिकाणी ऑनलाईन ही उक्ती म्हणजे खरी डोकेदुखी बनते १० रु. च्या कामाला संगणक बघून आपल्याला १०० रु. द्यावे लागतात. कागदी घोडे नाचली तरी चालतील पण गरिबांच तोंड लहान झालं की १०-२० कमी करून अगोदर काम व्हायची. पण आता ऑनलाईन म्हणजे दवाखाना झालाय संगणक वर काय होतंय कळत नाही आणि सांगेल तेवढं पैसे देऊन औषध घेतल्यासारख आपल्याला पैसे द्यावे लागतात. आणि त्या कामात किती खरे पणा किती खोटेपणा समजायला मात्र रस्ता नसतो. म्हणून ऑनलाईन जरूर एक वेळ चांगलं पण आज कागद जमावणारी माणस कमी झाली आणि त्यांची जागा संगणकने घेतली हाच फरक.


     लेखन : एन.के.( पत्रकार ) मो. 8806605852

Thursday, 20 February 2020

परीक्षा युद्ध की यशाची पायरी ??



          फेब्रुवारीची शिवजयंती संपली की दोन-एक महिने परीक्षेची धून सुरू होते अर्थातच मी बोर्डाच्या इयत्ता १२ वी आणि १० वीच्या परिक्षाबद्दल बोलत आहे. मागील काही वर्षात बोर्डाची परीक्षा असली की एकच ऑक्टोबर पासून परिक्षार्थीची धामधूम असायची.

 शाळेच्या नियोजनात पण या परीक्षेला घेऊन कडक नियम करत मुलांकडून चोख अभ्यासक्रम पूर्णत्वाला हात घातलं जायचं न यात शिक्षकांची सुद्धा कसरत व्हायची. अलीकडे आधुनिक काळात परीक्षा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याकडे असणार एक केंद्रित लक्ष किंवा परीक्षा कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. अनुक्रमे 20 अमानत गुण, विद्यार्थ्यांना हात लावायचं नाही म्हणून सैसाल मोकळं रान म्हणून आज विद्यार्थी परीक्षा किंवा शालेय असणाऱ्या पुस्तकी उपक्रमात तेवढ्या हिरहिरीने भाग घेत नाहीत जेवढं अगोदरच्या काळात घेतलं जायचं, मोबाईल, टीव्ही, पब्जीसारखे ऑनलाईन खेळ, व्हाट्सएप मैत्री, संभाषण यात अभ्यासासाठी काढून ठेवलेल्या एकूण वेळेतून किमान कमाल वेळ आज कमी होत चालला आहे .
             पाल्य न पालक यांच्या असणारी परीक्षा बद्दलच गांभीर्य काहीसं ढासळत चाललं आहे. पुस्तकांशी मैत्री म्हणजे जीवनाच्या यशाशी मैत्री ही म्हण आता लोप पावत चालली आहे.
जुन्या काळात मॅट्रिक शिकलं म्हणजे नोकऱ्या लागायच्या आज पदवीधर झाल तर शिपाई म्हणून नोकरी लागायची पंचाईत. आजची ही शिक्षण पद्धत काहीशी सोपी झाली पण त्या शिक्षणाचा फायदा आज काही ठिकाणी होताना दिसत नाही बेरोजगारी, अपुऱ्या नोकऱ्या यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. परीक्षेला सामोरे जाताना आज वेळेत अभ्यास करून त्यावर मात मिळावं यासाठी केलेलं गनिमीकावा टाइपचा अभ्यास आज दिसत नाही. खिंड लढवून आल्यासारखं आनंद आता पास झाल्यावर दिसत नाही. कारण शिक्षण पद्धत सोपी मुलांच्या पाठीवरच्या ओझं कमी करण्याच्या नादात आज शिक्षण कमी मार्क जास्त अशी पद्धत-परंपरा रूढ होताना दिसते आहे. शिक्षण घेतल्यानंतर ९०% च्या वर मार्क असणाऱ्या मुलाला आज घरी बसावं लागत आणि आरक्षण असलेल्या मुलाला रस्ता गवसतो. मग शिकायचं का आणि कसं हा प्रश्न असताना जास्त मार्क किंवा मेरिट मध्ये ९५% च्या वर गुणानुक्रम यायला हवं आणि परीक्षेला एक युद्ध म्हणून जिंकण्याच्या हेतूने लढायचं आणि काढलेला किल्ला हाच आयुष्याचा एक पायरी, स्टेप म्हणून बघितलं तरचं शिक्षण या उक्तीचा उपयोग होईल अन्यथा आपली तलवार म्यानातून बाहेर येऊन जगाच्या बाजारात परफॉर्मन्स दाखवणार नाही हे नक्की त्या उद्देशाने पाल्य न पालक परीक्षा कडे बघावं या हेतू हा लेख.


                                           लेखन : पत्रकार एन.के - ८८०६६०५८५२

Monday, 17 February 2020

प्रेम : आई वडिलांवरचं...!

शिर्षक : खरं प्रेम तेच : आई-वडिलांवरचं

       आजची पिढी इतकी प्रगत झालीय की समाजात सत्य आणि असत्य न जाणता अनेक नात्यात सहज गुंफली जाते. अनेकांच्या स्वार्थी किंवा मतलबी या समर्पक नावाची पुष्टी न करून घेता ट्रस्ट नावाचा विश्वास ठेवून बसते. आजकालची पीढीला माहीत नाही की लोकांनी लोकांसाठी बनवलेलं एक नात म्हणजे संबंध हे नक्की मग त्या नात्यात रक्त नाते, मानलेली नाती असे अनेक प्रकार पडतात. वेळ आली की आवाज दिल्यावर येणारे १० तर कारणे सांगणारी १०० अशी अनिष्ट प्रथा आज समाजात वाढीस लागली आहे. सोशल मीडियाचा अतिरेक आजकाल आपण सभोवताल पाहतोच, नव-नव्या कॉन्टॅक्ट लिस्ट आणि मैत्रीच्या नात्याने तयार होणारी नाती काही स्वार्थी अपेक्षांचे ओझे घेऊन लयास जातात. अर्थातच माझ्या म्हणण्याचा हाच उद्देश आहे की आज सजवून धजवून आपल्या न पुढच्याच्या अंगावर स्तुतीसुमने उधळून तयार केलेल्या डुप्लिकेट नात्यात आज काहीसा प्रत्येक युवा ते सम वयस्क लोकांत ईश्क वाला लव्ह होताना दिसतो आहे. युवा वर्ग असो किंवा कोणीही पुरुष किंबहुना महिला किंवा मुलगी प्रत्येकाला नव्या झालेल्या नात्यात एक मेकांबद्दल जाणून घेण्याची चौकस बुद्धी खूप प्रमाणात अन क्षणात वाढताना दिसते. प्रेम होतं न आकर्षण सारख्या मारक गोष्टीतून नात बनत मान्य पण आवश्यक असणारा त्यातला खरेपणा असतोच किती ? वेळ न एक समज ऑफ जवळचा प्लस ओळखीचा म्हणून ओढाताण करून चालू ठेवलेली नाती टिकतातच किती ? सोशल मीडिया किंवा डोळ्याने किंवा वयाच्या न प्रवाहाच्या बदलात आवडलेली नाती ग्रेट म्हणून निवडली जातातच किती?

           

             असा संदर्भ आज घेऊन येण्याचा एकमेव उद्देश की आज हा म्हणतो ना बोलीभाषेत फेमस तसला तो ट्रेंड झालाय पण नात बनलं तर आई वडील सारख बनावं. जे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आपल्या दांपत्यवर असलेली तमा, काळजी, प्रेम कधीही स्वार्थी किंवा उद्देशून व्यक्त होत नाही. सुखात दुःखात कायम काळजीच नव्हे तर त्यात असणारी आपल्या हिताचे सजेशन देणारी ही नाती गुंफणारी ते आई वडील न त्याच नातंच सर्वश्रेष्ठ.  ठेच लागली की आई बाबा वडील हेच सावरणार असतात. कधी अडचण आली तर  माय बापाच्या आशीर्वादाला तोड नसते. पोटच्या गोळ्याला त्रास होऊ नये म्हणून आपल्याला जग माहीत नसताना , आपण या जगात नसताना ९ महिने वाढवलेल्या माउलीने त्रास घेऊन जग दाखवलं तर आजही अशी प्रगत, पाश्चात्य संस्कृतीवर अपार लव्ह करणाऱ्या, जास्त पानांची पुस्तक वाचलेल्या मुलांनी आज अनेक ठिकाणी आई वडिलांच्या जीवाला घोर अर्थातच वृद्धआश्रम दाखवला. न तेही आज लग्न करून आणलेल्या बायकोच्या गॉड बोलीच्या प्रेम जाळ्यात अडकून हे कितपत योग्य आहे...?
तात्पर्य एवढंच की ट्रेंड वाला प्रेम न कमिटमेंटने वाढलेलं प्रेमाचं झाड, वेल एकदिवस वाळून जाणार आहे चांगल आहे की ज्यांनी आपल्याला भूक लागल्यावर दूध पाजलं आपल्या उदरातून त्रास देऊन जग दाखवलं त्यांच्या प्रेमाला उत्तर न उपकार आपल्या जगात कुणाकडे नाहीत पण तेच प्रेम उपकाराच्या छायेत का असेना पण त्यांच्या या वयात न यावेळेत तर प्रेम करा रे ! सांभाळून त्यांच्या वर थोडं तरी प्रेम करा रे !

Wednesday, 12 February 2020

हायब्रीड जगणं...!

शिर्षक :- जगणं आपलं हायब्रीड....!

कालियुगाच्या कलांतरात माणसाने प्रत्येक गोष्टीत गरुडझेप घेतली. अनेक रासायनिक संज्ञा वापरून जीवन आणि आपल्या भौतिक सुखाच्या गरजेच्या वस्तू क्षणिक वेळात मिळवण्याची कला अवगत करून घेतली. जैविक आणि अजैविक विविधता समजून घेताना सांजवेळ आलेली माणसाला समजायला वेळ झालं मग माणसाच्या आयुष्याचा घेरा कमकुवत होत गेला. पण निद्रिस्त पिढीला आता भाकरी ऐवजी पीझझा, आणि बर्गर अतीप्रिय वाटू लागला. समजून आणि उमजून जगण्याच्या पंक्तीतला माणूस आता हरवत चालला आहे.
            

      आता माणूस मांडी घालून जेवायला आज बसत नाही त्याला टेबल लागत तर पाश्चिमात्य खाद्य संस्कृतीला आपलंसं करून देणारी ही मॉडर्न आणि ४० वर्ष जगणारी कल्पक जीवनपट : अर्थात आजची आधुनिक जगणं. आजच्या १०० माणसात ८० लोकांत अनेक सूक्ष्म आणि अनेक मोठी आजार आढळतात कारण एकच की खाण्याच्या पद्धती आणि अती रासायनिक खतांच्या वापराने तयार झालेली पिके न त्यातून बनलेली पदार्थ तर दुसरीकडे चायनीज, अमेरीकन अशा परदेशी खाद्यचंगळ ला आज पसंदी आहे. 
पूर्वी लोक म्हणायचे की कमी खा पण स्वच्छ खा, किंवा खेड्याकडे चला, कारण ही असच होत की तेव्हाची माणसं ८० आणि १०० वा वाढदिवस साजरा करताना दिसतात. तर आजची माणसं वयाच्या ३० व्या वर्षी मधुमेह आणि कॅन्सर सारख्या आजारांची पथ्य पाळताना दिसतात. अगोदर आमच्या परिचीत मध्ये रोगर सारख्या औषध म्हणजे सर्वात विषारी मानलं जायचं, आत्महत्या करायला वापरलं तर त्याची कट्ट्यावर चर्चा होताना अशा भयानक विषारी औषधांची नाव चर्चिली जायची पण त्यांची जागा आता प्रोक्लेम सारख्या विषारी औषधने घेतली म्हणजेच माणसाने विषला सुद्धा जालीम विष तयार केलं म्हणजेच कमी प्रमाण नाही तर अती प्रमाण मधला अतिरेकी वापर म्हणजे अगोदरच औषध फक्त पिकांच्या पानावर कार्य करायचं पण आता अंतर्मुख होऊन विष पूर्ण धान्यात प्रमाण दाखवायला सुरवात केलं. म्हणजे आज आपण खाणार अन्न आणि त्यावर झालेली प्रक्रिया घातक असून आपण रासायनिक धान्य-पालेभाज्या खाऊन स्वतःचे अस्तित्व मातीत गाडून घेतोय इतकंच तात्पर्य. म्हणून आज जगाच्या बाजारात लहान शेतकरी, किंवा कमी प्रमाणात विक्रीसाठी उपस्थित असलेल्या बळीराजाकडून धान्ये आणि भाज्या विकत घ्या. म्हणजे जेणेकरून त्यावर आपल्या आयुष्याचा घेरा ठरवता येईल. यातून एकच बोध देण्याचा मी प्रयत्न करीन हायब्रीड जगण्यात फक्त ४ वाढीव दिवसाची अपेक्षा जगण्याची असेल तर व्यायाम, योग आणि उत्तम अन्न याला पर्याय नकोच.


आपला - एन.के. (पत्रकार) : ८८०६६०५८५२

Tuesday, 11 February 2020

माहीत नसलेला बाप...!

शिर्षक - माहीत नसलेला डोंगराएवढा आपला बाप

      घराला घरपण देणारी माणसं म्हणून आई वडिलांकडे आजकाल पाहिल जातं. समाजाच्या कानाकोपऱ्यात आईला महत्व आणि यशाचं कल्पिक श्रेय कायम देण्यात आलं. घर, खर्च, नाती, अडचणी सोडवणारा बाप माणूस कायम मागच्या रांगेत दिसला. बापाने माणुसकीची झाडं उभी केली, स्वतः कष्टाच्या हिंदोळ्यात गुंतवून घेऊन स्वतःची प्रतिमा झाकोळून जगाला आपल्या आप्तेष्ट असणाऱ्या कुटुंबाची झंकारच कायम प्रकाशझोतात तेवत ठेवली.

     आईच्या सोबतीची आणि मायाळू ऊब कायम सर्वांना समजली पण बापच महत्व आणि बापाबद्दल संदर्भ लेखन आणि उपमा कायम कमी प्रमाणातच आढळली. म्हणतात ना की जिजाबाईंनी शिवाजी महाराजच्या रुपात दैवत ए महाराष्ट्र नक्की घडवला किंवा तसं अवश्य म्हणाव,पण त्याचवेळेस शहाजीराजांची ओढताण सुद्धा लक्षात घ्यावी. शहाजी राजे आपल्या नेतृत्व आणि संभाषण कौशल्य अधिक निधड्या छातीने स्वराज्यासाठी रावण रंक व्यक्तिमत्व निर्माण करून शत्रूला अस्मान दाखवण्याची पुरुषार्थ कला मात्र महाराजांच्या देवाने अर्थात बापानेच दिली अस हे सत्य न स्वीकारावेच सोबत देवकीचं,यशोदेचं कौतुक अवश्य करावं पण पुरातून कृष्णाला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव पण तितकाच लक्षात ठेवावे. आजच्या आपल्या आधुनिक जगाच्या गाभाऱ्यात वडिलांच्या टाचा झिझ्लेल्या चपलांकडे, पडलेल्या बनियनच्या भोकातून आपल्या बापाची कीर्ती न स्वराज्य नकाशा इतका प्रखर आपला बाप असतो. घरासाठी १-१ रुपयांची कधी न कधी काटकसर केलेला अधोरेखित बाप हा पुण्य दैवत ए होम असतो, दैवत ए जिंदगी असतो, दैवत ए सुख असतो हे विधिलिखित सत्य. 
वडिलांचं महत्व कोणाला कळत? १०० दा बापाच्या प्रशशेंची स्तुतीसुमने गायली तरी कमीच बापाबद्दल लिहायला खूप काही आहे शब्द अपुरे पडतील इतकं बापच व्यक्ती मत्व आहे. अनेक ठिकाणी पितृछत्र हरपलं की घर सांभाळून घराची सावली बनुन राहणारी अनेक मोठी मुले, भावंड, आई, यांची जबाबदारी घेणारी माऊली- मुली असे अनेक जणांना बापाच्या व्यक्तिमत्व बद्दल नक्कीच जास्त माहिती असणार आहे. आईला न घराला बघत बघत स्वतःची इमेज तयार करायला लागणार वेळ आणि त्यानंतर पाठीमागे पाहिलं तर बाबा, पप्पा, वडील यांचं कर्तृत्व आठवलं तर नक्कीच डोळ्यांत अश्रू तरळल्या शिवाय राहणार नाहीत. लग्न सराई त्यात मुलीचं आयुष्य बहराव, मुलगा हवं नको बघितला असेल नसेल पण बापाला एक कप चहा, आणि एक ग्लास पाणी देणारी आपली मुलगी बहीण ताई हिच्या लग्नाच्या वेळी डोंगराच्या आकारएव्हढं बापाचा अंतकरण भरून येत. बापाच्या पश्चात पितृ छत्र नसलेल्या कुटुंबाला एकेक वस्तू, सुख क्षणासाठी , वस्तूसाठी तरसावं लागतं. अस हा बाप, बाबा, फादर, वडील ज्याची ख्याती जगविख्यात आणि डोंगराच्या अथांग विशालतेत पण न मावणारा लक्षणीय आपला बाप. 



- लेखन : एन.के. - ८८०६६०५८५२