Saturday, 28 August 2021

स्वार्थी लोकं आणि आपण...!

 स्वार्थी लोकं आणि स्वतःची बौद्धिक लढाई..!


    आपल्या जीवनात अनेक प्रकारची लोक येतात काही लोक आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात आणि त्या प्रती कोणत्याही अपेक्षांचं डोंगर नाही ठेवत. काही जण असे असतात की फक्त काम झालं की बस, त्यानंतर कोण माणूस महत्वाचा आणि किंवा नाती महातावाचो याकडे कोण लक्ष ही न देणारे असे द्विधा मनस्थितीची माणस आपल्याला रोज भेटतात. काही वेळा अशी आपली तारांबळ फारवेळा होते ते म्हणजे अस की ह्या अशा लोकांच पारख करण मात्र जड जातं. आपण कोणत्याही अमुक क्षेत्रात काम करत असू त्या त्या प्रत्येक क्षेत्रात एखादं चेहरा नक्की त्या मतलबी रंगाचा , स्वार्थी स्वभावाचा नक्की असतो. अनेक चेहरे तोंडावर सोबत चालणारी असतात पण प्रत्यक्ष कृतीच्या वेळी उपलब्ध नसतात हेही त्या प्रकारात मोडतात ज्याला आपण स्वार्थी म्हणतो आणि अशा प्रकारची माणसं जीवनात मुबलक भेटतात, अनेक वेळा प्रत्येकाला आपल्या माणसाचं सुख पचत नसत त्यांची होणारी जळफळाट त्यांच्या वागण्यातून प्रत्यक्ष निदर्शनास येऊन जाते. प्रत्येक माणसाची प्रतिमा तसेच त्यातील गुण जे काहींना काही अँटिक अस वेगळेपण असणारी प्रत्येक व्यक्ती जीवनात महत्वाची असते, पद आणि प्रतिष्ठा अनेक ठिकाणी नक्की कामाला येणार नाही अशावेळी मात्र त्या वेगळेपण जपणाऱ्या माणसाकडून काम होऊन जातं म्हणजेच प्रत्येक व्यक्ती म्हणून व्यक्तीच नव्हे तर आपल्या जिवनात प्रत्येक संदर्भ, प्रत्येक क्षण, प्रत्येक योगदान आपल्या जगण्याला महत्व प्राप्त करून देणारी असते.
          तसेच आपला भूतकाळ आपल्या वर्तमानमध्ये खुप परीणाम करणारा असतो. ज्यांच्या आयुष्यात नियम नाहीत त्या माणसाच्या जगण्याला अर्थ नाही कारण नियम नसतील, तोल नसेल तर पडणे साहजिक तसे मानवी जीवनात एक चकोर घेऊन जगण्यात अर्थ आहे अन्यथा अनर्थ म्हटले त्या जगण्याला तरी उत्तम. म्हणून जाता जाता तात्पर्य एवढंच सांगू इच्छितो की लोक कशी असतात त्याचा विचार सोडून द्या, कारण लोक क्षणिक काळासाठी असतात जगायला आपले आचार, विचार तथा वैचारिक संचारच कामाला येतात. म्हणून स्वतःची जी बुद्धी आहे त्या बुद्धीला जगातील कोणतीही तंत्रज्ञान त्याचा अंदाज लावू शकली नाही. स्वतःमध्ये असणारा आत्मविश्वास कायम ठेवत ठेवा, जागृत ठेवा. स्वतः वर दृढ विश्वास ठेवा आज वेळ वाईट आहे उद्या नक्की चांगले दिवस येतील या निश्चयाने सुंदर जगणं आपलंसं करून घ्या...! आनंदी राहा धन्यवाद...!!


        लेखनप्रपंच : पत्रकार एन.के. ( ८८०६६०५८५२ )
       तारीख : २८ ऑगस्ट २०२१, वेळ : ९:३०

Friday, 27 August 2021

कर्माचा तराजू...!

 कर्माचं वजन करणारा तराजू ...?




            शिर्षक वाचून वाटलं असेल कदाचित नवल पण सत्य आहे, जगात माणूस म्हणून जगणारा प्राणी सोडला ना कोणीही स्वार्थाच्या विचारांचा शोधून सापडणार नाही, आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक विचारांना दिवसभरात बळी ही पडतो आणि अनेक वैचारिक कल्पकतेला सामोरे ही जातो, कुणी पदाचा वापर करतो तर कोण स्वभावाचा तर कोण सलगीचा पण कुठं ना कुठं सुख दुःखाच्या डोंगरात आयुष्याची क्षणिक विचार रेखाटतो मात्र नक्की. १०० पैकी ९० जण आजही एखाद्याचं मन राखाव, इतरांना वाईट वाटू नये, मी गुणवंत वाटावा म्हणून जगणारे आहेत. तर पद, प्रतिष्ठा पैसे यांच्या जोरावर बाहुल्या नाचावणारे कटपुतली भेटतील. सत्य आहे बघा ना की जगणाऱ्या पंक्तीत तर प्रत्येकजण आहे, फक्त शैली, विचार, आचार, संचार वेगवेगळ्या आहेत. एक चारोळी सोशल मिडियाच्या माध्यमातून ऐकायला मिळाली " किसींका बुरा करके, अपनी बारी का इंतजार जरूर करना.." साहजिक आहे आपण कोण कसे किती याच काही ताळमेळ आपल्या डेली बेसिस मध्ये काहीसं पण फरक करणारं नसतं पण एवढं लक्षात ठेवा की याची परीक्षा नक्की होत असते, कोण घेत, कशी असते हे गूढ झालं, पण जस वर हिंदीतील शब्दांकन आहे त्या पद्धतीने कुठं तरी आपल्या वागण्या-समजण्याची एक तोल-माप नक्की होत असत. आज आपण कुणाला वाईट म्हंटल किंवा कुणाला चांगलं याची तूर्तास चर्चा श्रीमुखावर नक्की होत नसेल पण त्या चांगल्या की वाईट बद्दल किलो किंवा लिटर मध्ये नक्की नसेल पण त्याच मोजमाप पाठीमागे नक्कीच होत असत.
     कर्म म्हणजे काम हे आपल्याला माहीत आहे पण जगण्यातली कर्मे खुप फरकाची असतात, सोज्वळ मनाने केलेली प्रार्थना म्हणे स्वर्गाच्या दरवाजाचा रस्ता सुखद करतो, तस कर्म पण आपल्याला पुढील रस्त्याची आखणी ती पाठीमागील वैचारिक हितगुज मध्ये दडलेलं असत. जाता जाता एवढं सांगेन जगाला स्वतःची पर्वा असते इतरांची नाही. आपल्याला आपलं कर्तव्य आणि कर्म सुरळीत ठेवायचं आहे, तूर्तास कमी जास्त कोण असेल नसेल पण कर्मच्या तराजू मध्ये आपण कायम "वजनदार" असण्याचा प्रामाणिक प्रयत्न असुद्या, वाईट सर्वांना वाटत , दुःख प्रत्येकाला होत, भावनेच्या पुस्तकातील हे धडे जे रोज असतात, अनेक सुख-दुःखाच्या भरमसाठ धडे अनुभवायला मिळतात पण त्या धड्यांचा अभ्यास करून आयुष्याच्या परीक्षेत यशस्वी आणि जगण्याच्या बोर्डात अव्वल यायचं असेल तर त्या ईश्वराच्या तराजू मध्ये कायम आपले वजन आपल्या सद कर्मानी वाढते ठेवा..! आनंदी राहा धन्यवाद...!!


        लेखनप्रपंच : पत्रकार एन.के. ( ८८०६६०५८५२ )

Thursday, 26 August 2021

जगणं स्वतःसाठीचं...!

 जगणं स्वतःसाठीच....!


पाळतोय उगाच पोटासाठी जगायचं मात्र राहून गेलंय,
त्रास होतो चिंता वाटते पण स्वतःसाठी परखायचं राहून गेलंय,
घर न दार अनेकदा विसरतो मी इतकं व्यस्त असतो मी,
आपल्या कुटुंबासाठी कधी नसतो पण सर्वांसाठी स्वस्त असतो मी..! |1|

पद, पैसा,प्रतिष्ठा हेच दिनचर्येचा जणु आयुष्याचा भागचं झालय,
स्वतःसाठी कधी न जगणारा , कंटाळूनही राबण्याचं आता सवय झालंय,
आई बाबा मुलं बाळ यांच्यासाठी वेळ कमी असतो माझ्याकडे,
पण रोज न चुकता माझ्या भुकेच्या चौकशीच रजिस्टर मात्र कायम असतं त्यांच्याकडे...! |2 |  

जगाला चांगलं दिसावं, मी त्यात पारंगत असावं यासाठी कायम माझी खटाटोप,
यात स्वतःच्या चांगल्या अन घराच्या त्या माझ्या माणसाच्या अपेक्षा मात्र रोजच पावतात लोप,
लोक काय म्हणतील म्हणून भिऊन ही वागतो तस जरा पण लढत असतो कायम,
वय, ताकद कमी होते पण स्वस्वार्थी अन जगासाठी जगायचं आलेख मात्र असतो वाढता कायम...! |3|

भूक लागली की नाही याचं भान नसतं न घरच्यांना वेळ द्यायचं कधी याच शेड्युल नसत,
पण आयुष्यात कधीतरी ४-५ वर्षे सुखात जगू ह्या हव्यासापोटी मात्र कायम तत्पर आपलं बिगुल असत,
सण विसरतो मी, चक्क समारंभात ही व्यस्त असतो मी इतका कस बिझी ?
अस जगणं कधी तरी थांबेल न निदान होणारी पिळवणूक बघून तरी देव करेल का सुखाच्या त्या पर्वाला राजी...? |4|

बस झालं ना राजकारण ना समाजकारण करतो पण का इतकं माझ्यासाठी नकारघंटा,
आता घर, आई बाबा न कुटुंबासाठी मी देणार वेळ बस बाकीचे खटाटोप,
काम असेल , कर्तव्य असेल तेही नक्की करेन पण आयुष्य काढणार नाही तर आता जगणार,
आपल्यासाठी, आपल्या माणसासाठी, कुटुंबासाठी मी अल्व्हेज रिचेबल राहणार...! |5|


       लेखनप्रपंच : पत्रकार एन.के. ( ८८०६६०५८५२ )


Wednesday, 14 April 2021

कोरोना : द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह गेम ऑफ लाईफ !

 शिर्षक : कोरोना : द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह गेम ऑफ लाईफ..!


शब्दांकन / लेखन : पत्रकार एन.के. ८८०६६०५८५२



[ ...प्रत्येकाच्या जीवनात जगणं असलं तरी कष्ट असेल तर जगण्याच्या व्याख्या तूर्तास बदलून जातात आज पर्यंत आपण यावर एकमत होतो आणि आजही आहोत. पण कुणाला माहीत नव्हतं की प्रत्येक मानवी जीवनाला एक स्टॉप करणारा, भयावह तथा एक असा विषाणू जन्य रोग मानवी जनजीवन विस्कळीत करून टाकणारा येईल आणि त्याच नाव कोरोना असेल. प्रत्येक क्षेत्रात काम।करणाऱ्या प्रत्येकाला, मानव म्हणवून घेणाऱ्या प्रत्येक जीवसृष्टीला जिवाच्या आकांताने भीती घालणारा काळ म्हणून कोरोनाच्या रूपाने हे गेले दोन-एक वर्ष असतील अस स्वप्नात ही वाटलं नसेल पण आज अनुभवत असलेल्या ह्या क्षणाला भविष्यात जागा नसावी असच प्रत्येकाला वाटत. अर्थात कोरोना काळ म्हणजे ब्लॅक काळ म्हणून कायम ओळखला जाईल इतकं वाईट काळ आज गत वर्षी अन सन २०२० चा होता हे तितकंच सत्य... प्रत्येक माणसाच्या जगण्यातल्या त्या वर्ष बद्दल, जनजीवन आणि आजची परिस्थितीवर लेखन करतोय संदर्भीय लेख -]

     प्रिय वाचक हो कोरोना आणि जीवन यावर हे तिसरे लेख असावे माझ्या मते जसं इसवी सन किंवा हिजरी सन असतं तसं बहुतेक येणाऱ्या काळात कोव्हिड सन किंवा कोरोना सन अशाही नोंदी सापडल्या तर आश्चर्य वाटायला नको. मनात आणलं तर 2019 पर्यंत 'कोरोनापूर्व' आणि 2020 पासून 'कोरोनोत्तर' जग अशी स्वतंत्र कालगणना करता येईल. यातला गमतीचा भाग सोडून द्या पण खरंच या एका वर्षात आपलं जगणं अंतर्बाह्य बदललं हे नाकारता येणार नाही. एक पत्रकार म्हणून कोरोना व्हायरसबद्दल बोलत-लिहित आणि व्यक्तीशः कोव्हिडचा अनुभव घेत हे वर्षं कसं सरलं याचा हा लहानसा लेखाजोखा आज करतो आहे. पण आज खरंच ह्या लॉकडाऊन नावाच्या परिस्थिती वर नक्कीच नकोशी भूमिका घेणारे प्रत्येक चेहरा, कष्टकरी, मजूर,पगारदार, प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या रोजीरोटीवर उठलेला हा कोरोना अर्थात प्रत्येकाच्या नावडीचा विषय आहे हे नक्की. आजच्या ह्या घडीला प्रत्येक माणसाच्या जगण्याचा मतितार्थ अर्थात पैसे अन एक सुंदर बेझिजक जीवनशैली इतकंच आहे मग तो श्रीमंतांच्या यादीत असो वा मग गरिबांच्या यादीत. कारण हा कोरोना काळाचा बदल मात्र नक्कीच सर्व अक्षम्य बदलाचा प्रतीक आहे आणि या भयावह काळानंतर म्हणजेचकोरोनानंतर माणसाच्या आयुष्याची दिशा  ही बदलली जाईल आणि ती जशी बदलणार आहे, तसाच भाषाव्यवहारही बदलणार आहे. या बदलाची तयारी ज्या भाषा करतील त्याच भविष्यात टिकणार आहेत. आजची सध्याची परिस्थिती पाहता हे किंवा अधिक स्पष्ट व्हावे यासाठी आपण एक सोप्यात सोपे उदाहरण सांगायचं झालंच तर. ‘वर्क फ्रॉम होम’ हा कोरोनामुळे दिसलेला प्रमुख दृश्य बदल आहे. आजवर कधीही केले गेले नाही, अशी घरून काम करण्याची वेळ आज अनेकांवर आली आहे. पण, हा बदल तात्पुरता नसून, आता हीच कार्यपद्धती कायमची करता येईल का, याचा जागतिक पातळीवर विचार होतो आहे. टीसीएस (टाटा कन्सलटन्सी सर्विस) सारख्या कंपन्यांनी २०२५ पर्यंत आपली ७५ टक्के कर्मचारी घरून कसे काम करतील, या दिशेने कामही सुरू केले. जगभरात हे होत आहे. अनेक शाळा-महाविद्यालयांनी ‘लर्न फ्रॉम होम’ सारख्या घोषणा करत शिक्षणही ऑनलाइन करायला सुरुवात केली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत कमी मनुष्यबळ असताना ही कामे न पारंगत असणाऱ्या लोकांनाच इथे किंवा भविष्यात किंमत असेल हे स्पष्ट करणार, शिकवण देणारं चित्रण अर्थात कोरोना काळ. कोरोनासारख्या साथी याआधीही या जगाने पाहिल्या आहेत. पण कोरोनाची साथ वेगळी आणि अधिक विश्वव्यापी ठरली याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे दळणवळणाचा वेग (Speed of Mobility) आणि माहितीच्या प्रसारणाचा वेग (Speed of Information). हे दोन्ही वेग आजवरच्या मानवी इतिहासातील सर्वोच पातळीवर आहेत. या दोन्ही वेगात आणखी बदल होणार आहेत. पण आता ते ज्या पातळीवर आहेत. त्यात आयुष्याची भाषा म्हणून काय करायला हवे, या अनुषंगाने सातत्याने विचार आणि कृती व्हायला हवी हे नक्कीच. 

       कोव्हिडच्या काळात प्रत्येकाचं प्रवासपर्व जवळजवळ खुंटला आहे. जिथे कुटुंबीयांच्या भेटी होत नव्हत्या आणि वर्षभर आपल्याच घरी जाता येणं शक्य नव्हतं तिथे नव्या जागा आणि नव्या लोकांच्या भेटीगाठी होण्याची काय कथा. पण एरव्ही जे स्मार्टफोन्स आणि चॅटिंग अॅप्स पालक आणि मुलांमध्ये वादाचा मुद्दा ठरतात तीच यावेळी मदतीला धावून आली. लोक एकमेकांच्या संपर्कात राहू शकले, अडीअडचणीला मदतीला धावून जाऊ शकले आणि कमी होत चाललेला संवाद व्हर्चु्अली का असेना सुरू ठेवू शकले हे ही नसे थोडके. प्रत्येक दिवस, प्रत्येक वर्ष आपल्याला कळत नकळत काहीतरी शिकवून जात असतं. 2020 ने सुद्धा खूप काही शिकवलं. काळाच्या पटावरचं माणसाचं अत्यंत सूक्ष्म स्थान, पुरून उरण्याची त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि हा सगळा खटाटोप सार्थ ठरवण्यासाठी लागणारं कोंदण म्हणजे माणुसकी. समुद्राप्रमाणेच काळाच्या लाटाही एकापाठोपाठ एक थडकत राहतात. अथांग काळातून आपण आपल्या छोट्याशा होडीतून प्रवास करत असतो. लाटा त्यांचं काम करत राहतात, आपलं काम फक्त वल्हवण्याचं बरोबर ना...? याच बरोबर शासन आणि प्रशासन यांच्या सूचना आणि पावले ही आपल्याला आगंतुक पालयाच्या तर आहेतच म्हणून एक पॉझिटिव्ह ( कोरोना मधला नाही हा ! ) एटीट्युड घेऊन जाऊया ते अस की या कोरोना विषाणूमुळे जनतेला स्वत:हून जनता कर्फ्यू पाळून घरात बसवण्यास भाग पाडत आहे. घरातील व्यक्तींशी सुसंवाद करण्यासाठी भाग पाडत आहे. कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्र बसून जेवत आहेत, एकत्र बसून स्वत:च्या कुटुंबातील भूतकाळातील अनेक महत्त्वाचे प्रसंग, सुख-दु:खाच्या, मंगलदायी, गमतीजमती यांची उजळणी करावयास भाग पाडत आहे. ज्यांचे आरोग्य कमकुवत आहे त्यांना त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यास भाग पाडत आहे. प्रत्येकास नित्यनियमाने दररोज व्यायाम करण्यास भाग पाडत आहे़ बºयाच व्यक्तींना घरातील खरी परिस्थिती जाणवून देत आहे. गमतीनं का होईना सर्व पुरुष मंडळींना घरात स्त्रियांना मदत करण्यास भाग पाडत आहे. या वरील सर्व गोष्टींचा विचार केल्यास प्रामुख्याने एका गोष्टीची मात्र आठवण होते, ती म्हणजे आपण विसरत जात असलेली आपली भारतीय महान संस्कृती आणि तिचे महत्त्व. स्वतःची काळजी घ्या, शक्य तितके कोरोना पासून स्वतःचे, कुटुंबाचे रक्षण करा, व सूचना पाळत स्वतःला एक स्वावलंबी विचार प्रेरक बनवा, काळजी घेत, सुरक्षित राहा ! 


   धन्यवाद !


Saturday, 27 February 2021

जगणं ! राहून गेलं...


 शिर्षक : जगण ! राहून गेलं....!

  [ धगधगत्या जीवनशैलीत माणूस म्हणून जगायचं राहून गेलं आहे हे सत्य आहे, आजच काम, आजचा पैसा, आजचा दिवस यावर फक्त आणि फक्त भविष्य रंगवून मोकळा होऊन आजच्या दिवसाचीखळगी भरली, आजच्या पदरात असलेलं केलं म्हणजे झालं ही गत मात्र आता पसरून रूढ होऊन प्रत्येकाची परंपरा बनली आहे म्हणायला हरकत नाही. जगायचं म्हणून भूमीला बोझ म्हणून नाही तर जीवनात उत्साह आणि उत्सव असायला हवा. परमेश्वराने मनुष्य जन्म हा मोकळेपणाने हसायला, उत्सव साजरा करायला, मनोरंजन करायला आणि खेळण्यासाठी दिला आहे. सर्व जाती, धर्माच्या आणि संस्कारांमध्ये समतोल राखून नृत्य, संगीत आणि पदार्थांचा सामंजस्याने समावेश केलेला आहे. उत्सवामुळे जीवनात सकारात्मकता येते. भेटीगाठी वाढतात आणि अनुभवाची समृद्धी येते. जीवन जगणं ही देखील एक कला आहे. उदा. ड्रायव्हिंग न शिकलेल्या चालकाच्या हातात एखादी गाडी तर तिचे नुकसान होणार हे ठरलेलेच आहे. जीवनात ज्ञान, बुद्धी, विश्वासाशिवाय तुमच्या इच्छेचेही योगदान असते. योग्य ज्ञान आणि पूर्ण विश्वास यांच्या जोडीला सकारात्मकता नसेल तर तुम्हाला सतत अपयश येत राहते. याचे कारण अनेकजण जीवन म्हणजे एक संघर्ष आहे असे मानतात. तसे नसून जगणे म्हणजे एक कला असावी आणि त्या कलेला वाव द्यावं म्हणून रंग भरून मनसोक्त जगणं म्हणजेच जीवन... ]


   खुप दिवसांनी लेख आपल्या भेटीस आले वेळेच्या अभावी अर्थातच जगण्याच्या पंक्तीत वेळ मिळाला नाही असेच म्हणेन पण छंद जोपासून लिखाण करत राहून एक जगण्याची कला अवगत केल्याचा आनंद मात्र थोडा वेगळाच म्हणून वाचकांच्या पसंदीला उतरण आणि मनातल्या काही शब्दांना उतरवून रंगवून एक छान चित्र तयार करणे म्हणजे पण एक सुंदर कला समजू. आज आपण बघतो आपल्या आसपास, आपल्या वागण्यात यापैकी  क्रोध, सामाजिक द्वेष, हावरटपणा, युद्ध आणि अनेक प्रकारच्या विषारी विचारधारांमध्ये आपण कुठं ना कुठं यात बसतो आणि साहजिक लोकांना यात एक बाजूने असहाय्य वाटत आहे. डोक्यावरचा भार इतका वाढला आहे की, आता माणसे सामूहिक आत्महत्या करायला लागली तर वावग वाटायला नको.  आपल्यापैकी प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काही  सतत विचारचक्र सुरू असते. प्रेम, द्वेष, अपमान, बदला, गुन्हेगारी, नैराश्य अशा अनेक गोष्टींच्या दडपणाखाली आपण कसेबसे जीवन जगत आहोत. इतकंच नाही तर अनेकवेळा मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा अशा ठिकाणी गेल्यावरही काहींचे मन शांत राहात नाही. जीवन जगण्याची कलाच जणू काहींना अवगत नाही,असे वाटते. जगायला आज माणसाकडे काय हवं याच उत्तर कोणीही क्षणात देईल आणि ते म्हणजे "पैसा" माणसाला इतका प्रिय असणारा हा पैसा माणसाला जगायला नक्की शिकवतो म्हणजे असेल तर एक रस्ता अन नसेल तर एक रस्ता पण ह्या दिवसाच्या वजाबाकी शिवाय ते जगणं जे खळखळून हसणं, बागडत लहान होऊन निरागस होत आनंद घेत दिवस घालवण हे जगणं कधी माणूस अनुभवून खरं आणि सत्य असणार असलं जगणं म्हणजेच आयुष्य कधी समजून दिवस काढलेत का ? कदाचित ह्या प्रश्नाच उत्तर जास्तीत जास्त "नाही" असणार आहे कारण जगायचं असेल तर आपल्याला नवं अस काय करायला हवं का ? अर्थात नाही तर आपल्या दिनचर्येत वेळ - काळ,स्थिती-परिस्थिती बघून प्रत्येकाच्या मदतीला येत त्यात आनंद मानत, एक अशी सोज्वळ वेळ जी समाधानी म्हणून येते तेच जगणं बाकी सगळे तास फक्त जिवंत राहून दाखवून ह्या बाजारात आम्ही टिकलो हेच सिद्ध करण्यासाठी केलेली धडपड या व्यतिरिक्त काहीच नाही. माणूस होऊन माणसानं माणसाला माणसासारखं वागवावं, इतकी साधी मागणी अन मन त्या दिशेने वावरत जाऊन त्या बुद्धिन एक कल्पक आनंदी राहण्याचा, आनंदाच्या पेटीत असलेले ते रंग प्रत्यक्ष वागण्यात आणि आपल्या मानवी जीवनात अवरतवून रेखाटन करणं अर्थात जगणं. मग त्यात संवेदनशील माणसाचं स्वत्व हरवू नये, यासाठी समतेचा दिवा होऊन जग उजळवण्यासाठी आपण तत्पर आहे. दिवस कितीही वाईट आले, तरी लढण्याचं वय सरणार नाही, याची हमी देत पुन्हा नव्या जोमाने संघर्षाला उभी राहणे. आयुष्यभर सोसलेल्या कळा विसरून वेदनेला ही जगण्याचा लळा लागावा, इतकी नितांतसुंदर नाती निर्माण करून त्या नात्यात एक आनंद भरून दिवस काढणे अर्थात जगणं. वागणं नावाची जी चीज आहे ती प्रत्येक माणसातल्या माणुसकीचं प्रतिनिधित्व करते. आनंदाच्या महालात आपोआप जिव्हाळा राहायला लागतो मग प्रेम उदभवून त्यात अनेक चांगले रंग मिसळून एक दिवस "छान" केल्याचं समाधान अर्थात जगणं.  प्रेम ही मिळवण्याची गोष्ट नाही, ती फक्त आणि फक्त मिळणारी गोष्ट आहे. प्रेयसीच्या सुखात सुख मानणारा प्रियकर हा खऱ्या प्रेमाचं प्रतिनिधित्व करतो. अशा अनेक उदाहरण मधून , अनेक नात्यांच्या प्रकट आणि जपलेल्या प्रत्येक त्या मानवी सच्चेपणाला स्पर्श करणार जगणं म्हणजे आयुष्य असावं तर मुखवट्याचं जगणं कदापी कुणाला मान्य नसावं, म्हणून माणुसकीचा वसा घेऊन अंतर्मनातील संवेदनेची ज्योत प्रत्येक वादळात प्रखरतेने तग धरून उजळत राहिल, शेवटच्या श्वासापर्यंत वणवण करत काळजाच्या जखमेला काळजीचा लेप लावायला मानवतेचे हात पुढे सरसावतील, हा आशावाद घेऊन जर प्रत्येक माणूस जगायला लागला तर खरा जीवनाचा अर्थात आयुष्याचा मतितार्थ कळून जाईल. संघर्ष हा माणसाच्या आयुष्याचा कणा आहे. जगण्याची भ्रांत माणसाला निवांत बसू देत नाही. काळजाला जाणिवेचा चटका लागला की, माणसाचं जगणं समृद्ध होत जातं. माणसाचा स्वाभिमानी विवेक जागा असायला हवा. तेव्हाच जगायला आपण शिकू अन्यथा या शाळेत आपण नापास गाडग म्हणून स्वतःला स्वतःच हिणवत बसू.

     लेखाच्या मुळ मुद्द्यावर परतत असताना सांगायचं एवढंच आहे की खरंच मनापासून आपण जगणं विसरून गेलोय धावपळ, उठाठेव, नको त्या तसदी, नको असलेल्या काही गोष्टी आपल्या हातून अनपेक्षितपणे असो किंवा प्रत्यक्ष होतातच पण २१ व्या शतकात आपण जगतोय, प्रगत आणि विकसित परिसरात राहतो , वागतो हा न्यूनगंड पण तितकाच कारणीभूत म्हणावं लागेल. जस शतक तस आपण दैनंदिन जीवनात वापारास आणत असलेली ती साधने जी जुन्या काळातील टपाल, पत्र, संभाषण, गाठ, भेट , सगळं काही पुसून टाकली. अजून एक ते काय डिजिटल जमाना शोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एकमेकाच्या इतक्या जवळ आलोय की खरं जगणं सुद्धा विसरून गेलोय. पत्रावरून आठवण आली की आज अनेक अशी प्रश्न जी आपली होती, आपल्या अंतर्मनातून निर्माण झालेली न सहज आपल्या माणसाच्या काळजाला स्पर्शून जाणारी जशी की, 'आई बाबा कसे आहेत, ताई कशी आहे, दादा काय करतो, वासरू विकल का ? शेजारचे काका-काकू बोलतात का आपल्याशी ? अशी कित्येक प्रश्न आजच्या धावपळीच्या जीवनयात्रेत 'अनुत्तरित' च राहिले सत्य. "शतदा या जन्मावर प्रेम करावे" या पंक्तीला केव्हाच या वेळ-काळेने फाटा दिलाय. स्वतःची जगण्याची शैली निर्माण करून साधं पण छान जगण्याची स्वच्छंदी सवय मोडकळीस निघाली आहे न ती कला परत आल तरच जगायला आनंद वाटेल हे अधोरेखित सत्य नाही तर त्रिकाल बाधित सत्य म्हणावं लागेल. म्हणून हरवून जाऊ नका ह्या सुंदर जगात अनेक अशी आपली बनवलेली, सजवलेली गोड गोमटी नाती न त्यांची सुंदर मने आहेत त्यावर राज्य करा अन एक छान जगणं पदरात पाडून घ्या. 

     जाता जाता फक्त इतकेच सांगेन, तुम्ही स्वतः मधेच हरवून गेले ना की मग हट्ट करूनही कोणी आणून देणार नाही हे लक्षात ठेवा. जगण्याच्या ह्या चाकोरीत तुमचं बालपण ही जगत राहा जे आज वयाबरोबर हरवत चाललंय. पूर्वी एखादी गोष्ट करण्याची जिद्द असायची पण त्यामागे कोणी आपले आयुष्य विसरून धावत नसे. लोक स्वप्ने पूर्ण ही करायची आणि प्रत्येक गोष्टींचा आनंद ही घ्यायचे. अलिकडे मात्र हे कुठे तरी ढासळताना दिसते. अलिकडे लोक फक्त स्वप्नांमागे धावताना दिसतांत, परंतु कूठेतरी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घ्यायला ते विसरतात. खरंच, या स्पर्धेच्या युगांत कुठेतरी तो आनंद, तो प्रत्येक क्षण जगण्याची कला कुठेतरी आयुष्यातून हरवत चालली आहे. खर्‍या अर्थाने कुठेतरी आयुष्य हरवत चालले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही तसच अगदी हा रोजच्या जगण्यातला खाचखळग्यांचा प्रवास करीत असताना, धावत असताना कधी ठेचकाळणं, पडणं, रकतबंबाळ होणं, उठुन पुन्हा धावणं, या प्रवासात येणारे सहप्रवासी, त्यांनी मारलेली फुंकर, त्यांचा तो मुलायम स्पर्श, स्नेह, ओलावा, जिव्हाळा, माया, ममता हे सगळं सगळं विसरुन आपण ईच्छित स्थळ गाठण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा गाठतो ही, पण हे सगळं करीत असताना खुप काही मागे हरवुन पुढे आलेलो असतो. जे हरवलेलं असतं अस वाटायला लागतं, ते खरं आयुष्य असतं. आपण काहीतरी सोडुन पुढे आलेलो आहे ही मनाला रुखरुख लागुन रहाते. ते हरवलेले क्षण म्हणजे हरवलेले आयुष्य. कित्येक गोष्टींचा आनंद न घेता रूक्षपणे बेचव रंगहिन जगणं म्हणजे हरवत गेलेले आयुष अस मला वाटतं, बरोबर ना ?

     धन्यवाद..! 

     लेखन : पत्रकार एन.के. ,वळसंग.  ( ☎️ : 8806605852)


Wednesday, 2 December 2020

कोरोना : एक शिकवण !

 शिर्षक : कोरोना : एक शिकवण..!

[ गेली वर्षभर कोरोनाने थैमान घातलं आणि अक्षरशः प्रत्येकाच्या आयुष्यात नकोसा वाटणारा वर्ष म्हणून हिणवले जाणारे वर्ष म्हंटल तर चालेल. सध्या जगभरात कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले आहे. या साथीच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरातील मानवी समूहाला ‘जिवंत राहणे’ हीच आपली प्राथमिकता आहे हे अधोरेखित करायला भाग पाडले आहे. साथीच्या प्रकारातील या विषाणूचा प्रादूर्भाव जगभरातील अनेक श्रीमंतापासून ते गरीबापर्यंत होतोय. तस ह्या "जगणं" नावाच्या झटापटीत प्रत्येकाची गळचेपी होऊन बाजार भरला आहे पण बाजारात प्रत्येकाला किंमत मिळेना, जगणे अवघड आणि मरणे डाव्या हाताची मळ झाली आहे हे खरं. या संकटातही अहोरात्र झटलेल्या पोलीस आणि आरोग्य विभागाच्या तमाम योध्याना लेख समर्पित...करतो तसेच कोरोनाच्या काळात आपल्याला मानवी जीवनात मिळालेल्या शिकवण बद्दल लेख आपल्यासमोर सादर करतोय...]

देशात कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. मात्र तरी देखील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. तसेच कोरोनाच्या युद्धात आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलिस, नर्स आपले कर्तव्य बजावत आहे. ‘भारताला कोरोना विषाणूसोबत जगायला शिकावे लागेल आणि लॉकडाऊन हटवावा लागेल. याचे कारण लॉकडाऊन हटवला नाही तर कोरोनामुळे जेवढे मृत्यू होतील, त्यापेक्षा जास्त लोक उपासमार आणि कुपोषणामुळे मरतील,’ असं मत इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायणमूर्ती यांनी यांनी व्यक्त केलं आहे. आजवर लॉकडाऊन म्हणून अनेकांच्या पोटाला चिमटा बसला अनेक उद्योग पासून ते अनेक व्यवसाय रसा-तळाला गेले आहेत. 

आज वर वर्ष भरत आलं तरी कोरोनाच्या भीतीने आणि संसर्गाने जी देश विदेश पातळीवर थैमान घातले आहे ते नक्कीच उभारून किंवा पडलेली खळगी भरून निघायला मात्र नक्की अनेक वर्षे लागतील यात आशंका नको. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या लोकांना विविध स्वरुपात मदत केली जात आहे. कोणी आर्थिक मदत तर कोणी अन्न धान्य, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करीत आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्यात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीही बाधित होत आहेत. कोरोनाच्या काळात जास्तीत जास्त धावपळ न जीवाचं रान करून जे ह्या मानव जातीला वाचवण्यासाठी प्रयत्न केला अर्थात डॉक्टर, नर्स आणि पोलीस प्रशासन हेच दैवत म्हणून उभे ठाकले. आज प्रत्येक गावात , देशात नाही जगात एकच प्रश्न सामान्य पासून ते असामान्य लोकांच्या समोर असलेला प्रश्न म्हणजे " कोरोना ". 

त्याबद्दल - 

समतोल बिघडला निसर्गाचा

मानवा कसा घातला रे घाव,

कोरोनाच्या या महामारीतून

देवा सुटकेचा आम्हा मार्ग दाव,

दाखविली अनेक तुझी रुपे देवा

आलास कोरोना योद्धे बनुनी,

डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी

प्रशासक, शेतकरी अन् गृहिणी,

एखाद्याच्या चुकीमुळे प्रत्येकजण

कोरोनाच्या विळख्यात अडकतो आहे,

या काळातही प्रत्येक कोरोना योद्धा

जिवाचं रान करुन लढतो आहे. 

... वरील संकलित उक्ती मुळे वाटून जात की नक्कीच जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यात डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, पोलीस प्रशासनाने केलेलं योगदान आज नक्कीच चांगल्या आणि जिवाच्या बचावासाठीच ते योगदान नक्कीच नमूद करण्या इतपत श्रेष्ठ म्हणावं लागेल. कोरोना व्हायरसने संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातला लाखो लोक मृत्यूमुखी पडले काही देशांची अर्थव्यवस्था खिळीखिळी करून टाकणारी प्रचंड मोठी महामारी भारतासारख्या देशालाही सळोकी पळो करून सोडलं आहे. भारताच्या राजकीय आणि केंद्रीय मंत्री महोदय यांच्या सावधानते मूळ आज भारतात त्याचा वेग कमी होत आहे. तसेच काहीशी परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाचे जगणे किंवा राहणीमान सुरळीत सुरू असताना कोरोनाच्या आगमनने सर्व काही बदलून गेले. तसेच त्याच्या ह्या संसर्गमुळे आपल्याला अनेक धडे शिकायला ही मिळालं. जसे की पाण्याचे प्रदूषण ही देखील एक मोठी समस्या आहे. मनुष्याने निसर्गाचं मोठं नुकसान केलंय. प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढले असून त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. पण आता या सर्वात कोरोनाने काय शिकवले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचे उत्तर सोपं आहे; निसर्गाला त्रास दिला की तो तुम्हाला त्रास देतो आणि हीच महत्वाची शिकवण आहे की निसर्गाला गृहीत धरू नये. निसर्गापुढे कोणाचेही चालत नाही असे म्हणतात आणि ते तंतोतंत खरे आहे आणि म्हणूनच निसर्गाची काळजी घ्या हा सर्वात मोठा धडा कोरोनाच्या या संकटाने आपल्याला शिकवला आहे. 

     नोकरी आणि पोटापाण्यासाठीच्या धावपळीने जीवनशैली अतिशय धकाधकीचे बनलंय आणि त्यामुळे घरच्यांना वेळ देणे, त्यांच्याशी गप्पा मारणे देखील दुर्मिळ झाले आहे. खरंतर घरच्या मंडळींना वेळ देणे अतिशय महत्वाचे असते. आई वडिलांचा एकमेकांशी आणि मुलांशी संवाद, घरातील ज्येष्ठ लोकांशी संवाद या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोरोनामुळे लोक व्यथित असले तरी कोरोनाने सर्वांना घरात बसायला लावले आहे आणि याचमुळे घरच्यांना भरपूर वेळ देणे शक्य झाले आहे. काही घरांमध्ये वाद होत आहेत पण अनेक नाती देखील मजबूत होत आहेत. कोरोनाने आपल्या सर्वांनाच नात्यांचे महत्व शिकवले आहे. म्हणून नाती टिकवून ठेवण्यासाठी प्रत्यक्ष संवाद पासून ते प्रत्यक्ष गाठी भेटी झाल्या पाहिजेत ही आमूलाग्र बदल घडवणारे बाळकडू ह्या कोरोनाने आपल्याला दिल. तसेच आपल्याला म्हणता येईल स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात कचऱ्याचे प्रमाणात अतिशय मोठे आहेत पण त्यासाठी होणाऱ्या उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहेत. स्वच्छता असल्यास कोणताही आजार आपल्या जवळ येत नाही हे तर सर्वांनाच माहितीये. पण तरीही सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची ऍलर्जी असल्याचे दिसून येत आहे. कोणताही आजार पसरण्यासाठी अस्वछता अतिशय पोषक आहे. कोरोनाने लोकांना सारखे हात धुण्यास शिकवले. मास्क देखील लोक घालू लागले आहेत. सर्वजण लॉकडाऊनमुळे घरी असल्याने संपूर्ण निसर्ग स्वछ होतोय. कचऱ्याचे प्रमाण कमी झालंय. थोडक्यात काय कोरोनाने सर्वांना स्वच्छतेची शिस्त लावली असे म्हणल्यास काही वावगे ठरणार नाही. हीच सवय आपण यापुढेही अशीच पाळली पाहिजे. विचित्र जीवनशैली, वेळी-अवेळी खाणे अशा अनेक गोष्टींमुळे सध्या देशातील लोकांच्या तब्येतीचा स्तर खालावला आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ या सगळ्या गोष्टींमुळे आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या, मधुमेह, ब्लड प्रेशर यासारखे सारखे आजार असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले लक्ष्य केले आहे.

            कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीरो गप्रतिकारक शक्ती चांगलीच असावी लागते. म्हणजे कोरोनाने सर्वांना तब्येतीचं महत्व शिकवलं. तब्येतीची काळजी घेणे किती महत्वाचे आहे हे देखील या विषाणूने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. मग आयुष्यभर तब्येतीची काळजी घेतल्यास सर्व प्रकारच्या व्याधी आणि रोगांपासून दूर राहण्यास आपण सक्षम होऊ शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे निसर्गाचे चक्र सुधारलं आहे. प्रदूषणात मोठी घट झाली असून वन्य जीवन देखील आनंदी असल्याचे अनेक ठिकाणी आपण त्यांना पाहिलंय. वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीवप्राणी असो अथवा वन्यप्राणी सर्वच जीवनचक्राचा एक आमूलाग्र आणि अतिशय महत्वाचा भाग आहेत. त्यांची संख्या कमी झाल्यास जीवनाचा समतोल बिघडतो आणि म्हणूनच त्यांच्यावर प्रेम करणे आणि त्यांची काळजी घेणे देखील अतिशय महत्वाचे आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात प्राण्यांच्या कत्तलीमध्ये देखील घट झाल्याचे दिसून येत आहे. सर्वांनी आनंदाने एकमेकांची काळजी घेऊन एकत्र राहावे अशीच शिकवण कोरोना सर्वांना देत आहे. कोरोनाचे संकट मोठे असले तरी आपण सर्वांनी काळजी घेतल्यास त्यावर नक्कीच मात करू शकतो. कोणताही आजार असो तो नेहमीच सगळं हिरावून घेत नाही तर तुम्हाला काही चांगल्या गोष्टी देऊन देखील जातो. अनेक वेळेस आपल्याला अनेक गोष्टींबद्दल पूर्वकल्पना देतो.अनेक गोष्टी शिकवून देखील जातो.

    ... प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहुयात आणि कोरोनाने आपल्याला जे धडे अथवा शिकवण दिली आहे त्यावर गांभीर्याने विचार करून ती अमलात आणून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखूयात.


                             © धन्यवाद ( लेखन : पत्रकार एन.के. ) 

                             © मोबाईल : +९१८८०६६०५८५२

Tuesday, 15 September 2020

मगचं लोकांना चुकीचं ठरवा !

 शिर्षक : आपली झोळी तपासा ; मगच लोकांना चुकीचं ठरवा !

लेखन - पत्रकार एन.के. ( संकेत टाइम्स : ८८०६६०५८५२ )

           [ नमस्कार वाचक हो, अनेकदा खुप काही लिखाण करून आपल्या समोर सादर करावे वाटते परंतु वेळे अभावी ; असो आजच्या वरील शीर्षक प्रमाणे आपल्या भोवताल असणार हे सुंदर जग, अनेकांना अनुभवायला येत का नाही माहीत पण म्हणतात की जग सुंदर आहे, आपल्या दैनंदिन कामात आपल्याला सुखाची छाया देणारी माणस, वस्तू, प्राणी हेच चांगले अन्यथा बाकीच्याशी देणं घेणं नाही म्हणून जीवन जगणाऱ्या पण जीवनावर कंटाळा करून नावडती म्हणून जगण्याला हिणावणऱ्या अशा प्रत्येकासाठी लिहतो आहे.. ]


.... ‘‘मी पणाचा गर्व मात्र नाशाकडे आणि ऱ्हासाकडे नेल्याशिवाय राहात नाही.’’ कारण नियती कधीच कुणाला माफ करत नाही. म्हणूनच चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात. तुम्ही जे पेराल तेच उगवेल हे वास्तव आहे." ‘जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी सत्वर’ हे प्रल्हाद शिंदे यांच्या पहाडी आवाजातले गाणे बालपणापासून ऐकत आलोय, पण त्याचा मथितार्थ मोठा झाल्यावर समजू लागला. ‘‘जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर’’ हे का सांगितले आहे ते सदानकदा, पावलोपावली अनुभवास येते. माणसाचे कर्म चांगले असेल, तर निश्चितच त्याचे न मागता फळही चांगले मिळते, असा त्याचा बोध आहे. तुमच्या आचरणातून तुम्ही स्वत:ला सिद्ध कराल ते भगवंताला प्रिय असते. स्वामी समर्थानी सांगितले आहे की, ‘भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे’ ज्या ज्या वेळी तुला संकटाशी सामना करावा लागेल. त्या त्या वेळी मी तुझ्या हाकेला धावून येईन, मात्र तू प्रयत्न कर. स्वत:च्या स्वभावातून आचरणातून समाजसेवा घडली पाहिजे. भुकेल्याची भूक आपली वाटून तुम्हाला ज्यावेळी दयेचा पाझर फुटेल तेव्हाच तुम्ही माणूस म्हणून जगण्याचे तुम्हाला समाधान मिळेल. अहंकार, गर्व कशासाठी? शाश्वत तर काहीच नाही, मग गरीब-श्रीमंत या भेदभावात माणसाला माणूस हरवून का बसला आहे.  आयुष्याच्या प्रत्येक क्षणात तुम्हाला सत्याच्या वाटेने जाताना तुमचा नि:स्वार्थीपणाच कामाला येईल. चांगले कर्म केले तर कोणत्या ना कोणत्या रूपाने तुम्हाला त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. दिवसभर किंवा आयुष्यभर भक्तीत डुंबून जायची गरज नाही. घर, प्रपंच सोडून भक्ती करायची गरज नाही. जगात अनेक अशी उदाहरणे आहेत जे आपल्याला स्वार्थ म्हणजे काय अशी तात्पर्य देऊन जातात. माणूस जगतो मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा आपल्या जवळच्या माणसाच्या स्वार्थासाठी हे नक्की क्वचित काही जण असतात जी ह्या समाजासाठी किंवा पुढच्या गरजुच्या हातची भूक,तहान, भागवत असतात. पण जसे ही क्वचित असतात ना तसे आपले उपकार पण क्वचित असतात कारण आपली काम व्हावी म्हणून प्रत्येकाला आपण उपकाराच्या सौम्य जाळ्यात घेतो पण त्या मागे खूप मोठा स्वार्थ असतो एवढं सगळं करत असताना नमूद करावे असे वाटते जगासमोर आज कोरोना सारख महा संकट समोर असताना आजही माणूस आपल्या जिवाच्या आकांताने स्वतःसाठी स्वतःच्या उपजीविका किंवा स्वतःच्या चांगुलपणाची लख्तरेची पान वर वर पुसण्यात अव्वल असतो. आपल्या जगण्याच्या एक शैलीत प्रत्येक माणसाची सवय म्हणतो मी तर की एखाद काम असत न त्या क्षेत्रातील त्या माणसाच्या वतीने काम होणार असेल तर त्याला दलाल रुपात बघून गोड प्रवृत्ती बनवून काम करून घेतो अनपेक्षित काम आल्याने पुढचा केला किंवा वेळ नसल्याने विलंब झालं तर तो माणूस चुकीचा किंवा वाईट ठरवणारे आपण जहागीरदार कोण ?     

       आहे का उत्तर नाही ना ? नसणार आहे कारण ही प्रवृत्ती प्रत्येक माणसाच्या अंगात भिनली आहे. खूपदा अस होत आपल्याला कॉल येतात संपर्क होतो खुप दिवसांनी झालेली संपर्क ही काही ना काही स्वार्थ घेऊन आलेली असतात ( काही वगळता ) त्यात तू कसा मी कसा, छान -बरेची मुक्ताफळे टाकून झाली की "माझं एक काम होतं" मग सुरू होते बोअरिंग बीजगणित पाढा ! हे बंद झालं पाहिजे यासाठी माझं मत आहे की आपण कुणाच्या मदतीला किती येतो न तेही निस्वार्थ तेवढंच आपल्याला क्विक वाला फीडबॅक मिळणार  आहे हे कदापी विसरू नका ! आपल्या झोळीत लोकांना द्यायला काय असेल नसेल तरच त्यावरून आपल्या पदरात पडणाऱ्या चांगल्या वाईटची लिस्ट ठरत असते. म्हणून एखाद्या माणसाच्या बद्दल बर वाईट मत प्रकट करत असताना विचार करा. स्वार्थ असुद्या नक्की पण त्याची प्रदर्शन मांडू नका, संयम न नात्याची पारख करा, टेहाळणी करा, नात्याला गालबोट किंवा हर्ट करण्याआधी शंभर वेळा विचार करा आणि मगच एखाद्या बद्दल विचार करा न मग वागा. भिंतीला कान असतात नक्की पण कानाला भिंत जवळ असते नसते पण पुढच्या व्यक्तीच्या मनातली तुमच्या बद्दलची प्रेमळ भिंतीची ती वीट ढासळू नये एवढी काळजी घ्या मात्र नक्की. मागील लेखातील एक संदर्भ घेतो - 


"सुन्दर चेहरा थोड़े समय ही याद रहता है, पर सुन्दर व्यवहार जीवन भर याद रहता है।"

बस यही है जीवन का गुरु मंत्र... अपने चेहरे और शरीर की सुंदरता से ज़्यादा अपने व्यवहार की सुंदरता पर ध्यान दें.. जीवन अपने लिए आनंददायक और दूसरों के लिए अविस्मरणीय प्रेरणादायक बन जाएगा..!

   धन्यवाद !