Saturday, 31 March 2018

जगण्याच्या पंक्तीत आहे तसं व्यक्त व्हा ना नसता उठाठेव कशाला...?

शिर्षक :- जगण्याच्या पंक्तीत आहे तसं व्यक्त व्हा ना; नसता उठाठेव कशाला...?

लेखन :- एन.के. ( पत्रकार)

दि. ३१ मार्च २०१८

जग सार डिजितलच्या वाऱ्यात भेभान झालाय साधं ला कोण का विचारेना,
स्वार्थ आणि माझच्या या माळेत माणसाची माळ का सापडेना...?
सांगा ना कुठं चुकलो आपण कि विसरची व्याख्या आपल्या उशाला,
त्यासाठी जगण्याच्या पंक्तीत आहे तसं व्यक्त व्हा ना ; नसता उठाठेव कशाला...?...१

जगाच्या बाजारात आपली किंमत नेहमी कमी कमी होत असते तरी आपला तोरा वरचं का..?,
माणूस म्हणून जगायचं आहे ना मग ही दानव बुद्धी थोबाडावर का...?,
अक्ख आयुष्य गेलं कागद जमवण्यासाठी पण दोन इंचाची खळगी तृप्त म्हणून कधी नाही भरला,
मग सरळ न साधं जगणं असावं त्यासाठी जगण्याच्या पंक्तीत आहे तसं व्यक्त व्हायचं नसता उठाठेव कशाला..?...२

तुझ्या न माझ्या संघर्षात खूप काही फरक नाही तात्पर्य एकच जगणं,
एकाच धारेवर चाललेल्या या कसरतीत मग भलतंच का वागणं,
संपलेल्या दिवसाला आठवण म्हणून वापरणारे आपण तर का उगीच स्वप्नांच्या रंगरंगोटीच सामान उशाला..?,
अती नसलेल्या सुंदर आयुष्यात जगायचं तर जगण्याच्या पंक्तीत आहे तसं व्यक्त व्हा ना नसता उठाठेव कशाला...? ...३

मनाची भ्रमंती हि रोजचीच ठरलेली त्यात सर्वजण मी श्रेष्ठ म्हणून घ्यायला पहिल्या रांगेत,
आयुष्यभर स्वतःच्या मोठेपणाला लिहण्याच पाप आपण केलंय काय धुणार तुम्ही या गंगेत..?,
जगताना आनंदी आणि बागडताना स्वच्छंदी समजून पण आयुष्यातली मंदीची स्पस्टोक्ती कशाला...?,
पाप पुण्याचा न्यायदानी तो आहे तर जगण्याच्या पंक्तीत आहे तसं व्यक्त व्हा ना नसता उठाठेव कशाला...? ...४

लिहायचं काय म्हणून सगळंच लिहलं जात पण जगायचं कसं कोण लिहणार..?,
साम,दाम,दंड, भेद च्या या गोड आयुष्यात आपली दिशा न बाजू योग्य ती कोण पाहणार...?,
जमत नाही आम्हाला मनमोकळं व्यक्त व्हायला तर अती Adjustment कशाला...?,
हात ओढून आयुष्य जगायचं काही वेळा त्रासदायक असत तर जगण्याच्या पंक्तीत आहे तसं व्यक्त व्हा ना नसता उठाठेव कशाला...? ...५

धन्यवाद...!

Friday, 30 March 2018

मराठी शाळेचे कर्दनकाळ :खुर्चीवरच सरकार

शाळा आणि नोकर भरत्या बंद करून भावी पिढीच्या भविष्याला काळोखात लोटू नका

( *टीप : लेख जरासं मोठा आहे...* )
आज सामान्य जीवन जगताना आणि समाजातील प्रत्येक स्थरातील (म्हणजे काहींनी घालून दिलेल्या गरीब आणि श्रीमंतांच्या दरी) तील प्रत्येक घटक आपल्या नवजात पासून शालेय पाल्याला भविष्यात एका चांगल्या आणि एक सक्षम स्थरावर पोटाच्या खळगीच्या छताखाली असावं असं एक मार्मिक स्वप्न असतं. गरिबांच्या पोरांना चांगलं शिक्षण मिळावं माझं पोर बांधावर शेळ्या सोडण्याऐवजी शाळेत जाऊन शिकावं म्हणून रात्रीचा फिवास आणि दिवसाचा रात्र करणारी मायबाप आज शासनाच्या विविध निर्णयाचे आत्महत्याने स्वागत करताना दिसत आहेत. कुणाच्या मनाला टोचले किंवा कुनाच्या मनाला आंनद वाटेल असं द्वितीय पद्धतीचं लिखाण करायला कधी आवडलं नाही पण सत्य परिस्थितीच एखादं विषय आणि त्यावर संक्षिप्त पण सत्य रेखाटन करायला मला कुणाची भीती हि नाही वाटत. सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील माणसं आज आपल्या पाल्याला भविष्य काढावं म्हणून शिक्षण पासून ते कपडे ते खर्चायला पॉकेट मनी पर्यंत विचार करून दुसऱ्याच्या शिवारात राब राब राबतात आणि एका पुढच्या पिढीच्या आयुष्याला घडवायला रक्ताचं पाणी करतात तेव्हा मला सांगा तुमचं डिजिटल इंडिया कुठं कामाला आलं हो..?
शिकून सवरून पोरांनी नशीब काढावे, आपण केलेल्या काबाड कष्टाचे पांग फेडावेत, ही सर्वसाधारणत: कोणत्याही पालकांची अपेक्षा असते. त्याचप्रमाणे चांगले शिकून शासकीय नोकरीत जावे, सुखासीन आयुष्य जगावे अशी सर्वसाधारणत: तरुण पिढीची अपेक्षा असते, किंबहुना तेच त्यांनी आपल्या आयुष्याचे अंतिम ध्येय मानलेले असते आणि त्याद‍ृष्टीने त्यांची तयारी सुरू असते. सरकारी नोकरीत दाखल व्हायचा एक प्रमुख राजमार्ग म्हणजे स्पर्धा परीक्षा, ही अडथळ्याची शर्यत एकदा का आपण पार केली की आपण आपले ध्येय साध्य केलेच, अशी अनेकांची धारणा असते. त्यामुळेच राज्यात आजमितीला जवळपास 10 लाखांहून अधिक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देतात. केंद्र अथवा राज्य पातळीवरील कोणत्याही पद्धतीच्या स्पर्धा परीक्षेचे स्वरूप विचारात घेता सहजासहजी आणि एक-दोन वर्षांत साध्य होणारी ही गोष्ट नाही, हे सहज लक्षात येते. किमान तीन-चार वर्षांपासून आठ-दहा वर्षे रात्रंदिवस घाम गाळावा, प्रचंड प्रमाणात अभ्यास करावा, तेव्हा कुठे ते ध्येय साध्य होते. मात्र, आपल्या ध्येयपूर्तीच्या आकांक्षेने झपाटलेले लाखो तरुण आणि तरुणी या कशाचीही फिकीर न करता स्पर्धा परीक्षेसाठीचे हे कष्ट वर्षानुवर्षे उपसताना दिसत आहेत. या कष्टाचे फलित जर व्हायचे असेल तर अजून तारेवरची कसरत करावी का...? यश नावाचं लेबल मिळवण्यासाठी ७ आकडी रक्कम कुठून आणायची...? मागील ४-५ वर्षापाठीमागचा काळ आठवला तर ३-४ हजाराच्या घर खर्चाच्या रकमेत ३ पटीने वाढ होऊन ती रक्कम् आता आज १० हजार वर पोहचली आहे आणि यात जर आपल्या द्यायची दुरडी कधीच भरणार नसेल शिक्षण आणि पदाव्यांचं काय चिवडा आणि लाडू बांधायला उपयोगात आणायचे का वो...?आज केंद्र शासनाच्या सेवेतील 4 लाख 20 हजार आणि राज्य शासनाच्या सेवेतील 1 लाख 77 हजार वेगवेगळ्या पातळीवरील पदे रिक्‍त आहेत. आज ना उद्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ही पदे भरली जातील आणि त्यातच कुठेतरी आपल्या नशिबाची दारे उघडतील म्हणून राज्यातील हे दहा लाखांवर तरुण वर्षानुवर्षे आपले नशीब आजमावत आहेत, तर काही आजमावण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणांमुळे राज्यातील या लाखो तरुण-तरुणींच्या ध्येयावर पाणी फिरण्यासारखी परिस्थिती उद्भवलेली आहे. केंद्र आणि राज्य शासनाने जवळपास 30 टक्के शासकीय पदे म्हणजे नोकर्‍या कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही कपात केलेली पदे सोडून राहिलेली रिक्‍त पदेसुद्धा भरण्याचा शासनाचा मानस दिसत नाही. तातडीची आवश्यकता असेल त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कामे करून घेण्याकडे शासनाचा कल दिसत आहे. त्यामुळे शासकीय नोकरीकडे डोळे लावून बसलेल्या आणि त्यासाठी वर्षानुवर्षे कष्ट उपसणार्‍या स्पर्धा परीक्षार्थींच्या डोळ्यापुढे दिवसा काजवे चमकू लागले आहेत. आपल्या काळ्याकुट्ट भवितव्याच्या चाहुलीमुळे हा सगळा वर्ग पुरता भेदरून गेलेला दिसत आहे. त्यामुळेच त्यांच्यात प्रचंड नैराश्याची भावना दाटून आल्याचे दिसत आहे. शासनाने गांभीर्याने या वर्गाचा विचार केला नाही तर त्यांच्या नैराश्याला भलतीकडेच वाटा फुटण्याचा धोका दिसत आहे.

*आयुष्याची माती करू नका!*

स्पर्धा परीक्षार्थी आपल्या आयुष्यातील उमेदीची वर्षे आपले ध्येय साध्य करण्यासाठी खर्ची घालत आहेत. ते ध्येयपूर्तीच्या टप्प्यावर असतानाच जर शासनाने नोकर कपात अथवा नोकर भरती बंदीसारखे निर्णय घेतले तर या युवकांच्या आयुष्याची माती व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे शासनाने तातडीने स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून रिक्‍त पदे भरावीत, अन्यथा या युवकांच्या मनातील असंतोषाचा स्फोट व्हायला वेळ लागणार नाही. आज कोणत्याही सामर्थ्य विना जगणे मुश्किल झाले आहे विचार आणि प्रभोधनाचे माध्यमातून जगण्याचे संकेत तर शुभ मिळू शकतात पण एखाद्या झाडाखाली उभं राहून झाड सावली देईल का अंगावर पडेल अशी भीती बाळगून सामान्य रोजी-रोटीच जीवन जगणं आता मुश्किल झाले आहे आज प्रत्येक शाळकरी मुलगा शैक्षणिक आणि वैचारिक धडा अंगीकृत करतो खरा पण माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षणाच्या संभाव्य स्पर्धे नंतर मात्र आयुष्यचं वर्तमान पुसट आणि अंधुक वाटायला लागले आहे. आयुष्याचा कार्दन काळ म्हणून शासनाच्या योजनांचा रोज स्वागत करत राहिलो तर नक्कीच आपलं जीवन हे काळा-पाण्याची शिक्षा म्हणवल्याशिवाय राहणार नाही.

लेखन - एन.के. (पत्रकार संकेत टाइम्स)
दि. ११-०२-२०१८
( संकलन आकडेवारी साभार - इंटरनेट)

महापुरुषयांच्या विचारांच्या जयंतीची गरज...

फक्त आणि फक्त जयंती उत्सव साजरे करणारे २१ व्या शतकातले महापुरुषांचे भक्त

आज कोणत्याही महापुरुषांची जयंती आणि उत्सव म्हटलं की आपल्या दृष्टीस पडणारं पाहिलं दृश्य म्हटलं तर डॉल्बीच्या कर्कश आवाजात ताल धरलेले २० ते ३० वयोगटातले तरुण. सामाजिक आणि वैचारीक इतिहास घेऊन या जन्मभूमीत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या महापुरुषाकडे पाहताना वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांच्या कर्माच्या आणि कर्तृत्वाने त्या त्या क्षेत्राचं विशाल साम्राज्य उभं करणाऱ्या या इतिहासकारांच्या स्मृतीला आठवण म्हणून आयोजल्या जाणाऱ्या विविध सामाजिक बोधमृत पाजणाऱ्या प्रत्येक समारंभला पाहता एक प्रश्न मनी ठेका धरू लागतो तो म्हणजे " इतिहासाची जपणूक का इतिहासाची पुसवणूक". एखादी जयंती होत असताना कुतूहलाने पाहणारे आम्ही त्या गजबजलेल्या वातावरणात काही क्षणासाठी कुणाची जयंती, कुणाच्या विचारांचे पाईक हे बनत आहेत, कोणत्या महापुरुषांच्या आचार विचारांना डोळ्यासमोर ठेऊन असे सभ्य वर्तन करत आहेत असे विचारांनी मन ग्रासत. अनेक गाव तालुका जिल्हा यापातळीवर अनेक महापुरुषांना नेमून दिल्यासारखं त्या त्या कट्टर नावाची उपाधी घेऊन हिंडणारे ग्रुप न मंडळे जयंती साजरी करतात ते हि मनापासून सुद्धा अनु तो तितक्या मोठ्या प्रमाणात कृतज्ञतेने देखील सर्वत्र साजरा सुद्धा केला जातो पण तो कसा?
तर मोठ्याने एका ट्रक मध्ये डी.जे. लावला जातो ज़्यात कधी मुन्नी बदनाम होत असते, कधी शिला जवान होत असते, कधी हलकट जवानीचं प्रदर्शन होत असतं, तर नाचणारे महापुरुषांचे विचाराक म्हणवणारे? त्या ट्रकच्या समोर चक्क दारू पिऊन न "चिपका दे सय्या फेविकॉल से…" म्हणत कुणा कुणाला 'चिपकण्याचा' प्रयत्न करताना दिसतात काय हीच आहे त्या महापुरुषाची शिकवण? या साठीच का त्यांनी आपले आयुष्य, आपले तारुण्य नि सर्वस्व पणाला
लावले? विचार करा अशी मिरवणूक पाहून कोण प्रभावित होणार नाही? डी.ज़े. च्या कर्ण कर्कश धांगड धींग्यां पासून लांब पळणारे लोकंच मग शांत उभे राहून या मिरवणुकी कडे उत्सुकतेने पाहत राहतील.
बुद्ध आणि बाबासाहेबांनी दिलेला शांततेचा संदेश, शिवाजी महाराजांनी दिलेला लढवय्या बाळकडू किंवा महिला समता बंधुता लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि हीच आदर्श व त्यांच्या शिकवणुकी प्रमाणे असलेली मिरवणूक ठरेल! असे मला वाटते त्या नंतर सर्वजण एकत्र येऊन महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन करून, त्यांचे विचार सांगणारे कार्यक्रम प्रस्तुत करून मिरवणुकीची सांगता करावी.
मी आजवर अश्याच मिरवणुकीचे, जयंतीचे दृश्य आपण पाहत आलोय आपण ही यावर एकदा विचार केलं पाहिजे भविष्य काळात अशा शांत, निर्व्यसनी व आदर्श जयंती व मिरवणुका पहावयास मिळतील अशी अपेक्षा.बोलताना कटू वाटत पण सत्य आहे आज प्रत्येक समाज आणि प्रत्येक धर्माने महापुरुषांना वाटून घेतल्यासारखं वर्तन पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून असं पाहायला मिळत आहे की महापुरुष किंवा देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांच्या जयंत्या सुद्धा काहींना आठवेनासे झालेत. मध्ये असंच वाचनात आले महात्मा गांधींच्या ३० जानेवारीच्या स्मृती निमित्त काही अपवाद वगळता कोण मूर्तिकडे फिरकल सुद्धा नाही म्हणे...ज्या अर्थी जर वर्षी नवनवीन कार्यक्रम, उपक्रम घेणारे संस्था किंवा संबंधीत व्यक्ती संघ इतकं आपण आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त झालो आहोत का हो...? समाजात वाटून दिल्यासारखं वर्गणी आणि वर्गणीची खर्चिक बाजू म्हणून महाप्रसाद आणि धांगड-धिंगा हेच आपल्या पिढीची जयंती साजरी करण्याची रूढ परंपरा आहे का हो...? समाजाच्या उन्नती साठी एखादे लाक्षणिक व्याख्यान माला किंवा जयंती महापुरुषांची ख्याती प्रसिद्ध करणारे उपक्रम राबवून शॉर्ट बट स्वीट जयंती आपण का करू शकत नाही ही...? आज राजकारण सुद्धा त्या महापुरुष किंवा एखाद्या दौवताच्या समान माणसाला समोर ठेऊन भावनिक राजकारणाला सुरवात झाली आहे आजचे सरकार पाहता महाराजांचे आशीर्वाद घेते आणि जनतेला दिला जाणारा वृद्धी म्हणून त्रास पाहता जनसामान्यांचे जनजीवन विस्कळत चालले आहे. आज ही आपण राम मंदिर आणि मशजिदच्या नावाखाली मते मागायला गरिबांची झोपडी शोधत असतो.
काळाची गरज पाहता आजच्या पिढीला विसर पडलेल्या त्या इतिहासाची बाळकडू पाजणे गरजेचे आहे. सामाजिक आणि गोष्टीकडचा कल आपला वाढला पाहिजे जेणेकरुन यातून समाजाला १% घेता आलं तरी आपल्या जीवनाचे सार्थक झाले हे कटू सत्य. चला मग वसा घेऊया आज पासून कोणत्याही कारणाने एखाद्या जयंती किंवा कोणत्याही सामाजिक बोधाच्या कार्यक्रमात "मुन्नीला बदनाम" करणार नाही किंवा "शिलाच्या जवानाला" खुले आम आणणार नाही. पाऊल मोठं आहे पण सुरवात झाली तर नक्कीच शिखर व्हायला वेळ लागणार नाही.

धन्यवाद...!

लेखक :- एन.के. (पत्रकार दै. संकेत टाइम्स)
दि. ०७/०२/२०१८

एक आदर्श शिक्षक : इनामदार सर

वळसंगच्या मातीतला शिक्षक पेशातला खरा आधुनिक शिक्षण तज्ञ : मा.स्व. इनामदार सर

जगामध्ये अनेक शिखरे पादाक्रांत केलेले व्यक्तिमत्वे आपल्या डोळ्यासमोर रोजच तरळत असतात आणि यांची क्षेत्रे वेगवेगळी असली तरी त्याला आशय आणि पाठबळ देणारी गुरु नावाची व्यक्ती, शिक्षणाबरोबर जगण्याची शिकवण देणाऱ्या उमेदरुपी व्यक्ती प्रत्येकाच्या पाठीशी नेहमी कोणी ना कोणी असते आणि ती आपल्या यशाचा खरा कणा म्हणून काम करत असतो. जगामध्ये गुरु शिवाय यश नाही आणि यश प्राप्तीनंतर कौतुकाची थाप घ्यायला हवं असलेलं व्यासपीठ म्हणून प्रत्येकाच्या जीवनशैलीत गुरूला विशेष महत्व आहे.
     गाव तस लहान पण शुशिक्षीत माणसाच्या वस्तीतलं माझं २-३ हजाराच्या लोकवस्तीचे गोर-गोमटं गाव आणि आणि या गावातली मोहरे जे विविध पदावर काम करणारी माणसं पाहता आज वळसंगच्या नावाची छाप जगाच्या बरोबरीने म्हटलं तरी कमीचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज माझ्या गावाची माणसं एका विशिष्ट आणि महत्वाच्या पदावर वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्या पाठीमागे मन उंचावणारी कथा कथित इतिहास जे एखाद्या कालाटणीने किंवा गुरुदक्षिणाने प्राप्त सुवर्ण अक्षराने लिहलेला इतिहास भावपूर्ण मनाला स्पर्शनारा आहे. आज या लेखनाचे उद्देश आणि गरज कुणाला हवी नको वाटण्यापेक्षा त्याची प्रचिती आणि त्यांच्या आचार विचारांची जपणूक महत्वाची वाटली इतकेच कारण मी सुद्धा गावाचा रहिवाशी आहे आणि समाजाच्या देनेकरी स्वरूपात माझ्या गावाच्या वैचारिक आणि सक्षम पायभारणीचे शिल्पकार म्हणून त्या महान माणसाच्या इतिहास बद्दल चार गोष्टी लिहिण्याची मला संधी मिळावी याला मी माझं धन्य मानेन एक छोटासा प्रयत्न केला आहे कुणाच्या महापुरुषाच्या बद्दल लिहताना किंवा व्यक्तिरेखाटन करत असताना आत्तापर्यंत मला नेहमी प्रेरणात्मक चालना मिळाली.
  आज सामन्यातील सामान्य माणूस एखादा चुका करत असेल तर त्याला पहिली चपराक म्हणजे अडाणी असल्याचा आपण देतो आणि सोबतच हेच शिकलास शाळेत का अशी बोचक टीका केली जाते म्हणजे नक्कीच कोणत्याही गोष्टीतील शिक्षण हे त्या निगडित गोष्टीशी असो किंवा त्या मधला आपला अनुभव म्हणजे त्यातले ज्ञान असणे महत्त्वाचे असते यामते आज सुद्धा त्या महामेरुचा विषय तुमच्या समोर घेऊन येतो आहे. ती व्यक्ती ज्यावेळी आपल्या गावाला तालुक्याच्या ठिकाणी जायला रस्ते नव्हते की जेणेकरून माध्यमिक शिक्षण घेणे परवडत नसायचे अशा वेळी निघालेल्या सन - १९८० च्या हायस्कुल शाळेची किनार आणि प्रेरणा म्हणजे आपल्या गावाचे *स्व.कै. इनामदार सर* ज्या वेळी समाजातील आजच्या संचालक बॉडीने निर्माण केलेल्या श्री केंचराया शिक्षण प्रसारक मंडळ च्या संस्थेची स्थापना करून श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कुलची स्थापना केली आणि समाजातील गोर गरीबापासून प्रत्येकाच्या शिक्षणाची महत्वाची पायरी म्हणजे माध्यमिक शिक्षणाचे दारे उघडून सर्वासाठी खुले करून दिले. सुरवातीपासून शाळेच्या मुख्याध्यापक पदी विराजमान झाल्यापासून शाळेच्या व्यवस्थापन बाबत आणि पटसंख्याचा विषय असो त्यावेळी सरांचे योगदान त्या अर्थी आणि परिस्थितीनुरूप प्रामुख्याने बोधमृत ठरले. ज्याला शिक्षणाची आवड आहे त्याला शाळेत यायला काहीच अडचण नसायची पण ज्याला शिक्षण हवे ज्याला पुढं न्यायचं आहे अशी एखादी व्यक्ती कुटुंबातील शिकली कि त्याचा परिणाम सुधारणा या संकल्पनेत होतो हे जाणकार असलेले इनामदार सरांनी सर आपल्या स्वखर्च - श्रमातून कर्मचारी करवे त्या पाल्याला घरातून आणून शिक्षणाची गोडी आणि आवड निर्माण करण्याचे काम केले म्हणजे तूर्तास काळातले ते आपल्या गावासाठी शाहू-फुले- आंबेडकरांच्या शैक्षणिक विचाराचे वारसदार म्हणून लाभले. त्या महापुरुषांच्या स्मरणात शिक्षण आणि समाज आणि यातला दुवा बनण्याचे काम सरांनी केले. सरांच्या पंक्तीत शिकलेली मुलं आज शिस्त आणि समाजाच्या एका उंचीच्या पायरीवर कार्यरत आहेत आणि याचा त्यांना सरांचा सार्थ अभिमान आहे. श्री केंचराया शिक्षण प्रसारक मंडळाचे - श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कुल या शाळेवर काम करत असताना एक शिस्त व कडक मुख्याध्यापकाच्या रुपात सरांनी काम केलं काम यापेक्षा शाळेच्या नावाप्रमाणे हनुमान बनून भक्कम कार्यप्रणाली राबवली. त्यांच्या अंगीकृत असलेल्या शिस्तीच्या धड्यांची सर्वामध्ये भिस्त असायची. आणि आज त्याची पावती देणारी इतिहासात्मक चित्रण म्हणजे सरांच्या आणि संचालकांच्या अथांग परिश्रम तथा संयोजनातून एक विविध उपक्रम आणि सर्व विद्या प्रदान करणारी संस्था म्हणून आज ही शाळा नावारूपाला येत आहे.
     आज अनेक शिक्षणाची दुकानदारी उघडून शाळेचा धंदा करताना आपण अनेक संस्था बघतो पण सत्य आणि निस्वार्थ भावनेनं शाळा म्हणजे घर म्हणजे शाळेतील प्रत्येक घटक म्हणजे कुटुंब या पद्धतीने इनामदार सरांनी आपले अनमोल विचार पेरत गेले आणि त्यांनी पेरलेल्या वृक्षाचा वटवृक्ष होताना आज पाहतो आहोत. सरांनी घालून दिलेल्या पायाभरणीचे अनुकरण आज ही होत आहे. आजसुद्धा सरांच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवत संचालकांच्या अथक परिश्रम आणि सहयोहातून विविध उपक्रम राबवणारी आणि सर्वगुण संपन्न आदर्श नागरिक घडवणारी संस्था म्हणून आजही हि शाळा नावारूपाला येत आहे. आमचे इनामदार सर (मी फक्त १६४ दिवस त्यांच्या निगराणीत शिकलो...)
आमचे इनामदार सर म्हणजे खरे सच्चे आदर्शवत चेहरा त्यांच्या बद्दल हि कविता मी त्यांना अर्पण करतो-

*इनामदार सर म्हणजे*
*शाळाशाळांतून वर्गावर्गातून*
*पिढ्यांचं बांधकाम करणारा चेहरा,*

*शांतपणाने सातत्याने संस्कारांचे चारधाम पेरणारा चेहरा,*

*इनामदार सर म्हणजे देशांच्या सीमांचा अदृश्य एक रक्षक..*

*जीवनाच्या वाटेवर शिस्त आणि शिक्षणाचा डोंगर घेऊन हिंडणारा शिक्षक...*

*कधी शांत तर रौद्र कधी स्थळ काळानुरूप बदलणारा चेहरा..*

*हसमुख कधी प्रेमळ हात पाठीवर तर...*

*ध्येयनिष्ठ अन् जिद्दीचा स्वतंत्र दंडक आपल्या पाठीवर..*

.... असे आमचे इनामदार सर त्यांच्या आठवणीत आमचे डोळे काहीवेळा पाणावतात कारण एखाद्या खऱ्या खुऱ्या आधुनिक जगतातील शिक्षण तद्न्य म्हणून सरांकडे पहिले जाते. या माझ्या गावाच्या प्रत्येक महर्षी आणि बड्या लहान पण स्वतःच्या पायावर उभे असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या विचार आणि आचाराना आपलं केलं आहे. सर ज्या पद्धतीने समाजात उंची म्हणजे काय आणि एक स्वाभिमानी जगणं म्हणजे काय याची शिकवण देणारे ते खरे गुरु होते न माझ्यासाठी किंवा प्रत्येकाच्या बाबतीत.

सराबद्दल मला जास्त लिहता आलं नाही पण प्रमाणिक पणे त्यांच्या सहवासातील १६४ दिवसाच्या प्रवासात मला मिळालेल्या मोटिव्हेशनल गुरु बद्दल दोन शब्द व्यतीत झाले चुकलं असेल क्षमस्व. सरांची विचार सरणी म्हणजे- *"संघर्षाच्या दगडावर रेंगाळत बसू नका, स्वतःला एका चांगल्या जीवनशैलीवर पाहायचे असेल तर नवं विचार किंवा नवं शिक्षण यापेक्षाही जीवन जगण्याची कलात्मक शिस्त आणि नियोजनबद्ध वाटचालीचे वाटसरू व्हा."* अशा भविष्य निर्मिक विचार आजही मनात घर करून आहेत सर आणि सरांची प्रत्येक बोट आणि ओठ सांगायचे कि *"Without Positive Attitude, Success Called Luck, But With Positive Attitude , Success Called Achievement"* अशा विचारांची माणसं देव सुद्धा आपलंसं करून घेतो... सरांनी जो कानमंत्र दिला तो आजही आमच्या प्रत्येकाच्या वाटेला "मॅप/गाईड/दिशादर्शक/त्त्वद्न्य" म्हणून काम करतो आणि आम्हाला हे सर्व जे सरांनी दिले ती खाण घेऊन जाताना आम्ही कधी नशिबावर विश्वास ठेवला नाही त्यांच्या या आदर्श जीवनशैलीचे बाळकडू अनुभवताना अजून एक म्हण सरांना साजेशी वाटते ते म्हणजे- *"Dont Believe in Luck, Believe in HARD WORK"*

सर तुमची आठवण आणि विचारांची साठवण आणि तुमची प्रतिमा आजही मनाच्या कोपऱ्यात आधुनिक शिक्षण तज्ञ बनून राज्य करते आहे...!

लेखन- एन.के. उर्फ कल्लू
             (पत्रकार नंतर अगोदर सरांचा शिष्य)
   मोबा.- ८८०६६०५८५२

एकजुटीची माळ : A Real Battle Of Life

#एकदा एकजुटीची माळ तुटली कि मग आयुष्याचे मणी आस्थाव्यस्थ झाल्याशिवाय राहणार नाहीत...

समाजात जगत असताना आपल्या सभोवताल एक निरीक्षणाची परिभाषा असते मग यात काही तर्क-वितर्क तञ् आले काही जण टीकेची झोड घेऊन शासन चालवणारे आले. पण माणूस म्हणून जगत असताना समाजाच्या पुढं आपण कोणत्या दशेत जातो कोणत्या नीतीच्या झेंड्यासोबत वावरतो हे नक्कीच महत्वाचे आहे. घरामध्ये असलेल्या कुटुंबाचा सहभाग आणि सलोखा सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनाच्या वाटचालीसाठी पूरक असतो. जीवनभरासाठी आपण एकमेकांच्या आणि नवनवीन सहवसाच्या छायेत वावरतो पण प्रत्येकाची भाषा शैली आणि प्रत्येकाचे आचार विचार तथा विचारात्मक देवाण-घेवाण विभिन्न प्रकारचे असतात. या प्रकारात आपलं वैचारिक वळण आणि संपर्काची माळ योग्य असायला हवी आणि जरी अनेक अडचणी एकवटल्या किंवा तुमच्या विरोधात भली भारी ताकद जरी एक झाली तरी सत्य हीच संस्कृती म्हणून चला यश नक्कीच पदरात पडेल.
कारण स्वतःच्या मनावरचा विश्वास आणि श्राद्धीक प्रभुवर असलेलं अजोड प्रेम आणि यातून आपल्यात असलेल्या कर्म विवेक बुद्धीच्या जोरावर केलेली कर्म आणि आपण केलेल्या कर्मावर आणि राहिलेल्या प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की तो इतके देणार, की मागायला काहीच उरणार नाही...!
त्याच प्रमाणे आपल्यात असलेली ती अवीट गोडी कायम ठेवा आपल्या बापाचे काय जाते म्हणून यावेळी अभद्र विचारांना आळा बसवत आपण आतापर्यंत काय शिकलो काय घडलो आणि भविष्यात आपली भूमिका आणि व्यक्ती विशेषण काय असायला हवे याकडे नेहमी लक्ष देणे तितकेच गरचेच आहे कारण आताच्या युगात स्वार्थाला भाऊ आणि माझं ला कुटुंब म्हणणाऱ्याला कधी यशश्री मिळाली नाही पण आपल्या परिस्थितीला एकरूप होऊन योग्य त्या छायेखालून मार्गक्रमण करत आणि प्रामाणिक माळ जपत जो जीवनाच्या वाटेवर जगला तो मात्र आयुष्यभर चांगल्या आणि महत्वाच्या पदावर आपले नाव अलगद कोरला आहे. आणि यासाठी आपल्याला मिळालेली शिक्षण आई वडिलांची शिकवण असो किंवा आपल्या सहवासातल्या प्रत्येक माळाकडून मिळालेली चांगल्या वाईटाची गुरुदक्षिणा यावर आपले प्रभुत्व असेल आणि त्याच उलट जोपर्यंत आपल्यावर देवाची किंवा गुरूंची कृपा आहे, आपल्याजवळ त्यांचा वास आहे, तोपर्यंतच आपल्याला मानसन्मान आणि समाजाकडून लाभणारे प्रेम मिळणार आहे. ज्या क्षणी अहंकार बळावतो, त्या वेळी आपली स्थिती गाढवापेक्षा वेगळी रहात नाही; म्हणून देवाला विसरू नये. अहंरहित रहावे.
आयुष्यात कधीही गर्व करू नका कारण गर्वाने जेवढे मिळवता आले आहे त्याच्या तीनपट घालवण्यात आलेल्या कथा प्रचलित आहेत. आजूबाजूचा समाज आणि माणसं यात आपली भूमिका नेहमी नम्र ठेवा लहानासो कि मोठा नम्रता हि नेहमी आदर सन्मान घेऊन हिंडत असते.


- लेखक- एन.के. (पत्रकार-संकेत टाइम्स)

पॉट आगीतून लिहिलेलं : Inspiration Medicine

आपल्या निंदकामार्फत केले जाणाऱ्या निंदेला, बालिश लिखाण आणि दोषाला आपलं आत्मविश्वासाच औषध म्हणूनच वापरा...

लेखन :- एन.के. पत्रकार
दि. २४/०२/२०१८

ज्या समाजात आपण राहतो, ज्या समाजाने आपली जडणघडण केली त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. विधात्याने जर एखाद्याच्या हातात लिखाणाचे कौशल्य दिले असेल तर ती त्याची लेखणी समाजाला काहीतरी चांगलं देण्यासाठी वापरावी किंबहुना प्रत्येक कलावंताने आपली कला समाज समृद्धीसाठीच निर्माण करावी असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातूनच कोणीतरी लिहितो. पण
काहींना प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात निंदक म्हणून कोण ना कोण भेटत असत क्षेत्र कोणतेही असो नाव ठेवणारी लोक हि तयार करावी लागत नाही तर आपोआप आपण फेमस व्हायला लागलो कि संसर्गजन्य पद्धतीने उगवत असतात.
काही जण असतात त्यांना आपलं कधी चांगलं ( जे खरंच चांगलं असत) दिसत नाही वाईटच दिसत असत आणि असे फक्त आपल्या प्रति वाईटच प्रेरित करत असतात जगासमोर मांडत असतात. आणि ज्यांना ज्यांना वाटत कि आपण स्वतः काहीसं लिहून समाजाला एक २% टक्के इतकं संदेश देऊ शकतो किंवा एखाद्याची लेखणी म्हणजे तळपणारी अशी धारधार प्रतिक्रिया जर त्याच्या प्रती उमटत असतील तर नक्कीच माझा गोड सल्ला आहे समाजातल्या प्रत्येक अमुक तमुक घटकांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर सामाजिक आणि वैचारिक विषयावर आपले लेखन चालू ठेवावे. स्वतःला कोणी लेखनकार समजून घेत असेल तर म्हणवून घेऊद्या पण तुमच्या मनातला प्रश्न समाजाच्या काही प्रश्नावर कटाक्ष टाकणारा असेल बंधुनो नक्की लिहा कुणाच्या लेखनाला उत्तर नाही तर चांगला सल्ला आहे.
अजून एक सांगायचे होते जर आपल्या लेखनाला जळणारं साधन जरा जास्त ठेवा कारण काहींना सवय आहे आपलं न माझं म्हणवुन घ्यायचं काय करायचं वृत्तीच आहे.... असुदे वाढूदे निंदक कारण....
निंदक किंवा टीकाकार हे अनेक प्रकारचे असतात. हे बघा निंदकांचे काही "गुण":
नेहमी एखाद्याची इतरांशी तुलना करत राहणारे, नेहमी दोन्ही बाजूंनी बोलणारे, लेबल लावणारे किंवा शिक्के मारणारे, एखाद्या व्यक्तीत सतत दोषच काढणारे वगैरे. काही निंदकांमध्ये मात्र वरचे सगळे "गुण" एकत्रितपणे भरलेले असतात.
मुळात कुणाची निंदाच करणे चूक आहे. कारण निंदा करणारा हा स्वत: कोणत्या ना कोणत्या बाबतीत कमजोर असेलच की ज्यामुळे इतर लोकांच्या तो निंदेला पात्र असेल. मग निंदा करून मिळते काय? निंदा ही एखाद्या व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीला त्याचा बुद्धीनुसार झालेले आकलन असते. त्यामुळे निंदा व्यक्तिसापेक्ष असते जसे की सत्य हे व्यक्तिसापेक्ष असते आणि सत्याला अनेक बाजू असतात. किंबहुना सत्य हेच स्वत: एखाद्या माणसाकडून थोड्या असत्याचा अंश घेऊन जन्मलेले असते. तसेच निंदेचे असते.
हा विषय घेऊन येण्याचा एकमेव उद्देश आहे की जगात असं कोणतही क्षेत्र नाही की जिथं पाय ओढणाऱ्याची संख्या विरळ आहे. माणूस आणि प्राणी असं आपण धरलं प्राण्यांपेक्षा माणूस पाय ओढण्याचा स्पर्धेत अव्वल आहे. माणसातला सद्गुण अवगत झाला की सदकर्माची फळी त्या त्या क्षेत्रात निर्माण होते तेव्हा त्याला मिळणार सन्मान काहींच्या डोळ्यात टोचू लागतो आणि तो डोळ्यातला कचरा काढण्यासाठी त्याला दंडक उत्तराची गरज असते असे अनेक बुजगावणे तयार होत असतात. अशांना वेळीच त्याच्या कक्षेच्या शेतात जागा करून देण्याची गरज आहे. आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपल्या झेंड्याखाली राहून समाजातल्या काही (मनातल्या विरोधकाकड ) बघण्याचा दृष्टिकोण वाईट असतो आणि यातून त्याच्याबद्दल गैर पसरवणाऱ्यांची संख्या आज बेरजेच्या कॉलम मध्ये आहे.
पण विद्य परिस्थिती पाहता माणसाला पुढं जाण्यासाठी खूप काही कष्टाच्या कचाट्यातून जावं लागतं पण जात असताना अनेक काटे आडवे येत असतात याच काट्याना आपण "निंदक" असे म्हणतात. कारण माणसाला कोणत्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रम आणि दृढ संकल्प याला पर्याय नाही. त्यासाठी आपल्यातला सत्य परमार्थ जागृत करून लढत राहिले पाहिजे बाकीच्या आजूबाजूच्या निंदकाचे मनावर न घेता आपले ध्येय ध्यानात घेत मार्गक्रमण करत राहायचे. “एक वेळ नशीब कमी पडलं तर चालेल, पण मेहनत कमी पडता कामा नये”. कारण आपल्या मेहनतीवरच जीवनाच्या यश अपयशाच पारड हालत असते. पण ते आपण ठरवावं लागते की, मेहनत करुण ते आपल्या बाजूला ठेवायचं की मेहनत नकरून ते दुसऱ्या बाजूला ठेवायचं.
काही निंदक लोक दोन्ही बाजूंनी बोलतात.
समाजात अशा दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध असले पाहिजे. एकवेळ एका विशिष्ट विचारसरणीला धरून चालणारा शत्रू आणि निंदक परवडला पण सतत रंग बदलणारे सतत स्वत:च्या फायद्यासाठी आपले विचार बदलणारे व ते विचार त्यांच्या सोयीनुसार दुसऱ्यांवर लादणारे मित्र आणि नातेवाईक यापासून मात्र सावध असले पाहिजे.
उदाहरणार्थ, कुणी मुद्दाम आपल्याला राग आणण्याचा प्रयत्न केला आणि आपण शांत असलो तर "बर्फासारखा थंड" आणि संतापलो तर "भडकू डोक्याचा" असा शिक्का आपल्या कपाळावर मारतात. पण आपण लोकांच्या प्रत्येक म्हणण्यानुसार सतत स्वत:ला बदलत गेलो तर आपल्याला जगणे मुश्कील होईल आणि आपले स्वत्व उरणार नाही, म्हणून शांत राहणे व बोलणे हेच फायदेशीर असते कारण हे दोन्ही बाजूंनी बोलणारे लोक स्वत: सुद्धा आदर्श नसतात आणि संताप हा केव्हाही चांगला नसतोच. तसेच "थंड आणि संताप" यातील सुवर्णमध्य कधीच अस्तित्वात नसतो....!
त्याचप्रमाणे काही निंदक हे सतत एखाद्या व्यक्तीतला दोष काढण्यात गुंतलेले असतात. त्यांना फक्त ठराविक व्यक्तीतले गुण तर ठराविक व्यक्तीतले दोषच दिसतात.
आता तुम्ही म्हणाल निंदकांकडे लक्ष न देता आपले मार्गक्रमण करत राहावे. पण प्रत्येकाला प्रत्येक वेळेस हे शक्य होत नाही. प्रत्येक जण स्वचालक (internally driven) नसतो, काही जण लोकप्रमाणचालक (externally driven) असतात आणि ते या निंदकांना बळी पडतात.
या निंदकांची विपरीत बुद्धी ठिकाणावर आणण्यासाठी त्यांचीच निंदा आपण सुरू केली पाहिजे, शेरास सव्वाशेर भेटतो तसा आणि त्यांनाच चार लोकांत खजील केले पाहिजे. या प्रक्रियेत आपण स्वत: निंदक होवून जाऊ पण केव्हा केव्हा ते समाज हिता साठी आवश्यक बनते.
निंदक असती घरा | आत्मविश्वासाचा होई कचरा ||
सव्वाशेर दणका द्या जरा | निंदकांची निंदा करा ||
म्हणा त्याला परनिंदा सोडा | थोडी स्वनिंदा करा ||
तेव्हा निंदक होई बरा | अन समाज सुदृढ होईल खरा ||

*जाता-जाता....-*

*माणसाच्या जीवनात संधी ह्या चालून येत नसतात तर त्या माणसाने स्वतः मेहनत करुण निर्माण करायच्या असतात आणि हे तेव्हाच साध्य होते जेव्हा आपण कठोर परिश्रम करू. एक वाक्य महाविद्यालयीन जीवनात व्याख्यान मालेच्या विषयात एक गोष्ट ऐकली होती- दुसऱ्या महायुद्धात विजय मिळवल्यानंतर एका पत्रकाराने विस्टन चर्चिलला प्रश्न विचारला की, जीवनात यशस्वी होण्याचा कानमंत्र कोणता, तेव्हा चर्चिल त्यांना म्हणाले जीवनात यशस्वी होण्याचा असा कोणताही कानमंत्र नाही पण “ज्या माणसाची कामावर श्रद्धा, जिद्द, आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल ती व्यक्ती जीवनात यशस्वी होते”. म्हणजेच काय तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही*

धन्यवाद...!

महिला दिन बद्दल एन के यांचं लेखन...

【 महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सत्य परिस्थिती वरील लेखांकन】

*आजची महिला : मनी सावित्रीबाईचे विचार; संसारात गुरफटले आचार ; कसा होईल समाजाचा उद्धार...?*

लेखन :- *एन.के. - पत्रकार (दै.संकेत टाइम्स)*
दिनांक:- *१३ मार्च २०१८*

आम्हाला जगायचं आहे म्हणून देव देवतांची पूजा, कुटुंब जगला पाहिजे म्हणून साकडं, आणि विविध उपवासाची माळ घेऊन आजची आधुनिक माता-भगिनी जगात वावरताना दिसतात. आधुनिक आणि शिक्षण परीपक्व कुटुंबाच्या ऊंबरठ्यातून जगाच्या पाठीवर सक्षम आणि एक शिक्षित व समाजाच्या उंचवट्याला हातभार लावणाऱ्या स्त्री बाहेर पडतात पण ते हि किंचित. कधी कधी आपण एखाद्या महत्वाच्या घराच्या निर्णयात सुद्धा अनपेक्षितपणे महिला वर्गाला लांब ठेवतो आठवून बघा. सत्य आणि असत्याचा बाजूत नेहमी दुय्यम म्हणून माहिलाना पाहणारे आपण महिला दिनाला मात्र हिरो-हिरोईनच्या फोटो ऐवजी आई-बहिणीच्या फोटोला ठेवत स्वतःला धन्य समाजणाऱ्याला परमात्माचं सुधारू शकेल. आपण लाख म्हणतो की आज स्त्रियांच्या परिस्थित खूप सुधार झाला. त्या खाद्यांला खाद्या देऊन चालतात. पण खरं बघायला गेलं तर हे फक्त एक वर्ग विशेषपर्यंत मर्यादित आहे. परिस्थित बदली आहे आणि बदलत आहे यात शंकाच नाही पण खूप काही गमण्याआधी ती बदलली पाहिजे.
स्त्रियांना पुढे वाढण्यासाठी वाव द्या याचा अर्थ असा नाही की त्यांना पुरुषांपुढे जाण्याची लालूस आहे. पण किमान समान पातळीवर तरी येऊ द्या. शारीरिक रूपाने ती पुरुषांची बरोबरी करू शकत नाही हे स्त्रीचं वैशिष्ट्ये झालं. केवळ या गोष्टीमुळे पुरुषाने तिच्यावर हक्क गाजवावा असं होत नाही. यासाठी आपण आपल्या जीवनाचा प्रत्येक गणिक टप्प्यावर किंवा यशस्वी टप्प्यावर स्वतःला घडवताना लहानपणच्या अशा काही भूतकाळाच्या गोष्टी आठवून बघा कधी तरी शांत डोक्यात आणि जग जिंकण्याची उदात्त स्वप्न पाहणाऱ्या डोळ्यात कधी तरी महिलांच्या रुपात मार्गदर्शक किंवा शिक्षक किंवा कधी वाटाड्या कधी मैत्रीण बनून उभं ठाकलेल्या आईची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आणि महिलांच्या भूतकाळ बद्दल जास्त लिहिता आलं नाही पण आज समाज घडवण्यासाठी योगदान ठरलेल्या थोर महिला वर्गाचा उल्लेख समजावून घेताना जरासं इतिहास स्पष्ट होतो. फार पूर्वी स्त्रियानी फ़क्त चुल अणि मूल बघायचे आणि पुरुषानी प्रपंच चालवायचा हा अलिखित नियम होता. स्त्रिया फ़क्त उत्सव अणि समारंभ या निमित्तानेच घराबाहेर पडायच्या. त्या वेळीही गार्गी अणि मैत्रेयि सारख्या उच्च शिक्षित स्त्रिया होत्या... पण फारच कमी. पंडिता रमाबाई, सावित्रीबाई फुले यानि स्त्री शिक्षणाची दालने योग्य अर्थाने खुली केलि.
त्यानंतर स्त्रियानी मागे बघितलेच नाही। प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आज पुरुषांच्या एक पाऊल पुढेच आहेत। अगदी अवकशापर्यंत पोचलेल्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स , समाजसेविका मेधा पाटकर , डॉ.रानी बंग , पंतप्रधानपदी विराजमान असलेल्या इंदिरा गाँधी , पुलिस क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या किरण बेदी ..... एक नव्हे तर कितीतरी नावे आपल्यासाठी आदर्शवत आहेत। आपले राष्ट्र निर्माण करण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे। पण तितक्याच महान आहेत त्या राजमाता जिजाबाई... मनावरील संस्कार, त्याग, चातुर्य , बुद्धिमत्ता, वीरता , सामाजिक बांधिलकी या सर्व गुणांची देण त्यानी शिवरायाना सुपूर्त केलि। त्यानी शिवाजी महाराजाना घडविले , म्हणून स्वराज्य निर्माण होऊ शकले.
घराची गरज पूर्ण करण्यासाठी नोकरीनिमित्त बाहेर पडलेली स्त्री, करियर च्या कधी मागे लागली , ते समजलेच नाहीं... पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करताना , कदाचित आजच्या स्त्रीला याचा विसर पडतो आहे...की तिची सर्वात मोठी करियर म्हणजे चांगली पीढ़ी निर्माण करणे.... हे काम करण्यासाठी लागणारी त्याग, प्रेम, चिकाटी, सहनशीलता या गुणांची देण जेवढी स्त्री कड़े आहे तेवढी पुरूषाकडे नाही। आपल्या मुलांचे अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन करून सुजाण नागरिक निर्माण करण्याचा प्रयत्न करणे ही सुद्धा राष्ट्रकार्याला मदतच आहे। मुलांचा सर्वांगीण विकास करणे ही आज कालाची गरज आहे। उत्तम आरोग्य, योग्य शिक्षण , उत्तम संस्कार याचबरोबर सामाजिक बन्धिलाकिची जाणीव आजच्या पिढीत निर्माण करणे आज गरजेचे आहे.
आज महिलांना ५०% आरक्षण बरोबर समान वागणुकीचे जाहिरात तर रोजच पाहतो पण ते पाहत असताना रोज होणाऱ्या बलात्काराला सुद्धा प्रश्न पडतो की कुठं आहे संरक्षण कुठं आहे अभय... पण स्वतः ८ मार्चला धडाधड भाषण देऊन एक सक्षम आणि निडर महिलांची प्रचिती न देता स्वतःच्या संरक्षण आणि स्वतःच्या हिमतीचे शक्तिप्रदर्शन वेळोवेळी हवेच... सामान्यतः एखाद्या महिला किंवा मुलीच्या मनातला प्रश्न -

" तू एक मुलगी आहेस
हे तू विसरू नकोस
तू जेव्हा घराचे दार ओलांडशील
तेव्हा लोक तुझ्याकडे
तिरप्या नजरेने बघतीलच
तू जेव्हा घराचे दार ओलांडशील
तेव्हा लोक तुझ्याकडे
तिरप्या नजरेने बघतीलच
तू जेव्हा गल्ली-बोळातून जाशील
लोक तुझा पाठलाग करतील,
शिट्याही वाजवतील
तू जेव्हा गल्ली पार करून
मुख्य रस्त्यावर पोहचशील
लोक तुला चरित्रहीन म्हणून शिव्याही देतील
जर तू निर्जीव असशील
तर परत फिरशील नाहीतर
जशी जात आहेस तशीच चालत राहशील....!"

असंच पुढं जाऊन शिक्षित समाजात महिला न महत्व जगापुढं व्यतीत करायचं असेल तर शस्त्र आणि सन्मानाने जगण्याचे अस्त्र आता उचलणे गरजेचे आहे. संकलित माहिती आहे थोडीशी आज आपण महिला दिनाच्या शुभेच्छा आणि कार्यक्रमाला हजेरी लावून आलेले कोणीतरी असणार किंवा कार्यक्रमाचे प्रत्यक्ष साक्षीदार आहे. पण ही जागतिक महिला दिनाच्या रूढ परंपरा काय आहे- अमेरिकेमध्ये एका उद्योग क्षेत्रात काम करणार्यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्याय आणि शोषणाविरुद्ध सण १९१० च्या इसवीत संघटित होऊन न्याय हक्कासाठी एक होऊन रस्त्यावर उतरले आणि ती तारीख होती ८ मार्च तेव्हा पासून ८ मार्च महिला दिन म्हणून रूढ झाला. आणि या संघटनेतून विजयी नारा म्हणून तात्पर्य मिळालं यातून अनेक जगभरातील महिलांना प्रेरणा म्हणून ठरलेली हि एकजूट. आज महिला दिन म्हणून आपल्या सर्वांच्या वाट्याला दरवर्षी येते. सामान्यतः लिहताना न एका ठिकाणी वाचायला मिळालं हे महिला दिनाला होऊन ७-८ दिवस झाले न सहज वाचत असताना हि माहिती मिळाली. एका माझ्या गावातल्याच शाळेत मला महिला दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवता आली. आणि तिथं अनेक अनोळखी महिला वर्गानी अगदी पाठांतर प्रमाणे भाषण केले न वाटलं की खरंच इतकं धाडस आपण या चार चौकटीत करतो तसेच बाहेर हि करायला हवं सक्षम आणि निर्भीड जीवनाचे सार आत्मसात करण गरजेचं आहे. महिला दिन सुद्धा शोषणाविरुध्द व अन्यायाविरुद्ध संघटित झाल्यावरच प्रथा पडली म्हणजे महिला साठीचा दिवस सुद्धा आपल्या न्याय हक्कासाठी घालवलेला इतिहास घेऊनच पुढं येतो न हे बदलायचे असेल तर परंपरा आणि जाचक बंधने यावर आकलन करत पुरुषाच्या बरोबरीनं जगण्याची सूत्र हाती घेतल्याशिवाय हे शक्य नाही. महिला बद्दल लिहीत असताना सत्य परिस्थितीचे चित्रण काही यशस्वी पदावर काम करणार्यांना थोडस अवचित वाटेलही पण एक प्रयत्न म्हणून करून बघा आज तुम्ही एक मुख्यमंत्री असला तरी सुद्धा शेजारच्या महिलेला एखाद्या कार्यक्रमाला पूर्ण वेळ आणू शकत नाही म्हणजेच बंधन, संसार आणि प्रपंच यातून मुक्त करणे आज एका महिलेला अवघड आहे आणि यासाठी नमूद करावे वाटते की आपण जी महिला समाजाच्या धार्मिक आणि संसारिक विळख्यात आहे तिला त्यातून मोकळा स्वास् देत सामाजिक गोष्टीत तिला रुची असेल तर स्वातंत्र्य द्या आणि नसेल तर निर्माण करायला शिका कारण आजची सावित्री उद्याची नेल्सन मंडेला, किरण बेदीची निर्माती असणार आहे.