Sunday, 13 May 2018

मदर्स डे शुभेच्छा नको मातृत्व जपा..!

शिर्षक :- मातृ दिनाच्या शुभेच्छा झाल्या स्वस्त पण आईचे मातृत्व जपलं जातंय...?

लेखक :- एन.के. (पत्रकार)

दिनांक : १४ मे २०१८

नमस्कार मंडळी /मित्र/ मैत्रीण/ जिवलग/ जेष्ठ/ आदर्शवत सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा...; आज शुभेच्छा देण्याचं कारण म्हणून प्रश्न चिन्हांकित चेहरा झाला असेल.. काय करू सकाळपासून आईची डिपी बदलले जात आणि मेसेज येत आहे. आईला थँक्स सांगा आईला आज देव मानणारे १०० भेटले पण मला एक प्रश्न पडला माझ्याकडे आईचा फोटो पाकिटात आहे. सकाळपासून कामावर होतो. दुपारी घरी जाण्याचा योग आला गोड धोड घेऊन जाता आलं नाही. घरात गेलो नजर आईला शोधत होती. आई बाहेर गेलेली. सायंकाळी आल्यावर आईच्या मांडीवर खुशाल झोपायचं ठरवलं. तस झालंही खूप म्हणजे ४-५ दिवस घराकडे जायचं झालं नव्हतं म्हणजे कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी होतो. गावाकडे जाता आलं. नाही आईने कौतुकाने डोक्यावर हात फिरवत चौकशी केली कसा आहेस. मी पण सांगितलं बर आहे आई आईची विचारपूस केली तबियत विचारलं. आईने ही सकारात्मक उत्तरात बर आहे म्हणाली. तिच्या पेक्षा घरच्यांची आम्हा भावंडांची , वडिलांची न सुनांची काळजी घेऊन आईच्या खरमुड हाताला पण मखमली जाणीव मनाला होत होती. असं झोपून मला मांडीवर झोप लागलेलं कळलच नाही. असं सुख अनुभवताना मला विलक्षण प्रिय वाटत होत. कारण मी नशीबवान होतो. आई वडील माझ्या जवळ होते. मला किंवा कुणालाच आयुष्यात कितीही पैसे ओतले तरी हे दैवत मात्र मिळत नाही. ते दैवत आज माझ्याजवळ होत. जगात अशी अनेक अनाथ आज आईसाठी तळमळत असतील. आशा साठी कुठला डिपी निवडलाय तुम्ही. यांच्या साठी कोणता प्रोफाइल पिक्चर आहे तुमच्याकडे??
माता होणे सोपं नसत उदरात तुम्हाला वाढवल्यावर तुमच्या प्रश्नाला बाल ते वृद्ध पर्यंत असतील तर नक्कीच प्रथम मान्यता वजा मंजुरी असते पण आपण कधी २० ते ३० च्या वयाच्या घरात वावरताना आई वडिलांच्या कंठातून आलेल्या शब्दाला जगल्यासारखं मनमोकळी दाद देतो का हो ? मनाला विचारून बघा ना कधी तरी आई साठी सरप्राईज म्हणून काय घेऊन गेलोय का जस एखादं डे आलं की १०० _२०० च खर्च करायला आपण विसरत नाही तस आईला किंवा बाबाला कधी १००-१५० च काही तरी त्यांच्या उपयोगाची वस्तू आणतो का हो आपण...? ६० च्या घरानंतर आई वडिलांच्या पांगाला फेडण्यासाठी काळजी आणि क्षणिक लहान सहान गोष्टीची अपेक्षा असते कधी स्वतःहून विचारपूस करून पूर्ण करतो का हो ...? अनाथ आश्रम आज गच्च भरताना दिसतात का ९ महिने ९ दिवस पोटाला चिकटवून हिंडणाऱ्यां माऊलीला आज ९ एक वर्ष असणारी न ते आयुष्य पूर्ण तुझ्यासोबत राहायचं न तुझ्यात असण्याची स्वप्न बघणाऱ्या जन्मदात्याला सोबत ठेऊ शकत नाहीस इतकं निर्दयी ...? अरे लहान असताना तळहाताच्या पायावर जपणाऱ्या त्या माऊलीला आज मातृदिनाच्या शुभेच्छा नकोयत रे तिला फक्त तुझ्या आधाराची गरज आहे ज्यावेळी तुला उभं राहता येत नव्हतं तेव्हा तुझ्या प्रत्येक पायाच्या पायरीला छातीच पाणी करणारी का तर पडतोस का तू म्हणून इतकं उदात्त मनाच्या देवाला आज फक्त या दिवशी सेल्फी आणि क्षणिक किंमत देऊन तिला तुझ्या शुभेच्छा कधीच आपलंसं वाटणार नाहीत रे. मग शुभेच्छा देताना वचन देशील का रे ज्यांनी तुला आयुष्य जगायला शिकवलं त्यांच्या आयुष्यात कारण, वाद, मतभेद होऊन त्यांना दूर करणार नाहीस असं बघ जमलं तर...तिच्या मातृत्वाची किंमत कमी होऊ देऊ नको रे...!

धन्यवाद….!

Wednesday, 2 May 2018

बांगड्यांचा सन्मान करायला शिका...!

बांगड्यांचा सन्मान करायला शिका म्हणजे मिळवलात...!

【वाढत्या बलात्कार आणि महिला अत्याचारावर कटाक्ष टाकणारा लेख..】

लेखक : एन.के. (पत्रकार)

मोबाईल : ८८०६६०५८५२

दिनांक : १ मे २०१८ (महाराष्ट्र दिनाच्या निमित्त लिहलेले..)


आपण राहत असलेल्या समाजाला एक राजकीय आणि मौलिक तथा वैचारिक बलिदानाचा इतिहास लाभला आहे. अनेक सोयी आणि सुविधांच्या कक्षेत वावरताना स्वातंत्र्यनंतर काळात राजकीय आणि टेक्निकल चेंजेस खूप होताना आणि वृद्धी तथा विकास वेड्यासारखं झालाय का वेड्यासारखं करतो आहे हे समजेना झालाय. इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या काळात भारत माता सुखा-समाधानाच्या विचारांनी जनता आंनद नावाच्या दिवसात गोड नांदत होती. इतिहास आणि वैचारिक विचारांनी समृद्ध झालेला माझा भारत महिला आणि मुलगी यांच्या अनिष्ट प्रथावर 'काहीसं' निर्बंध लागले पण त्याच्या सुरक्षेचा प्रश्न आजही ऐरणीवर आहे ही खंत मात्र रोजच्या सकाळ संध्याकाळची दिनचर्या बनून गेली आहे. लिहिण्यासाठी अनेक प्रश्न आहेत पण सत्ताधारी आज प्रत्येकाच्या विषयाला बेताल वक्तव्य करत सुटतो. तर काही ठिकाणी सामन्याच्या प्रश्नाला 'मॅनेज' ने दबवले जातात अशी मार्मिक खंत वाटावी इतक्या स्वातंत्र्यात आपण आहोत का...? विचार करायचा की आम्ही पण आणि तुम्ही पण आज शासन आणि प्रशासन घुडगे टेकून आम्हा महिला किंवा बाल बघेना सर्रास रोज निदान एक तरी अत्याचार किंवा बलात्काराच्या गोष्टींची वृत्त पत्रात पाहायला मिळते आहे. म्हणजे असं झालय 'आंधळं दळतय कुत्रं पीठ खातंय' मग आता दळणारा तर त्यावर निर्बंध आणू शकतो आशा कुत्र्यापासून आपल्या गिर्हाईकच्या पिठाला वाचवू शकतो पण कुत्रं गिरणीवाल्याच आहे असं आता काहीसं झालं आहे.
सामान्य सत्ताधारी अशा प्रश्नावर कधी रस्त्यावर उतरत नाहीत कारण सत्ता, खुर्ची, आणि पक्ष महत्वाचा आहे कारण घरचा रस्ता पाहायला लागेल या भीतीने समाजाच्या अनेक अशा लज्जास्पद प्रकरणावर अनेक वेळा काय नेहमीच मौन असत...! एखाद्या सत्ताधाऱ्यानं किती मस्तीत, माजात, घमेंडखोरीत मिरवावं? मग तो संपूर्ण पक्ष असो की त्याचं नेतृत्व. कोवळ्या मुली, वयात आलेल्या मुली, स्त्रिया यांच्यावर सरेआम बलात्कार होतात. संरक्षक पोलिसांच्या साक्षीनं लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणारे लिंगपिसाट होतात. करुण किंकाळ्यांनी आसमंत हादरतो, देशवासी दिग्मूढ होतात. मती गुंग, सुन्न होते. पण यांच्या जाहिराती अधिक रंगीत होतात. यांचे लोकार्पण सोहळे थांबत नाहीत. प्रसंगानुरूप कुर्ते आणि जाकिटे रंग बदलत राहतात. रक्ताचा सडा पडतो, देहाची विटंबना होते, निरपराध झुरळापेक्षा क्षुल्लक पद्धतीनं मारले जातात. यावर कळस म्हणजे अपराधी, अपराधगंडानं अथवा कायद्याच्या शासनाच्या भीतीनं गपगर होऊन फरार होत नाहीत की तोंड लपवत नाहीत. उलट राष्ट्रध्वज हातात घेऊन झुंडीनं हिंडत कायदा, न्याय, शासन सर्वांनाच आव्हान देतात. कारण, आम्ही हिंदू आहोत आणि देशात आता आमचंच सरकार आहे. सरकारचं मौन या आक्रमकतेला मूक प्रतिसादच देतं.
सांगा ना बलात्कार होतात महिला अत्याचार सहन करते. पण यावर कठोर असं प्रशासनाची चाबूक आम्हाला आणि सर्वांना गर्व वाटेल असं कुठं आहे ? नाव ठेवलं पाहिजे म्हणून नाही किंवा महिला सुरक्षा आणि 'सबका साथ सबका विकास' च्या नावाखाली सत्ता भोगायला लागला तुम्ही पण सब च्या विकास आणि सुरक्षेच के केला ओ तुम्ही. उन्नावमध्ये तर सरळ सरळ लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलिस आणि राज्य सरकार वर्षभर पीडितांना झुलवतात. दबाव टाकतात, नमवतात. पीडित मुलीच्या बापाचा पोलिस कोठडीतच मृत्यू होतो. ‘दबंग’गिरी चालूच राहते. हे असे ‘दबंग’ सर्व पक्षीय वारकरी असल्यानं विरोधी पक्षही आस्ते कदम मोडवर जातात. आणि हे सर्व घडत असताना प्रधानसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करत स्वत:च्या पदाचं श्रेय त्यांना देत आयुष्यमान सप्ताह साजरा करण्याचे आवाहन सोहळे करत राहतात! किमान नैतिकता ही आता या राष्ट्रीय पक्षात आणि त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांत राहिलेली नाही. जणू काही आपण त्या गावचेच नाही, असं आठवडाभराचं मौन पंतप्रधानपदाची शोभा करतं. कधीतरी याच पक्षाच्या जाज्वल्य नेत्यानं, जो सध्या अडगळीत आहे, त्यावेळच्या पंतप्रधानांना ‘सबसे निकम्मा प्रधानमंत्री’ अशी चपराक लावली होती. त्याच पंतप्रधानांना आताच्या पंतप्रधानांनी ‘मनमौनसिंह’ असं नाव दिलं होतं. मग आता या दोन्ही उपाध्या एकत्र करून ‘मौनी निकम्मा’ म्हणून साभार परत करायच्या काय? टीकेची झोड आणि राजकारण याना मध्य म्हणून बघायला आम्हालाही आवडत नाही पण राजकीय झेंड्याखाली EVM च्या मदतीने प्रतिनिधी झालेले कधी प्रतिनिधींच्या पुढं असलेले 'लोक' या शब्दाला जागले नाहीत. हे पण कटू सत्य म्हणावं लागेल का नाही...? भारत निर्माण होतोय असं लाट पहिली पण समुद्र मात्र आम्हाला राजस्थानी वाळवंटासारखाचं दिसतो आहे. महिलांच्या समस्या घेऊन जगत असताना निर्भया पथक त्यांच्या परीने हा ... 'अथक' प्रयत्न करूनही महिलांच्या लचके तोडले तर कसे जातात. गस्त आणि प्रशासन इतकं स्ट्रीक्ट असताना खिंडार पडतेच काशी...? शाहिस्तेखान निसटून जातोच कसा..? ही प्रश्न आम्हाला पडतात पण विचारायचं कुणाला हा पण या प्रश्नापेक्षा भला मोठा प्रश्न बनून गेलाय. कारण न्याय आणि सुव्यववस्थेवर नियंत्रण तथा लोक हित वर्धक पोषक वातावरण जपण्याचे एकमेव सूत्र म्हणजे लोकप्रतिनिधी. आणि अशा कठुआ आणि उन्नाव सारख्या प्रकरणात जर सावरासावर जर लोक प्रतिनिधीच करत असतील तर न्याय कुणाला मागायचं आणि असं प्रश्न पडणं साहजिक आहे...
    आत्ता पर्यंत कोपर्डी आणि अशा अनेक प्रकरणाचा छडा किती सक्षम पद्धतीने लागला आम्हालाही कळत ना. या सर्व घटनांतील पुरुषी मानसिकता हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. मग तो पुरुष आमदार असो, मंत्री, अधिकारी, प्रधानसेवक असो की सरसंघचालक. स्त्रियांचं स्वावलंबन आणि स्वयंनिर्णयन कायमच खूपत असतं सर्वांनाच. त्यामुळेच स्त्री आरक्षण विधेयक संसदेत धूळ खात पडतं. हरेक बलात्कारासोबत नवा कायदा, नवे नियम, नव्या समित्या. पण पुरुषांची शिकवणी नाही. तीन मुलांच्या आईवर कोण बलात्कार करेल, हे भाजप नेत्याचं दिव्यज्ञान. हे असे मर्द ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाकडून आपण अपेक्षा तरी काय करायची? असं नाही ज्यांच्या मूळ आपल्यात आज गाव राज्य आणि देश जिवंत आणि सुरळीत चालू आहे त्याचे तारणहार म्हणजे जवान आणि जवानांच्या पत्नीवर सत्ताधारीचा प्रतिनिधी असे बेताल वक्तव्य करतात का ओ कुणाचं श्रेय आणि अभय आहे याना....? बलात्कार यांच्या काळात आणि त्यांच्या काळात होत नव्हते का असा उत्तर आणि प्रश्न येतील पण प्रतिनिधी आणि मॅनेज नावाची वाढीव चरबी फक्त या सध्य सत्ताधाऱ्यांच्या अंगावर आहे म्हणून असे प्रकरणे सर्रास आणि रोजरास घडत आहेत. याला बंधन काय म्हणून अनेकांचे उलट प्रश्न येतील ही पण त्यांना उत्तर एकच असु शकते ज्यांच्यात हिमंत नसते ते फक्त भुंकत असतात आणि आपण भुंकणारऱ्याला भाकरी घालायचं का इमानदार कुत्र्याला आपलं करायचं हे सर्वस्वी तुम्हा आम्हाच्या हातात आहे.

    या आणि अशा गुन्हेगारीतील गुन्हेगारांना त्यांचे त्यांचे पक्ष, नेते, धर्म, जाती वाचवतील. यातून स्त्रियांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. रामराज्यांनी भारलेल्या सध्याच्या काळात राम, रावण, धोबी, सगळेच एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अग्निपरीक्षा, लवकुश व आजन्म वनवास!

...तेव्हा प्रतीकं आणि मिथकं यातून बाहेर पडत थोडं उच्चरवानं सांगायला हवं की, बांगड्यांचा अहेर तथाकथित मर्दांना पाठवू नका. आम्हाला बांगड्यांचं ओझं नाही की, ते तेवढंच आमचं स्त्रीधन नाही. आता सती पेटणार नाहीत, तशी बांगडीही फुटणार नाही की, कुंकू पुसलं जाणार नाही. म्हणून पर्यायी न भक्कम शासन येईपर्यंत जस आरक्षणाचा प्रश्न गाजरात रूपांतरित झाला. आणि त्या ८ वर्षाच्या असिफा प्रकरण दुर्लक्षित व्हावं म्हणून श्रीदेवीच्या प्रकरणाची चिन्ह चिन्ह करून चाळण कंटाळले इतकं चाळून पसरवल आणि हे सगळं शाळा आणि ज्ञान प्राप्त करून पण योग्य तात्पर्य आपल्यात मिळत नाही आपण फक्त परराष्ट्र मंत्री , भाई और बेहनो च्या गोड आपकी अदालत मध्ये बघून भारत मागासत्तेची स्वप्न पाहणार असू तर आपण चुकीच्या रस्त्यावर आहोत. चुकलं असेल तर क्षमस्व...!


धन्यवाद...!

Sunday, 29 April 2018

कविता : प्रेम हे असंच असत !

शिर्षक :- प्रेम हे असंच असत...मनाला वेड लावून बसतं..!

लेखन- एन.के. ( पत्रकार )

दि. २९ एप्रिल २०१८

प्रेम हे असंच असत हवं ते मिळायला इथं कसरत
लागणार,
पण जितकं जवळ असावं तितकंच लांब असलेले प्रेम विरहाच्या प्रवाहात धावणार,
प्रेम करता करता मनापासून अनेक गोष्टी एकटं करवून बसतो,
पण मनाच्या आतल्या भावना प्लस प्रेम मात्र आपण नेहमीच हरवून बसतो...!

असच असते हे प्रेम
कुणाच्या तरी आठवणी जपणार
कुणाची तरी स्वप्न दाखवणार ,
कुणाच्या तरी भावनांना श्वासात रोखणार.
असच असते हे प्रेम.

असच असते हे प्रेम
डोळ्याची मुकी भाषा समजणार
कुणाच्या तरी मनातील मधुरस चाखणार
कुणाला तरी तळहातावरील फोडाप्रमाणे जपणार.
असच असते हे प्रेम.

असच असते हे प्रेम
प्रत्येक श्वास घेताना कुणाचे तरी नाव घेणार .
कुणाच्या तरी भेटीची अनामिक ओढ लावणार.
असच असते हे प्रेम.

असच असते हे प्रेम
कुणाशी तरी सतत भांडणार
कुणाला तरी रातभर रडवणार
कुणाशी तरी भांडून रडऊन झाले कि हळूच मिठीत घेणार ,
असच असते हे प्रेम

असच असते हे प्रेम
काही दिवस विरह सहन करायाल लावणार .
डोळ्यात आलेल्या अश्रुना स्वताच समजावणार
ती कधी भेटेल याची वाट पाहायला लावणार .
असच असते हे प्रेम....!

कुणाला प्रेमाची कदर असो ना असो त्या त्या मनाला असते हे सत्य,
पण जीवनात स्वप्न १०० पण पूर्ण होण्याची पाहिलेली स्वप्न मात्र असत्य,
मग आपल्या शाश्वती प्रमाणे आपल्याला न मिळणाऱ्या या गोडव्याला प्रेम न म्हणता गेम म्हणूया,
पण तरी सुद्धा यात जिंकणारे योद्धा पाहिलं तर त्यांच्या आयुष्याच्या त्या क्षणाला प्रेम म्हणूया...!
धन्यवाद...!

Thursday, 26 April 2018

तुला नाही कळायचं ग प्रेम म्हणजे काय असत...?

शिर्षक - तुला नाही कळायचं ग प्रेम काय असत...!

लेखक - एन.के. पत्रकार

दि. २५/०४/२०१८

खरंच ना आयुष्यात कोण असावं यापेक्षा महत्व त्याच्या असण्याला आज आहे,
पण असलं तर मनाच्या आवडीचा मनकवडा असावं असं सर्वांचं आहे,
आकर्षणाने प्रेम कधीच होत नसत पण जुळायला लागतात हेच त्या अडीच अक्षर बाबत सत्य असत,
पण जरा तू वेडी आहेस तुला नाही कळायचं ग प्रेम काय असतं..! ...१

आज आणि उद्या गोड बोलून मन वळवायला आज असंख्य असतात,
पण जे खरे असतात काळजी आणि राग राग करतात तेवढेच मनात घर करून बसतात,
आठवत मला अशी संध्याकाळ झालीच नाही की त्यात तुझं आठवण नसत,
पण तू नटखट बुद्धू तुला नाही कळायचं ग प्रेम काय असतं...! ..२

जवळच्या व्यक्तीवर रागावून प्रेम वाढत रे म्हणणारी तू कधी मनाला विचारलीस का प्रेम करता येत का स्वतःला,
नाही आवडत काही गोष्टी त्यावर मन मोकळं व्यक्त होतेस खरं प्रेमाच्या व्याख्येला भिऊन नाही म्हणता येत का विचार न स्वतःला..,
राग आणि गोडवा भरला आहे तुझ्यात पण न उमजे की तुला मिळवायला कोणतं exercise करायचं असत,
के करू खूप प्रेम+कठोर दिल आहेस म्हणून सांगतो ऎक तुला नाही कळायचं ग प्रेम काय असतं..! ...३

वाहणाऱ्या वाऱ्याला विचारलं तर त्याने पण तुझं नाव सांगितलं की मला ती खूप आवडते,
मी म्हटलं सोड रे हट्ट करू नको ती माझी आहे तर रागावून वादळ होणारं ते वाऱ्याच प्रेम पण आवडत झालं,
सौन्दर्य जणू ताज महाल जैसी म्हणून आजही डोळ्यात तूझी छबी मुमताज सारख दिसत,
पण मनातला शाहजान वेडा होऊन म्हटला सोड ना तुला नाही कळायचं ग प्रेम काय असतं...! ...४

सुरेख नाव घेऊन प्रेम किंवा सुंदर चेहऱ्यावर प्रेम नाही होत फक्त त्यात आकर्षण होत,
कधी कळणार तुला की तू हिर-रांझा च्या जोडीतली आहेस,
मनापासून तुझ्यावर प्रेम केलं तर तू स्वीकाराशील का हेच खंत मनी कायम असत,
पण राहूदे पागल ग तुला नाही कळायचं ग प्रेम काय असत...! ...

धन्यवाद...!

Thursday, 19 April 2018

Come On Lets Go For Change...! (चला बदल घडवायला..)

शिर्षक:- एका सकारात्मक गोष्टीची सुरवात...लेटस गो फॉर चेंज..!!

लेखन- पत्रकार एन.के.

दि. २०-०४-२०१८

अनेकांच्या काळ्या आणि भगव्या झेंडा किंवा इतर रंगाच्या आणि डीपी ठेऊन झाल्या असतील तर मनापासून आभार मानावे मनातून राग व्यक्त करून हवं ते बरं वाईट बोलून टाकावं. प्रत्येकांनी आपापल्या परीने फक्त व्यक्त व्हावं म्हणून किंवा वाटलं मनाला म्हणून श्रद्धांजली वाहून झाली असेलचं यात शंका नको हो ना... कधी आपल्या सभोवतालच्या परिसरात अनेक घटना घडतात तेव्हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रत्येकांनी बघ्याची भूमिका घेताना आपल्या चामड्याला जरा चिमटून बघत जावा. प्रत्येकाच्या चांगल्या आणि वाईटची सुरवातही एका ठिणगीने होत असते. सामाजिक भान ठेवून जगताना समाज काय म्हणेल किंवा समाजात माझी प्रतिमा अप आणि डाऊन होईल का म्हणून प्रेक्षक बनून किती दिवस असं स्वतःला गुदमरून घेणार आहात ...? आवाज काढणे आणि आवाज उठवणे कधी जमणार आहे आपल्याला ? आज प्रत्येक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, अन्याय होत चालल्या आहेत शासन आणि प्रशासन हतबल होत आहे की चक्क प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या नेत्यांच्या हातून असं सावरसावरीच गाठोडं बाहेर निघावं इतकं अक्षम्य कर्तृत्वपुढं आम्ही तर काय करणार म्हणून बांधलेल्या हाताला आपण आपल्या एकजूट आणि ठिणगीतून हळू हळू वणवा कधी बनणार आहोत वो ...? साधारण विचार करताना मी अमुक रंगाचा मी तमुक रंगाचा म्हणून किती दिवस नो इंटर फेअरच्या बोर्ड खाली सापडून मरणार आहोत. विचार करा ना कधी तरी आपण आपल्या परीने योग्य सुटसुटीत विचारधारा घेऊन आसपासच्या सामाजिक भान बिघडवणाऱ्या किंवा संस्कृती लोप पावणाऱ्या कृत्याला आपण आळा घालू शकतो. स्वतः पेटून उठून दुसऱ्याची अन्यायी प्रवृत्ती कधी संपवायला पुढं सरसवणार आहोत..?
आज जगताना आपण अनेक लहान सहान गोष्टीत नाक का खुपसायच म्हणून गप्प बसायचो पण आता सार्वत्रिक घडत असलेल्या मार्मिक गोष्टीवर आपण कॅडल घेऊन उभं राहतो. आणि जेणेकरून कसे का होईना त्या अन्यायाच्या प्रति आपल्यात चीड निर्माण होते आहे म्हणजे एक सुरवात आहे की अपल्यातलं शमलेले मन आणि रक्त आता रुळावर यायला लागली आहे. मग आपण काय करू शकतो अनेकांना प्रश्न पडला असेल नक्की सांगतो सामान्य जीवन जगणारं आपण आहोत समजून चला कि दिल्ली, कोपर्डी नंतर असिफा नंतर आपल्या आस पास कुठं तरी ही घटना आज ना उद्या घडेल का असा भयनाक विचार मनात आणून बघा वाईट वाटत आना चीड येते न... यासाठी आपण सर्वांनी एक पाऊल उचलू शकतो.


चित्रपटात आणि इतरत्र स्त्री देहाच हिडीस दर्शन घडविणाऱ्या स्त्रिया आणि संबंधित मंडळी ह्याच्यावर सक्त कारवाई केली गेली पाहिजे. (मराठी असो वा हिंदी ) आयटम गाणी ह्याचा अर्थ कळतो का ? पुरेसे कपडे न घालता नक्की कुणाच मनोरंजन केल जात ? ज्या समाजाचे ते घटक आहेत त्या समाजाप्रती त्यांची काहीच जबाबदारी नाही का ? जर ती त्यांना कळत नसेल तर त्यांना त्याची जाणीव करून द्या..ज्या स्त्रिया ह्या गोष्टी करतात जे करवून घेतात त्यांना कुठलीच झळ पोहोचत नाही बळी जातात निष्पाप निरागस मुली आया बहिणीची अब्रू आणि नको त्या गोष्टीचे कृत्य आणि जेवढे झाकले पाहिजे अशा वर आपला डोळा वळतो आहे आणि अशा अंगाचा लचका आणि त्यानंतर अमानुष पणे खून त्यानंतर कँडल मौन, निषेध, काळे डीपी ,काळे झेंडे, निदर्शने का पाहिजे असलं ? मराठी किंवा हिंदी चित्रपट सृष्टी या अगोदर संपन्न नव्हती का ? कमाई हा एकमवव उद्देशाने आपल्यावर लादलेल्या या मुन्नी, आणि शिळा आजच्या शिलतेला आणि चारित्र्याचा काळिमा हवं असं नाही वाटत का ? आपण अशा पद्धतीवर बंधन अनु शकतो चित्रपट पाहायचं नाही ज्यात आयटम सॉंग आहे. का विचार बद्लनार नाही ...? शुद्ध चित्रपट आशय घेऊन आला तर नक्कीच १०० तली १० टाळकी सुधारली म्हणजे आपण सफल झालो. निदान आता तरी ज्या मुली ह्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत त्याचं त्याच्या कुटुंबियांच दुखः समजून घ्या. ती मुलगी जितकी असुरक्षित होती तितकीच आपल्या कुटुंबातील स्त्री पण आहे ह्याचा विचार करा...दुसर्याच्या पेटलेल्या घराची झळ आपल्याही घराला बसू शकते...वाढणार्या विकृतींना आळा घाला..! असच घडत चालल्या व गेल्या काही दिवसांमध्ये ज्या काही माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडल्या त्याचा निषेध प्रत्येक माध्यमाने केला आहे. मला एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते अशी की ह्या गोष्टीच्या निषेधामध्ये स्त्रियाइतकाच पुरुषांनी दिलेला आपला सहभाग, मत सगळच त्यांच्याविषयी आदर निर्माण करणार आहे मग इथे वयाचा भाग तितकासा महत्वाचा नाही. जे घडत आहे ते चुकीच आहे हे कळण हीच एक चांगल्या समाजाची नांदी आहे. हा एक आशेचा किरण आहे..
निसर्गाच्या प्रत्येक घटकाला सुखाने जगण्याचा हक्क आहे त्याच्या त्या हक्काचा आदर प्रत्येकाने ठेवायला हवा. जग आणि जगू द्या .कुणाच्याही यातनांच कारण होऊ नका. होईल तितका आनंद सुख वाटण्याचा प्रयत्न करा हीच सदिच्छा...! एक चांगला विचार आपल्याला समाज आणि त्यानंतर गाव आणि असं वर्क दिवस चांगला देश म्हणून घडवण्याच्या विचारात आपण आहोत.


धन्यवाद...!

Monday, 9 April 2018

बाबासाहेबांच्या विचारांची गरज...!

शिर्षक :- "बाबासाहेब तुमच्या विचारांची गरज आहे या वेगवेगळ्या रंगाच्या समाजाला...!"

लेखन- पत्रकार एन.के.

दि.१० एप्रिल २०१८

समाज अनेक गोष्टींनी पुढारलेला आहे. समाजात विविध कल्पक आणि आधुनिक समुग्रीच्या माध्यमातून "शॉर्टकट ए जिंदगी" चा फंडा आता फॅशन बनत चालला आहे. समाजात पाहताना अनेक जात,धर्म,पंथ च्या झेंड्याखाली वावरताना आज मनुष्य दिसतो आहे. जगायला लागणार अर्ध भाकरी पेक्षा माझं न आपलं हेच आजच्या जनरेशनला काहीसं महत्वाचं वाटू लागलं आहे. अंधश्रद्धेच्या चितेवरून माणसाला बाहेर काढण्यासाठी आपल्याला इतिहासरूपी महापुरुषांनी दिलेल्या मूलमंत्राचा विसर आज समाजाला पडत चालला आहे. ज्या समाजात क्रांतीची मशाल निर्माण झाली त्या समाजात आज महापुरुषांच्या इतिहास आणि शौर्याच्या गाथा आज आम्हाला गळा फाडून सांगाव्या लागतात. इतका समाज शिकला आणि संघर्ष करू लागला तो फक्त आपल्या रोजच्या आणि दैनंदिन जीवनाच्या आवश्यक गोष्टींच्या भौतिक सुखाच्या वस्तू किंवा कागद कमावण्याच्या कामात. आजही माझ्या समाजात समान न्याय व्यवस्था असताना सुद्धा बलात्कार करणाऱ्या आरोपीला महिनो न महिने फुकटच बिर्याणी खायला घालणारी आपली न्याय व्यवस्था पाहता आजही लोचारीच बोध झाल्याशिवाय राहत नाही. आणि आजही अत्याचाराच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. आजही जातीपातीच्या राजकारणात गुंतलेली अति सुज्ञ नागरिक व युवक वर्ग पाहिलं तर भावी पिढी हि फक्त दादा, भाऊ ,नेते म्हणण्यात जाते आणि संध्याकाळी अर्ध्या भाकरी साठी मला-तुला करण्यातच जाते की काय अशी दाट शंका आता वाटू लागली आहे. आपला समाज कसा असावा आणि कसा होता याची प्रचिती आजही आपल्या देशाचं वैभवशाली इतिहास साक्ष देत आहे. सामान्यतः जगात २०० पेक्षा हि जास्त देश असतील पण आपण ज्या महाराष्ट्रात राहतो ज्या देशात राहतो त्या देशाला भूतकाळात जेवढं शौर्य आणि अध्यात्मिक आणि क्रांतिकारक बलिदानाच इतिहास लाभलं आहे तेवढं कोणत्याच देशाला लाभलं नसेल हे सत्य. पण आज ही सांगायला लाज वाटते की आपण आपल्या पाठीमाग कित्येक शतकापासून इतिहास अनुभवतोय पण अनुकरण आणि त्या अनुषंगाने वाटचाल होताना किंवा करताना आज कोणीच दिसत नाहीत. महाराष्ट्र असो किंवा आपला भारत असो कर्मवीर भाऊराव पाटील असो किंवा स्वराज्याचे गादी पुरुष शाहू महाराज असतील, शिक्षणाची गंगा दारोदार पोहोचवत असताना शेण,दगड, माती झेलत ज्ञान गंगेला एक समुद्र बनवणारे फुले कुटुंबीय असतील, जगाला स्वच्छतेचा मंत्र देणारे संत गाडगे बाबा असतील किंवा आपल्या अभंगवाणी तुन जगण्याचं मूलमंत्र पसरवणारे आदर्श संतांच्या पंक्तीतले तुकोबाराय असतील किंवा राजमाता जिजाऊ माँ साहेब असतील किंवा महाराष्ट्र कुलदैवत स्वराज्य निर्मिकार छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा माझं स्वराज्य काही केलं तरी परक्याच्या हातात देणार नाही म्हणून आपल्या शरीराचे अक्षरशा कण कण करून घेऊन बलिदानाच खरं न खडतर स्वरूप जगाला पटवून देणाऱ्या माझ्या शिवपुत्र संभाजी असतील. आणि याबरोबरच कष्ट आणि संघर्षची खरी ठिणगी अंगावर झेलून आपल्या कुटुंबाची लाही लाही झालेली झोळी खांद्यावर घेऊन शिक्षणाच्या क्षेत्रातील पदोच्च शिक्षण तज्ञ तथा दिन दलित यांच्या उदार निर्वाह पासून त्यांच्या जगण्याची व आपल्या सर्वांच्या न्याय हक्क आणि खरं स्वातंत्र्य काय शिकवणारे, बॅरिस्टर व त्यागपुरुष,महामानव, बोधिसत्व, राष्ट्रपती पासून सामान्यांपर्यंत एकच कायदा म्हणून जन्म दिलेल्या संविधान रचयिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील यांचे आचार आणि विचार आज पोरके होण्याची भीती आपल्यात आहे . विचार करणारा करत जातो आपल्याला काय करायचं आहे म्हणून पण समाजातील प्रत्येकाच्या न्याय हक्क आणि जबाबदारी याचा उदगाथा म्हणून बाबासाहेबांच्या विचारांचं आचरण होणं आज खूप गरजेचं आहे.
भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.
४ दिवसावर बाबासाहेबांची जयंती येऊ घातली आहे. बाबासाहेबांचे त्याग आणि संघर्ष यात्रा आम्हाला पाहायला आणि त्यांच्या जीवनावर आधारित रेखाटन प्रति अनुकरण झालेलं सर्वांना पाहायला आवडेल. एक किस्सा आठवतो बाबासाहेबांच्या बायोस्कोपी वाचताना लक्षात आली बाबासाहेब एल्फिस्टन शाळेत शिकत असताना सरांनी त्यांना एक फळ्यावरच गणित सोडवायला सांगितलं तेव्हा बाबासाहेब फळ्याकडे जाऊ नये म्हणून सुवर्ण मुलांनी गोंधळ सुरु केला कारण फळ्याच्या पाठीमाग ठेवलेली जेवणाची डबे गलिच्छ होणार हे गलिच्छ विचार बाबासाहेबांना फळ्याकडे जाण्यापासून रोखू लागले. पण सरांनी त्यांना फळ्यापर्यंत जाऊ दिल आणि बाबासाहेबांनी फक्त गणित सोडवल नाही तर आपल्या सर्वांच्या आयुष्यातल्या जगण्याची आणि हक्काची गणितं संविधानाच्या माध्यमातून सोडवली. आणि त्या वर्गात ते गणित सोडवणारे फक्त एकटे बाबासाहेब होते. या प्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा एक क्षण जीवन सार्थक करायला पुरेसा असतो. बाबासाहेब इंग्लंड मध्ये असताना त्यांच्या एकूण ४ पुत्रा पैकी शेवटचा पुत्र सुद्धा विधात्याने हिरावून घेतलं आणि ज्या वेळी बाबासाहेब आपल्या अर्धांगिनी जवळ येतात आणि म्हणतात रमा मी तुला काहीच देऊ शकलो नाही. आपलं शेवटचं बाळ सुद्धा देवाने हिरावून घेतलं आपल्या भविष्य बद्दल बाबासाहेबांनी रमाई जवळ आपली खंत व्यक्त करते तेव्हा रमाई म्हणजे आज जर तुम्ही या एका तुमच्या बाळासाठी विचार करत बसला असता तर देशातली अनेक बाळ तुमच्याविना पोरकी झाली असती. हा असतो त्याग म्हणजे हे रमाई च त्याग जगात असं कोणतीच व्यक्ती किंवा महिला आपल्या संसाराच्या गाड्याला बाजूला सारून समाजाचा विचार करणारी भेटणार नाही. पण देणं आणि समाज याची सांगड खूप मोठी आहे यासाठी त्याग महत्वाचा आहे आणि ते केलं तर त्याच तराजू उत्तरात नक्कीच चांगल्या फळाची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. 
आज समाजात उलट घडत आहे जस लोक आपलं दैवत वाटून घेतलेत त्याच पद्धतीने आपलं-आपलं महापुरुष वाटून घेतलेत क्षमा असावी पण वास्तव आहे आज निळा,भगवा, पांढरा, पिवळा, हिरवा असं प्रत्येक जात आणि धर्माच्या बेड्या घालून घेतलेल्या प्रत्येक समाजाचा असा वेगळा गट, रंग निर्माण होताना दिसतो आहे. प्रत्येक महापुरुषांनी आपल्या आडनाव प्रमाणे आपल्या जातीच्या धर्माच्या नावाखाली सक्षिप्त पद्धतीने विचार पेरले असते किंवा कार्य केले असतं तर आज या स्वातंत्र्याच्या भारतात आपण वावरलो नसतो. मग आपणच का ? वेगवेगळी मोर्चे आणि वेगवेगळी झेंडे जे सत्य आहे जे हक्कच आहे त्यासाठी पूर्ण समाज एक होऊन का पुढं होत नाही...? बाबासाहेबांनी सांगितलं 'शिका'- आम्ही काय शिकलो एकटा पुढं गेलाय आणि त्याच पाय खेचायच शिकलो, एकमेकांच्यात भांडण लावून शांतता भंग करण्याची शिक्षण कला शिकलो. आणि 'संघटित व्हा' - आपण संघटित फक्त मोर्चाला होतो पण इतर वेळी शेजारच्या माणसांना मदत काय ढुंकुनही बघत नाही. आपण संघटित होतो यासाठी कोणत्या माळावर जायचं न कोणती पार्टी करायची किंवा कुणाच्या डोक्यात दगड घालायचं कुणाला मारायचं कसलं मॅटर मिटवायला संघटित होतो, आणि 'संघर्ष करा' - आपण संघर्ष कुणासाठी करतो वो...? ७ वा वेतन आयोग मिळावं म्हणून... पगार वाढ व्हावी म्हणून...? कधी तरी जगाचा पोशिंदा म्हणून फक्त नावाला राहिलेल्या माझ्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष करा ना व्हा ना संघटित.डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तात्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, '' आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा '' यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे. यातूनच आपण बोध घेत समाजाला वेगळ्या पर्वावर उच्च स्तरावर नेण्याचं कर्तव्य आपण करायचं आहे. यासाठी चला आणि पेटून उठा आणि स्वतःमध्ये बदल घडवूया...! 


धन्यवाद...!

Friday, 6 April 2018

जगण्याची जीएसटी...!

शिर्षक: - जगण्यातली जि.एस.टी. 0%

लेखन - एन.के. (पत्रकार)

दि. ०७/०४/२०१८

सकाळी उठलो नेहमी प्रमाणे कंटाळवाण वाटत होत म्हणून असच पडून राहिलो. परत झोपताना आठवलं कि अमुक आणि तमुक कामं राहिलेत आणि त्यासाठी उठायला हवं. उठलो आणि अवरलो दिवस सुरवात झालं कामाच्या दिशेने आगेकुच करत -करत दुपार झाली जेवायला बायको कडून आमंत्रणच फोन झालं. जेवल कस बस आणि परत कामाला जुंपल गेलो. आणि संध्याकाळ झाली काही काम झाली आणि काही झाली नाहीत. त्या कामाच्या पूर्णत्वास पुन्हा आखणी आणि नियोजनात सूर्यदेव गायब झाले न आजच्या वर्तमान तारखेचा दिवस मावळला. अशी दिनचर्या रेखाटली गेली. प्रत्येक जण असं स्वतःसाठी किती दिवस जगणार आहोत..? काय केलं आज स्वतः साठी ...? भविष्याची स्वप्न रंगवत रंगवत आज एक एक दिवस मावळत चालला आहे.  जगायला जरा आता शिकायला पाहिजे का अशी सध्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सकाळ पासून संध्याकाळ पासून नियोजित कामात दिवस गेला अक्खा. याच पद्धतीने फक्त 'कामात' जगणं हे आता सर्वांचं ब्रीद वाक्य झालं आहे जरा स्वतःसाठी आणि स्वतःच्या माणसासाठी स्मार्ट पद्धतीने जगायला आपण कधी शिकणार...? आपल्या स्वतःची आवड-निवड, आपल्या कुटुंबाचं क्षणिक सही आनंदाचे क्षण आपण कधी 'स्पेन्ड' करवून घेणार...? स्मार्ट सिटी व्हायला लागला पण त्या सिटीतील रहिवाशी मन कधी आपण स्मार्ट करणार...? आहे का उत्तर द्या ना...!!
         राहिला प्रश्न उत्तर नसल्या शिवाय प्रभू पण अडचणी निर्माण करत नाही म्हणे.... अहो आपल्या प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही अडचणी आहेतच. त्या अडचणींना आपल्या चाणाक्ष बुद्धीच्या आणि खंबीर मनाच्या जोरावर चांगलं सणसणीत उत्तर द्यायला शिकूया. चला, आपल्या स्वतःची जबाबदारी स्वीकारत स्मार्टपणे जगायला सुरुवात करूया. बरोबर ना आपल्या आजच्या परिस्थितीला आपण सोबत इतर परिस्थितीला कसं सगळेच जबाबदार आहेत, हे पटवून देण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न केला. परिस्थितीनं कसा आपला जवळजवळ बळीच घेतलाय, असं सांगत आपण एका कोपऱ्यात पडून एकाच रडगाण्यात अडकून राहिलो तर अवघड आहे. काही वेळा अडचणी आणि दुःखात स्वतःच स्वतःला बिचारं आणि निर्दोष असल्याचं प्रशस्तीपत्र देऊन टाकलं आहे; पण यामुळे मानसिक स्थितीही फारशी बदलणार नाही आणि  प्रगतीही होणार नाही.
     अशा वेळी थोडंसं कटू सत्य दाखविण्याची वेळ असते. कोणत्या परिस्थितीत आपण कोणता मार्ग काढतो, कोणता निर्णय घेतो, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. अशा वेळी चुकीचे निर्णय घेतले, तर त्याची जबाबदारीही सर्वस्वी आपल्यावर असली पाहिजे. स्वतःचं दुःख कुरवाळून, स्वतःला बिचारं मानून समस्या सुटत नाहीत. म्हणून असली नकारात्मक मानसिक संरक्षण यंत्रणा मोडीत काढलीच पाहिजे. त्यासाठी अनेक वेळा माझ्या लेखातून सांगत आलोय पडलेल्या आणि सुखलेल्या फुलात व सुगंध आहे तस आपल्या जगण्यावर निर्बंध आहेत ना जीएसटी आहे. जगा ना स्वच्छन्द.

   धन्यवाद....!