Friday, 7 August 2020

मिडिया आणि समाज

 शिर्षक : मीडिया आणि समाज : एक विदारक सत्य !

लेखन : पत्रकार एन.के.

       [ _सारांश : गेले ७-८ दिवसापासून अनेक विषय डोळ्यासमोर तरळत होते ते म्हणजे कोरोना काळात लिहावं आज वेळ मिळाला व्यक्त होतोय प्रतिक्रिया नक्की असावी ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यूज चॅनेल किंवा काही डिजिटल मीडियावर पाहायचं झालं तर कोरोनावर कानउघाडणी धडाधड येऊन पडायची अन पडत ही आहेच, या विरोधार्थी म्हंटल विविध विषय होते यात अनेक शेतकरी, कोरोनाच्या काळात घाला घातलेले अनेक धंदे, संसार, अनेक नियोजीत कामे, योजना, असे प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक एक ना एक असे विषय जे संकटात होते आणि आहेत यावर कुणाचं किती लक्ष याकडे एक कटाक्ष टाकल तर तळ पायाची आग मस्तकात नक्कीच जाते, शेवटी आज मनातल उतरवत आहे..._ ]

            

        आपण राहतो त्या समाजाच्या एका कोपऱ्यात जर एखादी भयानक गोष्ट घडली की वाऱ्यासारखी पसरणारी साधने म्हंटली की तडक डोळ्यासमोर येतात ती अमुक तमुक न्यूज चॅनेल, देशाच्या, राज्याच्या , जिल्ह्याच्या एवढंच नाही तर तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या गाव, गल्ली पासून दिल्लीपर्यंतच्या घडामोडी आपल्या जवळ क्षणात पोहचवणारी एक वहिनी म्हणजे मीडिया, आज मीडिया आणि डिजिटल वर अनेक कामे मग ती आर्थिक असतील, किंवा संभोधन असेल किंवा मग कोणत्याही क्षेत्रातील कोणतीही सौम्य किंवा मोठी कामे आज मिडियामार्फ़त होतात म्हणजेच की मिडियाचे महत्व आज प्रिंट मीडिया पेक्षा जास्त आहे. पण आज मीडियाचा इतका अतिरेक आज पाहायला मिळतो आहे की कोणत्या बातम्या असाव्यात किंवा कोणते संदर्भ घेऊन आपल्या समोर व्यक्त व्हायला हवं त्याच सोयर सुतक आहे का भला मोठा प्रश्न चिन्ह आज सर्वांसमोर उभा राहिला आहे. मानवी संस्कृतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे माणसाने केलेली स्वतःची समूह रचना. प्रत्येक माणूस हा मन, मेंदू आणि विचार यांनी दुसऱ्याशी जोडला गेला आहे. आपण दररोजचे जीवन जगत असताना आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा आपल्या आयुष्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम होत असतो. त्यातूनच आपले व्यक्तिमत्व घडत जाऊन आपण सवेंदनशील होतो. झालेला बदल आणि महत्त्वाचे म्हणजे विचारांची वळणधार नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात एक चांगल्या आणि एक वाईट जाग्यावर नेऊन ठेवतो हे नक्की. 'बदल' हा निसर्गाचा नियम आहे. गेल्या काही वर्षापासून माणसाच्या आयुष्यात खूपच आमूलाग्र बदल घडून आले आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात रेडिओ, साठ सत्तर च्या दशकात दूरदर्शन, ऐंशीच्या दशकात संगणक, नव्वदच्या दशकात केबल नेटवर्क, मोबाईल आणि एकविसाव्या शतकात इंटरनेटच्या माध्यमातून, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, ब्लॉग अशी विविध माध्यमे माणसांच्या हातात आली. तंत्रज्ञान क्षेत्रात झालेले हे बदल तुमच्या माझ्या आयुष्यात आमूलाग्र अश्या पद्धतीचेच आहेत. 1991 ला भारताने जागतिकीकरण स्वीकारल्यांनतर संपूर्ण जग हीच भारतासाठी एक बाजारपेठ निर्माण झाली. तशी आज या सर्व सोशल मीडियाच्या प्रगतीने संपूर्ण जग हे तुमच्या एका क्लीक वर संपर्कात आले आहे. आज शेतीपासून उद्योगधंद्यापर्यंत, समाजकारणापासून ते राजकारणापर्यंत, विज्ञापासून शिक्षणापर्यंत सगळीच क्षेत्रे सोशल मीडियाच्या कल्पनाविष्काराने बहरली आहेत. तरुणाईसह इतर वर्गाची सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांची संख्या जास्त आहे. आणि दिवसेंदिवस ती वाढतच आहे. या तरुणाईला सोशल मीडिया च्या माध्यमातून वैचारिक आणि तांत्रिक पाया असणारा तत्वांचा एक गट आहे. ज्याद्वारे आपले विचार आपले मत समाजसमोर बिनधास्तपणे मांडता येते. तसेच आपल्या विचारांची देवाण घेवाण करता येते. दररोज विचारांच्या माध्यमातून नवीन नवीन मित्र भेटत राहतात. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ग्रुप हे समाजाच्या विविध प्रश्नांवर समाजाची मते जाणून घेऊन त्यावरती उपाययोजना करण्याचे काम समाजात करत असताना दिसत आहेत. दररोजच्या धकाधकीच्या आणि धावत्या जीवन शैलीमुळे समाजमनावर आलेली मरगळ काहीवेळा विनोदाच्या माध्यमातून दूर होण्यासही मदत होते.   

           हा एक भाग झाला आणि आज ऑनलाइन शाळा किंवा अनेक अशा शालेय गोष्टीत अनेकांचा वेळ आणि प्रवास वाचला नक्की आहे पण कधी कधी नाहक गोष्टीवर मीडिया जास्त लक्ष देते या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंब उपाशी, अनेक रोजगार ठप्प, अनेक लहान उद्योगांवर उपासमारीची वेळ आली पण त्यावर कधी बातमी गडद होताना दिसत नाही. म्हणून कोणत्या डिजिटल दुनियेवर विश्वास ठेवावा हेच कळत नाही. सध्य परिस्थितीत पाहता मोबाईल वर सगळ्या गोष्टी शक्य आहेत मग त्यात करमणूक आलं, त्यात वृत्त वाहिनी आल्या तस तसे प्रिंट मीडिया लोप पावत जाते की काय अशी भीती वाटू लागली आहे. गेले अनेक दिवस आपण पाहिलं की सुशांत नामक अभिनेत्याच्या आत्महत्तेनंतर मीडिया ने सदर प्रकरण इतके उचलून धरलं की गरज नसलेली गोष्ट अतिरेक करून सोडलं त्या बदल्यात कधी शेतकरी, कधी बेरोजगारी, कधी सामान्य माणसाच्या प्रश्नांना घेऊन लढाई लढली जात नाही ही खंतच म्हणावी लागेल. अनेक असे प्रश्न आहेत, कुटुंब आणि गाव आणि नगण्य प्रकरणे आहेत पण कधी मीडिया त्याला गंभीरपणे घेत नाही हे एक प्रकारचे दुर्दैवच म्हणावं लागेल. 

अगदी सकारात्मक दृष्ट्या विचार करता सोशल मीडियाने वैयक्तिक आयुष्य मनमोकळे केले आहे. असे असले तरी काही दुष्परिणामही आपल्याला नाकारून चालणार नाहीत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वापर वाढल्यास त्याचे पडसाद नकारात्मकच अधिक पहायला मिळतात. सोशल मीडियाच्या अतिवापराने वैयक्तिक आयुष्यात कोटुंबिक जीवन दुःखाच्या छायेत गेल्याच्या घटनाही आपल्याला पाहायला मिळतील. मानसिक विकृतीतून अनेक सायबर गुन्हेगारांचा जन्म झाला आहे. आजची तरुण पिढी दहा दहा तास फक्त फेसबुक, व्हॉट्सअप वर वैयक्तिक संभाषणासाठी स्वःतला गुंतवून घेते. यामधून अनेक आजारांना स्वतःहून आमंत्रण देण्याचा हा प्रकार दिसून येतो. अनेक मुलींना वैयक्तिक अकाउंट वरून ब्लॅकमेलिंग केल्याच्या हि घटना आपल्यासमोर आहेत.. त्या आहेतच असे नाहीतर त्या दररोज वाढतच आहेत हि तुमची माझी बोचरी खंत आहे. शेवटी तीक्ष्ण हत्याराने जशी शस्त्रक्रिया करून एखाद्याचे प्राण वाचविले जातात तसेच त्याच हत्याराच्या चुकीच्या पद्धतीच्या वापराने एखाद्याचे प्राणही घेतले जाऊ शकतात . त्यामुळे सोशल मीडियाबरोबर आनंद घेत असताना आपल्या इतर मित्रांच्या किंवा समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी हि आपल्या सारख्या सुशिक्षित समाजाने घ्यायला हवी हीच एक माफक अपेक्षा...!

धन्यवाद.


मोबाईल : +९१८८०६६०५८५२

Sunday, 19 July 2020

शिकवण चुकांची !!

शिर्षक : शिकण्याचं खरं व्यासपीठ : चूक (FAULT) !!

लेखन : एन.के. ( पत्रकार ; मो.- 8806605852 )

[ नमस्कार ! खुप दिवस नंतर विषय घेऊन येतो आहे, मानवाने आज पर्यंत अनेक जीवनाची चढ उतार पाहिले, अनेक सुख - दुःखाची दारे ठोठावली त्यातून अनेक गोष्टी पोळल्या ही असतील आणि काही आठवणींचा कप्पा गडद ही केले असतील ; आणि यावरून माणसाने जीवन प्रवासात काही अडचणी चुका मधून ही उद्भवल्या असतीलच आणि एक लक्षात ठेवा, चुकणे हा माणसाचा स्थाई स्वभावच बनला आहे, कारण जो निर्णय घेतो त्याच्याच हातून चुक होते जो निर्णयच घेत नाही त्याच्याकडून चूक होण्याची शक्यता नसतेच, पण एकदा केलेली चुक परत न करणे यालाच शहाणपण असे म्हणतात. असाच एक सुंदर विषय वर लेखन तुमच्यासाठी... ]

आजच्या टॉपिकवर येतो, चूक करणे किंवा होणे हे माणूसपणाचे लक्षण असले तरी चुकांची पुनरावृत्ती न करणे आणि केलेल्या चुकांच्या परिणामांची जबाबदारी उचलणे हे गुणी माणसाचे लक्षण आहे. बरोबर आहे आज काल माणूस चुका करतो पण त्यावर भाष्य किंवा ते स्वीकारून न घेता त्यावर पडदा टाकण्याचाच जास्त वेळा प्रयत्न होतो. असे न करता झालेल्या चुका पदरात घ्या आणि स्वछंद मनाने आत्मसात करून त्यावर मान्यताप्राप्त बनायला शिका.
         तसेच प्रत्येक माणसांत गुण आणि दोष हे असतातच. कदाचित एकाकडे गुण जास्त असतील तर दुसऱ्यात ते कमी प्रमाणात असतील. काहींचे दोष डोळ्यावर येतील तर काहींचे दोष छुपे राहतील. हे सगळं डबोलं अंगावर घेऊनच आपण जगत असतो. त्यामुळे काही फायदे होतात तर काही तोटे, पण सर्व फायदे-तोटे भोगत जगणं हा आपला स्वभावधर्म होऊन बसतो आणि आपण आपल्याकडे शांतपणे बघतच नाही. एखादवेळेस आजार झाला, अपघात झाला तर नाइलाजास्तव का होईना, आपल्या सवयी, जीवनशैली यात थोडा बदल करतो. पण तेसुद्धा अगदी मनापासून केलेलं नसतं. अगदी अस की काही बाबतीत जगण्याच्या प्रत्येक वाटेवर, काळात, अलीकडे किंवा आपल्या बोली भाषेतल्या पलीकडे चुका सुधारून घेऊन त्या उलट चांगल्या सवयीना आवर्जून प्राधान्य द्या. २. अस कधी कधी स्वतःमध्ये डोकावून बघा ना वाटून जातं की, दुनियेतले कोटय़वधी लोक असंच जगत असतील जसे मागील पान उलटून त्याच वाटेने नवा दिवस व्यतीत करीत असतात. यालाच आम माणसाचं जीवन म्हणतात. जर उगवणारा प्रत्येक दिवस नवा असेल तर जे आतापर्यंत करत आलो त्यात चांगला बदल व्हावा असे अगदी थोडय़ा माणसांना का वाटते? जगात चांगला माणूस म्हणून जगणे थोडय़ा माणसांना का बरं जमते? आणि आपण बहुसंख्य जसे आहोत तसेच वर्षांनुवर्षे का जगत राहतो. का रुटीनमध्ये जगणं हीच आपण आपली नियती मानतो? म्हणजेच एक प्रकारे आपल्या आयुष्याचे दोर नियतीच्या हातात देऊन तिच्या तालावर पावले टाकत राहतो...? म्हणून कधीही खचून न जाता नशिबाच्या कागदाची वाक्ये न विचारात घेता स्वतःच्या मनाची आर्त हाक ओळखायला शिका. ‘मन’ हे असे वाहन आहे जे घरबसल्या आपल्याला जगाची सैर घडवते.. सगळीकडे फिरवून आणते..मन अर्थात आपल्या शरीराचा बॉस असतो. जो जस म्हणतो तस करावं लागतं. मन तस खुप मोठ असतं. सगळ्यांची चिंता वहाते.. कधी कधी उदास असते तर कधी आनंदी असते..एंजल आणि सैतान हे मनाचे दोन रहिवासी आपल्याला कधी सुंदर विचारधारा देतात तर कधी वाईट विचारधारा..एक अस ही विचार करून बघा की मन थकत नाही.. सतत उंडारत राहतं मनाचे काम दिवसरात्र चालू असतं. इतकं की कधी कधी आपल्याला कंटाळा येतो. कामात असतानाही मन शांत बसू देत नाही.
जाता जाता एक शब्दांकन असे की माझे गुरुवर्य माझ्या कामाच्या ठिकाणी असणारे एक वरिष्ठ अधिकारी मा. निशांत सर यांनी या विषय बद्दल आपल्या मार्गदर्शन मार्फत खूप छान बोध दिला त्यांच्या आत्मविश्वास भरे संभाषण नंतर हा विषय ठरला माझा त्यांनी आपल्या माहितीत असे विशद झाले की "माणसाने चुक करू नये, आणि जर अनभिज्ञ एखादी चूक झालीच तर त्याची जबाबदारी किंबहुना मान्य करायला स्वीकारा. तसच झालेल्या चुकामधून खूप शिकण्यासारखं असत ते शिका आणि सुंदर आयुष्याला गोंडस बनवा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बाबतीत चुका घडतात चुका कधी त्रासदायक असतात पण क्षणात गोंधळून न जाता शांत बसून वेळ काढा आणि पुन्हा चूक का झाली यावर विचार न करता चूक होणार नाही याकडे एक सुंदर विचार प्रेरित करून जोमाने कामाला लागा."

धन्यवाद ! 

Wednesday, 10 June 2020

नाती : रस्ते आणि जिवन...!

शिर्षक :- नाती अशीच असतात...!🙏🏻

     
         
       जगाच्या पाठीवर अनेक लोक भेटतात, करतात, मैत्रीच्या आणि आपुलकीच्या नात्यावर भुरळ पडेल अशी अनेक नाती बनतात सत्य असत्यच्या खेळा सुरू होतात यात ही अनेक नाती अशी अदृश्य असतात जे प्रेमाच्या प्रवाहात वाहिलेली असतात. स्वच्छ आणि सुंदर नाती कधीही बाधत नाहीत कारण अशी नाती कधी प्रेम नावाच्या पंखाच्या असेने हरत नाहीत तर उलट अशी नाती मैत्रीला एक किनार मानून मार्गक्रमण करत राहतात. कधी कधी नाती अशी अवजड वाटतात की आपल्यात निर्माण झालेला त्यांच्या बद्दलचा कणव कमी व्हावी आणि संपर्क नात्यातला संपवावे आणि निस्वार्थ भावनेने एकवटावे. नाती असतातच अशी लिहताना भान राहत नाही की सकाळ ते संध्याकाळ पर्यंत प्रत्येक नात वेगळं अर्थ, समज, वेगळी तमा, वेगळं आकर्षण अर्थात वेगळेपण असणाऱ्या असतात. पण अशा नात्यात एक प्राजळ मनाने आपल्या साठी केलेली प्रार्थनिय नाती असतात.
अशा नात्यात कधी तर प्रेम, विरह, सहवास पासून ते अगदी जिवलग पाखरांच्या गुफ्त-गु असतात. एखाद नात सुंदर आणि सजवून धजवून निर्माण केलं जातं त्याला प्रेमाचा वास लागतो अशा वेळी प्रत्येक शब्द आणि प्रत्येक बोली भाषा ही सावरून जगणं आणि व्यक्त होण्याला सुरवात होते. कधी कधी वाटून जात की अशी नाती जुंपली जन्माला की वाईट किंवा कोणत्या तरी लहानशा चुकीने दुरावली जाऊ नयेत म्हणून कधी प्रपोज केला जात नाही कारण मैत्री मलीन होऊ नये यासाठी धडपड असते. खरं तर मला तरी वाटतो.की मैत्री मधले प्रेम जा​स्त महत्वाचं आहे .कारण की आपल्याला जर अचानक एखादं संकट आले तर आपण एकटेच काही करू शकत नाही .जर आपण अगोदरच जर मैत्री करून ठेवली तर ती मैत्री आपल्याला आपल्यावर जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा ही मैत्री आपल्याला साथ देत असते. असं पण नाही की प्रेमा मधली मैत्री चांगली नाही ते पण ते पण एक महत्वाची मैत्री आहे. परंतु त्यांचा पेक्षा जास्त महत्वाची म्हणजे मैत्री. व्यवहार आणि मैत्री या दोहोंपैकी काहीच निवडु नका...
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा...
"व्यवहारात मैत्री असावी पण मैत्रीत व्यवहार नसावा...!"
व्यवहार करताना मैत्री सर्वांशी असावी...पण व्यवहारात भोळे पणा...सालस दाखवले तर जवळील व्यक्ति सुद्धा आपला वापर करेल...म्हणून पूर्ण व्यवहारीकच रहावे...
मैत्रीत व्यवहार केल्यास एखाद्या व्यक्तीचा करार करत आहोत असे काहीतरी जाणवेल...म्हणून मैत्री आणि व्यवहार दोन्ही असावे पण दोन्हीही आपापल्या ठिकाणी ठेवून पुढे जात रहायचे...! मैत्रीणीला मैत्रीण पणा जिवंत ठेऊन आज सांगतो की, होय तु माझी आवडती मैत्रीण असल्यामुळे मी तुझ्यावर मनापासून प्रेम करीत होतो. परंतु जर माझं प्रेम तुला मान्य नसेल तर माझी काहीच हरकत नाही. यासाठी मैत्री तोडण्याची गरज नाही. मैत्री आणि प्रेम ह्या समांतर प्रक्रीया असून मित्र म्हणून मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन याची खात्री मी आज तुला देतो .मैत्रीत प्रेम हे असतेच त्याशिवाय जर प्रेमच नसेल तर ती टिकणार तरी कशी हो ना , मैत्री म्हणजेच जिवापाड प्रेम हे आज समजलं न आज पासून प्रेमाची सांगड कमी घालू शकतो हे पक्के केलं आहे. माझ्या मते प्रेमाचा अर्थ प्रेमाची मागणी असा लावून कदाचित बोलणे बंद केले असेल तर माझे प्रेम हे निरपेक्ष मैत्रीचे नात्यातील प्रेम असून भविष्यात तीला या मैत्रीतील प्रेमामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची खात्री मी आज देतो.
जेव्हा आठवणींचा हात साेडायला मन तयार नसतं तेव्हा समजून जावं त्याने पुढचा प्रवास नाकारलाय. अट्टाहासाने त्यात आभाळाची आेढ निर्माण करणं टाळावं कारण कितीही प्रयत्न केला तरी ते आभाळाच्या इंद्रधनुष्यात नाही तर मातीत रुजलेल्या इवल्याशा अंकुरात गुंतलेलं असतं,रमलेलं असतं..आणि जाे एकदा मातीशी जाेडला गेला ताे तिथेच विसावला.... अनेकदा काही माणसं जगाच्या दृष्टीने एकाच वळणावर थांबलेली असतात पण खरं सांगायचं तर त्यांचा स्वतःपुरता,स्वतःसाठीचा प्रवास हा तिथेच संपलेला असताे...अजून काही मिळविण्याच्या लालसेपेक्षा अशीच आठवणींची पाऊलवाट चालत चालत जीवनाचा प्रवास संपवणं त्यांना जास्त भावतं..असं जगण्याचं वेड याेग्य की अयाेग्य हा प्रश्न अनुत्तरीत राहिलेला बरा..!!

लेखन - पत्रकार एन.के.
     मोबाईल - ( ८८०६६०५८५२ )

Sunday, 7 June 2020

बायको... एक जीवनसाथी !!

शिर्षक - बायको : त्यागाची मशाल, घर संस्कृतीचा कणा...!

लेखन - पत्रकार एन.के. ( 8806605852)

      ... [ स्त्री बद्दल खुपदा लिहलं, त्याच्या परिस्थितीबद्दल किंवा अनपेक्षित तिच्या जडण घडण बाबत काहीस लिहलं मी नक्कीच पण 'बायको' नामक असणाऱ्या त्यागाच्या रणरागिणी बद्दल आज काही शब्दांकन करण्याचा मूड होता, प्रत्येक घरात एक जोडपं असतं, प्रत्येक  पुरुषाच्या आयुष्यात ; जिवनात बायको नावाचं एक चाक असत. हे चाक नवरा, मुल-बाळ, संसार, संस्कृती, वडीलधाऱ्या पासून प्रत्येकाच्या सुख: दुखात स्वतः कडे दुर्लक्ष करून घरासाठी त्याग प्रतिमा स्वतः मध्ये जागृत करून संस्कारी रुळावर कायम झटणारी रणरागिणी बद्दल आज चार शब्द विशद करतोय. विवाहित, अविवाहित अशा आणि बायको बद्दल वाचनिय मन असणाऱ्या सर्वांसाठी आजचा हा लेख अर्पण करत आहे. ]
                           

      नवरा बायको, म्हणतात ना एका संसार रुपी रथाची दोन चाके आहेत. खरंच आहे ते. नविन लग्न झाल्यावरचा तो हवाहवासा वाटणारा एकमेकांचा प्रेमळ सहवास. त्याने केलेलं तिचं कोतुक, मग ते जेवण बनवण्यावरुन असो किंवा तिच्या दिसण्यावरुन. त्यावर तिचं लाजणं. प्रत्येक गोष्टीचा दोघांचा पहिला अनुभव न विसरता येणारा. किती गोड असतात ते दिवस. या नात्यात वेगळाच गोडवा असतो. नविन घरात तोच एक अगदी जवळचा, हक्काचा वाटतो. आयुष्यात त्याच्या असल्यानं किती सुरक्षित वाटत असतं. तिचं सगळं विश्व त्याच्या अवतीभवती असतं. एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी समजून घेणं, त्यात साम्य असले तर होणारा तो आनंद. जीवनातील सुंदर अनुभव असतो तो.
       'ही बायको नसती तर'  ह्या विषयावर निबंध लिहायची वेळ आली तर कदाचित शंभर पानी वही पण कमी पडेल तुम्हाला. खरंच खूप काही लिहावं लागेल हो. हीच्याशीच लग्न जमवण्यासाठी केलेली खटपट, लग्न जमल्यानंतरच्या भेटी गाठी, तिचा रागवा रुसवा, लाडाने तिची केलेली मनधरणी, लग्नासाठी तिच्या आवडी निवडी पाहून केली खरेदी, तिच्या येण्यासाठी आतुरलेले तुमचे घर, तिला आवडणाऱ्या रंगसंगतीचे पडदे, तुमच्या बजेट च्या पलीकडे जाऊनहि निवडलेले तिच्या आवडीचे हनिमून डेस्टिनेशन हे सगळं नक्कीच आठवेल बघा. घराची जमवाजमव करताना तिची पसंद, आपल्या घरच्यांना लावलेला लळा, आपलया मित्रमंडळींच्या आग्रहाखातर तिने बनवलेल्या काही खास पाककृती, अगदी तुमच्या कपड्यांमध्ये, केसांच्या ठेवणीमध्ये झालेला फरक, तुमच्या खाण्यापिण्याचे सांभाळलेले चोचले हे तर नोंदवावे लागतीलच त्या वहीत. कामावरून आल्यानंतर तुमच्या कानात सांगितलेली  ती गोड़ बातमी,  तुमच्या घरात येणाऱ्या  नवीन पाहुण्यासाठी केलेली जय्यत ती तयारी आणि तो आल्यानंतर त्याच्याकडे  पाहणारी तिची कैवल्यपूर्ण नजर, ते बाळ मोठ होत असताना त्याच्याकडे वटारलेले डोळे आणि तुमच्या त्या राजपुत्राने मिळवलेल्या भव्य यशानंतर तिच्या डोळ्यातले ते कृतार्थ भाव पण तर लिहावे लागतील त्या निबंधात. प्रपंच वाढताना केलेल्या परिश्रमांची आणि तडजोडींची मोजदाद तर ठेवलीच असेल तुम्ही .. नवीन घराच्या साठी दागिने दिले असतील तिने डोळ्यातले पाणी लपवत, लेकाला अमेरिकेला पाठवताना राहिल्या असतील अनेक पैठण्या दुकानाच्या शोकेसमध्येच, तिच्या आईसाठी नसेल पण तिच्या रक्ताचं नातं नसलेल्या तुमच्या आईसाठी तर नक्कीच जागली असेल अनेक रात्री हॉस्पिटलच्या बाकड्यावर... जागा आहे ना वहीत ..खूप लिहावं लागेल अजून. हळूहळू जबाबदारी दिसू लागते. एकमेकांच्या सवयी आवडेलच याची खात्री नसते, मग सुरू होते तू तू मी मी पण तरीही तू आणि मी. एकमेकांकडून नकळत अपेक्षा वाढतात, पूर्ण होत नसेल तर चिडचिड होते. पण प्रेम मात्र कमी होत नसते. दोघांच्या भांडणात, रुसवा फुगवा दूर करण्यात एक मज्जाच असते. मग अवतरतो भाग दोन म्हणजे की ह्या नात्यातली ती बायको नावाची स्त्री अर्थातच नात्यातील एक बंध सोडून तुमच्या कडे आली असते. मग संसार म्हटलं की मग सुरु होतो तो एक असा प्रवास की भांडण झाले की समजूत काढायची जबाबदारी त्याचीच असते. हळूहळू मुलांच्या येण्याने एक वेगळाच आनंद, प्रेम दोघांमध्ये असतं. मुलांचे संगोपन करण्यात, घर, नोकरी सांभाळण्यात ती खूप थकून जाते पण तिचे कष्ट बघून त्याने प्रेमाने मिठी मारली की ती सगळं विसरून जाते. आई म्हणून संस्कार, मुलांची देखरेख ती करत असेल तरी त्यांच्या भविष्याची काळजी त्याला असतेच. त्यासाठी कुठे गुंतवणूक करावी, घरखर्च, बायको मुलांची हौसमौज करत तो सगळा गाडा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असतो. दोघांनी एकमेकांना ‌समजून घेणं, प्रेम, विश्वास जपणं तितकंच महत्त्वाचं असतं. खुप गोड असं हे दोघांचं नातं असतं. या सगळ्यात दोघांचं नातं घट्ट होत जातं, प्रेम वाढतच असतं. दोघांनीही एकमेकांची खुप सवय झाली असते. दोघांचे एक सुंदर नाते निर्माण झालेले असते. त्याच्याशिवाय ती आणि तिच्याशिवाय तो अपूर्णच असतात. दोघांनीही समजून घेवुन विश्र्वासानं हे नाजूक जन्मभराचं नातं जपण्याची गरज असते. जसजसे वय वाढत जाते, मुले मोठी होतात तसतशी एकमेकांची जास्त गरज भासू लागते. संसाराचा गाडा सुरळीत चालवायला खरंच दोघांचीही गरज असते.
जाता जाता एवढंच की आठवून बघा.. अनेक लग्नसमारंभांना गेला असाल ना तुम्ही दोघे. मित्रांच्या कोंडाळ्यात बसून पहिले असेल तुम्ही तिला रुखवताकडे पाहताना. कशी वेगळीच दिसत होती हो ती. किती प्रेमाने सांगत होती सगळ्यांना तुम्ही भेट दिलेल्या त्या साडीबद्दल. साधी मोत्याची माळ तर घातली होती तिने पण सगळ्या गर्दीत आज कशी उठून दिसत होती. श्रावणातल्या घरच्या सत्यनारायणाच्या पूजेत तुमच्या बाजूला बसून पदर डोक्यावर घेऊन तुळशीची ची पाने वाहताना तुमच्या हाताला केलेला स्पर्श आठवतो का...झर्र्कन एक वीज स्पर्शून गेल्यासारखा. गाडीच्या प्रवासात न विसरता थर्मासमध्ये भरून घेतलेला तुमच्या आवडीचा मसालेदार चहा तुम्हाला भरून देताना किती कौतुकाने पाहत हॊतात हो तुम्ही तिच्याकडे. तुमची पहिली स्कुटर घेतली तेव्हा मागे बसून थोडीशी तुमच्यावर रेलून, तुमच्या उजव्या खांद्यावर हळुवार हात ठेऊन तुम्ही स्कुटर चालवताना छान दिसता हे सांगणारी हीच तर होती ... काही पाने या गुलाबी आठवणींने माझ्या माध्यमातून तुमच्या पर्यंत मला पोहचवता आल्या हे भाग्य...
एक कविता वाचायला मिळाली त्यातले १-२ कडवे लिहतो न समारोप करतो...
:- नवराही खरंच खपतो
करून मेहनत नोकरी धंदा
पण घरचं व्यवस्थापन
नसेल तर होतो मोठा वांदा
करा कल्पना बायकोशिवाय सहल आणि सणावारांची
म्हणून वाटतं,
संसारात ७५% भागिदारी बायकोची...

नवरा काय करतो,
ते बायकोने दाखवलय करून
नवऱ्यानेही द्यावं आता आपलं कसब दाखवून
चार चाकाच्या गाडीचीही, फिरतात दोन मागची
म्हणून वाटतं,
संसारात ७५% भागिदारी बायकोची...

स्त्री-पुरूष समानतेच्या
राहिल्यात नुसत्याच गप्पा
बायको जरा काही बोलली
तर नवरा होतो खप्पा
बायको या संस्थेने गाठलीय
सगळीकडे नवीन उंची
म्हणून वाटतं,
संसारात ७५% भागिदारी बायकोची !

लेख खूप मोठा झाला अजून लिहिण्यासारख खूप काही आहे पण आता एवढ्यावर समारोप करतो. धन्यवाद !!

Friday, 29 May 2020

सुप्त गुणांना वाव द्या !

शिर्षक : अपेक्षाच ओझं नको सुप्त गुण शोधा...!

लेखन : एन.के. - ( पत्रकार )

         ....( संदर्भीय वरील शीर्षक नुसार आजच्या स्पर्धेच्या युगात आपण अनेक अशी घटना तपासतो की अमुक विषयात नापास झाल्याने किंवा एखादे ध्येय साध्य झाले नाही की जीवनयात्रा संपवून घेणारे असे अनेक विद्यार्थी, किंवा मानवी जीवनातील उदाहरणे आहेत. प्रत्येक जन्म दिलेल्या मध्यम पासून उच्च शिक्षित कुटुंबातील पालकांमध्ये आपल्या पाल्य कडून एक उच्चभु अशा पदभूषित नोकरीची किंवा पदाची अपेक्षा असते. आजच्या युगातील अनेक जणांनी ज्या अर्थी आपल्या मुलामुलीकडून अशा अपेक्षा ठेवणाऱ्या किंवा समाजात नाव व्हावं म्हणून विद्यार्थ्यांकडे एक लाक्षणिक अभ्यास माध्यमातून ध्येय पाहणाऱ्यांनी किंवा शाळेत शिकणाऱ्या, कोर्स करणाऱ्या, नोकरी करणाऱ्या अशा सर्वजण आणि पालक-पाल्य यांनी वाचवा असा एक माझ्या लेखनातील लेख. )
   
              आपल्या कुटुंबात कुणी नवा सदस्य आला की कोणत्याही पालकाचे किंवा त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्य नुसार प्रत्येक जण त्याला हे करावं तर त्याला ते करावं असं बातचीत सुरू असते इतकंच नाही तर त्या विचारला स्पर्श करून त्याला तसे अभ्यास पासून ते तसे संस्कार धडे द्यायला सुरू करतात यात आई म्हणत असते की मुलगा माझा हे व्हावं, बाप म्हणत असतो की अधिकारी व्हावं तर आजोबा म्हणत असतात की त्याने सैन्यात भरती व्हावे असे अनेक प्रश्न आणि अपेक्षाच भडीमार त्या शिकणाऱ्या पाल्याच्या डोईवर असते. ह्या मुलांच्या बाबतीत नाही तर आजच्या जगण्याकडे एक नजर केलं ना की असे अनेक जण म्हणजे लाखो करोडो कुटुंब अशा एका विशिष्टअपेक्षांच्या ओझ्याखाली धावत आहेत. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती असो किंवा नोकरदार असो किंवा घर चालवणाऱ्या त्या गृहिणी सुद्धा अनेक प्रकारची टास्क घेऊन त्या पूर्णत्वास नेण्यासाठी कसरत म्हणजे एक प्रकारची खांद्यावर बंदूक म्हणतात ना तसे सेम अपेक्षांचं गाठोडं घेऊन जीवन जगत आहेत. सहज विचार केला की आपल्याला समजून येत की आपण ज्या प्रवाहात जगत आहोत त्या प्रवाहात आपण सध्या काय आहोत आणि आपली पायरी कोणती आहे, आपल्याला शिखर गाठायचं असेल तर आपल्याला कितपत पाय पसरावे लागेल आणि त्यासाठी आपल्याकडे अंथरून उपलब्ध आहे का , आपल्याला जे साध्य करायचे आहे ते करण्यासाठी आपण त्यासाठी सक्षम आहोत का, आणि जे व्हायचं आहे ज्या स्टेप वर आपण विराजमान होणार आहोत त्यासाठी आपलं मन, वातावरण, स्फूर्ती किंवा अनभिज्ञ असणारी सकारात्मक ऊर्जा आपल्यात तयार होईल का किंवा होणार का ? याची आकलनात्मक एक विचारांची किनार समजली जाणारी एक थिंक नावाचा पॉझिटिव्ह पिन आपल्या बुद्धीला किंवा मेंदूला व्हायला हवं हे खरं. म्हणजेच मला म्हणायचं इतकंच आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही स्वार्थी नावाचा व्हायरस चिकटून असतो आणि त्या व्हायरसच्या माध्यमातून आपली वाटचाल असते तर त्या वाटचालीत आपल्याला अमुक न तमुक नावाच्या हेवा असतात न ते तस झालं की मला बर वाटेल, शेजारी हे आणले मला आणायला हवं, मला एवढं श्रीमंत व्हायचं आहे मला असं तस करावं लागेल,मला प्रमोशन हवं आहे मला हे करावं लागेल, मला असं हवं तसं हवं हे ठरवणे नक्कीच चुकीचं नाही, ध्येयवादी माणसाने नक्की असावे पण समाधान नावाच्या झाडाखाली झोप हवी असेल ना आकलन नावाच्या उशीला जन्म द्यावा लागेल मग ह्या आकलन म्हणजे हेच की आपण काय करू शकतो, आपल्यात कोणती धमक आहे हे ओळखून त्या वाटेवर वाटचाल करणे अर्थात असे की आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे आपण क्रीडा क्षेत्रात आपलं करिअर आजमावत असू तर नक्कीच ठेच लागणार असे बारीक गोष्टी असतात समजा स्वतःला, पारखा मग ध्येय ठेवून चालायला सुरू करा वेळ लागेल पण तुमची वेळ येणार हे नक्की.
           काही अशी उदाहरणे आहेत आज आपल्या समोर की सचिन तेंडुलकर ज्याला ४ थीत असताना समजलं की मला क्रिकेट मध्ये रस आहे आज नामवंत जगविख्यात खेळाडूच्या यादीत नाव आहे. ज्याला इंग्लिश विषयात नापास व्हावं लागलं त्याच्या नावाने आज भारतरत्न अधोरेखित झालं. सांगायचं एवढंच की आपल्याला काय हवं या पेक्षा आपल्या जवळ काय आहे किंवा आपल्यात काय आहे हे ओळखून जगणे अर्थातच सुप्त गुणांना वाव देऊन जगणं होय. अस ही एक उदाहरण आठवत की आजही जपान मध्ये वयाच्या ४ थ्या वर्षी प्रत्येक बालकाचे आकलन केले जाते आणि त्याच्या आकलन क्षमते वरून अस ठरवलं जात की त्याला काय व्हायचं आहे किंवा हा कशात आपलं करिअर करू शकतो मग तिथूनच त्यांच्या जीवनाची वाटचाल पालक त्या दिशेने करतात म्हणूज आज ही जपान ऑलम्पिक मध्ये पोते भरून पदके मिळवतो तर आपल्या भारताच्या १३० कोटी हुन जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशाला एखादं पदकवर समाधान मानावे लागते.
              जगायचं सर्वांना आहे जाता जाता एवढंच सांगेन की प्रत्येक नात हे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे आपण जपत असतो या मागे त्याचा उपकार किंवा सुप्त गुण किंवा बहुदा त्याच्यात असलेली ती खुबी जी इतरांत नसते. म्हणून त्या नात्यांना तसेच जर अविरत आपल्या जीवनाशी बांधील ठेवायचं असेल तर तिथं ही त्याकडुन अपेक्षा बंद करून नात्याची खातरजमा करून त्या नात्याला तसेच पुढ्यात न्या, पालक आणि पाल्य हे वाचावं यासाठी सुरवातीला म्हटलं की आज मुलांना तुम्हाला काय हवं हेच डोळ्यासमोर ठेऊन ते जगत आहेत, पुस्तकं, खेळ, अगदी सिस्त बद्ध पणे वागतात पण कधी त्यांच्या मनाचा विचार करा, त्याला काय व्हायचं याकडे लक्ष द्या, तुम्हाला त्याला त्या क्षेत्रात त्याला नाव करताना पाहायला मिळेल न नाहक अपयश पाहण्यापासून तुमचे डोळे तरी वाचतील. लेख जास्त आणि मोठा झाला तरी काही विषय घेऊन आज पर्यंत लिहले प्रतिसाद बद्दल धन्यवाद वरील लिंक वर माझे अनेक विषय वर लेखन आहे जरूर भेट द्या.


धन्यवाद !

मोबाईल : 8806605862

Friday, 22 May 2020

कोरोना : माझा देश आणि बळीराजा...!

शिर्षक : कोरोना : माझं देश अन जगाचा पोशिंदा.... !!

लेखन : पत्रकार एन.के.
मोबाईल : 8806605852 

     
            
       खूप दिवस झालं माझ्या गावाला डोळे भरून पाहू शकलो नाही. कोरोनाच्या जागतिक महामारीने थैमान घातले या थैमान मध्ये अनेकांच्या चुली अगदी साजेस्या पेटल्या ना कुठला उठावेव ना कोणत्या जास्तीच्या गरजा किंवा ना कोणत्या मिजास खूप काही शिकवून गेला हा लॉकडाऊन किंवा हा आपला कोरोना. गरिबांच्या गरजेला सरकार धावून आले जीवाच्या आकांताने संरक्षण ही समर्पक मिळालं. पुणा मुंबईच्या लोकांनी गावाकडे आले आपल्या जिवाच्या खबरदारीने गावात आल्यावर ही स्थानिक लोकांत एक सौम्य भीतीचं वातावरण ही जागृत झालं पण गावाच्या हित संबंधात कायम अग्रेसर असणाऱ्या लोकांनी आणि प्रशासनाने नियोजन बद्ध कार्यप्रनाली राबवत समाजात आणि गाव ते तालुकात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून कंबर कसली. शासन आणि केंद्राच्या सगळ्या बाजूने देशाची आर्थिक घडी बसली पाहिजे यासाठी सगळे पुढे सरसावले. सुरळीत चाललेल्या गावाच्या गाव गाड्यातील बारा बलुतेदार यांच्या पारंपरिक आणि पूर्वजात व्यवसाय वर संक्रात आली. कोरानाच्या सावटातच शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामाला सुरुवात केली काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने तर काही ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीचीनांगरनी, वखरनी करीत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे कोरोनानं जगभरातील प्रत्येकाला जेरीस आणलंय. व्यापारी घरात आहे, शिक्षक घरात आहे, उद्योजक आणि कामगारही घरात आहेत. कोरोनानं अख्खंच्या अख्खं जग घरात कोंडून ठेवलंय जणू...  पण, पण आपला शेतकरी मात्र राना-वावरात राबतोय. माती उपसतोय... घाम पेरतोय... अन् मोती पिकवतोय. मात्र ही पिकवलेला माती रानातच सडतेय. कारण कोरोनानं बाजारपेठांना कुलूप लावलंय..! 
            जगातल्या पहिल्या व्यक्तीपासून ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाची मुलभूत गरज अन्न हीच आहे. आणि अन्न हे केवळ आणि केवळ शेतीच देऊ शकते. म्हणून शेती टिकली पाहिजे. आणि त्यासाठी शेतकरी जगला पाहिजे. कारण, कोरोनाविरोधात सध्या सुरू असलेल्या या महायुद्धात डॉक्टर दवाखान्यात. पोलिस आणि पत्रकार रस्त्यावर लढतायत. या सगळ्यांचं पोट भरणारा शेतकरी या सर्वांइतकाच महत्त्वाचा सैनिक आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांसमोर उभं राहिलेलं हे चक्रव्युह भेदून, धन-धान्य देणाऱ्या अन्नदात्याला आधार द्यायला हवा. त्याच्या खांद्यांना बळ द्यायला हवं. इतकं असताना सर्वांगीण समदं देशाच्या हितासाठी नव्हे तर जगाच्या उभारणीसाठी आपल्याला सर्वाना प्रशासन सोबत काम करून देशावरील हे संकट दूर करून पुन्हा "अपने दिन" परत आणायचे आहेत. 
         आताचे हे महत्वाचे दिवस म्हणून लेखन करतोय की आता या टप्प्यात कोरोना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचत आहे आज रोज रास पणे ग्रामीण भाग पासून ते समदं देशात कहर करणारा हा महा भयानक व्हायरस हळू हळू सगळीकडे पाय रोवू पाहतोय. १३० कोटी जनता आणि त्यातली ६० ते ७०% जनता गावात राहते. शहरातील मजूर स्थलांतरित होऊन तपासणी न करता गेले घुसले, शहरापर्यंत मर्यादित होत पण गावात कंट्रोल करणे खूप जोखमीचे होईल. यामुळे गावातील जे लोक आहेत त्या सुरक्षित भाग कोरोनाच्या छायेत जाण्याची दाट भीती आता जाणवू लागली. आज देश बाहेरच्या शत्रूशी कमी आणि अंतर्गत असणाऱ्या शत्रूच्या कारावाह्याशी लढतोय हे नक्की. गरिबी आणि अशिक्षिततेने पिचलेली जनताच आज भारताच्या पृष्ठभागावर दिसते आहे. मोदी जितका देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी धडपडत आहेत तितकंच ती प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. जाता जाता एवढंच सांगेन की गावागावात पोहोचलेल्या कोरोनाच्या पायदळी आपण भरडले जावू न त्यातून कधीच सावरणार नाही ही कल्पनाच न केलेली बरी तर काहींना वाटतंय चीन, इटलीने सावरलं स्वतःला. पण प्रत्येक चुकीचा आणि संकुचित पाऊल आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पायदळी तुडवणूक अर्थात देशाच्या आणि स्वतःच्या अस्तित्वाची नासाडी हेच कटू आणि अंतिम सत्य.!


धन्यवाद...! 

Monday, 4 May 2020

बार बार समझो... !!😢

जब तक नही समझोगे, समझाने वाला आता रहेगा..!

लेखन - एन. के. ( पत्रकार )

          नमस्कार ! नवीन विषय घेऊन तुमच्या पर्यत पोहचत आहे. गेले २-३ महिने झाले कोरोना हा शब्द अक्षरशः कानात पिंजून गेलाय, काम बंद, जेवणाच्या किंवा अत्यावश्यक वस्तूच्या मागावर असलेली मन रस्ते आज व्याकुळ झालेले आहेत. मध्यम वार्गीययांच्या कुटुंबाला उदर निर्वाह करणे जोखमीचे किंवा परंतु आव्हानात्मक झाल आहे. घरात बसावं तर अनेक कारणं असतात मग उकाडा अन्य अन्य ; बाहेर पडावे तर कोरोना सांगितलं जातं पण हे सर्वस्वी आपल्याला जड जात ते म्हणजे किंवा रुचत नाही असे म्हणजे बाहेर पडू का देत नाहीत. रोगाचे संक्रमण किंवा त्यावर असलेले बांधील सूचना पाळणे म्हणजे एखाद्या दुसऱ्याच्या जीवनासाठी नक्की नाही तर हे सर्वस्वी आपल्या चांगल्या जीवनासाठी. आपण नको ते प्रश्न चिन्ह उभं केलं आणि त्या प्रश्नाला उत्तर म्हणून फरक न पडणाऱ्या न्यूनगंड मध्ये जगत राहिलो आणि बाहेर पडलो आणि त्याचा परिणाम म्हणून सांगतो आपण बेफिकीर , बेजबाबदारपणे वागलाे ६४७ वरून ३०००० पर्यंत भारताला नेणारे आपणही तितकेच जबाबदार आहाेत ना मग आपण आजही बघतो प्रशासन ज्या पद्धतीने लढा देतंय त्यात आपण यशाच्या जवळ आहोत आणि बाकीच्या देशांना ही आपला हेवा वाटतो आणि कुनीतीने त्यांना भारताविषयी द्वेश आहे पण आपण तरी कुठे देशाची पर्वा केली? लॉकडाऊनचं गांभीर्य लक्षात न घेता वागलाे.... पाेलिस , डॉक्टर्स , इतर सर्विस देणारी लाेक आपल्यामुळे मृत्युमुखी पडली तर काहीवेळा अस दिसून ही आलं की फक्त माेदी द्वेश आणि टीका ह्यातच धन्यता मानली, सहकार्य करण्याची सकारात्मक आपल्यात कसलीच तमा नाही. अशी बेशिस्त जनता असल्यावर बाहेरचे शत्रू हवेच कशाला ? आपणच आपल्या पुरतं घाणेरड्या विचारांती देश संपवायला पुरेसा आहे.
मित्रानो आज पण आपण सुरक्षित आहोत ह्यासाठी खरं तर आपण आपल्या सरकारचे (केंद्र असू दे की राज्य ) , डॉक्टरांचे , नर्सेस, शासकीय कर्मचारी आणि सगळ्यात महत्वाचे आपले पोलीस ह्यांचे शतशः आभार मानलेच पाहिजेत. आज ते आहेत म्हणून आपण आहोत. मोदीजींनी देशाला दिलेली 'लॉक डाऊन'ची हाक ही त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी नव्हती की ती राजकीय खेळी नव्हती. "लॉक डाऊन" हा फक्त आणि फक्त आपल्या आणि आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी होता हे आज जगात जे काही मृत्यूचं तांडव करोनामुळे सुरु आहे ते बघून जाणवतंय. आपण जर तो पाळला नसता तर देशाची काय अवस्था झाली असती ह्याची साधी कल्पनाही न केलेली बरी... जवळ जवळ १,३५,००० मृत्यू ह्या करोनामुळे झाले आहेत. जगातील बलाढ्य देशांचे राष्ट्राध्यक्ष डोळ्यात पाणी आणून देवाकडे प्रार्थना करत आहेत की ह्या महामारीच्या विळख्यातून त्यांचा देश सुटावा. म्हणून प्रत्येकाला जाता जाता हेच मागण आणि हात जोडून विनंती आहे की घरीच थांबा आणि सरकारच्या सूचनांचे पालन करा यशाचं पारितोषिक लांब नाही.

धन्यवाद !