Thursday, 21 September 2023

क्यों भटक रहा हूँ मैं किस मंजिल की तलाश में !

 ■ शिर्षक : क्यों भटक रहा हूँ मैं किस मंजिल की तलाश में !

■ लेखनप्रपंच : पत्रकार एन.के...✍️


[ ना चाह पूरी कर पाया, ना साकार कर पाया सपने को,

खुद से ज्यादा तवज्जो दी, मैंने ही सायद किसी अपने को,

इसी को सायद जिंदगी कहते है, ताउम्र धूप में तपने को,

यूं जिंदगी बीत जाएगी, और परिणत हो जाऊंगा लाश में,

'ना जाने क्यों भटक रहा हूँ मैं किस मंजिल की तलाश में ' ह्या पंक्ती नुसार आपण आहोत त्या सुंदर जगण्या पासून वंचित होऊन अमुक ध्येय घेऊन उठाठेव करत तारखा बदलतात तस जगणं बदलत असतो हे सत्य,पण आपल्या आजवर दिलेलं योगदान म्हणजे एक विशिष्ट पद्धतीचं जगणं असावं यासाठी केलेलं मार्गक्रमण म्हणजे जगणं असतं का ? ; धगधग, धावपळ, त्रागा, चिडचिड तर कधी समाधानकारक लिटल बीट क्षण अस भरीव जगणं म्हणजे लाईफ इतकंच आपल्याला माहीत आहे, पण आपण आपल्या असलेल्या आणि चाललेल्या जिवनात समाधानी राहता आलं तर नक्कीच जे पदरात तेच जीवनात नक्की असेल सो मग आजपासून "भटकणं बंद" आणि "उमटण सुरू " 😊 ]


   नमस्कार वाचकहो ! एक पुनः सुंदर लेखन आपल्या भेटीस आणतोय दोन गोष्टी माणसाच्या हातात नसतात. एक जन्म आणि दुसरी मृत्यू. पण जन्म व मृत्यूमधील आयुष्य माणसाच्याच हाती असते. ते आयुष्य कोणती मूल्ये घेऊन जगतो. त्यावर जगण्याची कृतार्थता ठरते. सॉक्रेटिसने शिष्यांना चार मौलिक गोष्टी सांगितल्या. त्यातल्या पहिल्या दोन विसरण्यासंबंधी तर राहिलेल्या दोन लक्षात ठेवण्यासंबंधी आहेत. विसरायला सांगितलेल्या गोष्टी अर्थात लक्षात ठेवल्या पाहिजेत. जीवनाची वाटचाल करताना आणि विशेषतः यशाच्या शिखराकडे जाताना, वाटेत आपला द्वेष, मत्सर करणारी, अडचणीचे काटे टाकणारी माणसे भेटतात. एकदा का आपण यशाच्या किंवा सत्तेच्या उंच ठिकाणी पोहोचलो की ज्यांनी आपल्या वाटेत काटे टाकले, द्वेष मत्सर केला, त्यांना विसरायचे. हे अवघड आहे. पण त्यांच्याशी सूडबुद्धीने वागायचे नाही. त्यांचा द्वेष, मत्सर करण्यात वेळ वाया घालवायचा नाही. ज्या उद्देशाने वा ध्येयाने आपण ते यश वा सत्ता प्राप्त केली त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी धडपडत राहायचे आणि हे वाईट वागणाऱ्यांना विसरल्याशिवाय शक्य नाही. आणि दुसरी गोष्ट विसरायची, ती म्हणजे त्या यशाच्या वा सत्तेच्या जोरावर आपण ज्यांच्यावर उपकार केले, ज्यांना मदत केली त्यांना विसरायचे. आठवणी आणि विसर ह्या गणितात आपल्याला जे हवं म्हणजे अस की आपल्या मानसिक समाधान साठी आपल्याला हवं असणार प्रत्येक पाऊल म्हणजे संघर्ष आपण रोजरास करत असतो, आपलं ध्येय न वाटचाल ही एक भौतिक सुखाच्या शोधतलं प्रवास म्हणावं लागेल. कुठेतरी वाचनात आलेलं एक सुंदर चारोळी - 

   'आयुष्य काळोखाने माखले असताना काही माणसं,'

'आपले जगणे विसरून इतरांच्या आयुष्यात उजेड पेरत असतात,'

'आदर्शाची स्थळ आपल्या अवतीभवती असतात,'

'आपण उगाचच दूरवरच्या, न अनुभवलेल्या माणसांचे कौतुक करीत दाखले देत असतो,'

'आत बाहेर निर्मळ असणारी माणसं अभावानेच आढळतात.'

   ह्या चारोळी प्रमाणे आपल्या कर्म आणि स्वभावाचा आपल्या जगण्यावर फार फरक पडत असतो, इतरांच्या मनावर अधिराज्य करता येईल इतकं समन्स स्वभाव आपल्याजवळ हवा, कारण अशी स्वभाव आपल्याला परत देताना भरभरून देत असतात. आपण केलेलं।योगदान आणि वाटचाल नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात असं "रस्ता" रुपी असतो, मग ध्येय वेगळं असलं तरीही वाटचाल असते हे नक्की, प्रत्येकाला जगण्यात स्वार्थ हवं असतं, हवं तसं नात हवं असत, प्रेमाचा प्रवास अवगत असतो, वय, उंची, पगार, पाणीच्या पलीकडे इच्छाशक्ती म्हणून स्वार्थाचं एक हच्छावाला असतोच, कारण प्रत्येक मानव महत्वाकांक्षी असतो. आपल्या मनात स्वप्ने रंगवितो. स्वप्नसृष्टीत रममाण होऊन जातो. पण ही स्वप्ने केवळ सुंदर शब्दांनीच रंगवून त्यात दंग होऊन चालणार नाही ती सत्यसृष्टीत आणण्यासाठी सतत प्रयत्न करावयास हवेत, अम करण्याची तयारी हवी, श्रम करणाऱ्याला लक्ष्मी हसतमुखाने माल घालते. अम करणाऱ्याला यशाच्या रुपाने परमेश्वर दर्शन देतो, नियमित अभ्यास करणारा विद्यार्थी परीक्षेत यश मिळवितो. तस चांगले कर्म आणि स्वभाव चांगला ठेवणाऱ्याला नक्कीच चांगली फळ ह्या जिवनात मिळतात हे नक्की ! जाता जाता समारोप करता करता एक कवितेच्या २-३ पंक्ती शेअर करतोय - 

                गुडघे गेले, कंबर गेली,

            नेहमी नेहमी कण्हायचं नाही,

               आता आपलं काय राहिलं?

       हे फालतू वाक्य कधीच म्हणायचं नाही ! 


                पिढी दर पिढी चालीरीतीत,

                थोडे फार बदल होणारच, 

                  पोरं-पोरी त्यांच्या संसारात,

                 कळत नकळत गुंतणारच ! 


                तू-तू, मै-मै, जास्त अपेक्षा

               कुणाकडूनही करायची नाही,

                  मस्तपैकी जगायचं सोडून,

             रोज थोडं थोडं मरायचं नाही ! 


          स्वत:च स्वत:ला समजवायचं असतं,

              पुढे पुढे चालत राहायचं असतं,

                  वास्तू तथास्तू म्हणत असते,

             हे उमजून निरामय जगायचं असतं ! 


        धन्यवाद ! © पत्रकार एन.के. 







       

Monday, 18 September 2023

नात्यांचा ऋणानुबंध आणि समज-उमज !

 लेखनप्रपंच : पत्रकार एन.के. 

   नाते म्हणजे अनेक प्रकारची असतात, नातलग पासून , मैत्री किंवा प्रेमा पर्यंतचे ह्या नात्याना आपण बनवताना केलेली सजावट, भरलेला जिव्हाळा, दिलेला आमूलाग्र स्व बदल आणि वैचारिक फिनिशिंग खूप महत्त्वाचा असतो न त्यासाठी आपण समर्पित केलेलं ही असत, पण कधी कधी क्षणिक अविचाराने झालेला आघात, किंवा क्षणार्धात आपण त्या समोरच्या व्यक्तीबद्दल केलेलं नकोस विचार ह्या नात्यांना तडा देऊन अविरत हव्यासा असणारं हे बंध तोडायला भाग पडत, नात्यात गोडवा, रुसवा हवाच पण क्षणीक असावं, नाते द एन्ड पर्यंत घेऊन जाणार बुद्धीचातुर्य कदापी नसावं...



   धन्यवाद ! ब्लॉग साधारण एक-दिड वर्षे लिखाण बंद असूनही आपला प्रतिसाद हा नक्कीच वाखाणण्याजोग होतं, अशीच आपली सोबत असुद्या ; लेखनाला पुन्हा एकदा सुरवात करतोय - ऋणानुंबधाशिवाय कुणी कुणाच्या आयुष्यात येत नाही ह्या जन्माशी आईचा ऋणानुबंध त्यातूनच आईला मुलांबद्दल प्रेम आपुलकी वाटू लागते मग या ऋणानुबंधाला सुरुवात होते, एखाद्या ओहोळाप्रमाणे हे ऋणानुबंध एकमेकांत कधी सहानुभूती तर कधी खरं अधोरेखित प्रेम वृद्धींगत होत ऋणानुबंधाच्या गाठी तयार होत राहतात. काही निरगाठी तर काही सूरगाठी ! आपले एखाद्याशी उत्तम पटते तर एखाद्याशी कमी मग ते कुटुंब असू देत शेजारी पाजारी मित्रमैत्रीणी हे ऋणानुबंधामुळेच. नात्यात येताना आणि नात्याला नाव देताना आपण अनेकवेळा विचार करतो की माणूस आपल्याला कोणत्या स्वार्थाने जवळ करायचा आहे की स्वभावाने, स्वभावाने जवळ येणारी चिरकाल टिकणारी असतात स्वार्थाने जवळ येणारी माणस संधी साधून नात्याचं बिमोड करतात हे सत्य. आपल्याला हवी असणारी प्रत्येक नाती आपली असतात आणि हे प्रत्येक नात्यातील गोडवा चाखत जीवनचक्र ह्या ऋणानुबंधात अडकत जाते एका नव्या जाणीवेने अस्तित्व टिकवण्यासाठी कारण आपलं अस्तित्वच ही खरी आपली अस्मिता खूणगाठ असते जगण्याची ! ज्यांच्या मधे तुमच्या बद्दल आपुलकी असते जिव्हाळा असतो ते ऋणानुबंध दृढ होतात दोघांतही समान आपुलकीचा धागा असेल तर, कधी कधी ऋणानुबंध विधिलिखीत असतात परमेश्वरी संकेत तर कधी कधी ते असूनही जपताना अडचणी येतात हे ही ऋणानुबंधच...! अशी नाती प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, प्रत्येकाच्या घनिष्ठ बंधीलतेने बनलेली असतात न ही नाती तुटली जाऊ नयेत यासाठी थोडं-फार त्याग समर्पण करण गरजेचं आहे, दैनंदिन आयुष्य जगता-जगता आपोआपच एक साचलेपण येत जातं. जीवनातही आणि नात्यांमध्येही. परिणामी सुरुवातीला घट्ट असणारे ऋणानुबंध सैलावत जातात. प्रसंगी कायमचे दुरावतात देखील. कुठल्याच नात्याची विशिष्ट अशी हमी देता येत नाही, हे खरंच. मात्र ती ‘एक्स्पायर’ होणार नाहीत, इतकी काळजी तर प्रत्येक जण घेऊच शकतो ना...! 

     राहिला प्रश्न अशी नाती जपलं पाहिजे की आपल्यासाठी वेळ काढतात, नड काढतात, धावून येतात, पाठीशी राहतात, ह्या नात्याना तेवत ठेऊन त्या प्रती प्रेम अन जिव्हाळा कायम असुद्या आणि कोणतंही नातं नवं असतं तेव्हा त्यात उत्स्फूर्तता जास्त असते. नवेपणात हवीहवीशी ओढ जास्त असते, त्यामुळे तिथे नातं जपण्यात, वृद्धिंगत करण्यात आपसूकच ऊर्जा जास्त लावली जाते. नातं जसजसं मुरायला लागतं, प्रगल्भता वाढत जाते, तसतशी त्यातली उत्स्फूर्तता नकळत कमी होते. एकमेकांच्या सवयी, स्वभाव अंगवळणी पडतात आणि त्यात तोचतोपणा येत जातो. तिथे लावल्या जाणाऱ्या ऊर्जेत कपात केली जाते, मुद्दाम नाहीच, अगदी नकळत होत जाते. आणि यातून आयुष्यात आलेलं साचलेपण अस्वस्थता देत राहतं. खूपदा याची परिणती विपरीत असू शकते. प्रत्येक व्यक्तीच्या गरजा, आवडी-निवडी, आचार-विचार भिन्न असतात. त्यामुळे सगळेच बदलत्या परिस्थितीत सहज समायोजन करू शकतील, असंही नसतं. पण इथे एक पर्याय असू शकतो, किंबहुना असतो. तो म्हणजे, नात्याच्या वॉरंटीचा कालावधी कसा वाढवता येईल, याचा विचार करणे. नात्यांमध्ये आलेल्या साचलेपणाला घालवण्यासाठी कल्पकतेचा वापर प्रामाणिकपणे करता येऊ शकतो. समोरची व्यक्ती कसा प्रतिसाद देईल, हे आपण सांगू शकत नाही; पण आपल्या सातत्यपूर्ण सकारात्मक प्रयत्नांनी समोरच्या व्यक्तीच्या (व स्वत:च्याही) वर्तनात काही बदल होण्याची शक्यता मात्र नक्की वाढते. नाती ही आयुष्याला मिळालेली मोठी देणगी आहे. ती संपवायला क्षण पुरतो, पण दृष्टिकोनात थोडा सकारात्मक बदल करून आहेत ती नाती मनातून स्वीकारता येतात का ते पाहा, म्हणजे नात्यांमधला तोचतोपणा टाळण्यासाठी क्रिएटिव्ह कसं होता येईल, याचा विचार करा. दैनंदिन गोष्टींनाही नावीन्यपूर्ण पद्धतींनी हवंहवंसं करता येतं. चुटकीसरशी सगळं बदलेल असं नाही. नातं जपणं ही जबाबदारीही कुण्या एकाची नसते. पण मरगळ संपेल, स्वतःला आनंद मिळेल आणि प्रयत्नांना दिशाही. अवास्तव अपेक्षांचं ओझं बाळगण्यापेक्षा/लादण्यापेक्षा जे आहे ते सुटसुटीत करून जपण्याचा प्रयत्न करा. क्रिएटिव्ह होऊन जगण्याचा प्रयत्न करा.


   धन्यवाद ! 

Wednesday, 20 July 2022

रिलेशनशिप : अपेक्षा आणि प्रेम !

 

शिर्षक : रिलेशनशिप : अपेक्षा आणि प्रेम ! 

लेखन : पत्रकार एन.के....✍️

 



 प्रत्येकालाच आयुष्यात प्रेम हवं असतं. प्रत्येकाच्या प्रेमाच्या संकल्पनाही वेगळ्या असतात. पण काही प्रमाणात एकमेकांशी जुळतील अशाच असतात. प्रेमात वय , रंग, रूप अनेकदा पाहिलं जातं, पण खरं प्रेम हे निष्ठेची असावी, विश्वासाची कडा असावी हे खरं.  खरं तर प्रेम करणं अर्थात प्रेमात पडणं खूप सोपं आहे. पण प्रेम केल्यानंतर एकमेकांना ते नातं टिकवून ठेवणं आणि त्या नात्याची काळजी घेणं खूपच कठीण आहे. प्रेमामध्ये पैशापेक्षा किंवा कोणत्याही गिफ्ट्सपेक्षा सर्वात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे एकमेकांंना समजून घेऊन ‘वेळ’ देणे. वेळ नसेल नात्यात तूट अशी अनेक बहुतांश किस्से अनुभूती म्हणून सभोवताल पाहायला मिळतात.  वास्तविक प्रेमात एकमेकांना काही प्रमाणात गृहीत धरणं योग्य आहे. प्रेम म्हटलं की अपेक्षा आल्याच. कारण कोणत्याही दोन व्यक्ती सतत त्याग करून आणि अपेक्षा न ठेवता एकत्र राहू शकत नाही. अशा गोष्टी केवळ चित्रपटांमध्ये घडत असतात. पण खऱ्या आयुष्यात तुम्हाला हे नातं टिकवायचं असेल तर काही गोष्टी आपल्या जोडीदारासाठी करणं हे ओघाने आलंच. आजच्या पिढीच प्रेम म्हणजे  नकळत्या वयात चित्रपट पाहून एक स्वप्नवत जग तयार होतं आणि चित्रपटाप्रमाणेच आपली प्रेयसी वा प्रियकर असावा असं बऱ्याच जणांना वाटत असतं. पण त्याला प्रेम नाही तर अट्रॅक्शन म्हणतात. अर्थात हे सर्वांच्या बाबतीत होत नाही. बरेच जण मनापासून प्रेम करून ते अगदी शाळेपासून असलं तरीही लग्नापर्यंत नेतात आणि सुखाने संसारही करतात. पण स्वप्नात जगणं म्हणजे प्रेम नाही. प्रेम म्हणजे काळजी. प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं. एकमेकांच्या गुणदोषासह स्वीकारणं. असं असल्यानंतर अपेक्षा आल्याच आणि अपेक्षा आल्या म्हणजे त्या पूर्ण न झाल्यामुळे होणारी भांडणही आलीच. पण त्यासाठी आपल्या जोडीदाराला सतत गृहीत धरणं कितपत योग्य आहे? हा प्रश्न तुम्हाला कधी जाणवतो का? खरं तर आपणच बरोबर आणि आपला जोडीदार चुकत आहे असं मनात ठेवलं तर नातं कधीच टिकणार नाही. पण आपण किंवा आपला जोडीदार सतत गृहीत धरत असेल तर असं करणं कितपत योग्य आहे..? म्हणून अपेक्षा जस्ट अ रुल ऑफ रिलेशनशिप असावं बाकी माणूस म्हणून स्वीकारलेल्या गुण दोष सहित जपलं जावं आणि टिकलं जावं यासाठी उद्दात मनाने प्रयत्नशील असावे हे खरं. प्रेमाच्या सुरुवातीला तुम्ही जे म्हणाल ते शब्द झेलण्यासाठी तुम्ही दोघंही तयार असता. मग वर्ष निघून जाताना या छोट्या छोट्या गोष्टी आणि आनंद तुम्ही तुमच्या आयुष्यातून का काढून टाकता? सुरुवातीला तुम्हाला एकमेकांना जिंकून घ्यायचं असतं म्हणून तुम्ही कोणत्याही परिस्थितून वेळ काढून भेटत असता. मग नातं टिकवतानादेखील ही गोष्ट नंतर करणं महत्त्वाचं नाही का? वेळ दिला नाही तर तो किंवा ती समजून घेईल हे सर्वात मोठं गृहीत धरणं असतं. इथूनच सुरुवात होते ती एकमेकांना न समजून घेण्याची. दोघांमधली सामंजस्य का संपत? कुठे निघून जातात एकमेकांना समजून घ्यायचे विचार? परिस्थिती कशीही असो एकमेकांची काळजी घेणं हा प्रेमातील सर्वात महत्त्वाचा भाग. मग अगदी सकाळी उठून गुड मॉर्निंग हा साधा मेसेज करून २ मिनिटं चॅट करणं असो वा दिवसभरातून कामातून वेळ काढून तू काही खाल्लंस का किंवा तू कुठे आहेस, कशी आहेस वा काय करतेस हे विचारणं असो. अगदी इतकंही जमत नसेल तर निदान तिला वा त्याला अपेक्षा असते ती केवळ आपल्याशी बोलण्याची. तेदेखील समोरचा समजून घेईल आपण कामात आहोत हे मनात ठेवून गृहीत धरणं खूपच चुकीचं आहे. प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. बघायला गेलं तर जोड्या अशाच असतात ज्या भिन्न स्वभावाच्या असतात. त्यामुळे एकमेकांना समजून घेण्याची ताकद हवी. पण समोरचा एकच व्यक्ती समजून घेत असेल सतत तर ते नातं फार काळ टिकणं शक्य नाही. मुलं आणि मुली दोघांनाही हे गोष्ट लक्षात ठेवायला हवी. बऱ्याचदा मुलींच्या बाबतीत हे जास्त घडताना दिसतं. मुलांच्या बाबतीत घडत नाही असं नाही. पण मुली प्रचंड प्रमाणात प्रेमात असताना मुलांची काळजी घेतात. त्यांना दिवसभरातून कितीतरी मेसेज करणं, ते कुठे आहेत, काय करत आहेत, जेवले की नाही हे सर्व प्रश्न काळजीपोटी विचारले जातात. ते कोणत्याही संंशयापोटी नसतात. पण त्या मेसेजचे रिप्लाय देण्याइतका अगदी 30 सेकंदाचाही वेळ नसावा हे नक्कीच योग्य नाही. माणूस कितीही कामात असला तरीही त्याला या गोष्टींना रिप्लाय देण्याइतका वेळ असतोच आणि अगदी नसेलच तर तो वेळ काढावा लागतो. तो किंवा ती समजून घेईल हे गृहीत धरणं काही काळापर्यंत नक्कीच तुमच्या नात्यामध्ये काम करू शकतं. पण काही वर्ष गेल्यानंतर हेच तुमच्या नात्यातील भांडणाचं मोठं कारण ठरू शकतं. कारण ज्या व्यक्तीला साधा मेसेज करून बोलायला वा रिप्लाय करायलाही वेळ नाही. त्या माणसावर आपण प्रेम केलं का असे प्रश्न पडायला सुरुवात होते. वेळ हा मुद्दा प्रेमामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो हे तुम्हाला प्रत्येकालाच माहीत आहे. तुमचा जोडीदार तुम्हाला वेळ देत नसेल आणि या गोष्टी तुम्ही सतत समजून घ्याव्या असं त्याला वाटत असेल तर त्याचं हे गृहीत धरणं नक्कीच चुकीचं आहे. कारण त्याला त्याच्या कामासाठी वेळ असतो. तो ज्या घरात राहात आहे, त्या व्यक्तींसाठी कितीही कामातून त्याला वेळ काढता येत असतो कारण त्याला घरात भांडण नको असतं. पण तुम्ही त्याला समजून घेता म्हणून सतत तुम्हाला कारण देत तुम्हाला वेळ न देणं हे कधीही योग्य नाही. नात्यात वेळ देणं आणि एकमेकांसोबत वेळ घालवणं खूप जास्त गरजेचं असतं कारण हेच क्षण असतात जे तुम्हाला अधिक जवळ आणतात. तुमच्या समोर तुमचा जोडीदार इतर गोष्टींसाठी वेळ काढताना दिसत आहे. पण तुम्ही विचारल्यानंतर जर त्याच्याकडे शंभर कारणं असतील तर तुम्ही त्याच्यापासून दूर जाण्याची वेळ आली आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. 
प्रेमाच्या नात्यातही आदर ठेवणं गरजेचं आहे. आपला जोडीदार आपल्या प्रत्येक मताचा आदर ठेवत असेल. पण आपण जर त्याचा आदर ठेवतच नसू तर त्याचं हे असं गृहीत धरणं खूपच अपमानास्पद आहे. आपला जोडीदार आपण म्हटलेली प्रत्येक गोष्ट करायला तयार असतो. पण जर आपण त्याची एकही गोष्ट ऐकली नाही तर कसं वाटेल त्याला? याचा विचारदेखील व्हायला हवा. सतत आपण कामात आहोत, मग नंतर बोलूया, नंतर करतो हे बोलणं चुकीचं आहे. कारण ज्याप्रमाणे आपला जोडीदार कामात असतो तसंच आपणही कामात असूनही त्याची काळजी घेत असतो हे त्याने लक्षात घ्यायला हवे. जोडीदाराच्या जागी एकदा स्वतःला ठेवून अशावेळी विचार करून नक्की पाहा. अगदी त्याने किंवा तिने भावना व्यक्त केल्यानंतर त्यावर योग्य प्रतिक्रिया द्यायला शिका. भरभरून समोरची व्यक्त जर तुमच्याविषयीच्या प्रेमाविषयी बोलत असेल तर तिला चुकीचं उत्तर देऊन नाराज करू नका.

धन्यवाद ! 🌺

Thursday, 17 March 2022

शिर्षक : बोंबलूद्या ! तेवढंच येत त्या कर्मठ बुद्धीला !

 शिर्षक : बोंबलूद्या ! तेवढंच येत त्या कर्मठ बुद्धीला !


लेखन : पत्रकार एन.के.

[ होळी अर्थात त्या संस्कृती आणि परंपरेची जोड म्हणून साजरी केली जाणारी होलीकात्सव, या दिवशी रावणाच्या प्रतिमेला म्हणजेच वाईट विचारांना पेटवून, चांगल्या विचारांची आरास व्हावी यासाठी केली जाणारी ही होळी, मनुष्य प्राणी जितका विचार करतो त्यात कितपत चांगले विचार असतात पाहायला गेलं तर कमबुद्धी विचार जास्त आणि चांगली प्रात्यक्षिक सोडले तर एखाद्या बद्दल चांगली वैचारिक विचारसरणी मात्र शून्य असते, स्वाभाविक माणूस ज्या ईश्वराने ज्या प्रकरतीने बनवलं, तस स्वार्थी टॅग लावून बनवलं असावं अशी घृणा विचार आल्याशिवाय राहवत नाही. होळीला शिमगा ही म्हणतात, शिमग्याला बोंबलल जात पण कधी आपण विचार केलाय का कायम आपण कुठल्या ना कुठल्या विचारांवर, संकुचित वृत्तीवर, अमुक व्यक्तीवर बोंबलत असतो, इतकं असताना आज एक चांगलं विचार त्या होळी अग्नी साक्षीने निर्धार करूया, मनाला पटेल तेच मार्ग, मनाला पटेल असच कर्तव्य, मनाला पटेल असंच वाटचाल वजा वागणूक मग बाकीचे असणारे जळक्या त्या ज्वालाना म्हणा - बोंबलूद्या ! तेवढंच येत त्या कर्मठ बुद्धीला ! ]


  होळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !


                   कृष्ण फाल्गुनची होते सुरुवात,
                   पाहिली जाते पौर्णिमेचि वाट
                  चंद्राचा प्रखर असतो प्रकाश,
                होळी या सणाची होते सुरुवात
             होळी रे होळी, पुरणाची पोळी ।।१।।

         उगवतो नवीन दिवस, उजळते नवी पहाट,
              सुरु होतो मग, रंगांचा वर्षाव
           खूप उधळतो गुलाल आसमंतात,
         येते स्मित हास्य, सर्वांच्या चेहऱ्यात
         होळी रे होळी, पुरणाची पोळी ।।२।।

      आज देशभरात होळीचा सण साजरा होत असतांना मनातील वाईट विचारांची होळी करून संकल्प करण्याचा हा दिवस ,निसर्गाच्या विविध रंगानी जसा फळा फुलांचा दर्पण येतो तसा ,हा ऐक्याचा आणि आनंदाच्या रंगाचा उधळण करणारा सण बहरलेली वने ,पशु पक्षाचा चिवचिवाट, रानातील लयबद्ध संगीत ही मानवी मनावर्ती किती अधिराज्य करतात. हीच खरी होळीची ओळख. निसर्गाने आपल्याला दिलेली जी ऐक्य, सौंदर्य, माधुर्य हे आपण आज खऱ्या अर्थाने जपायला हवं, होळी हा पवित्र सण असला तरीही आपल्यातला रावण अजून मेलेला नाही, आपल्या कर्मातून झालेल्या नुकसानाची होळी अभी बाकी है ! खुप दिवसानंतर लिहिण्याचा योग आला, पण आज काही विषय लिहायला घ्यावं अस वाटलं सायंकाळी बोंब मारण्याचा आवाज कानावर आला मग विचार केला की बोंब मारणारे प्रत्येकाच्या जीवनात असतात आणि ते होळीला नाही तर रोज बोंबलत असतात, आज बोंब मारणाऱ्यांना सणाचं कारण असत, तर रोज बोंब मारणाऱ्याचं वेगळं लॉजिक असत - द्वेष, मोह, मत्सर, जळफळाट हा मुख्य कारण असतो, अन अशी डिजिटल बोंबाच्या बाराखड्या प्रत्येकाच्या उरावर बसलेले असणार हे नक्की. म्हणून आज आपण निर्धार करूया की रोजच्या रावणाला मग आपल्यातला असो इतरांच्यातला पण नक्की संपवू, अर्थात होळी रे होळी मध्ये राख करू.
       मनुष्य इतका हुशार प्राणी आहे की त्याचे रंग इतके असतात ना त्याची गणना आकड्यात करणे अशक्य आहे. रोज नाही तर प्रत्येक क्षणाला , परिस्थिती नुसार रंगबदलू गिरगीट अर्थात माणूस. माणूस केवळ त्याच्या विचारांना उन्नत करून उभारी घेऊ शकतो, जिंकू शकतो आणि सिद्धी मिळवू शकतो. माणूस स्वतःमुळेच घडतो किंवा बिघडतो. विचारांची योग्य निवड व खरा वापर करून तो दैवतत्वाची उंची मिळवू शकतो; तर विचारांच्या चुकीच्या वापराने, दुर्विचाराने त्याची अधोगती पशूंपेक्षा खालच्या पातळीपर्यंत होऊ शकते. दैवत्व आणि पशू या दोन अंतिम धृवांच्या दरम्यान चारित्र्याच्या विविध छटा असतात आणि मानव त्यांचा निर्माता व धनी असतो. चांगले विचार, चांगल्या कृती कधीच वाईट परिणाम आणू शकत नाहीत; वाईट विचार व कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाहीत. विचार शब्द लहान वाटत असला तरी त्याची उंची आणि परिणाम मात्र अभाळाएव्हढं आहेत. प्रत्येकाचे जिवनमान, प्रत्येकाची पारख, प्रत्येकाला मनाच्या कप्प्यात - कक्षेत  समजून घेताना कामाला येणारे सर्वात ताकदवर अस्त्र म्हणजे विचार आहे अनेक वेळा आपण यावर शब्दांकन करून झालेलं आहे. आज ह्या पवित्र सणाच्या निमित्ताने एक निर्धार वजा शपथ घेऊया की मागे बोलणारे प्रत्येकाच्या जीवनात असतात, पुढे गोड बोलून पाठीमागे बोंबलनारे पण हजारो आहेत. त्यांना मनाच्या एका लाईन मध्ये उभं करून कप्प्यात घेऊन मारा म्हणावं बोंब, हात दुखेल पण थांबणार नाहीत कारण वर बोललो ना आपण कारण विचारसरणीचं जर मलीन असेल तर बोंबाटा तो बनता है ना बॉस !
      मग ठरवल ना की, पिछे भोकने वाले कभी आगे आके दहाड नही सकते ! म्हणून प्रत्येक माणूस पकडून चालू, प्रत्येक वयोगटातील व्यक्ती घेऊ, विशेषण असणाऱ्या प्रत्येक चेहऱ्याचा मागे एखादा तर चुगल्या असतो, जळणारा असतो, स्वार्थी नावाच्या रंगाच्या डब्याने रंगपंचमी खेळलेला असतो , मोहाच्या आणि द्वेषाच्या रांगेतून खरेदी केलेली  बुद्धी सत्व माणसं असतात. मग यावर उपाय काय तर एकच आपण लॉयल राहायचं, आपलं कर्म, धर्म, संस्कार कायम ठेवत ठेवायचं, म्हणजे परीणामी आपल्याला सुंदर जगण्यातली रंग मिळतील आणि जिणं सुखाच होईल, मनावरचा अतिभार कमी होईल. जाता जाता एवढं सांगेन...-ज्याने शंका व भीतीवर विजय मिळवला त्याने अपयशावर विजय मिळवला असे समजा. त्याचा प्रत्येक विचार शक्तीने भारावलेला असतो. सगळ्या अडचणींना हिमतीने तोंड दिलेले असते व शहाणपणाने त्याच्यावर मात केलेली असते. योग्य ऋतुमध्ये त्याच्या हेतूंची पेरणी झालेली असते. त्यामुळे ते बहराला येतात. त्यांना अशी फळे लगडतात जी कधीच जमिनीवर पडत नाहीत. शरीर मनाचा गुलाम असतो ... आनंदी आणि सौंदर्यपूर्ण विचारांच्या आदेशाने त्याला तारुण्याची आणि सौंदर्याची झळाळी येते.

        मी,
जमा करतोय आज
तिरस्काराची लाकडं,
मत्सराच्या गोवऱ्या,
हेव्या-दाव्याचं गवत..
होळीत दहन करायचं आहे,
ज्वाळ गगनास भिडवायचा आहे..
तुम्ही करता का थोडी मदत..?
             आज..
जमावायचे आहेत सारे रंग एकत्र,
काळा, पांढरा, लाल, भगवा, निळा, हिरवा इत्यादी..
झाकायची आहे त्याच रंगात..
जात, धर्म, कर्म अन बरचस काही..
फक्त माणूस कळला पाहिजे,
इतकीच सरळ अन् साधी..
माझी मागणी आहे.. ( संकलित )

            - धन्यवाद ! 

Monday, 14 February 2022

व्हॅलेंटाईन डे'ज : प्रेमाचा आठवडा ( पाश्चात्य संस्कृती मधला...! )

शिर्षक: व्हॅलेंटाईन डे'ज : प्रेमाचा आठवडा ( पाश्चात्य संस्कृती मधला... )


  जगात आता प्रेमयुगल असो प्रेमाच्या माणसाला प्रेम व्यक्त करणारा आठवडा म्हणून फेब्रुवारी मधला हा पूर्ण आठवडा व्हॅलेंटाईन डे च्या नावाने प्रचलित होतोय. नवीन तरुण तरुणी असतील किंवा मनात असलेल्या प्रेमाच्या भावनेला व्यक्त करून एक प्रेमळ नात्याला जन्म घालण्याचा आठवडा म्हणून याकडे पाहिलं जातं. गिफ्ट, डेट, भेट, अमुक डे तमुक डे च्या नावाखाली आज कालचे नव्या भविष्याची चेहरे आज एक यशस्वी का अयशस्वी नात्याला हात घालत आहेत याच गणित मात्र न सुटलेल आहे. ह्या पाश्चात्य संस्कृती वर अनुकरण म्हणून भारताची एक साधारण वयोगट किंवा साधारण टक्केवारीचा गट लयास जातोय का , संस्कृती पायदळी तुडवली जात आहे का याची शास्वती मात्र अद्याप अदृश्य आहे. आज खऱ्या मनाने किंवा कुंडली आणि गोतावळा मिळून तयार केलेली नाती कित्येक कोर्टात धूळ खात पडल्या आहेत. असे असताना प्रेम ही संकल्पना खोटी का ? प्रेम म्हणून असणारी सद्भावना संपली का ? नाती आजपण खोट्या बनतात का ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र नक्की नाही असेल पण ओघाच्या काळोखात कित्येक नाती बनतात आणि मनाला ठेच लागून दुर्दैवी दुर्घटनेच्या शिकाराला बळी पडत आहेत, पडतात तेही तितके महत्वाचे. मग याचे अनुकरण करावे किंवा नाही ? किंवा कितपत योग्य आहे याची खात्री करायला ही तितकेच महत्त्वाचे आहे. जगभर आपल्याला हीर-रांझा, रोमिओ-ज्युलिएट, लैला-मजनू जोड्या प्रत्येक संस्कृतीत सापडतात. या मानवी भावनेवर कित्येक प्रेमकाव्ये, प्रेमपत्रे, नाटके जगात लिहिली गेली आहेत. हत्या-आत्महत्यासुद्धा झालेल्या आहेत. म्हणजे स्त्री-पुरुष प्रेम किंवा आकर्षण हा कुणा एका संस्कृतीचा मक्ता नाही. याचा अर्थ ही भावना बायालॉजिकल आहे. ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातील या आठवड्याला आणि १४ फेब्रुवारी या दिवसाला खूप महत्त्व येऊ लागलंय. प्रेमाच्या या दिवसाने तरुणाईला वेड लावलंय असंही म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अगदी ठरवून या दिवशी कुणी प्रेमात पडत नाही, मात्र तरीही वर्षभर याची तयारी सुरू असते. मग गुलाबाची फुलं, गिफ्ट्स, भेटकार्ड, भेटवस्तू काय द्यायचा या गोंधळात तरुणाई गिफ्टशॉपमध्ये दिसतेच. खरंतर वर्षाचे ३६५ दिवस हे प्रेमाचे असतात पण व्हॅलेंटाइन डे की बात ही कुछ और है! अस म्हणत एक नवी पिढी वेगळ्या संस्कृतीला दृढ करत आहे म्हंटल तर वावग ठरणार नाही. यापेक्षा या पिढीला एक चांगल्या आणि सज्जड समज असो वा खऱ्या व्हॅलेंटाईनची ओळख करून देणे भविष्यात किंवा आता सध्याच्या काळाची गरज पालकांना आहे असे म्हणावे लागेल अन्यथा अनेक अशी कारणे, अनेक घटना, अनेक असे अनपेक्षित तात्पर्यना सामोरे जावे लागेल हे नक्की.
     आज पण आपण आपल्या पाल्याला म्हणून किंवा किशोर वयातल्या हरेक त्या कपलला आता समज देऊन अशा संस्कृतीच अनुकरण करायला बंद करायला हवं अन्यथा नको असलेल्या लाक्षणिक नात्याने अनेक कुटुंबाची डोकेदुखी वाढवू शकते. खऱ्या अर्थाने व्हॅलेंटाईन म्हणजे काय याची प्रचिती अजून कुणाला आली असेल का नाही माहीत नाही आठवडा भर तयारी इ. असणारी ही मुलं नक्की करतात काय आणि कोणत्या कल्पक गोष्टीकडे वाहिली जाताहेत याच गूढ मात्र मनात कायम असत..!
  जसे की कुणीतरी आपल्याला विशिष्ट दिवशी गिफ्ट देणं, आपणही कुणाला तरी एखादी भेट आठवण म्हणून देणं अशा संपूर्णपणे भौतिक असणाऱ्या घटकांचा सध्याच्या जगात बोलबाला दिसून येतो. भेटवस्तू देणं नक्कीच चुकीचं नाही तरीसुद्धा अशाप्रकारेच प्रेम व्यक्त केले जाते किंवा तसेच ते सिद्ध केले जावे हा अट्टाहास चुकीचा नाही का? अशा भेटवस्तू किती दिवस या भावनेला न्याय देऊ शकतील? मला वाटतं, फक्त काही दिवस किंवा फार तर त्या वस्तूचा वापर होतोय तोवरच. सतत "लव्ह यु" म्हणून जर प्रेम सिद्ध होते असा समज असेल तर तो गैरच आहे. कारण या दोन शब्दांचा फक्त आधार घेतला गेलेला असतो. खरी भावना तर यापासून कोसो दूर असलेली दिसते. "लव्ह यु" या शब्दाने जर प्रेम अबाधित रहात असते तर समाजातील शेकडो प्रेमविवाह मोडलेच नसते बरोबर ना..?
   प्रेमाचं ना टिकवायच असेल तर एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात खूप जास्त खोल प्रेमाची भावना रूजलीय तर तिची खोली तितक्याच उत्स्फुर्तपणे बाहेर उफाळून यायला हवी ना? मुळातच प्रेमाची भावना ही पवित्र आणि उदात्त अशी असल्याने तिचे महत्त्व फार उच्च आहे. तिला भौतिक गोष्टींचा आधार द्यावा लागत नाही. ती कोणत्याही नीती-मुल्यांच्या पाशात अडकणारी नाही. सामाजिक मान्यतांच्या पल्याड जाऊन ती आपले अस्तित्व टिकवून ठेवताना दिसते. तिच्यावर, त्याच्यावर किंवा आपल्या इतर कोणत्याही नात्यावर आपले खूप प्रेम आहे हे वेळोवेळी, अगदी छोट्या छोटया प्रसंगातून समोरच्याला जाणवले पाहिजे. याचा अर्थ असा नाही की, सतत आपल्या प्रिय व्यक्तीच्या संपर्कात राहिलेच पाहिजे. परंतु त्या "व्हॕलेंटाईन" असणाऱ्या व्यक्तीसाठी दिवसातला किमान वेळ तरी फक्त त्या व्यक्तीचासाठीच असायला हवा ना? आपल्या प्रिय व्यक्तीची एखादी लहानशी आवड लक्षात ठेवून ती योग्य वेळी पूर्ण केली तरी  ते समोरचे मन आनंदाने नाचू लागते.
    आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात. आपण ती लिलया सांभाळत असतो. तरीही प्रत्येकाच्या मनात एखादी "खास" अशी व्यक्ती असते तर तिला तशीच "#खास" वागणूक मिळायला हवी ना? इतरांपेक्षा थोडे जास्त महत्त्व त्या व्यक्तीला असायला हवे ना? परिस्थिती कशाही असोत, जर आपण आपल्यासाठी "खास" असणाऱ्या व्यक्तीसाठी "लव्ह यु"च्या पलिकडे जाऊन तिला जपत असू, पैसा, गिफ्ट किंवा तत्सम भौतिक गोष्टींना वगळून आपण तिच्यासाठी प्रेमभाव प्रदर्शित करत असू, त्या व्यक्तीचे मन समजून घेत असू तर ते खरे प्रेम असेल. अशा नातेसंबंधात हक्क आणि कर्तव्य यांची सहजसुंदर सांगड घातलेली असावी. मग अशा प्रेमाच्या नात्यात "लव्ह यु" आणि "हॕप्पी व्हॕलेंटाईन डे" म्हणण्याची गरजच पडणार नाही. कारण जगातील सर्वात महत्त्वाची, अमूल्य अशी गोष्ट असते ती म्हणजे आपण समोरच्या प्रिय व्यक्तीसाठी खर्च केलेली वेळ. जर ही वेळच आपण देऊ शकत नसेल तर बाकी सर्व गोष्टी गौण ठरतात.म्हणून एक सात्विक विचार घेतला तर व्हॅलेंटाईन हा आपला सण नव्हे, करायचा आहे साजरा तर कायम नात्याच्या महत्वकांक्षा बघून व्यक्त व्हा..! 
      म्हणून इतकंच सांगतो, आपल्या कोणत्याही नात्याला काही द्यायची इच्छा असेल तर आपला थोडासा वेळ, खास तिच्यासाठी, त्या माणसासाठी, त्या वस्तूसाठी, त्या नात्यासाठी राखून ठेवला तर ते नाते चमकून उठेल. प्रत्येकाने असा प्रयत्न एकदा करूनच बघा. तुम्हाला कोणतेही स्पेशल डे साजरे करण्याची गरज पडणार नाही.


  लेखन : पत्रकार एन.के.
  मोब. ८८०६६०५८५२

Tuesday, 4 January 2022

व्यसन : मोबाइलचं !

 शिर्षक : व्यसन मोबाईलचं !

लेखन : पत्रकार एन.के. ( ०४ जाने २०२२ )
  


       व्यसन म्हंटल की डोळ्यासमोर अनेक मद्यजन्य पदार्थ तरळतात पण आजकाल सगळ्याच वयोगटातील लोकांचं एक मौखिक तथा आपण सर्रास म्हंटल तर एक व्यसन "मोबाईल".  एखाद्या गोष्टीच्या अति आधीन जाणे म्हणजेच व्यसनाधीन होणे.चांगले असो अगर वाईट,परंतु प्रमाण जास्त वाढले म्हणजे त्याचे रुपांतर व्यसनात झाले.मोबाईलला हात लावला म्हणून नवऱ्याने बायकोला बेदम मारले,ही बातमी टीव्हीवर पाहिली आणि या मोबाईल नावाच्या मानवचलित यंत्राने माणसाच्या जीवनात केलेल्या आगमनाने माणसाला लागलेले त्याचे व्यसन,हे नक्कीच जीव घेणे आहे,असे वाटू लागले.ज्या महापुरुषाने मोबाईलला जन्मास घातले तो धन्य. मोबाईलनं लोकांना"विनाशकाले विपरीत बुद्धी"असं झालंय.लोकांची बुद्धीसुद्धा बिथरली.अगदी वयोवृद्ध मंडळी सुद्धा याला अपवाद राहिली नाही. लोक एकवेळ पायात चप्पल घालायची विसरतील,अंगात शर्ट घालायला विसरतील,पण मोबाईल मात्र हातात किंवा खिशात असल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकण्यास धजावणार नाहीत आणि चुकून मोबाईल जर विसरला तर आयुष्याचा जोडीदार हरवल्यागत हुरहूर मनाला लागावी,एवढा प्रत्येकाला याचा लळा लागला आहे.या निर्जीव वस्तूनं माणसाला प्रमाणापेक्षा जास्त आपलंसं केलं आहे.लोकांना अन्नपाण्यापेक्षाही याचा मोह जास्त वाढू लागला आहे. मोबाईलच्या अनेक किस्से आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात जितकं चांगलं आहे तितकंच अनेक अक्षरजंजाळ असलेली ही वस्तू अनेकांच्या मदतीला नक्की येते पण घातक सुद्धा तितकीच आहे. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे नैतिक नाती, जिवंत नाती दुरावत आहेत हे तितकेच सत्य.  संपर्क आणि इतर महत्त्वाचे कामासाठी वापरले जाणाऱ्या ह्या साधनाचा अतिरेक होऊन मृत्यच्या दारात घेऊन जाणारा एक प्रवासी साधन म्हणून मोबाईल हळूहळू उदयास यायला लागला आहे अस म्हंटल तर वावग ठरणार नाही. अनेक खेळ, अनेक ऑनलाइन ठग, पब्जी सारख्या खेळामुळे अनेक घटना घडलेल्या आपण पहिल्या असतील. शेवटी एवढंच म्हणावं लागेल की मोबाईल जेवढ हवं तेवढं वापरा अतिरिक्त वापर कधी कधी माहीत नसलेल्या आजाराचं आमंत्रण ठरू नये तर मिळवलं.
मोबाईलसारख्या एवढ्या छोट्या वस्तूनं आज मानवाचा एवढा विकसित मेंदू असूनही त्यावर कब्जा मिळवला आहे.मग प्रश्न असा पडतो,की मानवाने मोबाईलला निर्माण केले,की मोबाईलने मानवाला.आपण तयार केलेल्या वस्तूच्या आपण आधीन जात असू तर आपल्या बुद्धीची वाटचाल कुठे होते आहे,हेही ध्यानी घ्यायला हवे.आपणच निर्माण केलेली वस्तू आपल्यासाठी हानिकारक ठरत आहे.या व्यसनातून बाहेर येण्यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे.नाहीतर घोडामैदान समोरच आहे आणि त्याचे परिणाम अल्पावधीतच प्रत्येकाला कळणार आहेत.त्याकरिता आपला सावध पवित्रा असावा म्हणजे ही एक भविष्यात येणाऱ्या संकटांची चाहूलच आहे.मोबाईलचा गरजेपुरताच वापर करा‌.अनावश्यक फोटोज,व्हिडिओज,पोस्ट टाकणे आणि पाहणे टाळावे.विनाकारण फालतू गेम खेळत बसणेही नक्कीच धोक्याचे आहे.जवळजवळ बहुतांश व्यक्ती या व्यसनात अडकून पडल्यामुळे एक दिवस आपले स्वास्थ्य गमावून बसणार आहेत.त्याकरता वेळीच खबरदारी घ्यावी.आजपासूनच चारतास मोबाईल पाहणाऱ्यांनी दोन तास,दोन वाल्यांनी एक तास वापरावा,तर एक तास पाहणारांनी अर्ध्या तासात कसं आटोपते घेता येईल याचा प्रयत्न करावा.तरच आपण भविष्यात आनंदी आणि समाधानी जीवन जगू व इतरांनाही जगू देऊ हे निश्चित आहे.

   धन्यवाद !
  

Monday, 30 August 2021

कर्माचं श्रेष्ठत्व...!

 जगण्यातल्या : कर्माचं श्रेष्ठत्व..!




         म्हणतात ना की आपले काम ज्यामुळे आपले पोट भरते, ज्यामुळे आपल्या कुटुंबाचे गुजराण होते त्याला कायम श्रेष्ठस्थानी मानणं हे आपलं प्रथम आद्य कर्तव्य आहे तथा असावे. अनेक जण आज परिस्थिती मुळे असो अथवा शिक्षण असो यामुळे एक सुनिश्चित कामापासून वंचित असतात पण काहींना ते मिळालेल असत त्यात समाधान मानणे अवघड जात असते. परमेश्वर आहे किंवा नाही हा भाग जरी दुसरा असलं तरी ही आपल्या अंतर्गत कृपेने, श्रद्धेने आपल्याला अर्धी भाकरी नशीब होते त्याला सोनं समजून त्याची प्रामाणिक चव चाखणे अर्थात प्रामाणिक पर्वाचे साक्षीदार होणे. वैध की अवैध आपल्या हातात जितक असत त्याहून अधिक आपल्या येणाऱ्या किंवा वर्तमान काळ ठरवतो की आपण कसे वागले पाहिजे, मनुष्य म्हणून प्रत्येक क्षण परीक्षेचा आहे, आणि त्यात अभ्यास करून उत्तीर्ण होणे म्हणजे त्या क्षेत्रात पारंगत होणे असे मानावे. भाग्य आणि कर्म ह्या आपल्या जगण्यातील महत्वाच्या दोन दुवा असल्या तरीही आपल्या वाटेस आलेल्या त्या फलप्राप्तीला आपले कर्मच जबाबदार असतात. याच एक उत्तम उदाहरण म्हणून नमूद करू इच्छितो की आपण आता ह्या क्षणी कोणत्या पदावर, कामावर, कर्तव्यावर आहोत हे जर फळ असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे आपले भूतकाळ मधील संघर्षमय कर्मच जबाबदार असतात. आपली बौद्धिक क्षमता अशी विचाराधीन असते की आपल्याला आपल्या विरोधातील लोक, जे आपल्या मनाशी जुळत नाही ते लोक आपल्याला कुठून तरी किंवा कायम टोचत असल्या सारखं सुखी वाटतात. जगात अशी चांगली माणसं ही आहेत जी चांगल्या प्रतिसादाला चांगलं आणि काही जण चांगल्या प्रतिसादाचा वाईट परतावा देणं धन्य मानत असतात. कधी कधी आपण चांगलं काम करतो आणि त्याच फळ वाईट मिळत त्याला आपण अपयश किंवा कायम त्या परताव्याचा मनधारणीला सत्य मानून बसतो अस न करता या उलट आपण एक सुंदर अनुभव म्हणून घेऊन चांगल्या कामाचा पाढा सुरू ठेवणे अर्थात शहाणपण.
     कर्मा इज मोस्ट इंपोरटंट म्हणतात तस कर्मच आपल्या जगण्याच्या प्रत्येक सुख दुःखाचा अविभाज्य घटक असतो. अस असताना एक साहजिक प्रश्न पडणं गरजेचं आहे भाग्य महत्वाचं की कर्म ? मग एकच उत्तर सापडत ते म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या वाटेल आलेल्या त्या प्रत्येक कृतीतून आपल्याला मिळालेल यश आणि आपल्या वाट्याला येणं अर्थात आपलं भाग्य...! #सुंदर कर्माचे साक्षीदार व्हा..! #आनंदी राहा....!
    
        लेखनप्रपंच : पत्रकार एन.के. ( ८८०६६०५८५२ )
       तारीख : ३० ऑगस्ट २०२१, वेळ : १०:३०