Monday, 5 August 2019

सुखाच्या रस्त्याची शोध मोहीम...!

शिर्षक :- गड्या सुखाचा रस्ता लय खडतर हाय र...
लेखन :- एन.के. (पत्रकार)
मोबा - ८८०६६०५८५२


"जुबानी जिंदगी की ना सुनो गैरोसे जीना तो अपने को है, जीना क्या होता है औरोसे क्या पता चलेगा चलना तो अपने को है...!" जीवनाच्या वाटेवर चढ उतार पाहणारे आपणच आपल्या जीवनाचे खरे वाटाड्या, दिशादर्शक असतो. जगण्याच्या पंक्तीत तुम्ही आम्ही फक्त आलेल्या रस्त्याला पार करत जायचं असतं, बाकी होणाऱ्या अपघाताला आपल्या मनाने बाजूला करता आलं तर बरं. नाही तर अपघात हे ठरलेलं आहे. कारण सुखाच्या पाठी लागलेल हे जग कुणाच्या ठेच लागण्याला कुणाची कदर करत नसते. इसलीये केहते है की- सुखाचा रस्ता लय खडतर हाय गड्या म्हणून जगा असे अभिमान वाटल पाहिजे, रहा असे की कौतुक वाटलं पाहिजे. हा पण लाईक्स साठी नाही तर जगासाठी जगायचं यासाठी कोणता रस्ता धरायचा थोडक्यात...
कुणाच्या जगण्याच्या रेषेवर आपण जळून चालत नाही तर त्याउलट आपण जर चांगली रूपरेषा असेल तर आनंद घ्या आणि सोबत अनुभव, जर रूपरेषा वाईट असल्यास न जळता त्या रेषेला कानाडोळा करा अगर दुर्लक्ष करा. पण आपण ज्या अर्थी एखाद्याला चांगलं देतो तेव्हा उलन का होईना आपल्याला चांगलं मिळणार हे लक्षात ठेवून जगा. पण आजच्या या बाजारात प्रत्येक माणूस स्वार्थी तर बनला आणि स्वतःच्या स्वार्थाला तात्पर्य म्हणून सुखाची आस धरून बसला आहे मग कसं जगणं पूर्ण होणार कारण स्वार्थाची जोड धंदा घेऊन कुणाचं प्रॉफिट झालं नाही. म्हणून आपलं बजेट नेहमी सर्वार्थाला अर्पण असलेलं असावं म्हणजे ही भाषा जरा धार्मिक झाली पण नक्कीच रुचणारी आहे म्हणून शब्दप्रयोग केला मी. म्हणजे माझ्या सांगण्याचा आणि विचाराच्या एक रस्त्यावरून अनुभवाची शिदोरी घेऊन निस्वार्थ भावनेने केलेले सदकार्य हेच तुम्हाला सुख नावाच्या महालकडे घेऊन जाणार आहे.
साधारण विचार करू आपण अनेक सोशल मीडिया बघत असतो वापरत असतो तेव्हा एखादे चांगले काम असेल तर आपण लाईक सहज करून जातो; पण कधी एस.टी. स्टँडवर मागायला आलेल्या चिमुरडीला कधी १-२ रुपये सोडलं तर कधी खायला दिलं तर कीती समाधान वाटत एकदा नक्की अनुभवा. आणि अगदी स्वच्छन्द मनाने करा बर कारण आज काल ट्रेंड झालाय त्याच्यापण काही गरिबांना जेवू घालून व्हिडीओ करून Tiktok वर अपलोड करायचं. आणि लाईक्स मिळवायच्या असे नको मनात आलं म्हणून नाही तर मन मोठं करून मदत करा आणि मग बघा समाधान कस असत ते आणि एक सांगू का ह्या समाधान शब्दात जितकी ताकद आहे न ते असलं ना तर सुख मुबलक आहे हे विसरू नका. निजी जीवन जगणाऱ्या तमाम जनसमुदाय बघतो आपण कुणाला कुणाची कदर नसते, कुणाला कुणासाठी वेळ नसतो, कोण आलं, गेलं, काय तर कोण मेल हे ही विचार न करणारे आजचे हे लोक आजचा हा कलियुग म्हणून आपल्या कर्माला कोणी तात्काळ फळं देवो न देवो "देव" देईल या आशेने का होईना सुंदर आणि क्षणिक सही पण मदत, दान, धर्म, प्रेम, जिव्हाळा, नातं, मैत्री ही जी पान आहेत ना ती दिवसातून एकदा तरी गरजू साठी बाहेर काढत जावा. समाधान मिळेल आनंद मिळेल आणि यातच सुखाची व्याख्या लपलेली आहे. म्हणतात ना *"येताना मोकळे हात घेऊन आलेलो न जाताना ही मोकळं जायचं असत...*"
जाता जाता सांगून जातो - रीती, रिवाज, रूढी, परंपरा जपा त्यात अभिमान आहे आपल्या देशाचा चेहरा आहे तो. ईदला- गले मिलो, दिवाळीला - चाचाला पुरणपोळी भरवा यातून मिळणार स्नेह, बंध, मैत्री, नातं शब्दाच्या पलीकडे आहे. सोळा सोमवार, सतरा-साठ व्रत-उपवास करून कोण आज पर्यंत सुखी झालं नाही ना मोठं झाले...! फक्त निर्मळ मनाने प्रत्येक वाईट-चांगला प्रत्येकाला त्याच्या पेक्षा किंचित का होईना प्रेम द्या. गरजुला मदत दान द्या. आणि घरी, आई-वडील यांना कुटूंबाला वेळ द्या, मग त्यानंतर बघा आनंद कसा फुलतो. आणि एकदा आनंद असेल तर सुखाचा रस्ता कितीही खडतर असुद्या अलगद पार होत आणि "सुख" आपल्याच पारड्यात...!


धन्यवाद...!

No comments:

Post a Comment