Tuesday, 3 September 2019

नात्यांचा रिचार्ज...

लेख शिर्षक :- रिचार्ज नात्यांचा : लाइफटाइम विथ अनलिमिटेड

【 नाते तोडताना १०० वेळा विचार करा की आपण हे नातं निर्माण का केलं, आणि इतके दिवस का टिकवलं...?, प्रेम करणारी प्रत्येक नाती आणि एक व्यक्ती व्यथित जीवन म्हणून जगण्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने वाचावं अस लेखन बाय मी...】

लेखन - पत्रकार एन.के.

माणसाच्या आयुष्यात जगणं म्हणजे काय हे अजून प्रत्येकाला उत्तम उमजल आहे असे नाही. कारण कोणताही मनुष्य असो किंवा व्यक्ती ती आजही जगण्याच्या शोधात अर्थात सुखाच्या शोधात आहेत हे नक्की. आपण दैनंदिन जीवन जगत असताना कधी सुरवात तर कधी एन्ड ला घेऊन नाराज होतो आणि दिवसभरच्या कष्टाने कमावलेल्या आनंदी क्षणांना क्षणात दूर करून जातो. जगण्याच्या पंक्तीत आजही माणूस हा प्राणी भुकेला आहे मग ते धन, दौलत असो किंवा सुख यासाठी माणूस आजही कष्टाच्या झाडाखाली वास्तव्य करत आहे.
नात्यांची सांगड घालताना मनस्वी आणि कल्पक नात्यांची पाखरण होते. मनस्वी नाती तात्पुरती नसतात तर काळजी करणारे असतात, आपल्याला आपल्या राहणीमान बद्दल उद्देशून संबोधणारे असतात, आयुष्यभराच्या सोबतीनं जगण्याची कमिटमेंट करणारी असतात, पुढच्या व्यक्तीच नातं चिरकाल टिकाव यासाठी धडपडणारी आणि प्रसंगी जीवाचे रान झाले तरी नात्याला गालबोट न लावणारी ही मनस्वी नाती जी आज विश्वासाने आणि मानापासून प्रेम बंधनात तर कुठं एक आई-वडील, भाऊ-बहिणीच्या नात्यात त्यांची प्रखरता दिसते. तर याउलट कल्पक नाती म्हणजे फक्त नात्याला आपल्या आवेश आणि भावेश मध्ये गुरफटून स्वार्थी आस धरून टिकवली जाणारी ही नाती, सुदंर दिसण आणि सुंदर असणं याच काडीमात्र स्पर्श न घेता निवळ आकर्षणाच्या मुद्द्यावर कामपूरता मामा म्हणून जपलेली नाती म्हणजे कल्पक नाती असे संदर्भीय नातीचे प्रकार आज मानवाच्या जीवनात पाहायला मिळतात.
जीवनाचा प्रवास सुखाचा चालेलल असत पण या प्रवासात सोबत म्हणून असणारी घरची नाती एका बाजूला आणि आपल्या असणाऱ्या मनातल्या विविध आशा आणि वैचारिक जगण्याला खत पाणी घालून काळजीने रोपटं मोठं करणारी नाती आपल्याला मिळतात. विश्वासाच्या झाडाची उंची खांद्याच्या वर गेली की मग ते नात घट्ट आणि चिरकाल टिकणार म्हणून गणले जाते. आपण बनवलेली नाती ही वेगळ्या उंचीची असतात त्या नात्यातील पुढच्याच मन धरणी करून जगणं आणि त्याच्या पुढ्यात असलेली आपली चांगली प्रतिमा मलीन न होऊ देता त्याला जपून त्याची निगा राखणे म्हणजेच नात्यांची जोड मजबूत करणे. काही वेळा असे घडते की लहान सहान गोष्टी चुकीच्या घडतात तेव्हा ह्या नात्यात असणाऱ्या परामर्शला खंत वाटून जाते तेव्हा ही नाती समजून उमजून आपल्याला पर्यायी मार्ग निर्माण करतात जेणेकरून ही बनलेल्या नात्यांना तडा जाऊ नये म्हणून राग रुसवा फुगवा निर्माण होतो पण त्या रागाच्या आणि फुगव्याच्या पाठीवर एक प्रेम , जिव्हाळा लपलेलं असत आणि हे तेच सांगत असत की नातं जपलं का ? नात निर्माण का केलं ? आज चूक तुमची असो वा त्यांची पण त्यामुळे झालेला अंतर्गत खेद नात्याला पटरीवरुन खाली खेचतो आहे का ? याची सांगड घालून ते हक्काच नात कायम उत्तम राहावं यासाठी प्रयत्न करून त्यात पुनः प्रेम भरून जोमाने जगणाऱ्या नात्याला समानार्थी शब्द म्हणजेच ही मनस्वी नाती.
म्हणून ज्या नाती आहेत त्यांची कदर करा आणि त्याला अधिक सुंदर बनवा आणि सोबत राहा, जस आपल्याला नात हवं तसं घडावा न कायम सोबत करा कारण की आपण सगळेच निसर्गाचा समताेल ढासळसाय, शुष्क झालाय असं म्हणून जातो पण आपल्या अंतर मनाचा निसर्गही असाच झालाय ह्याची खंत आहे का? भावनांचे ऋतु व्यवहारी झळांमुळे कसे झाकाेळून गेलेत, काेरडे झाले आहेत ह्याची आपल्याला जराशी जाणीवही नाही.जे अंतरंगी घडतयं तेच बाहेर प्रतीत हाेतयं...हे आतले ऋतु जेव्हा पुन्हा भावनीक शिंपणांनी बहरतील,जेव्हा हे हक्काचे आणि मनापासून बनवलेली नाती जपण्यासाठी धडपडले जातील तेव्हाच बाहेरच्या निसर्गाच्या प्रतीची संवेदनशीलता वाढेल आणि त्याची काळजी घेतली जाईल.
म्हणून जाता जाता एक चार ओळी ( संकलित )
"कुणी काहीही म्हणाे प्रेम तुम्हाला एक व्यक्ती म्हणून खूप बदलतं. तुम्ही प्रेमात पडण्याआधी जसे असता , प्रेमात पडल्या नंतर मात्र तुमच्या आेळखीच्या खूणा तुम्हालाच शाेधाव्या लागतात. प्रेम यशस्वी ,अयशस्वी असं कधीच नसतं ते फक्त असतं. अशी व्यवहारीक परिमाण त्याला लावू नयेत. सगळ्या व्यवहारी शृंखला प्रेमात सहज तुटल्या जातात...अहंकार, राग, हेका ह्या भावना प्रेमापुढे नतमस्तक हाेतात. जपणूक , काळजी ,आठवणींमधे 'मीपण' कधी गळून पडतं ते कळतच नाही....आपण एकच गाेष्ट जाणताे ती म्हणजे आपलं कुणावर तरी प्रेम आहे...आणि ते खूप सुंदर आहे...!"


धन्यवाद ! मो.- ८८०६६०५८५२

No comments:

Post a Comment