Saturday, 30 November 2019

खरा रावण अजून जिवंत आहे...!

शिर्षक :- खरा रावण मेलाच नाही..!

लेखन :- पत्रकार एन.के.- ८८०६६०५८५२

⚫ Justice For Nirbhaya_Priyanka ⚫



[ आई ! प्रत्येकाच्या आयुष्यातला पहिला शब्द. प्रांत, देश, राज्य, गाव अनेक तर धर्म, जात, पंथ, बोलीभाषा अनेक पण मानव प्राणी हा एकाच प्रजातीचा आणि त्याचा जन्म हा एक महिले कडून होते न त्याला आपण आई म्हणतो. मातृत्व दिल्यावर जगाची पारख झालेले आपण जगाच्या बाजारात हमीभाव मिळवून रॉयल जगण्यात तिची ती ९ महिन्याच्या त्रासाला बायपास देऊन इतरांच्या आया, बहिणी कडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत करतो ? इतकंच नाही तर लचके तोडायच्या संधीला धन्यता मानून अमानुष बनून जातो. एवढी नीच प्रवृत्ती कशी निर्मित होते ? कसे बनतात हे नराधम ? बनतात पुनः तर दरवर्षी दसऱ्याला रावण जळून पण उरतो कसा...?
         लेख यासाठी लिहीत आहे की, देशात राहायचं तर का ? कशासाठी ? भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल म्हणजे झालं का ? नराधम अजून तयार होत आहे सावधान आणि सतर्क राहा. रात्र वैऱ्याची आहे. आज जगाच्या पाठीवर महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. हम भी कुछ कम नही म्हणून समाजात आपला आदर्श निर्माण करतात आणि जगतात. अस कोणतं क्षेत्र नाही की जिथं महिला काम करत नाहीत. एवढंच नाही तर देशाचं नेतृत्व केलेल्या महिलांचा उदाहरण, धाडशी संस्था, कार्य करणारी महिला अधिकारी वर्ग पाहिल्यावर प्रत्येकाला आपल्या देशाचा हेवा वाटेल इतकी महिला शक्ती आज देशात आपल्याला वर्तमान आणि भूतकाळात पाहायला मिळत. एक महिला उभी राहिली म्हणून राज्य गुलामगिरी मधून बाहेर आल, महिला सोबतीने समाजाची घाण अंगावर घेत शिकवली म्हणून आज सगळ्यांना अक्षरांची ओळख झाली. महिला इतकी सक्षम आहे. तशीच एक स्त्री जी आपली आई, बहीण, बायको च्या रुपात आपल्या आयुष्यात असते किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात असते मग प्रत्येकाच्या ती मुख्य भाग म्हणून जगण्याची आणि देशाची रण रागिणी आहे तर देहावर नजर टाकणारे कोणत्या उदरातून जन्माला आले ? आरोप प्रत्यारोप, श्रद्धांजली, जस्टिश हे ते नको ढीगभर प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या... कोपर्डी नंतर चिमुकली असिफा नंतर हे ताज उदाहरण प्रियांका रेड्डी प्रकरण बघून मन छिन्न झालं. काय गुन्हा होता त्यांचा मुलगी म्हणून जन्माला आली म्हणून ? का राक्षसाची भूक भागवायला ? गेंड्याच्या शिंगाला खाज सुटली म्हणून खाजवून घ्यायला जन्म घेतला का त्यांनी ? आजही अशा प्रकरणांनी त्या नराधमाच्या जन्म प्रक्रियेवर लाज वाटते कोणत्या सिस्टीम मधून जन्म घेतले असतील हे ? नराधमांना शिक्षा करायला ही सरकार तयार नाही. लाचार मीडिया आपली लोणी खाण्यात व्यस्त तर तळव्याचाटु नेत्यांनी आपली आरोप प्रत्यारोपात त्या पीडितांची खोटी सहानुभूती घेऊन उभे ठाकले हे सर्व चित्र आज आहे हे बदलणार कधी ? रावण अर्थात मारणार कधी ? निष्पापांच्या अंगावर पडणारे ओरखडे थांबणार कधी ? अजून किती निर्भया, असिफा आणि प्रियांका बघणार आहोत आपण ? कठोर शासन का होत नाही ? अशा नराधमांना भर रस्त्यात नग्न करून हात-पाय कापून धिंडवडे काढून नॉयलॉनच्या दोरीने गळ्यातला स्वास शांत होईपर्यंत ओरखडे का दिल जात नाही...? 

माझी ओळख तेव्हाच संपली,
फक्त "निर्भया" म्हणूनच उरली,
आता मरणाची आस मनी धरली,
शंभर वर्षे तर केव्हाच भरली....!!

... आपली आई, बहीण, बायको जिथं कुठं कामाला जात असेल, शिकायला जात असेल तिच्या बद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आज मनापासून काळजी वाटते आहे हे सत्य. आजपासून संध्याकाळ झाली की १० कॉल झाले तरी चालेल पण काळजीपोटी चौकशी करत राहू अशी शपथ घ्या. समाजात जगायचं असेल तर फक्त नाव, पैसा पुरेस नाही तर आज भीतीची गरज आहे. भीतीने बचाव म्हणून सतर्क राहून कार्य करा, राहा, जगा. कारण दरवर्षी दसऱ्याला रावण जळतो पण जळताना हसत मरतो कारण त्याला माहिती आहे. हा मनुष्य मला जरवर्षी जाळतो पण मी कोणत्याही स्त्रीला स्पर्श देखील केला नाही, आणि हास्य यासाठी करतो आणि म्हणतो आज मला जाळलं पण तुमच्यात अजून रावण शिल्लक आहे. म्हणजे खरा रावण जिवंत आहे. तो मेलाच नाही. फक्त कधी निर्माण होईल कुणाला माहीत नाही इतकच, म्हणून काळजी घ्या स्वतःची...!

       जाता जाता एवढंच सांगेन जगात प्रत्येकाला आई आहे, जगात प्रेम आहे जिव्हाळा आहे, माणसाला आवाज आहे, शब्द आहेत, बुद्धी पण प्लस पॊइंट मध्ये आहे. एकदा बालपण आठवा आई आठवेल फक्त आईचे कर्तृत्व आणि त्याग तथा योगदान लक्षात ठेवा बस...! माय-बाप, माता-भगिनीला माझा सल्ला आहे आपल्याची काळजी घ्या, स्टाईलने जगणारी पिढी आहे, कॉपी-पेस्टची नीच प्रवृत्ती समाजात कुठ तरी उदयास येत आहे. अंधारात रावण आहे रावणात महिला द्वेश नव्हता पण बदनाम झाला आणि "बदनाम राक्षस बननें देर नही करता"

काळजी घ्या ! स्वतःला जपा !! सतर्क-सावधान राहा...!!!


धन्यवाद...!!!

Saturday, 23 November 2019

कर्माची फळं...!

शिर्षक :- आयुष्यात एक न एक दिवस कर्माची फळ चाखायला मिळतातचं...

लेखन - पत्रकार एन.के.: ८८०६६०५८५२

[ ज्या अर्थी लहान का असेना सक्षम जिवनगाडा ओढत आपण जगत असतो आणि या जगण्यात आपल्या सभोवताल लहान सहान किंवा आपल्या गस्ती (सोयरीक ; मित्र, नातलग ) मधील लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नात्याने भेटत असतात या नात्यांची सांगड घालताना आपण दिलेला त्याना भाव, वागणं यातून आपल्या मनाची कर्मेद्वार कळून जातात. सेम असेच आपण बाहेरच्या जगात वावरताना जसे आपण वागतो "तसे" कर्मफळ आपल्या हयातीच्या जिंदगानीत मिळत राहतात. ]

      भगवत गीतेमध्ये म्हंटले आहे की "कर्म करत जा फळाची चिंता करू नकोस." खरचं कर्मच माणसाचे सर्व काही आहे. माणसाचे बाबतीत जे काही आज घडत आहे ती आपल्या कर्माची फळे आहेत. कर्माच्या बाबतीत माणूस बेफिकीर बनतो खरं पण त्यानंतर आज ना उद्या त्याच रस्त्याने जाणार आहोत आपण याचा विसर मात्र पडून जातो. शिर्षक प्रमाणे फार काही लांब नाही स्वार्थी कातड्यापासून थोडं सोयरीक बाजूला करून घेऊन जगायला शिकण्याची आज गरज आहे पण त्याची प्रचिती माझं शेजारच्याला यावं या विचाराने आजचा माणूस ग्रासला आहे सत्य. म्हणून आपल्या आज ना उद्याची चिंता करून रक्त आटवून घेण्यापेक्षा "Believe on कर्म" जाणून घेणे बंधनकारक म्हणायला काय हरकत आहे. म्हणून माझ्या विचाराने मी विशद होतो जे काही कर्म झालेत त्याची फळे आज आणि आजच्या ह्या जन्मीच मिळणार आहेत एवढं ग्राह्य असावं. जर जन्मतः चांगलं केलं असेल किंवा हयात जिंदगीत जर चांगलं केलं असेल विचाराने आणि आपल्या सभोवताल असणाऱ्या सजीव असो निर्जीव असो या सगळ्या सोबत असणारी कनेक्टव्हिटी जर उत्तम असेल चांगली आणि डिस-कनेक्टव्हिटी असेल तर भोगाची सरशी जीवनासोबत आहे एवढं जाणून जावं माझं मत. अर्थातच जे तुम्ही करता, राहता, वागता आयुष्यात तुमच्या कडून जे घडलं आहे याची नोंद कुठं ना कुठं होत असते न पुढच्या जन्म बघायला कदाचित परमेश्वराला सुद्धा वेळ नाही त्यामुळे योग्य वेळी या मोबदल्यात तुमची चांगली किंवा वाईट फळे रिटर्न गिफ्ट म्हणून पदरात पडत असतात एवढं जाणते व्हा. खूप दिवसांनी लिहायला घेतलं तस सारांश आणि पिन अगोदरच केलेलं पण आज वेळ मिळाला म्हणून मध्यरात्री लिखाण करतोय अनुक्रमे कर्म आणि फळे यावर संदर्भ झाला पण मी म्हणतो किंवा आपल्या ज्ञात असणारे सर्वजण ह्या विचारातून नक्की गेलं पाहिजे म्हणजे की, किंवा गेले असतील बहुदा आपण किती ही चांगली काम करू पण मानव म्हटलं की एक क्षुल्लक चूक झालेली असते किंवा होते तीच चूक लोक आयुष्यभर लक्षात ठेवतात म्हणजे केलेली चांगली कामे विसरली जातात अलगद पण चुका मात्र अलगद आणि कायम स्मरणात राहतात. म्हणतात ना "Choose Ur Wors Voicely" जितके बोलायच तितकंच बोलायच जास्त बोलायला जायचं सुद्धा नाही हे सज्जड ऍक्शन ऍक्ट समजा हवं तर. भावनेच्या भरात क्षणार्धात व्यक्त झालेलो असतो आपण तेच कुठं ना कुठं पुढच्याच्या मनाला लागून जात आणि आयुष्य भराच दुखणं होऊन बसलेल असत.
         अच्छा मग राहायचं कस अस पण प्रश्न पडतो तेव्हा मी सल्ले द्यायला कोणी मोठा उपदेशक नाही पण जे पटलं ते लिखित स्वरूपात आपल्या समोर विशद होत आहे इतकंच. मग तात्पर्य इतकंच सांगेन की परिस्थिती समजून घेऊन रिऍक्ट व्हा आणि रिस्पॉन्ड करा. आपल्या हातून होणारी कर्मे ही आपली फलश्रुती असतात. चांगल्या फळ प्राप्तीसाठी एक सुंदर उपाय आणि ऑप्शन आपल्याजवळ आहे म्हणजे की चांगले विचार ठेवले तर प्रत्येक क्षणी वाईट कमी करून चांगलं जास्त घेतलं तर हातून नक्की सदकर्म होत राहतील आणि प्लस्पॉइंट म्हणजे समाधान. कोणाच्याही बद्दल किंतु परंतु असल्यास सकारात्मक विचाराने ते बदलू शकतो. अनेक वेळा आपण अनेक गोष्टींना गृहीत धरतो एखाद्या माणसाबद्दल मत बनवण्या अगोदर आपण जर त्याच्याशी जर सुसंवाद साधला तर कित्येक गैरसमज दूर होतील न नाती शाबूत राहतील.

    "आयुष्यात शहाणपण यायला खूप वेळ लागतो आणि तोपर्यंत खूप वेळ निघून गेलेली असते; म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे आणि आपली कर्मेच त्याला सुंदर बनवणार आहेत."

धान्यवाद...!

[ लॉंग टर्म नंतर लेख पूर्ण करायला वेळ लागला त्या बद्दल दिलगिरी ]