Sunday, 27 January 2019

माझा भारत देश महान..!

!!•● जय हिंद 🇮🇳 जय भारत ●•!!

शिर्षक :- वे हमे हरे, पीले और भगवे मे बाटेंगे ; मगर तुम "तिरंगा" पे अडे रेहना...

लेखन- पत्रकार एन.के.

【 "... मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा हा माझा श्री भारतदेशा" म्हणणाऱ्यांची देशभक्ती न खऱ्या माणुसकीची पारख करणार लेखन 】


महाराष्ट्राच्या पावन मातीत आणि भारत मातेच्या कुशीत आपण वाढलो, ज्या मातीत अनेक वीर, शहिद, आणि संतांच्या शिकवणीची भूमी म्हणून असणाऱ्या या मातीत आपण कितीजण भारतीय म्हणून जगत आहोत...? देशातले असणारे १८ पगड जाती धर्माचे बांधव यांच्या सोबत आपण किती बांधव म्हणून जगतो...? आज प्रत्येक कानाकोपऱ्यात भूमीच्या प्रत्येक गल्ली बोळात माझी जातीची माणसं, माझ्या समाजाची माणसं , माझ्या धर्माची माणसं म्हणून संकुचित विचार सरणीतून केव्हा बाहेर येणार आहोत आपण...? शेजारी आणि माझ्या सहवासातील म्हणत कधी आपली टोपी, पगडी शेअर करणार आहोत आपण ? का असंच आरक्षण आणि विविध रंगीबेरंगी झेंड्याची कट्टे म्हणून जगणार आहोत आपण...? अस संकुचित विचार सरणी घेऊन जगात वावरताना माणुसकीची मशाल कुठं तरी वेगळ्या रस्त्याला आपल्या हातून राहून जातेय का काय अशी आत्मपरीक्षण करण्याची गरज आज भासत आहे. प्रजासत्ताक दिवसाच्या आगमनाला कधी तरी त्या तिरंग्याकडे बघून त्या तिरंग्याला कठड्यावर अभिमानाने फडकण्यासाठी किती जणांचा संघर्ष आणि प्राणाची आहुती घेऊन विराजित झालं आहे हे कुठं तरी विचाराधीन होऊन विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. फक्त प्रजासत्ताक आणि स्वतंत्र दिवस दिवशीच देशभक्तीची गुणगान गाणाऱ्या आपल्या पैकी काही जणांना कधी कळणार आहे की ज्या मातीत राहतो , ज्या स्वराज्यात राहतो त्याचे पाईक म्हणून क्षणभंगुर नको तर आजन्म ऋणी राहत त्याचा सार्थ अभिमान आणि देशाचा स्वाभिमान कायम उच्च स्तरावर तेवत ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
आज आपण जगात जगात असताना लहान विचार केला तर आपण आनंद एकाला आणि दुःख एकाला वाटत असतो म्हणजे एक सुखमय क्षण असेल तर आपण आठवतो आपले पय-पाहुणे आणि काही दुःखाच्या क्षणाला विशिष्ट लोकांना आठवत असतो. लक्षात घ्या आपल्या द्विधा मनस्थिती असलेली विचारसरणी किती दिवस आपल्याला सोबत करणार आहे. आपला मुल्क म्हणजे सर्वदूर कलावंतामधले (यात साहित्यिकांसह सर्वच अभिप्रेत) काही विचारवंत आणि राज्यकर्ते- सत्ताधीश यांच्यात नेहमी वैचारिक युद्धे होत असतात. राजकारणी सुसंस्कृत असतील तर ते विचारवंत- साहित्यिकांच्या कलाने राज्यव्यवहार चालवतात. सत्ताधीशांना विचारवंतांशिवाय पुढे जाता येत नाही. राजकारणी वा सत्ताधीश, विचारवंतांना- साहित्यिकांना डावलून आपला अजेंडा राबवायला लागलेत की समजावे आपण हुकूमशाहीकडे निघालोत. (लोकशाही पद्धतीने निवडून येणारे राज्यकर्ते सत्ताधीश लोकानुनय करताना दिसत असले तरी सुसंस्कृत सत्ताधीश हे नेहमी विचारवंतांना बिचकून असतात.) त्यासाठी लक्षात हे ठेवलं पाहिजे की आपण जगत असताना आपल्याला फक्त आणि फक्त आपले आप्तेष्ट नाही तर सर्वजण लागणारं आणि भविष्यात कुठं ना कुठं अडचण किंवा नड मध्ये त्या त्या व्यक्तीची गरज आपल्याला भासणार आहे.
     या उलट अर्थी विचार केला तर आज आपण गेले अनेक दिवस, महिने वर्ष झालं बघतो आहे. विकास काहीसा वेडा झाला आहे गट तट राजकारण एवढंच अभिप्रेत होत आहे. कधी सामान्यांच्या जगण्यावर गदा तर कधी गरीबाच्या माथी माती पडली आहे. अनेक राज्यकर्ते आणि अनेक राजकारणी फक्त पदाच्या मिळवणी पर्यंत आपल्या समाजाला पोषक म्हणून असतात. पण जेव्हा सत्ता मिळते तेव्हा मात्र आपल्याला परक्यासारखं वागणूक देतात. हे कुठं तरी थांबल पाहिजे. म्हणून आज सर्व ठिकाणी चाललेल्या आरक्षणाची झेंडे लक्षात घेतलं ; हक्क म्हणून नक्की घ्या पण किंवा आरक्षण च्या झाडाखाली आपल्या न्याय हक्काला सावली जरी दिली तरी ज्या वेळी आपण आपले लोकप्रतिनिधी निवड करत असतो तेव्हा मात्र तिरंगा टिकला पाहिजे आणि संविधानने दिलेल्या प्रत्येक हक्क आणि न्याय शाबूत राहिलं पाहिजे यासाठी हातात रंगीबेरंगी न घेता केवळ तिरंगा घेऊन स्वाभिमान जगावला तर नक्कीच सशक्त भारत घडल्याशिवाय राहणार नाही. लेख लिहिण्याचा उद्देश एवढंच ठेवलं की आजही अनेक चेहऱ्याच्या सानिध्यात सहवासात राहताना वाटून जात की संकुचित प्रवृत्ती अजून नष्ट झाली नाही. कारण ज्याला भेटतो तो काही वेळा काही संदर्भाला व्यक्त होताना माझी जात, धर्म, पंथला टच मध्ये राहून व्यक्त होत असतो. प्रजासत्ताक दिनाच्या या दिवशी आपण तिरंगा घेऊन हिंडतो हे सत्य, आपल्या छाताडावर तिरंगाचा बिल्ला लावून हिंडतो, राष्ट्रगीताला स्तब्ध राहून वंदन करतो हे सगळं सुंदर आणि छान असत पण काही बदल आहेत ते आपल्यात झाले पाहिजेत. संदर्भ म्हणून राज्यकर्ते आणि समाज यावर बोलताना देशासाठी आहुती आणि संतांच्या या भूमीत आपण फक्त (काहीजण हा) २६ जानेवारी आजी १५ ऑगस्टला देशभक्ती व्यक्त करतात पण कायम माझा भारत देश आणि इथले माझे बांधव म्हणून तिरंग्याच्या प्रति कायम प्रामाणिक राहायला शिकल पाहिजे. पण आपण काही वेळा इतकं सिरीयस नसतो म्हणून आजही आपल्याला सोशल मीडिया आणि टीव्ही वर राष्ट्रध्वज खाली टाकू नका अवमान करू नका , संकुचित जाती धर्माचा भारत नव्हता हे आजही सांगायला लागत. शब्द कडू असले तरी कृपा करून सत्य गोष्टी कायम मनात राहतात. त्यामुळे कुणाच्या भावना या लेखामुळे दुखावले असतील तर क्षमस्व...!


धन्यवाद...!

Monday, 14 January 2019

गरज चांगल्या विचारांची...!

शिर्षक : फक्त जयंती नको ! जीवनात सावित्रीबाई फुलेंची आणि जिजाऊ मातेच्या शिकवणीचा उत्सव होऊद्या...!

【सावित्रीबाई फुलेंची जिवनगाथा, शिक्षण क्षेत्रांच्या सुरवातीसाठीचा प्रयत्न, संघर्ष आणि जिजाऊ मातेच्या व्यवस्थापन आणि एक प्रशासन यासाठीची धडपड लक्षात घेऊन त्या वे (Way) ने वाटचाल करण्याची समाजाला गरज ; संदर्भीय माझा लेख...】

लेखन - एन.के. (पत्रकार)



शाळा नसत्या तर आपण खूप निबंध वाचली आहेत, असतील. पण लक्षात ठेवा जर शाळा नसत्या तर आपण असतो का हो ? म्हणजे शब्द, हावभाव, संभाषण हे सर्व काही अंधुक असल असत. म्हणजे अळणी म्हणतो ना आपण अस एक बेचव जीवन म्हणून आपल्या वाट्याला जगण आलं असत. शिक्षण उद्गात्या सावित्रीबाई फुले यांनी जर शिक्षणाची दारे उघडली नसती तर आज जगण्याला एक अर्थ म्हणून काहीच राहील नसत. आणि जिजाऊ मातेने जर शिवबा दिला नसता तर हा महाराष्ट्र एक लोकशाहीच्या कट्टर शिकवणी पासून किंवा एक नेतृत्व म्हणजे काय या बोधाला मुकला असता. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यात दोन महान व्यक्तिमत्वाच्या जयंत्या आपल्याला साजरी करायला मिळतात. हार, श्रीफळ आणि अगरबत्ती वाहून तर काही ठिकाणी केलेल्या पूजेचे धन्य मानले पाहिजे इतकं देखणी जयंती उत्सव डोळ्यांचे पारणे ही फुटेल इतकं छान सगळं चालेल असत लक्षात घ्या; आई जिजामाता ज्याने हा महाराष्ट्र घडवलं आणि एवढंच नाही तर सत्ता म्हणजे काय प्रजादक्ष राजेशाही म्हणजे काय याची प्रचिती घडवणाऱ्या शिवबाला आणि त्याग म्हणजे आणि मृत्यू अटळ असून शेवटच्या स्वासपर्यंत लढवय्या शंभूराजा दिला. आणि दुसरीकडे ज्या स्त्रीने अंगावर दगड धोंडे झेलत महिलांच्या शिक्षणाची दरवाजे खुले करत आज समाजात उंच मानेन महिलेला स्थान आहे त्याच्या मूळ म्हणून किंवा महिलांच्या हक्काच्या उद्गात्या सावित्रीबाई फुले या दोन महत्त्वाच्या महान व्यक्तिमत्वाच्या जयंत्या ह्या आपण संक्षिप्त किंवा वाजत गाजत करतो याची खरी गरज आहे का ? त्यांनी दिलेल्या वचन आणि बोधमृताचा परामर्ष आपण असे फेडायचे का हो ? दोन्ही महान व्यक्तिमत्त्वाचा इतिहास पाहिलं तर समाजासाठी आणि तळागाळातील लोकांपर्यंत साम्राज्य असो किंवा एक दक्ष कारभार असो किंवा एक शैक्षणिक गंगा दारोदार पोहचवऱ्याचा आदर्श व्यक्तीमत्वाच्या शिकवणीचा पांग आपण या पद्धतीने फेडणे कितपत योग्य...? ज्या संकुचित वृत्तीच्या आज जयंत्या होत आहेत यावरून एक खंत वाटून जाते की अमुक-तमुक विशिष्ट जाती प्रवर्गातील लोकांनी आपापले महापुरुष आणि देव वाटून घेऊन त्यांच्या जयंत्या ह्या संघर्षातून केली जात आहे पण कुठं तरी त्यांचा इतिहास , बोध आपण मागे सोडून जात आहोत का अशीही भीती वाटून गेल्याखेरीज राहणार नाही.
आजच्या महिलाबद्दल लिहायचं म्हटलं की,अनेक प्रश्न उभे रहातात,द्विधा मनस्थिती होते. ती आधुनिक काळातील महिला असो वा पुर्व काळातील महिलेचा विचार केला तरी अनंत यातना मग यात(मानसिक यातना असो वा शारीरिक) सोशिकतेची,सहनशिलतेची सुंदर वरदान असणारी 'स्त्री' कालची स्त्री -तीची मानसिकता,तीचे स्थान,तीची अवहेलना तीला गृहित धरने हेच तीच्या माहितीत होते, पुरुष प्रधान असलेल्या या समाजात तीला सोशिकपणाशी मुलीची बाई म्हणुन नाळ थेट जोडलेली असायची याप्रमाणे सावित्रीबाई फुले यांचे आगमनही त्याच काळातले. परंतु नशिबाने महात्मा ज्योतीराव फुले यांच्या अमृत सहवासाने सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणसाठी जीवाचे रान करत स्त्रिशिक्षण सुरु केले.त्यांची ती अभुतपूर्व कामगिरीने आजची महिला जन्माला आली.
       याचप्रमाणे जिजाऊ मातेने सुद्धा एक राजा घडवताना शिवाजी महाराजांच्या प्रजादक्ष अजेंड्याच्या कायम पाठीशी राहून स्वराज्य घडवण्यासाठी मोलाचे योगदान दिले. शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येक नवीन योजना किंवा प्रजेला दिलेलं वचन पूर्ती करत असताना त्यांच्या समोर माँसाहेब यांच मार्गदर्शन म्हणून कायम पाठीशी असणारी एक सक्षम आई, स्त्री म्हणून जिजामातेने प्रतिनिधित्व केलं. 
या दोन्ही महान नेतृत्व किंवा समाजाच्या सुपिकतेसाठी आपलं जीवन वाहिलेल्या महिलांच्या जीवन चरित्र पाहिलं तर कोणत्याही अत्याचाराच्या विरोधात उभे राहून लढणे, किंवा पुरुषांच्या साथीने वाटचाल करत समाजात एक महिला म्हणून वेगळं स्थान न प्राप्त करता आम्ही ही सर्व गुण संपन्न असून आम्ही ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो, लढा उभारू शकतो हे दाखवून दिलं न याला सपोर्ट म्हणून यांचा इतिहास असणार आहे.

...पण खंत ही कधी कधी वाटून जाते की आमच्या काही महिला वर्गांना फुल्यांची सावित्री कधी कळलीच नाही, सत्यवानाच्या सावित्री मधेच अजून अडकून आहेत, जिजाऊ मातेचे किंवा अनेक आदर्श घ्यायला पाहिजे असे पण आज ही आपण मार्गशीर्ष गुरुवार आणि उपवासाच्या दिनचर्येत व्यस्त आहोत...अंधश्रद्धा आणि श्रधिक गोष्टीवर भाष्य केले तरीही काहूर माजेल इतकं भीती असते पण आज काळाची गरज पुढ्यात असलेल्या प्रगतशील राष्ट्रांचा दृष्टिकोन बघून त्या अनुषंगाने उच्च शिक्षण पासून ते एक व्यवस्थित लाईफ यासाठी महापुरुष यांच्या जयंत्या ऐवजी त्यांचे बाळकडू, बोध लक्षात घेऊन त्या रस्त्याने आपली वाटचाल हवी अन्यथा समाज अजून कुठं ना कुठं बॅकलॉगला आहे असं भविष्यात म्हणावं लागेल...!

संक्रातीच्या या शुभ मुहूर्तावर चला तर मग छान छान आणि गोड विचारांची उधळण करूया, मनापासून गोड सणाच्या ;मकर संक्रातीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...!

धन्यवाद..!

मो. 8806605852

Tuesday, 8 January 2019

जगण्यातला व्यवहार रुपी प्रवास...!

शिर्षक : जगणं = व्यवहाराच्या सावलीतलं एक अप्रत्यक्ष प्रवास...

 【 ...अर्थात जगण्याच्या पंक्तीतल्या माणूस आणि व्यवहार मधला जिंदगीच्या संघर्षाचा काळ आणि द एन्ड यावर कटाक्ष टाकणार माझं लेखन !】

लेखन :- एन.के. (पत्रकार)

    सर्वांचं मानापासून धन्यवाद; माझ्या प्रत्येक वैचारिक गोष्टीला आणि सत्य परिस्थितीला शब्दात मांडून आपल्या पर्यंत जेव्हा जेव्हा पोहचवल तेव्हा तेव्हा मला तुम्ही प्रत्येकांनी भरभरून दिल. प्रेरणा आणि एक उमेद मिळावी इतकं स्तुतीसुमने माझ्या पदरात दिलात त्याबद्दल दहे दिल थँक्स..!

   हे बघा ! व्यवहार सगळेच जपतात पण माणसातील माणूसपण जपलं गेलं पाहिजे ह्यासाठी आग्रही असणारी व्यक्ती म्हणून प्रत्येकाने स्वतःकड बघितलं या पेक्षा स्वतःला घडवलं तर जीवन खरचं सुंदर वाटल्याखेरीज राहणार नाही. सामन्यात जगायला म्हणून पाहिजे ते करत सुटणारे आपण कधी स्वतःकडे लक्ष देत नाही ही सर्वात मोठी खंत आहे. वयाच्या बालपणात मोकळी स्वप्न कवटाळून जगण्यात मजा वेगळी होती, पण तारुण्यात अस कोणतं अस भूत अवतरलं की आपण जोतिष्य झालो न भविष्याच्या सु- (चांगल्या) च्या पाठीमाग धावताना या जीवन गाण्याला व्यावहारिक बनवून घेतलं. मनसोक्त जिवन जगायचं म्हणून किंवा रिलॅक्स राहायचं म्हणून आपण कमवायच्या नादी लागून बसतो मग हळू हळू ४०-५० शी ओलांडत मग मग या हायब्रीड जगण्यात आपल्याला रिलॅक्स राहू इतकं वेळ त्या वयात संपून जाते. यासाठी मग कोणत्या शेड्युलने जगायचं काहीच गरज नाही तर एक माणूस म्हणून जन्माला आलोय तर माणूस म्हणून वावरूया जसे माणस अशी कमवा की २ शब्द शेअर करताना ऐकायला ४ जण असायला हवे सोबत. नाहीतर रोजीरोटीतर आज भिकारी पण कमवून घेऊन खातो. मग आपल्या सूट-बुटला काय किंमत ? म्हणून नात्यांची कदर करायला शिका कारण कुणीतरी किती सहजपणे नात्यांचं मनोगत सांगून गेलं आहे. " जी नाती मनाने जोडली जातात ती कधीच तुटत नाहीत" मग ते प्रेम असो की मैत्री..." अस सिम्पल राहायच. लक्षात घ्या कुणीच कुणाची साथ आयुष्यभर देऊ शकत नाही पण तुम्ही कुणाच्या जगण्याचे अविभाज्य घटक होता तेव्हा ते नातं नक्कीच कॅज्युअल असतं नाही हे मात्र अगदी खरं आहे. अनेकदा तुम्ही जीवापाड जपलेल्या नात्यात गैरसमजुती , मतभेद स्वतःच्या पाऊलखुणा मागे ठेवून जातात पण एका सॉरी ने आणि माफ करण्याने ती नाती पुन्हा सहज जुळली जातात. हा टर्निंग पॉईंट कायम मेंदूवर अधोरेखित करून टाकूया. का नाही जुळणार शेवटी ती आपली असतात आणि कायम कोणत्या ना कोणत्या वळणावर आपलीच राहतात. लेखाच्या शीर्षक प्रमाणे प्रत्येक माणूस व्यावहारिक जीवनाला चिकटला आहे असं नाही तर आज सामन्यात विचार केला की खेड्यात राहणारा माणूस जरा शेजारच्या घरातून आवाज आला की "काय हो काय झालं...?" म्हणून विचारणारा व्यक्तीश: आपुलकी आपल्याला शहरातल्या बनलेल्या आर.सी.सी. मनामध्ये दिसते का हो...? शेजारी कोण राहतो आपल्याला माहिती नसत पण गावातल्या प्रत्येक लहानातल्या लहानग्या तान्ह्याला गावातील गल्ली न घर न बोळ माहिती असत याचा या जगण्याशी काय संबंध म्हणून तुम्हाला प्रश्न पडणं साहजिक आहे लक्षात घ्या माणूस म्हणून एखाद्याच्या ज्ञात असणं म्हणजे ओळखीतून हुन जास्त आहे कारण आजकाल ओळखीच्या माणसाचा उपयोग फक्त काम आठवलं की लक्षात येणं अस पाढा बनला आहे. म्हणून कायम आपल्या माणसाच्या सलग्न राहा सोबत करा शेअर करा कारण आठवत का बघा एक रिच लग्न आपल्या सगळ्यांना आवडलं असेल पण माझा वैचारिक किंवा काही जणांनी केला असेल नाही माहीत नाही पण एक गोष्ट लक्षात आली. भारतातील नामांकित श्रीमंत अंबानीना आपण सर्व जण ओळखतो माझ्या मते... झालं असं की इशा अंबानी च्या लग्नाचे काही व्हिडीओ बघायला मिळाले लग्नात केलेली अप्रतिम सजावट पाहिली मंत्री, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील दिग्गज यांची मांदियाळी पाहायला मिळाली आणि सोबत पूर्ण हिंदी सिनेसृष्टी तिथे अवतरली होती,  सहज मनात विचार येऊन गेला आपली मुंबई म्हणजे महाराष्ट्राची राजधानी आणि इथल्या मातीत मराठी चित्रपटाने अगदी ऑस्कर पर्यंत झेप घेतलेली...; दर्जेदार कलाकार , साहित्य आणि चित्रपटांची निर्मिती हा मराठी सिनेसृष्टीचा चेहरा आहे पण तरीही एकही मराठी कलाकार ह्या समारंभासाठी आमंत्रित दिसला नाही. का कुणास ठाऊक पण महाराष्ट्रात राहण्याची खंत वाटण्या इतपत थोडं का होईना पण वेगळं आहे हे...काय आहे ना महाराष्ट्राच्या भूमीत राहून मराठी अस्मितेच्या जोरावर आणि या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या मातीत जन्म घेऊन जग विख्यात बनणारी लोकं आज मराठी अस्मिता विसरून जात आहेत का काय ही मला खंत वाटली इतकंच म्हणून हा विषय. तसं पण हे दुःख आजकाल व्यक्त करायचीही महाराष्ट्रात भीती वाटू लागली आहे कारण मराठी आणि महाराष्ट्र ह्या दोघांचा संबंध आता तुटू लागला आहे का अशी भीती निर्माण झाली आहे. म्हणून हा उदाहरण यासाठी की आपण अशा सेलिब्रेटीच्या आयडॉल म्हंणून उपयोग करतो पण लक्षात ठेवा की लेखाच्या शीर्षक प्रमाणे आपल जनजीवन आणि जगणं हे आपल्या माणसासोबत असायला हवं तेव्हाच कुठं तरी आपल्या जगण्याला अर्थ असणार आहे अन्यथा परके न वेगळे या व्याख्यात आपलं जीवन बेजार झाल्याशिवाय राहणार नाही. साधारणतः शहरी जीवन जगण्याच्या बरोबर ग्रामव्यवस्था सुद्धा सुधारित आवृत्तीच्या छायेत असली पाहिजे यासाठी ही प्रयत्न झाले पाहिजेत. भारतामध्ये प्रजासत्ताक स्थापन झाल्यानंतर लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली गेली आहे. स्वातंत्र्य, बंधुता, समता आदी अनेक तत्वांचा त्यात समावेश आहे. जगण्याच्या सोयी सुविधा सोबत राहणीमान सुद्धा उंचावला आहे याचं मुख्य कारण म्हणजे शिक्षण आज तळागाळापर्यंत पोहचल आहे. पण समता रुजली आहे का हा महत्वाचा प्रश्न सुद्धा पडून जातो. कारण माणूस हा माणूसच रक्त लालच पण आजही वेगळ्या जातीची आणि धर्माची लोक आजही खेड्यात वेगवेगळ्या गल्लीत राहतात म्हणजे हमारा हमारा अलग अशी किंचित राहणीमान दिसून येत. त्यासोबत त्यांचे राहणीमान आणि व्यवहार ही वेगळाच दृष्टीस येतो. याचे सुद्धा परिवर्तन झाले पाहिजे यासाठी आपले जगण्याचे व्यवहारात थोडं बदल केल की नक्कीच यात बदल घडतील.
          ...कारण माणूस म्हटलं की मरण आहे आणि आज ना उद्या आपल्याला मरायचं आहे पण इतकं हे जीवन फक्त कमाई, अच्छाई म्हणून जगायला आपण वेडे आहोत का अस म्हटलं तर वाईट वाटू नये कारण माणसं आणि झाडं ह्या दोघांची तुलना आपण करून बघूया झाडांसारखीच माणसांची वेगवेगळी रूप आणि भोग सुद्धा. आता हेच बघा ना कुंडीतली झाडं ही मुळातच नाजूक, अती ऊन वारा न सोसता येणारी, कुंडीच्या सुरक्षित आश्रयात स्वतःची मूळ रोवून बहरणारी. ह्या झाडांना कठोर राहता येत नाही की वागताही येत नाही. ताठरता हा स्वभाव नाही. सुसंस्कृत , संवेदनशील आणि भावुक माणसं देखील अशीच असतात. संस्कारांच्या चार भिंतीत सुरक्षित आयुष्य जगणारी, स्वप्नांळू ,कुणी दुखावू नये म्हणून काळजी घेणारी, हे जग आपल्या सारखंच साधं सरळ आहे असा विचार करत वाईट अनुभवातून ही सहज कोलॅप्स होतात कारण कुठल्याही कोणताही अपघात न पचवता फक्त व्यवहार म्हणजे मी न माझ संसार किंवा माझी माणसं म्हणून जगणाऱ्या माणसाला कधी कधी लोकांनी टीका केली , निंदा केली तरी स्वतःच्या मुळांना ही चिकटून राहतात. कोणताही बदल दर्शवत नाहीत. अर्थात गुलाबाला काट्यांच सौरक्षण असत पण गुलाब प्रत्यक्षात हा मात्र कोमलच असतो ना ? कुणी दुष्टपणे कुंडीतून उखडून टाकलं तरी जगण्यासाठी लागणारी धडपड ह्यांच्या अंगीच नसते म्हणूनच ती छोट्याशा आघातानेपण ह्या जगाचा निरोप घेतात. मग हा उदाहरण आपल्या जीवनाला समानार्थी ठरतो कारण आपण फक्त आपल्या व्यवहाराच्या कुंडीत राहून आपलं जीवन जगत असतो. जरा बाहेरच्या जगाचा टेक्निकल थिंक करून बघा नक्कीच छान वाटेल. नाहीतर या व्यवहाराच्या जगण्यात आपलं जगायचं हिशोब चुकून जाईल ; हो ना...? मग आजपासून कस जगायच आणि मानवी व्यवहार बाजूला करून कसा वाईट मायनस आणि चांगलं तेवढं प्लस करता येईल न यातून एक सुंदर जगणं जगता येईल ठरवून घेतलं तर बर वाटेल...!

   धन्यवाद...!

मोबाईल. - ८८०६६०५८५२

Wednesday, 2 January 2019

ए मितवा : जगण्याला पंख फुटले !

शिर्षक - 😍हेssss माझ्या जगण्याला पंख फुटले...; प्रेम न प्यार भरी जिंदगी की कहानी...!

लेखक - आपला एन.के....✍
मोबाईल - ☎-8806605852


एखादी व्यक्ती आपल्या सोबत सु-भाषित आणि नवखी आहे. तिच्या सोबत जस जसे संपर्क वाढत जातात मग प्रत्येकाला आपली बाजू "बाहुबली" म्हणून आपण चांगले मित्र या पेक्षा जिवलग मित्र आहोत असे भास होऊ लागतात. मनाने मग एखाद्याच्या डोक्याखाली उशी प्रमाणे विसवून जाण्याची मग स्वप्ने प्रत्येकाला पडू लागतात. साधारणतः मी एक जेन्ट्स या नात्याने विचार करून लिहावं म्हटलं या बद्दल तर जस म्हणतात ना "आदमी सब एक जैसे होते है..." अस जर एक सुंदर न सुशील महिला समोर बोलायला आणि इकडे ही स्वतःला सलमान खान समजणारे मग हळूच प्रेमाच्या चादरीत आपली प्रेमाची शेकोटी शेकून घेण्याचा एक अविभाज्य युद्ध सुरू करतात किंवा होतात. मला सांगा अशी मैत्री किती दिवस टिकते हो...? मग हा मैत्री पद्धतीचा किस्सा किती दिवस न किती काळ टिकणार प्रभूच जाणे ना...? टिको न टि माणसाची बोलण्याची पद्धत न रोजच्या रोजमराच्या जिंदगीच्या रुळावरून जरा त्याच्या-तिच्यासाठी प्लॅटफॉर्म सोडून बाजूला येऊन अवगत कला म्हणून हवं तर छान छान बोलून आपलं करून घेण्याची मग दोन्ही बाजूने इनिंगज चालू होतात. प्रत्येक जण एकमेकाला पहिल्या दोन तीन वाक्यात पूर्णतः समजून जात जातात. मनाच्या कोपऱ्यात कुणाला ना कुणाला या पेक्षा एक पुरुष जातीला न त्यातील काही वयोगटातील न अपवाद यात ७० ते ८५% जणांना लवकरात लवकर महिला किंवा मुलगी आपल्यात असावी न आपल्या प्रेमाच्या बाहुपाशात सामावी अशी वाटते. महिला अपवाद वगळता त्यांनाही काहीना तस वाटत..नाही असं नाही त्याही शेवटी "दिलं तो बच्चा है जी" च्या श्रोते असतात त्यांना अपवाद कसे वगळून चालेल...? मग प्रशंसा , आवड निवड मग परत गर्लफ्रेंड सारखी जानू, बाबू, राजा, राणी मग चालू होतं. न प्रेम होतं मग तो "मै प्यार का प्यासा " मग तिकडून ही आवाज येतोच "मै प्यार की पुजारीन" हा मग अस पाढे चालू होतात. सामान्य माणूस म्हणून विचार करायला जरा सुदीक वेळ नसतो आमच्याकडे आणि पुढच्या महिलाकडे एक साम्राज्य, स्वप्न, आयुष्य आहे हे विसरून तिला किंवा आपल्याला प्रेमाची भूक लागू लागते हळू हळू आशा पल्लवित झाल्या की मग प्रेमाच्या गोष्टीत वाढ, कधी कधी कॉल तर कधी कधी लेट नाईट चाट आपल्याला आपलं भान आणि पुढच्याला स्वतःच भान नसत. रंगवलेल्या कल्पक गोष्टीत जवळीक न हळूच येऊ घातलेल्या संभाषित मिठीत या बर्फाळ थंडीत दोघ विसरून जातात अस काहीस जगात प्रेमाच्या नवीन फॉरवर्ड रिलेशनशिप बनत असतात. ही बाजू झाली क्रमांक एक.
स्वतःच्या जीवनात किंवा इतरांच्या विचारांचा घेतलेला एक क्षण किंवा प्याराग्राफ म्हणून पाहिलं तर प्रेमाची मानस अस बनतात का हो...? हा प्रश्न मला पडला साहजिकच लेख लिहायला घेताना वर्णन न शब्द कसे पटलावर घ्यायचे समजलं नाही पण सत्य उत्तरावं न याची सत्यता माझे वाचक म्हणून तुम्ही द्याल अस ठरवलं...!
मग दुसरी बाजू काय ...? - मित्र न मैत्रीण म्हणून जीवनात येणं चूक नसत लक्षात घ्या, जिंदगीमे हर दिन नया है यहा रोज चेहरे नये मिलते है अस नवीन मित्र मैत्रिणी ज्या नात्यातून पलीकडे भेटतात तुटतात यालाच जिंदगी म्हणतात न हे सगळं सोडून घर, दार, संसार , काम याला दिलेला वेळ म्हणजे भविष्य म्हणून चुकीच पाहिलं गेलेल्या स्वप्नासाठीची धडपड. हे बघा नाती जपायचं म्हणून हवं तसं "जैसे थे " एकमेकांच्या भेटीत आलो तर एक सुंदर नात प्लस पॉईंट म्हणून विश्वास पूरक नात निर्माण होत. इथं एक प्रेमाचा विषय चालू आहे तर असे की जर बोलण्याच्या रुपरेषेत आपण जर लक्ष्मण रेषा ओलांडली नाही म्हणजे जस आहोत तस मानापासून एकमेकांच्या सानिध्यात व्यक्त पासून ते वर्तन घडवून आणलो तर पुढची किंवा पुढचा तुमचा फॅन लवकर नाही होणार पण खरं असलेल्या तुमच्या मनावर नक्की फिदा होईल मग तुम्ही "मुझे प्यार हुआ प्यार हुआ अल्लाह मिया" म्हणून नाचल तरी चालेल. म्हणजे अस की एखाद्या बद्दल जाणून घेतल न एकमेकांच्या चांगल्या वाईट बद्दल जाणून घेऊन त्या अनुषंगाने आपण त्यांना आणि ते आपल्या समोर व्यतीत झाले न त्यांच्या किंवा आपल्या सुखदुःखात सुखावणार एक पुष्प जर आपण एकमेकांचे बनलो तर नक्कीच प्रेम करायला हरकत नाही मग प्रेमाची व्याख्या ही अशी असावी : काळजी करणार, अडचणीला धावून जाण्यासाठी कोणताही स्वार्थ न पहाणार, चेहरा, रंग, रूप, ढंग न पाहता कायम एकमेकांसाठी पाठीशी असणार नात रुपी प्रेम झालं तर नक्कीच या प्रेमला जागतिक संमती असायला हरकत नाही. सकाळचा चहा ते शुभ रात्री पर्यत तिच्या सोबत गप्पा टप्पा सुरू होऊद्यात मग असच या दिनचर्येत "आप मुझे अच्छे लगने लगे" म्हणून गाणं जरी म्हटलं तर तेही रिप्लाय मध्ये तुम्हाला "तेरे ईशक मे नाचेंगे..." म्हटल्याशिवाय राहणार नाहीत. एकमेकांच्या काळजीत जगायचं म्हणून मग तिला आपल्या प्रेमाच्या उदाहरण किंवा स्टंट न करता आपलं मन न तिच्या बद्दल असलेलं मानसिक प्रचिती विचार जैसे थे व्यक्त व्हा मग तुम्हाला ही ती तस व्यक्त झाली किंवा होत असेल तर हेवा एकमेकाच्यात वाढेल मग दोघ प्रेम करू शकता न ते प्रेम चिरकाल टिकेल १००% ग्वाही आहे माझी. मग हे इंग्लिश १४३ ( आय लव्ह यु ) च काय करायचं आणि १८1 ( एक आठवण) च काय...? सांगतो ; प्रेम केल्यावर लगेच इंग्रज व्हायचं नाही तर एक खोडकर मैत्रीण म्हणून पाहणाऱ्या तिची आठवण आली तर मिस यु म्हणून मेसेज केलं किंवा तिला मिस केलं तर गैर नाही, किंवा तिच्या प्रशंसा न तिच्या मनाला बर वाटल पाहिजे म्हणून अस फक्त छान म्हणण्यापेक्षा आपल्यासाठी ती नुतन आहे पण आपली जिवलग आहे म्हणून लव्ह यु म्हटलं तरी नो प्रॉब्लेम ना गाईज...? अशा प्रेमाचीही गोष्टी ज्ञात आहेत पण लक्षात घ्या ह्या दोन्ही गोष्टी (क्रमांक ) एकत्र आल्या वाईट काहीच नाही पण समवयस्क असल्यास शब्द राईट टू ऍक्ट असल्यास तर नक्कीच लग्न हा एक सेफ न सक्सेस पर्याय बनवु शकतो न एक सुंदर कुटुंब म्हणून रेशनकार्ड साठी अप्लाय करू शकतो. हसू नका एक रेशनकार्ड म्हणजे कुटुंब न कुटुंब बनल की जिंदगीची एक टास्क बनून जातो न असच मनाने जगात राहिलो तर जीवन अफल ना सो म्हणून हे रेशनकार्डच उदाहरण.

तात्पर्य म्हणून काही घेण्यासारखं असेल किंवा असावं असही वाटत नाही मनापासून जपणारा - जपणारी असेल तर नक्कीच एकमेकांवर सुंदर प्रेम करा, नाती जपली जातील असे भाष्य आणि वर्तन असुद्या विरह असुद्या, तिच्या न त्याच्या बद्दल कायम आदर असुद्या, न प्रेमात विरह न आठवणीच मोठ्ठ गाठोडं असुद्या मग एकदा गुणगुणा "याद आ राहा है..." ; कारण विरह सहन केल्याशिवाय प्रेम करता येत नाही आणि विरह झाल्याशिवाय मनमोकळं न स्वच्छ प्रतिमेने आपण एकमेकाला व्यक्त होऊच शकत नाही न जेव्हा फ्री माइंडेड ने आपण व्यक्त व्हायला दोघ शिकू तेव्हाच प्रेम होईल न तेव्हाच प्रत्येकाच्या जगण्याला नवं प्रेम पाखरू मिळेल न कालांतराने या तुमच्या जगण्याला पंख फुटल्याशिवाय राहणार नाहीत.

धन्यवाद...!🙏