Friday, 30 March 2018

एकजुटीची माळ : A Real Battle Of Life

#एकदा एकजुटीची माळ तुटली कि मग आयुष्याचे मणी आस्थाव्यस्थ झाल्याशिवाय राहणार नाहीत...

समाजात जगत असताना आपल्या सभोवताल एक निरीक्षणाची परिभाषा असते मग यात काही तर्क-वितर्क तञ् आले काही जण टीकेची झोड घेऊन शासन चालवणारे आले. पण माणूस म्हणून जगत असताना समाजाच्या पुढं आपण कोणत्या दशेत जातो कोणत्या नीतीच्या झेंड्यासोबत वावरतो हे नक्कीच महत्वाचे आहे. घरामध्ये असलेल्या कुटुंबाचा सहभाग आणि सलोखा सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनाच्या वाटचालीसाठी पूरक असतो. जीवनभरासाठी आपण एकमेकांच्या आणि नवनवीन सहवसाच्या छायेत वावरतो पण प्रत्येकाची भाषा शैली आणि प्रत्येकाचे आचार विचार तथा विचारात्मक देवाण-घेवाण विभिन्न प्रकारचे असतात. या प्रकारात आपलं वैचारिक वळण आणि संपर्काची माळ योग्य असायला हवी आणि जरी अनेक अडचणी एकवटल्या किंवा तुमच्या विरोधात भली भारी ताकद जरी एक झाली तरी सत्य हीच संस्कृती म्हणून चला यश नक्कीच पदरात पडेल.
कारण स्वतःच्या मनावरचा विश्वास आणि श्राद्धीक प्रभुवर असलेलं अजोड प्रेम आणि यातून आपल्यात असलेल्या कर्म विवेक बुद्धीच्या जोरावर केलेली कर्म आणि आपण केलेल्या कर्मावर आणि राहिलेल्या प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की तो इतके देणार, की मागायला काहीच उरणार नाही...!
त्याच प्रमाणे आपल्यात असलेली ती अवीट गोडी कायम ठेवा आपल्या बापाचे काय जाते म्हणून यावेळी अभद्र विचारांना आळा बसवत आपण आतापर्यंत काय शिकलो काय घडलो आणि भविष्यात आपली भूमिका आणि व्यक्ती विशेषण काय असायला हवे याकडे नेहमी लक्ष देणे तितकेच गरचेच आहे कारण आताच्या युगात स्वार्थाला भाऊ आणि माझं ला कुटुंब म्हणणाऱ्याला कधी यशश्री मिळाली नाही पण आपल्या परिस्थितीला एकरूप होऊन योग्य त्या छायेखालून मार्गक्रमण करत आणि प्रामाणिक माळ जपत जो जीवनाच्या वाटेवर जगला तो मात्र आयुष्यभर चांगल्या आणि महत्वाच्या पदावर आपले नाव अलगद कोरला आहे. आणि यासाठी आपल्याला मिळालेली शिक्षण आई वडिलांची शिकवण असो किंवा आपल्या सहवासातल्या प्रत्येक माळाकडून मिळालेली चांगल्या वाईटाची गुरुदक्षिणा यावर आपले प्रभुत्व असेल आणि त्याच उलट जोपर्यंत आपल्यावर देवाची किंवा गुरूंची कृपा आहे, आपल्याजवळ त्यांचा वास आहे, तोपर्यंतच आपल्याला मानसन्मान आणि समाजाकडून लाभणारे प्रेम मिळणार आहे. ज्या क्षणी अहंकार बळावतो, त्या वेळी आपली स्थिती गाढवापेक्षा वेगळी रहात नाही; म्हणून देवाला विसरू नये. अहंरहित रहावे.
आयुष्यात कधीही गर्व करू नका कारण गर्वाने जेवढे मिळवता आले आहे त्याच्या तीनपट घालवण्यात आलेल्या कथा प्रचलित आहेत. आजूबाजूचा समाज आणि माणसं यात आपली भूमिका नेहमी नम्र ठेवा लहानासो कि मोठा नम्रता हि नेहमी आदर सन्मान घेऊन हिंडत असते.


- लेखक- एन.के. (पत्रकार-संकेत टाइम्स)

No comments:

Post a Comment