Thursday, 5 April 2018

एन.के.लिहतात - ऑनलाइन-बिनलाईन

शिर्षक : अनमोल नात्यांची जपणूक होतेय आता फक्त ऑनलाइनवर...?

लेखन : एन.के.
दि. ०५/०३/२०१८

पाहिलं आयुष्याकडे तर वाटत या संसारात अनेक नाती आणि अनेक चेहरे वेगवेगळ्या रंग छटानी बनलेले आहेत. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन जुन्या चेहऱ्यापाठीमाग एक नात्याची ओळख लपलेली असते. सकाळ पासून झोपेपर्यंत अनेक नाती आपल्याला वेगवेगळ्या दृष्टीने आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करत असतात. या सगळ्या चेहऱ्यांना वेगवेगळी नाव आणि नातं असलेल्या या जाळ्यात चांगली आणि वाईट सुद्धा असतात तेवढंच नव्हे तर रक्त नात्यापासून मनाची नाती याबरोबर महत्वाची नाती सुद्धा असतात. आज "शॉर्टकट कम ग्रेट" म्हणून संपर्क आपला मोजका आणि कामपूरत बनत चालल आहे. आई बाबा आज्जी आजोबा ताई दादा काका काकूंची नाती आता मॉडर्न आणि ब्रिटिश राजवटीच्या उदा. ममा-पप्पा, अंकल, ब्रदर, आंटीने घेतलीत. सकाळचा चहा घेताना पारलेने आता गुडडे ने घेतलं असं महत्वाची नाती आता जपली जातात ती फक्त एक १० आकड्याच्या नंबरने फोन झालं की बोलणं झालं आणि मेसेज झालं की आपला उद्देश पोहोचल गेलं अशी संक्षिप्त वृत्ती माणसाची झालीय.
आज नातवाला खेळवायला आजोबा बाहेर येत नाहीत कारण नातवाला त्या व्हिडीओ गेम मध्ये सगळं दिसत अंगण, माया न प्रेम, आज बायकोला हिरव्या मिरच्यांचा ठेचा ऐवजी बाहेरची तंदुरी रोटी रुचकर लागते. अशा गोड सकाळी सगळी बसून स्वतःबद्दल चर्चा करत हवं ते खायला हवं ते मागायला आज कुणाकडे वेळ नाही. मोठ्या आवडीने एखाद्या कार्यक्रमात भेटलो तर चर्चा फक्त माझं घड्याळ, माझं हे न माझं ते न माझी साडी न माझी गाडी यातच आपलं घर जाऊन फक्त भिंतीची माडी उरलीय हे उमजेना झालय. आज संध्याकाळ आणि सकाळ आपली फक्त एका ग्रुप आणि मेसेज मध्ये जातो कधी निवांत चंद्राच्या सावली आई वडिलांच्या मांडीवर बसून इतिहासाची पाने चाळताना आता कोण दिसत नाही. अचानक का होईना पण येणारा पाहुणा आणि त्याच आनंद आता मावळत चालला आहे. फोन वरून येणं सांगितलं जातं न तो येणार आहे म्हणून केलेलं ऍडजस्ट म्हणजे जिंदगी का...? कधी तरी मनमोकळं पणाने सरप्राईज द्या. कधीतरी वाढदिवस नसताना पण घरातले खातील म्हणून केक आणून अचानक फक्त घरगुती वाढदिवस आपल्या आई वडिलांच्या आनंदाचा आपल्या माणसाच्या आनंदाचा दिवस म्हणून साजरा करा ना. फक्त सेलफोन यातच माझं सौख्य सामावल आहे अशी प्रतिज्ञा नको व्हायला. वेळ न मेळ घालून आपल्या सोबत आपल्यासारख वागुया चला. येताय ना.

- धन्यवाद

No comments:

Post a Comment