शिर्षक: - जगण्यातली जि.एस.टी. 0%
लेखन - एन.के. (पत्रकार)
दि. ०७/०४/२०१८
सकाळी उठलो नेहमी प्रमाणे कंटाळवाण वाटत होत म्हणून असच पडून राहिलो. परत झोपताना आठवलं कि अमुक आणि तमुक कामं राहिलेत आणि त्यासाठी उठायला हवं. उठलो आणि अवरलो दिवस सुरवात झालं कामाच्या दिशेने आगेकुच करत -करत दुपार झाली जेवायला बायको कडून आमंत्रणच फोन झालं. जेवल कस बस आणि परत कामाला जुंपल गेलो. आणि संध्याकाळ झाली काही काम झाली आणि काही झाली नाहीत. त्या कामाच्या पूर्णत्वास पुन्हा आखणी आणि नियोजनात सूर्यदेव गायब झाले न आजच्या वर्तमान तारखेचा दिवस मावळला. अशी दिनचर्या रेखाटली गेली. प्रत्येक जण असं स्वतःसाठी किती दिवस जगणार आहोत..? काय केलं आज स्वतः साठी ...? भविष्याची स्वप्न रंगवत रंगवत आज एक एक दिवस मावळत चालला आहे. जगायला जरा आता शिकायला पाहिजे का अशी सध्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सकाळ पासून संध्याकाळ पासून नियोजित कामात दिवस गेला अक्खा. याच पद्धतीने फक्त 'कामात' जगणं हे आता सर्वांचं ब्रीद वाक्य झालं आहे जरा स्वतःसाठी आणि स्वतःच्या माणसासाठी स्मार्ट पद्धतीने जगायला आपण कधी शिकणार...? आपल्या स्वतःची आवड-निवड, आपल्या कुटुंबाचं क्षणिक सही आनंदाचे क्षण आपण कधी 'स्पेन्ड' करवून घेणार...? स्मार्ट सिटी व्हायला लागला पण त्या सिटीतील रहिवाशी मन कधी आपण स्मार्ट करणार...? आहे का उत्तर द्या ना...!!
राहिला प्रश्न उत्तर नसल्या शिवाय प्रभू पण अडचणी निर्माण करत नाही म्हणे.... अहो आपल्या प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही अडचणी आहेतच. त्या अडचणींना आपल्या चाणाक्ष बुद्धीच्या आणि खंबीर मनाच्या जोरावर चांगलं सणसणीत उत्तर द्यायला शिकूया. चला, आपल्या स्वतःची जबाबदारी स्वीकारत स्मार्टपणे जगायला सुरुवात करूया. बरोबर ना आपल्या आजच्या परिस्थितीला आपण सोबत इतर परिस्थितीला कसं सगळेच जबाबदार आहेत, हे पटवून देण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न केला. परिस्थितीनं कसा आपला जवळजवळ बळीच घेतलाय, असं सांगत आपण एका कोपऱ्यात पडून एकाच रडगाण्यात अडकून राहिलो तर अवघड आहे. काही वेळा अडचणी आणि दुःखात स्वतःच स्वतःला बिचारं आणि निर्दोष असल्याचं प्रशस्तीपत्र देऊन टाकलं आहे; पण यामुळे मानसिक स्थितीही फारशी बदलणार नाही आणि प्रगतीही होणार नाही.
अशा वेळी थोडंसं कटू सत्य दाखविण्याची वेळ असते. कोणत्या परिस्थितीत आपण कोणता मार्ग काढतो, कोणता निर्णय घेतो, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. अशा वेळी चुकीचे निर्णय घेतले, तर त्याची जबाबदारीही सर्वस्वी आपल्यावर असली पाहिजे. स्वतःचं दुःख कुरवाळून, स्वतःला बिचारं मानून समस्या सुटत नाहीत. म्हणून असली नकारात्मक मानसिक संरक्षण यंत्रणा मोडीत काढलीच पाहिजे. त्यासाठी अनेक वेळा माझ्या लेखातून सांगत आलोय पडलेल्या आणि सुखलेल्या फुलात व सुगंध आहे तस आपल्या जगण्यावर निर्बंध आहेत ना जीएसटी आहे. जगा ना स्वच्छन्द.
धन्यवाद....!

No comments:
Post a Comment